Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Wheat Market: गहू बाजारातील तेजी टिकेल का? | Agrowon 02.10.2023

देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव स्थिर दिसतात. गव्हाला सणांच्या पार्श्वभुमीवर मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतो. त्यामुळे भावाला आधार आहे. मग सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? गव्हाचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

शेतकरी न्याहारीः दही, चटणी आणि भाकरी| Farmer's Breakfast: Curd, chutney and roti| Agri Unplugged 01.10.2023

दही, शिळी भाकरी आणि विविध चटण्या हा मेनू बघून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. याचं कारण हा साधा आहार असला तरी, तो सहजपणे उपलब्ध होत नाही. ही शेतकऱ्यांची न्याहरी आहे. ज्याच्याकडं किमान एकतरी दुभतं जनावर आहे, तोच याचा आनंद घेऊ शकतो. Curd, chutney, and roti… is a delicious, mouth-watering menu. Although it is a simple diet, it is not readily available. This is the farmer's breakfast. One who owns at l...

Tur Market: तुरीच्या बाजाराची दिशा काय राहू शकते? | Agrowon 30.09.2023

सरकारने तुरीवरील स्टाॅक लिमिटचा कालावधी वाढवला आणि स्टाॅकची मर्यादाही कमी केली. तसेच देशातील काही भागात पाऊस पडत आहे. यामुळे पिकाला फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे. मग खरचं पिकाला फायदा होतोय का? स्टाॅक लिमिट धोरणातील बदलाचा दरावर काय परिणाम झाला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटो बाजारात काय स्थिती आहे? | Agrowon 29.09.2023

टोमॅटोच्या भावाची प्रश्न आजही कायम आहे. देशातील बाजारात टोमॅटोचे भाव नरमलेले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोला अगदी १०० रुपये प्रतिक्विंटलपासून भाव मिळत आहे. मग टोमॅटोच्या भावावरील दबाव कमी होईल की नाही? टोमॅटोचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळद उत्पादनाची स्थिती काय आहे? | Agrowon 27.09.2023

चालू हंगामात वाढलेली निर्यात आणि कमी पुरवठा यामुळे हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पण मागील महिनाभरात निर्यातीसाठी मागणी कमी झाली. त्यामुळे हळदीच्या दरातील तेजी काहीशी कमी झाली होती. मग याचा हळद बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हळदीचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्मटधून मिळेल.

Cotton Market: देशातील कापूस पिकाला कमी पाऊस, कीड-रोगांचा फटका | Agrowon 26.09.2023

जागतिक कापूस उत्पादनात यंदा घट येणार आहे. तसेच देशातही दुष्काळी स्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तसेच देशाच्या काही भागांमध्ये कापूस पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. मग या सर्व परिस्थितीचा कापूस बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांदा बाजार पुढील काळात वाढतील का?| Agrowon 25.09.2023

कांदा बाजाराची कोंडी कायम आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यानी लिलाव बंद केल्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. मग याचा कांदा दारावर काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

केंद्र सरकारला मोझंबिकच्या शेतकऱ्यांचा पुळका कशासाठी?| Central government looking to Mozambique for Tur supplies | Agri Unplugged 24.09.2023

मोझंबिकातील शेतकऱ्यांना भरघोस तूर पिकविण्याची सिध्दी प्राप्त आहे आणि भारतातील शेतकऱ्यांना मात्र ते जमत नाही, इतके ते गयेगुजरे आहेत का? Are farmers in Mozambique more competent to grow large quantities of Red gram than Indian farmers?

Chana Market: हरभऱ्याचे भाव भविष्यात कसे राहू शकतात? | Agrowon 23.09.2023

हरभऱ्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. देशात तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. यामुळे हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभऱ्याचेही भाव वाढले आहेत. तसेच आयातही वाढत आहे. मग वाढत्या आयातीचा हरभरा भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Sugar Market: साखर तातडीने विकण्याचे कारखान्यांना आदेश | Agrowon 22.09.2023

निवडणुकांच्या तोंडावर सरकार कोणत्याच शेतीमालाचे भाव वाढू न देण्याच्या मनस्थितीत आहे. सरकारने आधीच कांदा, टोमॅटो, खाद्यतेल, गहू, तांदूळ अशा शेतीमालाचे भाव कमी केले आहेत. आता साखरेकडे सरकारने मोर्चा वळवला. मग सरकारने साखरेच्या बाबतीत काय निर्णय घेतला? साखरेला सध्या काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: देशातील बाजारात तुरीला काय भाव मिळतोय? | Agrowon 21.09.2023

देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आल्यानंतर मागील काही दिवसांपासून मात्र स्थिरावलेले दिसतात. तुरीचे भाव मागील सहा महिन्यांमध्ये जवळपास दुप्पट झालेले आहेत. पण मागील काही दिवसांपासून तुरीचे भाव स्थिरावले आहेत. मग तुरीचे भाव कशामुळे स्थिरावले? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? | Agrowon 20.09.2023

मागील हंगामात घटलेले उत्पादन आणि निर्यातीला असलेली मागणी, यामुळे जिऱ्याच्या भावात चांगली तेजी आली. जिऱ्याच्या भावात चालू हंगामात सुरुवातीपासूनच वाढ होत गेली. पण मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. मग जिऱ्याच्या भावातील तेजी का मंदावली? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांद्याचे भाव वाढतील की दबावातच राहतील? | Agrowon 19.09.2023

सध्या कांद्याचे भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदची हाक दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी गोची झाली. मग याचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळदीचा बाजार वाढणार की नाही? | Agrowon 18.09.2023

चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. पण मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव स्थिरावले आहेत. मग हळदीचे भाव का स्थिरावले? पुढील काळात हळदीच्या भावात वाढ होईल की नाही? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टम...

