Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.storytel.com

Auteur

Santosh Deshpande

Categorie

Arts

Website van de podcast

www.storytel.com

Nieuwste aflevering

17 sep. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... 20.03.2021

स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा सिरीजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला... क्राईम...

146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 16.03.2021

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही जगात भारी आहे. कोल्हापुरी, खान्देशी, कोकणी, पुणेरी, मराठवाडी, वऱ्हाडी अशी नाना प्रकारची खाद्यसंस्कृती असलेल्या आपल्या राज्यात कुठे, काय आणि कसं बेस्ट खायला मिळतं याची इत्तंभूत माहिती या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. भारतभर खाद्यभ्रमंती केलेले पत्रकार व फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांनी कुठे काय स्पेशल पदार्थ मिळतात हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले आहे... त्यामुळे...

145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... 13.03.2021

भारतात स्टोरीटेलचा श्रीगणेशा झाल्यानंतर पहिल्या काही ओरिजिनल्समध्ये ‘माया महा ठगनी’ने आपलं अव्वल स्थान निर्माण केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही स्टोरीटेल ओरिजिनल इतकी लोकप्रिय झाली की, आता या सिरीजचा पुढचा सिझन आलाय... संवेद गळेगांवकर लिखित आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या भारदस्त आवाजातील ‘हॅशटॅग नॉट माईन’ हा माया महा ठगनीचा पुढचा सिझन नुकताच रिलीज झालाय,...

144: शेतकरिअर! 09.03.2021

लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी ‘शेती करणं’ हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता जोडधंदा असावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘शेत...

143: लेखणीच्या लेकी! 06.03.2021

शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. ‘फिरंग’, ‘तो, ती आणि तिचा तो’, ‘मिशन हिमालय’ अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि ‘डेस्परेट हजबंड’, ‘केस नं. ००१’, ‘चित्रकथा’ सारख्या एर...

142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... 27.02.2021

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे... मराठी राजभाषा दिनानिमित्त अष्टपैलू आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि कायमच हासवणाऱ्या पुलंचं चरित्र स्टोरीटेलवर आज रिलीज झालंय. पुलंच्या जीवनावर आधारित ‘या सम हा!’ हे चरित्र त्यांच्याच निस्सिम चाहत्यानं म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक प्रसाद नामजोशी यांनी पुलंचे विविधांगी पैलू आपल्या या विशेष ऑडिओबुकमधून मांडले आहे. त्याला आवाज लाभ...

141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! 20.02.2021

स्टोरीटेलवरील प्रेम मराठी रसिक कायमच सर्व माध्यमांतून व्यक्त करत असतो. आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपण बोलतं केलं आहे `स्टोरीटेल`च्या एका खास चाहत्याला... आणि या चाहत्याने स्टोरीटेलबाबतच्या आपल्या भावना चक्क दुबईहून व्यक्त केल्या आहेत. त्यांचं नाव- आशिष कालकर.  ते स्वतः उत्तम लेखक आहेत. आपली वाचन व श्रवण संस्कृती परदेशात टिकवून ठेवणं आणि तेथील साहित्य संपदा आपल्या मायबोलीत मराठी वाचकांसमोर आणण्याचं मोठ...

140: ‘दीपस्तंभा'चा शिल्पकार! 19.02.2021

जगतो तर प्रत्येकजण आहे. पण खऱ्या जगण्याचं मर्म कशात सामावलं आहे, याची उकल काही व्यक्तींच्या कार्यातून होते. यजुवेंद्र महाजन हे त्यातले एक. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास पेरुन त्यांचं जगणं फुलविण्याचं व्रत घेतलेल्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असणाऱ्या यजुवेंद्र महाजन यांचा आजवरला प्रवास उलगडणारा हा हदयस्पर्शी संवाद. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडक...

139: नेमाडे उवाच! 13.02.2021

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट.  याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टो...

138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 06.02.2021

पॉडकास्ट म्हणजे नक्की काय, पॉडकास्टच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत कसे पोहोचू शकतो, मराठीमध्ये पॉडकास्टिंगला काय भविष्य आहे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत मराठीतील आघाडीचे पॉडकास्टर संतोष देशपांडे, उर्मिला निंबाळकर आणि विनायक पाचलग यांनी. हा `पॉडकास्टर्सचा पॉडकास्ट` स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी आपल्या खुमासदार प्रश्नांनी मस्त खुलवला आहे.  याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्य...

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... 30.01.2021

स्टोरीटेलवरील ‘मर्डर केस’ या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा या ‘मर्डर केस’ला आवाज देण्यापासून ते आजवरचा कलाप्रव...

136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! 23.01.2021

धोका, स्पेस ब्राव्हो, झंझावात, देव दानव आणि मानव, फराओचा संदेश अशा इंटरेस्टींग स्टोरीटेल ऑरिजिनल सिरीजचे लेखक, तसेच बिजिंग कॉन्स्पिरसी, थेंब थेंब मृत्यू, ब्लॅकमेल, क्लिओपात्रा, यशोवर्मन, कल्की या स्टोरीटेलवरील लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक संजय सोनवणी यांचा आजवरचा साहित्यिक श्रवणीय प्रवास ऐका या स्टोरीटेल कट्ट्यावर. या विशेष भागात संजय सोनवणींना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी.   याशिवाय प्रसाद म...

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! 16.01.2021

भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्...

134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'! 09.01.2021

स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑडिओबुकला आवाज देण्याचा तिचा अनुभव आणि स्टोरीटेलसोबत...

132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! 05.01.2021

`सिक्स्थ सेन्स`बद्दल नेहमी सगळ्यांना कुतुहल असतं. सिक्स्थ सेन्स अर्थात अतिंद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय, ती प्रत्येक व्यक्तीकडे असते का, अध्यात्म आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, त्यातील खरेपणा किती आणि अंधश्रद्धा किती अशा वेगळ्याच विषयांवरील थेट संवाद पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. या विषयामध्ये अभ्यासक आणि साधक म्हणून कार्यरत असणारे धवल आपटे यांच्य...

133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! 02.01.2021

२०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्टोरी रेकोर्डिंगचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे....

131: श्रीमंत कसं व्हावं? 29.12.2020

श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या 'श्रीमंत कसं व्हावं?' या पॉडकास्टमध्ये मिळतील. 'Su...

130: 'हिंदू' साकारताना...! 26.12.2020

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांची सर्वात जास्त गाजलेली 'हिंदू' ही कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. ही कादंबरीला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते अतुल पेठे यांचा! नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिंदू'चे विवेचन आणि रसग्रहण अतुल पेठे यांनी केलंय. तसेच हिंदू कशी घडली याचे सविस्तर वर्णनही केलं आहे. अशी श्रवणीय पर्वणी आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावर आणली आहे, ऐकायला अजिबात विसरू नका! याशिव...

128: सूत्रांच्या माहितीनुसार... 22.12.2020

राजकारण महाराष्ट्रातलं असो किंवा देशपातळीवरचं, त्याबद्दल माहिती बातमीदारापर्यंत पोहोचवतो 'तो' सूत्र कोण आहे, यावर त्या बातमीची आणि बातमीदाराची भिस्त असते. मधल्या काळात महाराष्ट्राने सूत्रांची 'पॉवर' चांगलीच अनुभवली... वृत्तवाहिन्यांवर दिसणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये 'सूत्रांच्या माहितीनुसार...' हा शब्द कॉमन होता. याच पार्श्वभूमीवर, सूत्र कसा निर्माण करावा, तो कसा टिकवावा, आपल्याला हवी ती माहिती कशी म...

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! 19.12.2020

आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'! 'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हायरस स्टॉकहोम' या मूळ स्वीडिश कथेवरून निरंजन मेढेकर...

127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज... 15.12.2020

मिड लाईफ आणि करिअरमध्ये होणारा बदल म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तर काहींच्या दृष्टीने डोकेदुखी असलेली बाब... मिड लाईफमध्ये म्हणजेच मध्यम वयात करिअर बदलण्याची वेळ आली तर ती परिस्थिती कशी हाताळावी, करिअरचं स्वरूप बदलताना कोणत्या नवीन गोष्टी शिकायला हव्यात, आत्मसात करायला हव्यात, करिअरबाबतचे निर्णय कसे घ्यावेत या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारा ह्युमन रिसोर्स आणि व्यवस्थापनतज्...

126: विनाशकाले : थरार क्राईम थ्रिलरचा... 12.12.2020

अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह्यांचा उलगडा करते. भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम...

124: ‘झोप का हो येत नाही...?’ 06.12.2020

झोप... झोपेशिवाय प्रत्येकाचं आयुष्य अपूर्ण! झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो, झोप नाही लागली तर अस्वस्थ होतो... पण हीच ‘झोप’ कशी येते, झोप येणं म्हणजे नेमकं काय, स्वप्नं कशी पडतात, शरिराइतकीच मनालाही झोपेची किती आवश्यकता असते, निद्रानाश म्हणजे काय अशा आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरं दिली आहेत प्रख्यात फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी ‘झोप का हो येत नाही...?’ या स्पेशल पॉडकास्ट...

125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? 05.12.2020

स्टोरीटेलवर लिहायचं कसं, कोणत्या प्रकारच्या लेखनाला स्टोरीटेलमध्ये प्राधान्य आहे, ज्यांनी यापूर्वीच कथा लिहिल्या आहेत त्यांनी त्या स्टोरीटेलपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या, स्टोरीटेल ऑरिजनल्स कशा लिहायच्या या व अशा लेखकांच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत थेट स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी... याशिवाय स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येणार आहे, स्टोरीटेलन...

122: असा घडतो विनोद! 29.11.2020

विनोद ऐकणं जसं आनंददायी असतं, त्याहीपेक्षा कठीण तो विनोद घडणं, घडवणं असतं... अशातच विनोद सादर करायचा असेल तर त्या सादरीकरणासाठी काय तयारी लागते, प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या चिंता दूर करून हसतं कसं करायचं हे कलाकाराच्या विनोदात असतं... आणि याच विषयावर ‘Sunday With देशपांडे’मध्ये आपल्याला हसवायला आणि विनोदामागची गोष्ट सांगायला आले आहेत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे! 'Sunday With देशपांडे'चे इतर...

Luister naar de podcast स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds