Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Be sure to visit the podcast's website and support the creator: lifeofstories.buzzsprout.com
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Oct 10, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 2002 :बायकोचा मित्र. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.04.2026 11:23
Send us Fan Mail “ओह! इट इज टू लेट’’, म्हणत तो जायला निघाला. त्याला हसून सगळ्यांनी निरोप दिला. तो गेल्यावरही मंजिरीचं ‘राजा पुराण’ चाललंच होतं. माधवला भुरक्यावरून खडसावूनही झालं. रात्री मंजिरी शांत झोपली, पण माधवची मात्र झोप उडून गेली. कारण…‘बायकोचा मित्र!’ माधव-मंजिरीचा नित्यक्रम सुरू झाला, राजा गेला खरा, पण माधवच्या मनातून राजा काही जात नव्हता. मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी त्या राजाने घर करून ठे...
# 1999 : साळींदराचे कोडे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.04.2026 5:43
Send us Fan Mail कल्पना करा की कडाक्याची थंडी पडली आहे. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीने कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवी आहे. साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचायला लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन...
# 2000 : पिझ्झाचा जन्म पोट भरण्याच्या गरजेतून झाला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.04.2026 4:45
Send us Fan Mail ‘हिस्ट्री टुडे'नुसार, पिझ्झाच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल १८८९ मध्ये झाला. खरे तर, राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा (मार्गेरिटा ऑफ सॅवॉय) नेपल्सला भेट देणार होते. त्यांना फ्रेंच जेवणाचा कंटाळा आला होता आणि त्यांना काही स्थानिक पदार्थ चाखून बघायचे होते. प्रसिद्ध पिझ्झा निर्माता राफेल एस्पोसिटो यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी राणीसाठी तीन प्रकारचे पिझ्झे तयार केले, त्...
# 1998 : "अमेझॉन मधले ते सात मंतरलेले दिवस" लेखक संकेत बराले. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.04.2026 11:28
Send us Fan Mail मी ॲमेझॉनमधून मनात एक हुरहूर घेऊन परत आलो…आणि एक जाणीव घेऊन , की त्या सात दिवसांत… माझं शरीर त्याच्या नैसर्गिक घरात होतं ! आणि आता ज्या पिंजऱ्यात मी परत आलो…तो मीच बांधला होता…हळूहळू… एकेक सोयीच्या नावाखाली. अजूनही…कधी कधी…डोळे बंद केले की…ते जंगल आठवतं… विचार येतो , "जर मी पुन्हा तिथे गेलो…तर ते मला ओळखेल का?" आतून एक उत्तर येतं "जंगल आपल्यापेक्षा खूप जुनं आहे…आण...
# 1997 : देवा, त्यांना क्षमा कर.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 31.03.2026 6:49
Send us Fan Mail जेरुसलेमच्या गोलगाथा टेकडीवर, प्रभू येशूचं क्रुसीफिक्सेशन उरकून, दोन मजूर खाली सैनिक छावणीत, क्रुसीफिक्सेशनचा 'मेहनताना' घेण्यासाठी आले. मुकादमाने त्यांना किती खिळे ठोकले विचारलं व प्रभू येशूच्या अंगावर ठोकलेल्या खिळ्यांइतक्या सुवर्णमुद्रा अदा करुन, त्यांना म्हणाला, 'जा ऐश करा!'
# 1996 : अपरिचिताचा शेवटचा दिवस लेखक : अज्ञात ( ॲड. स्वाती लेले) 22.03.2026 7:50
Send us Fan Mail एक टॅक्सी चालक नेहमी रात्रपाळी करत असे. एक दिवस एक वयोवृद्ध गृहस्थ त्याची टॅक्सी भाड्याने घेतात. पण त्यांची एक अट असते - ते त्याला काही रोख रक्कम देणार असतात. त्याच्या बदल्यात त्याने ते सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं व वाटेत एकदाही " का " असा प्रश्न विचारायचा नाही. टॅक्सी चालक त्यांना सगळीकडे घेऊन जातो. परंतु सुरुवातीला त्याला त्यांच्या बद्दल वाटलेलं आश्चर्...
# 1995 : भक्ती ची शक्ती (ॲड. स्वाती लेले) 21.03.2026 6:40
Send us Fan Mail अयोध्येत दररोज एक तास रामकथा रंगायची. त्या दरबाराची सुरुवात एका अनोख्या आमंत्रणाने व्हायची “या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा…” त्या काळात ही केवळ परंपरा नव्हती, ती होती अढळ श्रद्धेची जिवंत अनुभूती. त्या दरबारात एक विद्वान वकीलही नियमित येत असे. भक्तिभावाने तो कथा ऐकत असे, पण त्याची बुद्धी तर्काला सरावलेली होती. एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला, “खरंच येतात का हनुमंतजी?” प्रश्न विचारला...