बेकायदेशीर एचटीबीटी कापसाला परवानगी मिळणार?| Will illegal HTBT cotton be allowed? | Agri Unplugged 17.09.2023

भारतात असलेली मजुरांची टंचाई आणि त्यावर होणारा मोठा खर्च लक्षात घेता एचटीबीटी कापसाला परवानगी दिली जावी, असे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. Considering the shortage of labour in India and the huge cost involved, HTBT cotton should be allowed, said Y. G. Prasad, Director General, Central Institute of Cotton Research.

Tur Market: तुरीची लागवड खरचं ४३ लाख हेक्टरवर पोचली ? | Agrowon 16.09.2023

देशात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील तुरीची आवक कमीच आहे. तर तुरीला बाजारात चांगलाच उठाव मिळत आहे. याचा तुरीला आधार मिळतोय. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? सरकारच्या तूर लागवडीच्या अंदाजावर उद्योगांना संशय का आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटोचे भाव अचानक कशामुळे पडले? | Agrowon 15.09.2023

सध्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. टोमॅटो विक्रीतून वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात टोमॅटोला केवळ एक रुपया प्रतिकिलोपासून भाव सुरु होतो. मग टोमॅटोचा सरासरी भाव काय आहे? टोमॅटो भावावर अचानक दबाव का आला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: नाफेडच्या विक्रीने हरभरा भाव पडतील का? | Agrowon 14.09.2023

हरभरा भावातील तेजी कायम आहे. हरभरा भावात ऑगस्ट महिन्यापासून चांगली तेजी आली. देशातील बाजारात सणांसाठी जुलैपासूनच मागणी वाढू लागते. त्यातच यंदा पाऊसमान कमी आहे. नाफेडनेही विक्री सुरु केली. मग याचा हरभरा बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हरभरा भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

पोळा - बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण | Celebrating The Festival of "Bail Pola" | Agri Unplugged 13.09.2023

सर्जा-राजाला नदीवर नेऊन कुणी आंघोळ घालत असेल, कुणी सर्जा-राजा साज बाहेर काढला असला. त्याची साफसफाई सुरू असेल. तर कुठं हिरवेगार माळरानात चराईला सोडून चककणाऱ्या त्यांच्या शिंगाकडे टक लावून कुणी बसलेलं असेल. पोळा सणाची धामधूम गावोगावी सुरू झाली असेल. पोळा सण बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न असतोय. याच पोळा सणाबद्दल आज तुमच्याशी थोडं बोलावं म्हणलं

Cotton Market: आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस कशामुळे वाढला? | Agrowon 12.09.2023

अमेरिका आणि चीनमधील परिस्थितीमुळे जागतिक कापूस बाजाराला चांगलाच आधार मिळाला. तर देशात कापूस पुरवठ्याची स्थिती चांगली दिसत नाही. त्यामुळे देशातील कापूस बाजारात भाव वाढलेले दिसतात. मग सध्या कापसाला काय भाव मिळतोय? पुढील काळात कापसाला काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Onion Market:कांद्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon 11.09.2023

देशातील बाजारात कांदा भावात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा झालेली दिसते. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भावात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलयन डॉलर्सचा टप्पा गाठेल?| Can Maharashtra become a trillion dollar economy? | Agri Unplugged 10.09.2023

गेल्या काही वर्षांत ह्या देशाच्या आर्थिक चिंतनात एक अंधश्रद्धा तयार झाली आहे. ती म्हणजे वेगवान आर्थिक वाढ हे एकच उद्दिष्ट गाठले की दारिद्र्याचा प्रश्न आपोआपच सुटतो. याला खरे तर फार पुरावा नाही. वास्तविक महाराष्ट्राला आर्थिक वाढीबरोबरच दारिद्र्य निर्मूलनाचा, विषमतेचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल.  In the past few years, a superstition has formed in the economic thinking of this country. That is, i...

Soybean Market: देशातील सोयाबीन लागवड किती वाढली | Agrowon 09.09.2023

सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून आले. पण सरासरी भावपातळी मात्र कायम होती. मग सोयाबीनला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

सरकारचा कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा वार ! 08.09.2023

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील मसूरचा साठा घोषित करण्याची सक्ती केलीय. घोषित केलेल्या साठ्यापेक्षा जास्त माल आढळला तर कडक कारवाई करण्याची तंबीही सरकारने दिलीय. या निर्णयाचा तूर, उडीद, मसूरच्या भावावर काय परिणाम होईल, ते पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.

Cotton Market: नव्या कापसाची आवक कोणकोणत्या बाजारात झाली? | Agrowon 07.09.2023

कापूस वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कमी झाले होते. तर दुसरीकडे काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला. मग नवा कापूस कुठे आला? नव्या कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.