BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सोन्याच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचा काय फायदा होणार? 16.06.2021

भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. आता 16 जून पासून केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. हॉलमार्कचं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका, हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण, त्याचा...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती 15.06.2021

14 जून रोजी अडाणी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अडाणी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग -...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्त्रायलमध्ये नेफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान 14.06.2021

इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची बारा वर्षांची राजवट उलथून आठ पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. रविवारी तिथल्या संसदेत झालेल्या बहुमत चाचणीत नेतन्याहू यांच्या पक्षाचा एका मताने निसटता पराभव झाला. आता आठ पक्षांची एकत्र मोट बांधण्याचं अवघड काम नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना करायचं आहे. पण नेतन्याहू यांच्या पराभवासाठी हे आठ परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष कसे एकत्र आले? आणि या सत्ता बदलाम...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला? 11.06.2021

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाचं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. यंदाही सुरुवात ऑनलाईनच होणार आहे. आणि यावेळी मुलांना पहिले पंधरा दिवस एक खास ‘ब्रिज कोर्स’ पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुलांना मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे हे शिक्षकांना कळावं आणि मुलांचीही काही संकल्पनांची उजळणी व्हावी यासाठी हा पाठ्यक्रम SCERT मंडळाने ठरवला आहे. हा ब्रिज कोर्स कुणाला करायचा आहे,...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ‘होल्डिंग पाँड्स’ मुंबईला पूरापासून वाचवू शकतील का? 11.06.2021

मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पूराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात. आणि असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे? 09.06.2021

अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत यांनी सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. यावर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पण, जात प्रमाणपत्र रद्द झ...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लैंगिक ओळख जपण्यासाठीचा समलैंगिकांचा लढा 08.06.2021

2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द केलं. त्यामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देशात मिळाली. पण, तरीही समलैंगिक लोकांचा लढा अर्धवट होता. कारण, कित्येक घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी समलैंगिक आहे समजल्यावर ही लैंगिकता स्वीकारली जात नाही. आणि समलैंगिक भावना दडपण्यासाठी कन्व्हर्जन थेरपीचा सल्ला दिला जातो. आता मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण खटल्यात अशी थेरपीही कायदेबाह्य केली आहे. सम...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्कम टॅक्स रिटर्न भरणं झालं अधिक सोपं 07.06.2021

यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो. कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये (www.incometax.gov.in) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आणि ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे. जाणून घेऊया या नवीन वेबसाईटविषयी आणि त्यातील बद...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे? 03.06.2021

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या नेटवर्कमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून ते प्राणी आणि माणसासाठीही सुरक्षित असल्याची ग्वाही कोर्ट देऊ शकतं का, असा सवाल त्यांनी विचारला आहे? त्यानिमित्ताने 5G तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि पर्यावरणाची होणारी हानी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया खरंच 5G अपायकारक...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही? 02.06.2021

कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावा अंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं. आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास? 01.06.2021

30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने 7 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तर 31 मे ला देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दर जाहीर झाला. देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतंय की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा आकुंचन पावली. पण मग याचा अर्थ काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होणार आहे? आ...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट 31.05.2021

पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारा मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल क...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का? 28.05.2021

आजारातून बरं झाल्यानंतरही अनेकदा त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ सहन करावे लागतात. तशीच काहीशी गत कोव्हिडची. कोव्हिड-19 मुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. डायबेटोलॉजिस्ट सांगतात की कोव्हिडमुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. यामागे काय कारणं आहेत? हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला का याचा बायडन सरकार का करतंय तपास? 27.05.2021

कोरोना व्हायरसचा उगम नेमका कसा झाला? तो चीनच्या लॅबमध्ये जन्माला आला होता या दाव्याला आजवर धुडकावलं गेलं. पण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना या दाव्याचीही सखोल शहानिशा करण्याचे आदेश दिलेत. अनेक तज्ज्ञांनीही हा व्हायरस प्रयोगशाळेत जन्मलेला असण्याची शक्यता पूर्णतः फेटाळता येणार नाही असं म्हटलंय. नेमकं सत्य काय आहे? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे? 27.05.2021

अमेरिकन सैन्य 20 वर्षं अफगाणिस्तानात राहूनही तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित इतर कट्टरतावादी गटांचं कंबरडं मोडू शकलं नाही. तिथली लोकशाही प्रक्रिया अजूनही पूर्णपणे स्थिरावू शकलेली नाही. त्यामुळेच अमेरिका बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. लोकशाही सरकार जाऊन तालिबान सत्तेत आलं तर भारतासाठी चिंतेचं कारण ठरेल का? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- न...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाव्हायरस उपचारासाठी मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना कामी आली का? 25.05.2021

गरीबांना कोरोनाचे उपचार ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोफत मिळणार असल्याची घोषणा सत्यात उतरली का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस भारतात लहान मुलांना कधीपासून मिळणार? 24.05.2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं जगभरातल्या जाणकारांचं सांगणं आहे. सध्या भारतात लहान मुलांना लस दिली जात नाही पण जगातल्या काही देशांमध्ये हे केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे काय फायदे आहेत? त्यादृष्टीने भारतात काय हालचाली सुरू आहेत? ऐका आजची ही सोपी गोष्ट संशोधन- बीबीसी मरा...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा? 21.05.2021

कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय. #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं. भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना होम टेस्ट किट काय आहे? गुळणी करून कोरोनाची चाचणी कशी करायची? 20.05.2021

कोरोनाची टेस्ट म्हटली की डोळ्यासमोर येतो स्वॉब आणि पीपीई किट घातलेले लोक. पण आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. पुण्याच्या माय लॅब या कंपनीने विकसित केलेलं घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किटला ICMR ने मान्यता दिली आहे. तसंच नागपूरच्या नीरी या संस्थेने विकसित केलेल्या सलाईनच्या पाण्याची गुळणी करून सँपल घेण्याच्या तंत्रालाही मान्यता मिळाली आहे. काय आहेत या टेस्ट आणि त्यांचा कसा फायदा होईल? ऐक...

इस्रायल कसा जन्माला आला? स्वातंत्र्य, इतिहास, आणि पॅलेस्टाईनशी वैर | सोपी गोष्ट 19.05.2021

मुस्लिमबहुल प्रदेशात इस्रायल हा ज्यूंचा देश कसा जन्माला आला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनावरचं भारतीय औषध किती प्रभावशाली? 18.05.2021

कोरोना : DRDO 2 DG हे कोव्हिडवरील भारतीय औषध किती प्रभावी आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात इस्रायलची बाजू का घेतली नाही? 17.05.2021

इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. अनेक लोकांचे यात जीव गेलेत, अनेक बेघर झालेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. पण तरीही भारताने सध्याच्या संघर्षात इस्रायलची बाजू घेतलेली नाही. उलट पॅलेस्टाईनच्या न्याय्य उद्दिष्टांना भारताचं समर्थन असल्याचं राजदूतांनी संयु...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं? 14.05.2021

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे इतकं वाढवण्यात आलं आहे. याचा अर्थ हा की, पहिल्या डोस नंतर दुसरा डोस तीन ते चार महिन्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उलट लसीची परिणामकारकता वाढते असं संशोधनातून दिसून आलंय. तुमच्यापैकी अनेकांना सध्या दुसरा डोस मिळवताना अडचणी येतायत. कारण, लशीच उपलब्ध नाहीएत. अशावेळी तर या निर्णयाने मोठाच दिलासा मिळाला अस...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात? 13.05.2021

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी टीम लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऐन ईदच्या सणाला इस्त्रायल देश का पेटलाय? 12.05.2021

एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय. इस्त्राएलनं गाझा पट्टीतली १३ मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्रायलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली. आणि यात तेल अवीव हे इस्त्रायलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्...

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds