Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.

Auteur

Sudhakar Chodankar

Categorie

Religion

Website van de podcast

sudhakar-chodankar.com

Nieuwste aflevering

15 jan. 2025

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

देवाच्या या आनंदाचे - 21.06.2024

देवाच्या या आनंदाचे – सर्वसाधारपणे आपण सारेच,  काहीतरी करून आनंद घेत असतो . कुणी आवडीचे पहातो, कुणी खातो कुणी ऐकतो, कुणी स्पर्श करून तर कुणी गंध घेऊन आनंद अनुभवत असतो. म्हणजेच आनंदासाठी कृती आवश्यक आहे. पण माझ्या सद्गुरूना न्याहाळतांना एक शोध लागला की त्यांची हरेक कृती आंतरिक आनंदातून उद्भवत आहे. आनंद ही त्यांची कायम  स्थिति आहे. या सहज स्थितीतून त्यांची कृती घडत आहे. काही करून ते आनंद घेत आहेत अस...

कृष्ण मज ना वेगळे पाही 14.06.2024

कृष्ण मज ना वेगळे पाही – कृष्ण भक्त राधेचे हे बोल आहेत. असे का बरे बोलते राधा? एवढेच नाही तर ती पुढे स्पष्टपणे , ठामपणे सांगते – मी मग त्याची होऊनि राही – कृष्णाचा शोध घेता घेता राधा कृष्णस्वरूप हौऊनि राहिली. कशी ? तेच ऐकू या एपिसोड मधून.  

आकळावा श्रीपति येणे पंथे 07.06.2024

आकळावा श्रीपती येणे पंथे - जर हा भगवंत अनुभवाचा व्हायचा असेल तर संतांचा संग आवश्यक आहे , सद्गुरू सहवास आवश्यक आहे. पण या सहवासातून मनास भगवंताचा ध्यास नाही लागला तर मनोमार्ग सुरूच होत नाही. मनाला गती मिळणे पुढची गोष्ट आहे. देव स्वानुभवाचा होणे यालाच आकळावा श्रीपती म्हणतात. आता हा मनोमार्ग कसा घडतो काही कथन घडत आहे या एपिसोड मधून

निवृत्ती तिष्ठतु एकरूप चित्ति 31.05.2024

निवृत्ति तिष्ठतु एकरूप  चित्ति- एके दिवशी नारदमहर्षि आत्यंतिक प्रेमाने नारायणाला विचारतात “ हे भगवंता, आपण कुठे रहाता ?“ तेव्हा भगवंत चटकन उत्तरतात “ अहो नारद महर्षि,   जिथे माझेभक्त गायन करतात तिथे मी असतो”. मला प्रश्न पडतो जर भगवान नारायणाने मलाच प्रश्न विचारला“आता मला सांग, तू कुठे रहातोस?” मी सहजसांगेन मी तुझ्यातच असतो भगवंता “म्हणजे नेमके कुठे म्हणाल तर निवृत्ति नाथांचे शब्दओठावर येतील “ निवृ...

तू अंतरी संचारणारा 24.05.2024

तू अंतरी तू संचारणारा – परमेश्वर सगळीकडे संचारलेला आहे एवढे ऐकून, वाचून, बोलून माझे समाधान नाही होत. त्याचाच साकळीकडे संचार आहे पण मला काय त्याचा उपयोग? माझ्यात तोच संचारून आहे ही जोपर्यंत माझी Reality होत नाही तो पर्यन्त ही केवळ पोपटपंची जाणवते मला. अंगात देव देवी येत असेल कुणाच्या. माझा  अनुभव नाही तो . देव अंगात येण्यापेक्षा अंतरंगात का अनुभवास येत नाही हा माझा ध्यास आहे. असेच प्रकट होत आहे या...

आनंदची अंग आनंदाचे- 17.05.2024

आनंदची अंग आनंदाचे-पांडुरंगाचे परमभक्त श्री संत तुकाराम महाराजांकडुन त्यांच्या अंत:करणात उद्भवणारा अलौकिक आनंदाचा सहज सुंदर उत्सव म्हणा कल्लोळ म्हणा शब्दातून काहीशा अंशाने प्रकट होत आहे. आनंद हे आनंदाचेच अंग आहे. पूर्णातून पूर्णच उद्भवणार अन पुन्हा पूर्णातच एकरूप होणार असे काहीसे म्हणत असावेत - पाहूया आता .

देव आनंदात पाहू - 10.05.2024

देव आनंदात पाहू - देव दर्शन हे एकांगी असते, पण देव भेटी उभयतांची असते. देव भेटीत केवळ दर्शन नसून मार्गदर्शनही असते. जिथे भक्त किवा शिष्याचा आत्मशोधाचा मार्ग सुरूहोतो अन यालाच भक्ति म्हणतात. असा भक्त देवाला प्रत्यक्ष आनंदात पहातो. देव देवळात मंदिरात तीर्थक्षेत्री पहाता येतो. पण भक्तासाठी देव केवळ हृदयाचाच असतो. तेव्हा भक्त पाहू काय म्हणतो ते - देव आनंदात पाहू

मना संत आनंत शोधुनी पाहे 03.05.2024

मना संत आनंत शोधुनी पाहे - संतांना शोधायचे म्हणजे त्यांच्या अंतरंगाचा शोध घ्यायचा. तरच आपल्याच स्वताच्या अंतरंगात डोकावणे घडू शकते. आत्मशोध म्हणतात स्वताचा शोध तो हाच. संत जसे ईश्वरी अनुभवाने सदा आनंदी, समाधानी, शांतिपूर्ण असतात तसे आपण होणे हेच तर जीवनाचे प्रयोजन. तेव्हा साधकाचा हा शोध कसा होतो तेच प्रकट झाले आहे या एपिसोडमधून

तेथेच स्फुरते रामायण 26.04.2024

रामनवमीला अनेकांचे शुभ संदेश आले. अनेकजण जोडून आहेत याचा आनंद होतो आणि या सार्‍यांचा मी खूप ऋणि आहे या जाणिवेने मी सर्वांचे देणे लागतो असेच वाटते मला. केवळ ईश्वरी प्रेम देणे आणि घेणे यासारखे आनंददायी दुसरे काहीच नाही. " तेथेच स्फुरते रामायण " या एपिसोडमधून हे प्रेमच प्रकट होत आहे.

देव माझा मी देवाचा 19.04.2024

देवाचे सारेच आहे. किंबहुना देवच साकार झालाय समग्र अस्तित्वाने. पण या अनुभवाचा मी झालो का? देव माझा झाला का आणि मी एकीएक देवाचाच झालो का या ध्यासाने जेव्हा भक्त सक्रिय होतो तेव्हा तो म्हणतो " देव माझा मी देवाचा " - तेव्हा ऐकू भक्त काय म्हणतो ते -

आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे 12.04.2024

आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे- असे भक्त म्हणतोय. आंतरीक कृतार्थतेतून उद्भवणारी त्याची कृतज्ञता सहजतेने वहात आहे त्याच्या सद्गुरूंच्या , पर्यायाने त्याच्या भगवंताच्या चरणापाशी. आनंदाचे जीवन झाले झाले तुझ्यामुळे - या आनंदाचे मूळ आहे कुठे , फळ आहे कुठे हे प्रकट होतेय त्याच्या ओघवत्या मधाळ वाणीतून- तीच ऐकू आता -

परी देव शोधोनी कोणी न पाहे 05.04.2024

श्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात- मनी मानिला देव तो पुजीताहे , परी देव शोधोनी कोणी न पाहे - ते का बरे असे सांगतात ?खरे तर ते साधकाला, भक्ताला, शिष्याला सावध करीत आहेत असेच जाणवते मला. असेच काहीसे प्रकट होत आहे "देव शोधोनी कोणी न पाहे " या एपिसोड मधून -

आलासी देवा जीवनी 01.04.2024

आलासी देवा जीवनी- देव आधी जीवनात यायला हवा तरच आंतरिक बदल शक्य होतो. तरच जीवन आनंदाचे होते. भक्तीचे समृद्धीचे होते. मी देवळातला देव म्हणत नाही, जे दैवत सद्गुरूरूपाने भक्ताच्या जीवनात प्रत्यक्ष येते. विलक्षण सहवासातून हा प्रत्यक्ष देव जेव्हा अप्रत्यक्ष होतो तेव्हा भक्ताच्या ठिकाणी हेच दैवत प्रस्फुटित होत रहाते हीच तर यथार्थ भक्तीची किमया. असेच प्रकट होत आहे " आलासी देवा जिवनी, जगता गोडी कळे " या एप...

देवा सोबत की देवा संगे ? 19.03.2024

देवा सोबत असणे तसे बाह्यांगाचे असते. पण संगे असणे हे बाह्यांगाबरोबर अंतरंगाचेही असते.

तुला पाहतांना 08.03.2024

देवाला भक्त सदैव पाहत असतो. भक्ताचे पहाणे केवळ डोळ्यांचे नसते. केवळ संवेदनांचे नसते, अंतरंगाचे असते. जिथे यथार्थ दृष्टीचा उद्भव होतो. म्हणूनच भक्त गातो "तुला पाहताना, तुझे गीत गातो, तुझे गीत गाता, तुझाची मी होतो" "देवाचा होणे" हीच तर साधकाची आंतरिक प्रक्रिया आहे. भक्ताचे रूपांतरण म्हणतात ते हे. भक्ताला सत् स्वरुपा कडे नेता नेता त्यातच विलीन होते ते संतत्व....असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोड द्व...

हरीसी करुणा येईल तूझी 23.02.2024

भगवंत हा करुणेचा सागरच आहे. जसा सागर जलमय असतोच तसा भगवंत करुणामय आहेच. प्रश्न एकच आहे. माझी मला करुणा येते का? माझीच मला कीव येते का? मी दुःखी कष्टी होतो का? माझी मनस्थिती केविलवाणी होते का? आणि होत असेल तर यावर उपाय काय? याचा शोध घेताना हे ' मी ' आणि 'माझे' म्हणून जे मानले जाते त्याचा सुगावा लागत राहतो. इथेच भक्तीची आर्तता निर्माण होते. या अनुभवातूनच दुःखाचे निरसन होते तेव्हा भक्त म्हणतो "हरिसी...

येवूनी पावलो मूळस्थानी 16.02.2024

मूळस्थानी पावणे म्हणजे काय हो ? ऋषींचे कूळ अन् नदीचे मूळ विचारू नये म्हणतात, पण भक्त तोच जो मूळ शोधतो. त्याशिवाय शांति समाधान आनंद नाही. हे मूळ बाहेर नाही ते आतच आहे. जिथे भगवंताचा निवास आहे.असा हा एकांतिक झालेला भक्तच या मूळ स्वरूपाला पावतो. हरीचे हे कूळ पवित्र पावन, भक्त हे भूषण या कुळीचे .......असेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून

देवाकडे गेलो माझ्या घरी आलो 09.02.2024

देवाकडे गेलो माझ्या घरी आलो.. देवाला शोधायला निघालो , शोध लागताच जाणवले की अरे, मी माझ्याच घरी पावलो, या आधी मी केवळ भरकटतच होतो, आता निवांत झालो, शांत समाधानास पावलो. का ? तर माझ्या घरी पावलो म्हणून. हे घर बाहेर नाही इथे आतच आहे. हेच सांगतोय भक्त. केवळ सद्गुरू कृपा दुसरे काय ?

मी तू पणाची आनंद उर्मि 02.02.2024

मी तू पणाची आनंद उर्मि- भक्ताच्या ठिकाणी सातत्याने भक्तीपोटी मी तू पणाची उर्मि निर्माण होत असते. हा मी म्हणजे भक्त अन तू म्हणजे देव. यातूनच मिलनाचा अन विरहाचा खेळ भक्ताच्या हृदयात घडत असतो. दैनंदिन जीवनात तसे मी मी, तू तू चे प्रसंग अधून मधून येत असतात. त्यातून वाद, विवाद , भांडणे होतात देखील. क्वचित वेळा झोंबाझोंबीही होते. त्यातून अबोला, दुरावा होतोही. या काही आनंदाच्या उर्मि नसतात. ही दुर्दैवी मा...

काही नाहीतच सर्व काही 26.01.2024

काही नाहीतच सर्व काही - सद्गुरूंशी प्रत्यक्ष भेटीची खरी सार्थकता जर कशात असेल तर "मी सदैव त्यांच्या भेटीतच आहे " या जाणिवेत. देवाचाच होऊन रहाणे घडते आता. याच आनंदात जीवन हलके फुलके जाणवते. सद्गुरूंच्या सहवासातील घडलेले श्रवण नव्याने माझ्यातून उगवून येत असते सातत्याने. काही महिन्यापूर्वी जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली होती तेव्हा ते म्हणाले “ अरे सुधाकर, काही नाहीतुनच सर्व काही उद्भवते अन सर्वकाही पुन्ह...

ही इज EVERYWHERE 19.01.2024

डॉक्टर ICU च्या बाहेर लगबगीने येतात अन् नातेवाइकांना दबलेल्या शब्दांनी सांगतात " He is no more" ऐकताच सारेच गर्भगळीत होतात, प्रचंड दुःखी होतात. "He is no More" हेच डॉक्टरांचे शब्द जेव्हा माझ्या सद्गुरूंनी , त्यांच्या सद्गुरूंच्या निर्याणाच्या घडीला ऐकले तेव्हा माझे सद्गुरू सहज उद्गारले " Impossible , He is every where , and that Every where is here in my Heart " सद्गुरुंचे हे सहज उद्गार माझ्यासाठी...

शांत हरी हास्य करी 12.01.2024

हरीचे स्मितहास्य प्रगाढ शांतीतून उद्भवते. हरी हा शांत स्वरूप आहे म्हणूनच या शांतितून उद्भवणारे भगवंताचे स्मितहास्य भक्ताला मोहित करते. हा नारायण भुजगशयनं असला तरी स्मितहास्य काही मावळत नाही या हरीचे. काय बरे हे भगवंताचे सहज सुंदर अस्तित्व? हा कोणता सहज योग भगवंताचा? भक्त, ऋषि, मुनी, योगी, ध्यानी या साऱ्यांची एकच तहान, एकच वेड, केवळ देवाचे अद्भुत अलौकिक रूप पहाण्याचे. . माझे देखील वेडेपण या एपिसोड...

जाणिवेच्या उगमापाशी 05.01.2024

भक्ति तिच जी जगण्याला भान देते. जिवंत सगळेच असतात पण यथार्थाने आनंदाने जगणे घडते का ? हा प्रश्न केवळ भक्तीतूनच उद्भवतो अन जीवन भक्तीचे होता होता भक्त आनंदाचा स्वामी होऊन रहातो. “मी “ म्हणून हा जो कोणी आहे तो मनाचा, शरीराचा बांधील असतो म्हणूनच जगणे आनंदाचे होत नाही. भक्ति याच “मी” ला स्वत्व देते. स्व च्या शोधासाठी ध्यास लावते. तेव्हाच मन, मनाची बुद्धी, विचार, विकार, कल्पना, स्मृति, संस्कार, मान्यता...

जगू आनंदे,निघू आनंदे, संगे आनंदे वैकुंठा 29.12.2023

जगू आनंदे,निघू आनंदे, संगे आनंदे वैकुंठा. कोणत्यातरी मराठी चित्रपटातील हे गाणे. मी काही चित्रपट पाहिला नाही. परंतु या गाण्याच्या ओळी माझ्या जगण्याला जणू आशय देत आहेत असे सखोलतेने जाणवते मला. किंबहुना जीवनात आनंद सापडेल की नाही माहीत नाही पण आनंदात जीवन सापडते हे निश्चित. हाच आशय या एपिसोड मधून प्रकट होत आहे.

माझ्यातून जग अन जगातून मी 22.12.2023

जगातून मी गेलो की मृत्यू, अन् माझ्यातून जग गेलं की मुक्ती. पण मी या जगातच आहे. माझ्यातून जग गेले की मी ही जाणारच. जो पर्यंत मी आहे तोपर्यंत जग असणार. संत कबीर म्हणतात जब मैं था तो हरी नाही अब हरी है मैं नाही. सद्गुरुंचे हे वचन जसजसे भक्ताच्या अंतरात रुजत राहते तसा मी विरहित भक्त उगवत राहतो. तसा भक्त या बोधाचा होत असतो. सद्गुरुंचे वचन आता भक्ताचे beingness होत रहाते. असेच काहीसे भक्ताच्या अनुभवातून...

Luister naar de podcast Sudhakar Chodankar in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds