Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ 118 episodes

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

Author

Sakal Media

Category

News

Podcast website

audiowallah.com

Latest episode

Jul 10, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता? 25.07.2025

2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. एकट्या भाजपला 282 जागा जिंकता आल्या. 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.

RAJ'KARAN PODCAST | खोतकर, शिरसाट, गायकवाड, राठोड... शिंदेंचे शिलेदारच शिवसेनेचं जहाज बुडवणार? 18.07.2025

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक एक शिलेदार अडचणीत येत आहे. अर्जुन खोतकरांपासून सुरु झालेले संकट आता संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहचले आहे. या सर्वांमुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषतः यामुळे शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा मालिन होत आहे

“बच्चू कडू : संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा नेता” 11.07.2025

अपंग बांधवांच्या हक्कासाठी गाडी अडवणाऱ्या, आंदोलनातून सरकारला जागं करणाऱ्या आणि राजकारणात लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपंगांचं न्यायासाठीचं आंदोलन, आणि मंत्री झाल्यावरही लोकांच्या दारात पोहोचणारा थेट भिडणारा नेता – हा आहे विदर्भातून उभा राहिलेल्या एका खऱ्या लोकनेत्याचा प्रवास

शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी 04.07.2025

ज्येष्ठांचा सन्मान कसा राखायचा, राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं आहे.अय्यूब कादरी

सुसंस्कृत, कलासक्त! जमिनीवरचे मुख्यमंत्री 27.06.2025

महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी

द्रष्टे, शांत, संयमी राजारामबापू 20.06.2025

राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी

शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता 13.06.2025

उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी

पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं... 30.05.2025

आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी

काँग्रेसचे संकटमोचक, आणीबाणीचे सूत्रधार 23.05.2025

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.

तत्त्वनिष्ठ, निर्भीड, स्पष्टवक्ते...! 16.05.2025

तत्त्वनिष्ठ राजकीय नेते, अशी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.

रुग्णसेवा, राजकीय क्षेत्रातील पितामह 09.05.2025

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे आरोग्य, राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहेअय्यूब कादरी

सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान... 02.05.2025

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी

चित्रपटसृष्टी अन् राजकारणातलाही जादूगर! 25.04.2025

एम. जी. रामचंद्रन हे अत्यंत संवेदनशील होती. भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच अभिनेते होते. अय्यूब कादरी

पटकथालेखक ते मुख्यमंत्री अन् प्रगत तमिळनाडूची पायाभरणी 18.04.2025

पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. अय्यूब कादरी

प्रखर राजकीय संघर्ष, चढ-उतार पाहिलेल्या 'अम्मा' 11.04.2025

सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. अय्यूब कादरी

तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वी 04.04.2025

तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं. अय्यूब कादरी

हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिला 28.03.2025

राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.

ज्योती बसूः देशाला दिशा दाखवली, मात्र 'पीएम'पदाची संधी हुकली 21.03.2025

ज्योती बसू यांच्याकडे 1996 मध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेमुळं ती संधी हुकली होती.

सोमनाथ चटर्जीः असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...! 14.03.2025

संसदीय लोकशाही आणि पक्षीय राजकारण, यात निष्ठा कुठे ठेवायची, हे सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष असताना दाखवून दिलं.

मौलाना आझादः प्रचंड विद्वत्ता, तशीच देशभक्ती 07.03.2025

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली.  

कल्याण सिंहः यूपीत हिंदुत्व रुजवलं, पण.... 28.02.2025

उत्तर प्रदेशात हिंदुत्व रुजवण्यात माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मोठा वाटा होता. 

मुलायमसिंह यादवः धर्मनिरपेक्ष राजकारणाचे चॅम्पियन 21.02.2025

उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

होय, दिल्लीच्या शिल्पकार शीला दीक्षितच! 14.02.2025

शीला दीक्षित यांनी 15 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिल्लीकरांचं जगणं सुकर केलं.

अरुण जेटलीः प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व 07.02.2025

नरेंद्र मोदी सरकारचे संकटमोचक, अशी अरुण जेटली यांची ओळख होती.

लालूप्रसाद यादवः मागासांचा, शोषितांचा आवाज 31.01.2025

कितीही आरोप झाले तरी बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांचं स्थान, महत्त्व अबाधित राहिलेलं आहे.

Listen to the "राज"कारण " Rajkaran podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.