# 1994 : "एक फोन कॉल" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.03.2026 1:27
Send us Fan Mail “आजोबा, तुम्ही रोज स्वतःच्याच नंबरवर फोन का करता?” “तुझी आजी जिवंत होती ना… ती मला रोज याच वेळी फोन करायची." दुसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी, त्यांना जगातला सगळ्यात गोड आवाज ऐकू आला “हाय आजोबा… फक्त एवढं सांगायचं होतं, की या वेळी अजूनही कुणीतरी तुमची आठवण काढतंय.”
# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.03.2026 4:57
Send us Fan Mail अनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो. त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची. त्यातल्या त्यात वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे संवाद सुरू होतो. त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते. बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. म...
# 1992 : ड्यु प्रोसेस ॲंड राईट टु कौंसेल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.03.2026 11:42
Send us Fan Mail जेव्हा खटला सुरू झाला, तेव्हा गिडियनने न्यायालयाकडे एक साधी, घटनात्मक मागणी केली: "महाराज, माझी अशी विनंती आहे की, या खटल्यात माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एक वकील दिला जावा." जजचे उत्तर सभ्य होते, पण भयंकर होते: "मिस्टर गिडियन, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला वकील देऊ शकत नाही. फ्लोरिडा राज्याच्या कायद्यानुसार, न्यायालय फक्त तेव्हाच वकील नियुक्त करू शकते जेव्हा आ...
# 1991 : माणुसकी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.03.2026 6:48
Send us Fan Mail आज्जी चांगल्या घरच्या दिसत होत्या. अगदी गळून गेल्या होत्या थकव्याने. घाबरलेल्या स्थितीत होत्या. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नव्हते. कसंबसं हे कळलं की कोणीतरी त्यांना बाइकने धक्का मारला आणि त्या पडल्या. ज्याची बाईक होती तो तसाच निघून गेला. त्या सतत एकच गोष्ट सांगत होत्या ,'मी माझ्या मुला सोबत आले, हरवले आणि माझ्या जवळ १०० रुपये होते ते सुद्धा चोरले.
# 1900 : वर्तुळाची शाळा' ले.श्री शंकर कऱ्हाडे (मीनल भडसावळे.) 12.03.2026 5:48
Send us Fan Mail निसर्गावर प्रेम करणारा कवीमनाच्या मुलाची गोष्ट. त्याला शिस्त, संयम लावण्यासाठी एका रेषेत अडकवल. तिथे त्याची शाळा सुरू झाली. मग प्रतिभेला धुमारे फुटले. वडीलांनी पण साथ दिली. त्यातून एका निसर्गप्रिय महान व्यक्तीचा शिक्षण प्रवास सुरू झाला.
# 1989 : कालभैरवाची भेंडोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.03.2026 9:20
Send us Fan Mail तुळजापुरात तुळजाभवानी भवानी मंदिर परिसरात काळभैरव आणि टोळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. वास्तविक तुळजापूर परिसरात भैरवाची अनेक ठाणे आहेत. त्यात कालभैरव, टोळ भैरव, उन्मत्त भैरव, रक्तभैरव, बटभैरव ही प्रमुख आहेत. इथे प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार कालभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचे असून देवीच्या पूर्वीपासून कालभैरव इथे विराजमान आहेत.
# 1988 : स्मशानातील बाप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.03.2026 8:28
Send us Fan Mail पुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.
# 1987 : सावत्र बाप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.03.2026 6:13
Send us Fan Mail तेरावं झाल्यावर रोहित शंकरपाशी गेला आणि तोरा दाखवत म्हणाला, "बघा शंकरराव, आता आई नाहीये. त्यामुळे तुमचं आणि माझं नातं संपलं. हे घर माझ्या सख्ख्या वडिलांचं आहे. मला हे घर विकायचं आहे. तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत रूम खाली करा." शंकर शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुखः होतं, पण रोहितच्या वागण्याचं आश्चर्य नव्हतं. ते फक्त एवढंच म्हणाले, "हो बाळा. मला माहित होतं...
# 1986 : "मी सुंदर आहे ."लेखिका : सुनीता टेंबे. (प्रा. सौ अनुराधा भडसावळे. ) 08.03.2026 10:58
Send us Fan Mail "मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं. आरसा सांगू लागला होता, "ती सुंदर नाही. " अखेर तिनं आईला विचारलं, " मी सुंदर आहे? " आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, " पण तुला...
# 1985 : आंतरराष्ट्रीय महिला दिन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.03.2026 14:22
Send us Fan Mail स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर...
# 1984 : "बैलगाडीचा पायलट," लेखक : विशाल गरड. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 06.03.2026 3:28
Send us Fan Mail पप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले. दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन रानात निघाले. पण चिन्मयला काही बैलगाडी आणि बैल सांभाळता येईना. त्यांने बैलगाडी डायरेक्ट ओढ्यामध्येच लँड केली. “अरे निर्जीव मशिनी चालवण्या परीस हे जिवंत चि...
# 1983 : कर्तव्यापुढे मृत्युची भीती प्रभावहीन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.03.2026 4:58
Send us Fan Mail परिस्थिती संवेदनशील होती. इतक्यात बचाव मोहिमेची बातमी आली आणि त्या महिलेला सकाळी सव्वादहाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. संपुर्ण महिला विमान कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. वास्तविक दुसरीच पायलट मोहिमेवर जाणार होती परंतु आयत्यावेळी एका 23 वर्षीय महिला पायलटच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या या बचाव मोहिमेत, कॅप्टन...
# 1982 : "गोपाळ काल्याच्या प्रसादाचा हात का नाही धुवायचा?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.03.2026 6:12
Send us Fan Mail मुनेच्या काठी गायी चारताना कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी एकत्र केलेला “काला” – आणि त्यामागे दडलेली एक सुंदर कृष्णलीला. देवांनीही तो प्रसाद मिळवण्यासाठी किडे-मुंग्या आणि माशांचे रूप का घेतले? आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नयेत अशी प्रथा कशी पडली? संतांच्या अभंगातून जपलेली ही कथा आपल्याला एकत्र येण्याची, प्रेमाने वाटून खाण्याची आणि सख्य जपण्याची शिकवण देते. चला, गोपाळकाल्...
# 1981 : पांडवांचे स्वर्गारोहण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.03.2026 17:10
Send us Fan Mail पांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक...
# 1980 : "टोकियो ट्रायल्स : बहुमताविरुद्ध ठाम उभा राहिलेला भारतीय न्यायाधीश" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 02.03.2026 9:31
Send us Fan Mail ९४८ साल. टोकियोमध्ये युद्धानंतरचा एक ऐतिहासिक खटला चालू होता. जपानच्या नेत्यांवर युद्धगुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले गेले होते . जगातील अकरा देशांतील न्यायाधीश त्या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले होते. एकामागोमाग एक न्यायाधीश आरोपींना दोषी ठरवत होते. जणू निकाल आधीच ठरलेला होता. पण त्या वेळी एका भारतीय न्यायाधीशाने शांतपणे वेगळे मत मांडले. ते होते न्यायमूर्ती राधाबिनोद पाल. त्यांनी...
# 1979 : "ठेवू नका, देऊन टाका." लेखिका संध्या घोलप. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.03.2026 5:55
Send us Fan Mail ति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं. मी काय केलं? वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेते; पण वाचून झाली की ती लायब्ररीला किंवा मैत्रिणींना देते. उरलेली औषधं केमिस्टकडे परत देते. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या, असं त्याला सांगते. वयोमानामुळे साडी नेसणं कठीण झालं...
# 1978 : "ह्या गाढवाचा मेंदू कुठे गेला?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.02.2026 5:54
Send us Fan Mail गोड शब्द नेहमीच गोड असतात का? कौतुकाच्या शब्दांत लपलेला सापळा कसा जीवघेणा ठरतो, हे सांगणारी ही छोटी पण तीक्ष्ण कथा — “गोड सापळा”. एका चलाख कोल्ह्याने गोड बोलून रचलेला सापळा… आणि त्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर दोनदा विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या गाढवाची गोष्ट.
# 1977 : "हा अंधार कोण आहे?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 27.02.2026 3:28
Send us Fan Mail एकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो. सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी त्याची काही ओळखही नाही. मी कशाला त्याचा पिच्छा पुरवेन? एकदा त्याची माझी भेट करून दे. या गोष्टीला लाखो वर्षं झाली… पण, सूर्य आणि अंधार यांची समोरासमोर भेट परमेश्वरही करून देऊ शकलेला नाही. त्यामुळे...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.