BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk
Auteur
BBC Marathi Audio
Categorie
Website van de podcast
Nieuwste aflevering
25 mrt. 2026
Waar luisteren?
Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaarPodcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts
Afleveringen
प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट पॉडकास्ट 03.05.2022 5:31
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - मयांक भागवत लेखन...
कोकाकोलामध्ये खरंच पूर्वी कोकेन होतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट 03.05.2022 7:41
ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क पुढची कोणती कंपनी घेणार, याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी एक ट्वीट करून सांगितलंय की, "मी कोका कोला विकत घेणार आणि त्यात पुन्हा कोकेन टाकणार." ते पुन्हा म्हणतायत तर याचा अर्थ कोका कोलामध्ये याआधी कोकेन किंवा इतर कुठले ड्रग्स वापरले जायचे का? त्यामुळेच आपल्याला कोका कोला एवढं आवडतं का? कोका कोलाची जी आजवरची सिक्रेट रेसिपी आहे, त्यात खरंच काही अमली पदार्थ असतात का?...
नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? कोणत्या सरकारमुळे पेट्रोल महागलंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 28.04.2022 6:14
केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पण काही राज्यांनी व्हॅट कमी न केल्यामुळे पेट्रोलचे भाव जास्त आहेत, असं मोदी म्हणतायत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. ते म्हणतात की पंतप्रधान चुकीची माहिती पसरवतायत. खरं कुणाचं? पेट्रोल, डिझेलच्या किमती कुणामुळे कमी होत नाहीयत? संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – निलेश भोसले
पाम तेलाचा तुटवडा, म्हणजे महागाई पुन्हा वाढणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट 27.04.2022 5:00
महागाईचा भडका उडालाय, हे आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो, वाचतो. पण हे किती शब्दशः खरं आहे बघा ना. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत, खाण्या पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढलेत आणि या आगीत आता आणखी तेल ओतलं जाईल की काय, अशी भीती आहे. खायच्या तेलाचे भाव किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढतील, अशी चिन्हं आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याकडे आयात होणाऱ्या पाम तेलाची आवक कमी होऊ शकते. इंडोनेशियाने तिथून निर्यात होणाऱ्या पाम तेला...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं, आता पुढे काय? 27.04.2022 5:15
इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं. मुक्त अभिव्यक्तीचा पुरस्कार करणारे मस्क आता लोकांना ट्विटरवर वाटेल ते बोलण्याची मुभा देतील का? सगळे निर्बंध उठवले जातील का? मस्कच्या मालकीचं ट्विटर पूर्वीपेक्षा वेगळं असेल का? संशोधन, लेखन - सिद्धनाथ गानू निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट : फ्रान्समध्ये ‘मुस्लीविरोधी’ नेत्याला मॅक्रॉन यांनी कसं हरवलं? 25.04.2022 4:41
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मरीन ल पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पेन यांच्या भूमिका मुस्लीमविरोधी असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. मॅक्रॉन यांनी महागाईचा फटका बसू न देता उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारसरणींच्या पक्षांचा पराभव कसा केला? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू निवेदन – ऋजुता लुकतुके एडिटिंग – निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: राज ठाकरे बाळासाहेबांचं अनुकरण करत आहेत का? 19.04.2022 5:14
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि त्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमागचं नेमकं कारण काय आहे आणि राज ठाकरे यांची वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने सुरू आहे का? त्याचे नेमके परिणाम काय असू शकतात? संशोधन – हर्षल आकुडे निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदी सरकार तुमच्या खासगी माहितीवर CPC द्वारा गदा आणतंय का? 18.04.2022 5:13
लोकसभेनं संमत केलेल्या द क्रिमिनिल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) या विधेयकावरून वाद सुरू आहे. पण हा कायदा बेकायदेशीर असल्याचा आणि त्यामुळे नागरीकांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास आणि खटल्यांचा वेगानं निकाल लागण्यात यानं मदत होईल. संशोधन – टीम बीबीसी, निवेदन - जान्हवी मुळे, एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट: जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा वाद पुन्हा का सुरू झाला? 15.04.2022 5:04
13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुस्तकाचं नावं होतं - शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आणि लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. जेम्स लेन कोण आहेत? शिवाजी महाराजांवर त्यांनी काय लिहिलं, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं? राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा का का...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: अझान आणि मशिदीतल्या भोंग्याविषयी नियम काय सांगतात? 13.04.2022 5:37
लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अझान हा केवळ भारतातच नाही तर अगदी काही मुस्लिम देशांतही वादाचा विषय ठरला आहे. धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक किंवा कुठलीही साऊंड सिस्टिम वापरण्याविषयी भारतातले नियम काय सांगतात? संशोधन – जान्हवी मुळे, दीपाली जगताप निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला? 13.04.2022 5:40
दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही. संशोधन – अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते? 11.04.2022 4:44
14 लाख कर्मचारी असलेलं भारतीय सैन्य हे रोजगारनिर्मितीच्या बाबतीत देशातच नाही तर जगातही आघाडीच्या संस्थापैकी एक आहे. लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात. पण गेली दोन वर्ष सैन्यभरतीच झालेली नाही. संशोधन – सौतिक बिस्वास निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : राजपक्षे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे देश डबघाईला आल्याचा आरोप का होतोय? 08.04.2022 5:11
श्रीलंकेतल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात श्रीलंकेत निदर्शनं झाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंनी आणीबाणी लावली आणि नंतर आणखी निदर्शनांनंतर ती उठवलीही. याचा राजकीय फटकाही त्यांना आणि पक्षाला बसला कारण अर्थमंत्र्यांसह या मंत्रिमंडळातल्या अनेकांनी राजीनामा दिला. अनेक स्थानिक श्रीलंकन या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि एकूणच राजपक्षे कुटुंबाला दोषी धरतायत. राजपक्षे क...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही? 08.04.2022 6:10
रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला. या युद्धाला आता 44 दिवस झाले आहेत. पण इतक्या दिवसांच्या संघर्षानंतरही रशियाला युक्रेनमध्ये आतपर्यंत शिरता आलेलं नाही. रशियाच्या तुलनेत लहान असणाऱ्या युक्रेनवर वरचढ ठरणं रशियाला इतकं कठीण का गेलं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : भाजपच्या स्थापनेला होता मुस्लीम प्रमुख पाहुणा 06.04.2022 5:15
गेल्या चार दशकांत भारतीय जनता पक्षानं भारतीय राजकारणात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपलं स्थान बळकट केलं आहे. पण या पक्षाची स्थापना कशी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कुशीची उब आणि जनता पार्टीतली घुसळण या दोहोंतून भाजपचा जन्म झाला, असपण इतकंच सांगावं, इतकाच काही मर्यादित इतिहास नाही. संशोधन - नामदेव काटकर निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले जातात, कारण... 05.04.2022 5:21
देशात भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या सर्वाधिक केसेस कर्नाटकात नाही, तर महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. यामागे काय कारणं असावीत? संशोधन – जान्हवी मुळे, मेधावी अरोरा निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पाकिस्तानचा पंतप्रधान 5 वर्षं पदावर का टिकत नाही? 04.04.2022 4:59
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे 1947 पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाहीये. भारतात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले, तेव्हा शेजारच्या देशात हे का होऊ शकलं नाही? बीबीसी मराठीवर पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 569 मध्ये.
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल? 01.04.2022 5:27
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताने अत्यंत सावध भूमिका घेतलीय. आपण संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रस्तावांवर कोणत्याच बाजूने मत दिलेलं नाही. आपण रशियाची उघडपणे निंदा केली नाही, पण युक्रेनलाही निराश केलं नाही. रशिया आणि अमेरिका जगातल्या विविध राष्ट्रांना आपापल्या बाजूने वळवू पाहतायत. भारत ही तारेवरची कसरत कशी पार पाडेल? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन,लेखन,निवेदन – सिद्धनाथ गानू एड...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत? 30.03.2022 5:35
गेले 9 दिवस देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण पाहातोय. कधी 50 पैसे तर कधी 75 पैसे तर कधी काही रुपयांमध्येही ही वाढ होतेय. पण गेल्या 9 दिवसांत 8 वेळा ही वाढ का झालीये? एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे देशांतर्गत कारणं यामुळे या किंमतीत वाढ होतेय का? संशोधन, लेखन, निवेदन – ओंकार करंबेळकर एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का? 29.03.2022 7:25
सध्या सर्वोच्च न्यायालयात एका देशांतल्या काही राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत असं २०११ ची जनगणना सांगते. मग हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा अधिकार कोणाचा? केंद्र सरकारचा की राज्यांचा? या विषयावर ही सोपी गोष्ट.
काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जबाबदार कोण? काँग्रेस, भाजप की इतर कुणी? सोपी गोष्ट पॉडकास्ट 28.03.2022 9:02
1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून पंडितांनी पलायन केलं. यासाठी नेमकं जबाबदार कोण होतं? भाजपच्या पाठिंब्यावर तेव्हा व्ही. पी. सिंह केंद्रात सत्तेत होते, पण काश्मिरातली परिस्थिती ही काही एका वर्षाचा परिणाम नव्हती. या सगळ्या घटनांमागे काय पार्श्वभूमी होती? संशोधन, लेखन, निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : श्रीलंकेत महागाई इतकी का भडकली आहे? 25.03.2022 5:51
महागाईचा प्रश्न भारतात त्रास देतो आहेच, पण श्रीलंकेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या एका आठवड्यात 16 श्रीलंकन नागरिक पळ काढून भारतात आलेत. ते आता तामिळनाडूत पोलिसांच्या ताब्यात आहेत. आपल्या शेजाऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी ओढवली? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार का होतो? 24.03.2022 7:09
पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविं...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : उद्धव ठाकरेंप्रमाणे नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री कोण? 24.03.2022 4:38
मेव्हण्यांवर ईडीचे छापे पडले आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. यापूर्वी महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री त्यांच्या नातेवाईकांसंबंधीच्या प्रकरणांमुळे आपल्या पदावरून पायउतार झालेले आहेत. ही प्रकरणं काय होती? कोण होते हे मुख्यमंत्री? पाहा. संशोधन – नीलेश धोत्रे लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? 22.03.2022 6:18
व्लादीमीर पुतीन युक्रेन आक्रमणाबद्दल नेमका काय विचार करतायत यावर अवलंबून आहे की हे युद्ध कसं आणि कधी संपेल. पुतीन म्हणतायत की हे आक्रमण रशियाने नाही, युक्रेनने सुरू केलं. पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? जगभरातले गुप्तहेर याची उकल करण्याचा प्रयत्न करतायत. या गुप्तहेरांना काय सापडलं? संशोधन - गॉर्डन कॉरेरा लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Vergelijkbare podcasts
Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds