BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

रशियात हल्ले करायला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला काय फायदा होईल? BBC News Marathi | सोपी गोष्ट 26.11.2024

रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला अमेरिका, युकेसारख्या देशांचं पाठबळ मिळतंय. पण आता त्यांना या देशांकडून देण्यात आलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं रशियाच्या भूमीत हल्ला करण्यासाठी वापरता येणार आहेत. शिवाय अमेरिका युक्रेनला Landmines म्हणजे भू सुरुंग पुरवणार आहे. यामुळे युद्धामधली बाजी युक्रेन पलटवू शकेल का? जो बायडन यांच्याजागी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काय होईल? समज...

एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? ते कसे केले जातात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 26.11.2024

निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे झळकायला लागतात. विविध संस्थांनी केलेल्या या पाहण्यांच्या अंदाजात अनेकदा मोठी तफावत असते. तर प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरही एक्झिट पोल्सनी मांडलेले अंदाज चुकल्याचं लक्षात येतं. असं का होतं? एक्झिट पोल्स कसे करतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 26.11.2024

समुद्राखालीही ज्वालामुखी आहेत - हे तुम्हाला माहित्येय का? यातले काही सक्रीय आहेत. तर काही निद्रिस्त आहेत. संशोधकांना आर्क्टिक समुद्राच्या तळाशी एक प्रचंड मोठा ज्वालामुखी सापडलाय. अमेरिकन कोस्ट गार्डच्या icebraker हीली (Healy) या जहाजावरच्या संशोधकांच्या क्रू ला हा शोध लागलाय. जाणून घेऊयात याच ज्वालामुखीबद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

मुलांच्या वाढीवर जातीचा कसा परिणाम होतोय? BBC News Marathi 19.11.2024

लहान मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीइतकी नसेल, तर याला Stunting - वाढ खुंटणं म्हटलं जातं. पुरेसं पोषण मिळत नसल्याची ही खूण असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये आणि आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या देशांमध्ये - म्हणजे Sub Saharan Africa भागामध्ये लहान मुलांची वाढ अशी खुंटण्याचं प्रमाण अधिक आहे. भारतातलं हे प्रमाण सहारा वाळवंटाखालच्या आफ्रिकन देशांपेक्षाही अधिक असल्याचं एका संशोध...

डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi 19.11.2024

गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी घसरण होत, रुपयाने निचांक गाठलाय. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याने रुपयाच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय? आणि या गोष्टीचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश...

क्रेडिट कार्डचं बिल कसं भरताना काय खबरदारी घ्यायची? BBC News Marathi 19.11.2024

क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

सुनीता विल्यम्स यांची अंतराळात तब्येत बिघडतेय का? BBC News marathi 13.11.2024

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या एका फोटोवरून जगभरातल्या लोकांना सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीची काळजी वाटली. बोईंग स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या चाचणी मोहीमेसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळे अंतराळ स्थानकातच अडकले. प्रवाशांना परत घेऊन येण्यासाठी स्टारलायनर सुरक्षित न ठरल्याने सप्टेंबर 2024 मध्ये हे यान रिकामंच पृथ्वीवर परत आणलं गेलं. फेब्रुवारी 2024...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा हवामान बदल रोखण्याच्या प्रयत्नांवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट BBC News Marathi 11.11.2024

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाल्याने हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदल हा एक भ्रम, स्कॅम असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचा पॅरिस करारातला सहभाग काढून घेतला होता. यावेळीही ते बाहेर पडतील अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. ट्रम्प यांच्या विजया...

बिटकॉईनचा शोध लावणाऱ्या सातोशी नाकामोटोंचं गूढ! सोपी गोष्ट BBC News Marathi 11.11.2024

जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचं स्थान महत्त्वाचं आहे. अब्जावधींचं मूल्य असणाऱ्या बिटकॉईनचा शोध लावणारी व्यक्ती - सातोशी नाकामोटो, नेमकी कोण आहे, हे अजूनही जगाला माहिती नाही. ही व्यक्ती कशी दिसते, किती वयाची आहे हे स्पष्ट झालं नाही. आजवर अनेकांनी आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केलाय. पण हे दावे खरे ठरलेले नाहीत. काय अजून माहिती आहे या सातोशी नाकामोटोंबद्दल... समजून घेऊयात सोपी गोष्...

इस्रोने लेहमध्ये सुरू केलेलं ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? BBC News Marathi 07.11.2024

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने (ISRO) भारताचं पहिलं अॅनालॉग स्पेस मिशन (Analog Space Mission) लेहमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केलंय. भविष्यातल्या अंतराळ मोहीमांसाठीची तयारी म्हणूनच पृथ्वीवर करण्यात येणारी ही तयारी असते. ह्यूमन स्पेसफ्लाईट सेंटर, इस्रो, AAKA स्पेस स्टुडियो, युनिव्हर्सिटी ऑफ लडाख, IIT मुंबई या सगळ्यांनी मिळून आणि लडाख अटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या मदतीने या...

डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi 07.11.2024

डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स निवेदन - अमृता...

सोपी गोष्ट: 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट होतेय, हा फोन कट करू नका नाहीतर...' 29.10.2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ताज्या ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला. आपण पोलीस वा तपास अधिकारी असल्याचं भासवत एखाद्या व्यक्तीला वेठीला धरून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? खरंच पोलीस असं कुणाला डिजिटल अरेस्ट करू शकतात का? फ्रॉडचा हा नवा प्रकार काय आहे? त्यापासून सावध कसं रहायचं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग...

ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi 24.10.2024

कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात आणि यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो. 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत. आणि हे आयोजन करताना आयोजकांनी 19 पैकी तब्बल 9 खेळ वगळले आहेत.असं का...

इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्यात भारतातल्या इंटरनेटसाठी चढाओढ का? | BBC News Marathi 23.10.2024

भारत ही इंटरनेट क्षेत्रासाठी जगातली एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भारतातल्या सॅटलाईट ब्रॉडबँड मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सध्या जगातल्या दोन सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये चढाओढ सुरू आहे. या दोन व्यक्ती आहेत टेस्ला, एक्स, स्पेस एक्स या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क आणि भारतीय अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मुकेश अंबानी. मस्क आणि अंबानींमध्ये नेमकी कोणत्या...

US निवडणुकीत इलॉन मस्क, टेलर स्विफ्ट हे ट्रंप, कमला हॅरिस यांना जिंकवणार? BBC News Marathi 22.10.2024

प्रसिद्ध व्यक्तींकडून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातली व्यक्ती, वस्तू, सेवा वा उत्पादनाविषयी सांगितलं जाणं वा त्याची जाहिरात करणं, ही पद्धत जगभर प्रचलित आहे. आणि हे राजकारणातही केलं जातं. म्हणजे भारतात होताना तर आपण पाहिलंच आहे. पण सध्या अमेरिकेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि तिथेही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरलेयत. याचा ट्रम्प वा ह...

महाराष्ट्रातून मान्सून परतला, पण अजूनही पाऊस का पडतोय? | BBC News Marathi 21.10.2024

देशातून मान्सून परतला, असं हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस भरपूर पाऊस पडलेला आहे. हा पाऊस कशामुळे पडतोय? हा अवकाळी पाऊस आहे का? राज्यात थंडी कधी येईल? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi 18.10.2024

व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप Meta य़ा कंपनीच्या मालकीचं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामही याच मेटा कंपनीच्या मालकीचे आहेत. व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. भारतामध्ये व्हॉट्सॲपचे दरमहा 50 कोटींपेक्षा अधिक ॲक्टिव्ह युजर्स आहेत. मग व्हॉट्सॲप पैसे कसे कमवतं? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

NASA Europa Clipper निघालंय गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला | BBC News Marathi 17.10.2024

गुरू ग्रहाच्या (Jupiter) युरोपा (Europa) नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर (Europa Clipper) हे अंतराळ यान झेपावलंय. ही फक्त युरोपावर आयुष्याच्या खुणा शोधणारी ही मोहीम नाही. तर युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे याद्वारे शोधलं जाईल. गुरूचा हा युरोपा नावाचा चंद्र कसा आहे? आणि त्याकडे जाणारं हे यान कसं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता...

THAAD: US इस्रायलला अँटी-मिसाईल सिस्टिम का देतंय? | BBC News Marathi 16.10.2024

1 ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती. यातली बहुतेक आकाशातच नष्ट करण्यात आल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं होतं पण त्यातली अनेक मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये पडली. या हल्ल्याला अजून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि आता इस्रायलला त्यांची हवाई हल्ल्यांपासूनची सुरक्षा वाढवण्यासाठी High Altitude Anti - Missile System म्हणजे अधिक उंचीवरून येणारी क्षेपणास्त्रं रोखणारी य...

खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi 15.10.2024

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेश दिले आहेत. पण या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. जस्टिन ट्रुडो यांचे वडील पिएर ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाही दोन देशांत तणाव निर्माण झाला होता. भारत - कॅनडा संबंधांमध्ये आजपर्यंत काय - काय घडलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दु...

रूप कंवर: भारतातलं शेवटचं सती प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय? | BBC News Marathi 14.10.2024

राजस्थानच्या दिवरालामध्ये 4 सप्टेंबर 1987 रोजी 18 वर्षांची रूप कंवर तिच्या पतीच्या चितेवर सती गेली. आणि देशभर गदारोळ झाला. ती स्वतःहून सती गेली की तिला असं करण्यास भाग पडलं गेलं यावरून वाद झाले. याचे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पडसादही उमटले. भारतातलं हे सतीचं शेवटचं प्रकरण होतं. रूप कंवरच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं? आता 37 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा का चर्चेत आलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...

हे यान लघुग्रह पृथ्वीवर धडकण्यापासून वाचवेल | BBC News Marathi 14.10.2024

पृथ्वीच्या दिशेने जर एखादा लघुग्रह येत असेल तर तो पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हे शोधणारं हेरा आंतरराष्ट्रीय मिशन नुकतंच झेपावलं. दोन वर्षं प्रवास करून हे यान Dimorphos नावाच्या एका अंतराळातल्या लघुग्रहापर्यंत पोहोचेल. हे यान काय करणार आहे? कोणत्या लघुग्रहाच्या दिशेने ते चाललंय?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. a रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निल...

नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi 09.10.2024

जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय. जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi 09.10.2024

अंटार्क्टिकाचं हवामान पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कोरडं, वादळी, बर्फाळ आणि थंड आहे. पण अंटार्क्टिकामधली वाढत जाणारी ही हिरवळ मात्र पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. अंटार्क्टिका प्रदेश हा पृथ्वीचा Thermostat म्हणजे तापमान नियंत्रक मानला जातो. आणि म्हणूनच या भागात होणारे हवामान बदलाचे परिणाम तुमच्या - आमच्या आयुष्यावरही परिणाम करणारे असतील. अंटार्क्टिकात नेमकी कोणती हिरवळ वाढली? त्याचे परिण...

इस्त्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश कुणाच्या बाजूने? 08.10.2024

7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमाससोबत संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.यामुळा गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय. लेबनॉनमधल्या हिजबुल्लासोबतच्या संघर्षाची तीव्रता एकीकडे वाढतेय. इस्रायलने जमीनवरूनही लेबनॉनवर हल्ला केलाय. असतानाच इराणने 1 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली. लेबनॉन -...

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds