BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

यंदाचं बजेट सरकारसाठी तारेवरची कसरत ठरेल का? 31.01.2023

केंद्रीय अर्थमंत्री 2024 सालच्या निवडणुकांआधीचा आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीत सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांना वाटतं. पण कोव्हिडनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटकांना सरकारची मदत करावी लागणार हेही नक्की आहे. सीतारमण यांच्यासमोर नेमकी काय आव्हानं आहेत आणि यंदाचं बजेट ही तारेवरची कसरत का ठरू शकते, जाणून घेऊयात लेखन – निखिल इनामदा...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते बनतील का? 30.01.2023

भारत जोडो यात्रेला राजकारणाशी जोडून पाहिलं जाऊ नये, असं स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसने आवर्जून सांगितलं. पण तरीही राहुल गांधींना त्यांच्या राजकीय वाटचालीत या यात्रेचा फायदा होईल असं काहींना वाटतं. पण खरंच भारत जोडो यात्रा राहुल गांधींना विरोधी पक्षाचे नेते म्हणून ओळख मिळवून देईल का? अधिक जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन – इकबाल अहमद निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार 27.01.2023

आज भारतातले जवळजवळ 97 टक्के स्मार्टफोन्स हे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळे या फोन्समध्ये बाय-डिफॉल्ट गुगलच्याच काही गोष्टी टाकून येतात. त्यामुळेच आता गुगल इंडियाला भारतात तब्बल 13 अब्जांची चपराक बसली आहे. काय आहे हे प्रकरण? यामुळे तुमचे-आमचे अँड्रॉइड फोन्स कसे बदलणार? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : जुन्या पेन्शन योजनेचा वाद काय आहे? 26.01.2023

जुन्या पेन्शन योजनेविषयी आम्ही नकारात्मक नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं आणि पेन्शनवरून चर्चेला पुन्हा उधाण आलं. पण जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम किंवा ओपीएस म्हणजे काय आहे? ती पुन्हा लागू करावी अशी मागणी का होते आहे आणि या योजनेला विरोध का होतो आहे? जाणून घ्या. लेखन – जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटि...

प्रजासत्ताक दिनाविषयी तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 25.01.2023

6 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारं संचलन तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर नक्कीच पाहिलं असेल. शाळेत असताना आपापल्या गावात, शहरात होणाऱ्या संचलनातही तुम्ही सहभागी झाले असाल. दर वर्षी हा सोहळा रंगतो. पण अजूनही प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती अनेकांना नसते. तर अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमधून...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ग्रीन कॉमेट कसा पाहता येईल? 24.01.2023

ग्रीन कॉमेट नावानं ओळखला जाणारा धूमकेतू जगभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण तब्बल 50 हजार वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. म्हणजे याआधी हा धूमकेतू आला होता, तेव्हा इथे पृथ्वीवर निअँडरथल्स या आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली. हा धूमकेतू कसा, कुठे, कधी पाहता येईल आणि धूमकेतूंचा अभ्यास महत्त्वाचा का असतो? जाणून घेऊयात. निवे...

क्रीडा क्षेत्रातील लैंगिक छळ : कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? : सोपी गोष्ट पॉडकास्ट 23.01.2023

क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंचा लैंगिक छळ होत असतो अशा चर्चा नेहमीच कानावर येत येतात. पण याबद्दल भारतीय कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपीगोष्टमध्ये.

मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 21.01.2023

आता सरकार एक असा नियम आणू पाहतंय, ज्यामुळे एखादी गोष्ट, बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे अधिकार सरकारलाच असतील. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021च्या नियमांमध्ये प्रस्तावित दुरुस्तीच्या दस्तावेजात म्हणण्यात आलंय की कुठल्याही सोशल मीडियावर आणि ऑनलाईन पोर्टर्ल्सवर अशा मजकुराला स्थान देण्यात येऊ नये, ज्या मजकुरास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या Press Information Bureauच्या फॅक्...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आता परदेशात राहूनही UPI पेमेंट्स करता येतील? 17.01.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे? 16.01.2023

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आर्थिक परिषद म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे गेले आहेत. फक्त शिंदेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस बोम्माई यांच्यासह देशातले मोठे उद्योगपतीही या परिषदेला जाणार आहेत. पण दावोसमध्ये जाऊन हे लोक नेमकं काय करतात? ही परिषद काय आहे? त्यातून कुणाचा फायदा होतो आणि त्...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेत पक्षप्रमुख कसा निवडला जातो? 12.01.2023

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. 10 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने लाखो कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केली आहेत. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला आहे...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वातावरणातलं हे भगदाड माणूस कसं बंद करतोय? 11.01.2023

पृथ्वीभोवतीचं ओझोनचं आवरण वाचवण्याच्या माणसाच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणेच यश आलं आहे.पुढच्या काही दशकांतच या आवरणाला पडलेलं भगदाड भरून निघेल असं संयुक्त राष्ट्रांनी एका ताज्या अहवालातून जाहीर केलं आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : परदेशी विद्यापीठांची भारतीय केंद्रं 10.01.2023

सरकार परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची केंद्रं उघडण्यासाठी आमंत्रण देण्याच्या विचारात आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा 5 जानेवारीला जाहीर केला.पण यामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होईल का? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

ब्राझीलच्या राजधानीत हिंसाचार का उसळला? सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi 09.01.2023

8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले. काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मधून. निवेदन - विशाखा निकम एडिटिंग - अरविंद पारेकर

ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 07.01.2023

मोदी सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केलीय. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. पण काय आहे हे मिशन? हायड्रोजनपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे का? आणि जर हो, तर आपण आजवर या तंत्रज्ञानाचा वापर का नाही केलाय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 06.01.2023

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये तब्बल 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झाले. यात 1 लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला तर 3 लाख 84 हजार 448 जण जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील लोक रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू किंवा जखमी होतात. सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडूमध्ये झाल्याची नोंद आहे, त्या मागोमाग उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. संशोधन – दीप...

मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती शक्य आहे का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 04.01.2023

अमेरिकेत पारंपरिक अंत्यविधीला पर्याय म्हणून ह्युमन कंपोस्टिंग ही पद्धत नावारुपाला येत आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन राज्याने यासाठी मान्यता दिली होती. आतापर्यंत अमेरिकेच्या सहा राज्यांनी ह्युमन कंपोस्टिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला आपल्या शवाचं रुपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. ‘ह्युमन कंपोस्टिंग’मध्ये नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्र...

देशभरात जैन समाजाचे लोक का निदर्शनं करत आहेत? सोपी गोष्ट पॉडकास्ट 03.01.2023

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि झारखंडसह देशभरात सध्या जैन धर्मीयांचं आंदोलन सुरू आहे. नुकतंच कोल्हापूर आणि मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असलेल्या झारखंडमधील ‘श्री सम्मेद शिखर’ धर्मस्थळाला पर्यटनस्थळ करण्याच्या प्रस्तावाला जैन समुदायाचा विरोध आहे. झारखंड राज्यात गिरीडीह जिल्ह्यात पारसनाथ पर्वतावर जैन धर्मीयांचं पवित्र स्थळ आहे. जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांचं याच ठ...

भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट 02.01.2023

2023 या वर्षात जगातल्या एक तृतियांश देशांमध्ये Recession म्हणजे आर्थिक मंदी येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं दिला आहे. यामागची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा भारतावर काय परिणाम होईल? भारतातही नजीकच्या काळात आर्थिक मंदी येईल का, जाणून घेऊयात. संशोधन – अर्चना शुक्ला, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस कुठे, कितीला, कशी मिळेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 31.12.2022

अखेर कोरोनावरची नाकावाटे दिली जाणारी लस अर्थात nasal vaccine आली आहे. भारत बायोटेक म्हणजेतीच कंपनी जी कोव्हॅक्सिन लस देत होती, त्याच कंपनीने ही लस भारतात आता आणली आहे. पण ही लस नेमकी काय आहे? ती कुठे? कशी आणि कितीला मिळेल? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

नेपाळमधल्या सत्तांतराचा चीनला फायदा होईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 30.12.2022

विवारी (25 डिसेंबर 2022) नेपाळच्या राजधानीत अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुष्प कमल दाहाल उर्फ प्रचंड यांनी तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. प्रचंड हे नेपाळमधल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची चीनसोबतची जवळीक चर्चेत असते. ते पंतप्रधान झाल्याचा भारत-नेपाळ संबंधांवर आणि चीनसोबतच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग –...

BF.7 या नवीन कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन लागेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 29.12.2022

चीनमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत, तशी भारतातही भारतातही भीती वाढली आहे. पण यावेळी आपण कोव्हिडची किती भीती बाळगली पाहिजे? लस, मास्क, गोळ्या, ऑक्सिजन, प्रवास.... याबद्दल तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं बीबीसीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेतली. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

बेळगाव केंद्रशासित करता येईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 29.12.2022

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजतो आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत एक पर्याय म्हणून बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा, असं उद्धव ठाकरे यांनी सुचवलं. पण खरंच बेळगाव केंद्रशासित करता येईल का? एखादा नवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्याविषयी कायदा काय सांगतो? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

चंदा कोचर यांवर आरोप असलेला ICICI बँक - व्हीडिओकॉन घोटाळा काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 28.12.2022

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) अटक केली. तर व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली आहे. व्हिडीओकॉन समूहाला 3250 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

BF.7 ओमिक्रॉन व्हेरिअंटपासून आपण घेतलेल्या लशी संरक्षण देतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.12.2022

कोरोनाचे रुग्ण चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढल्यानंतर भारतातही एका नवीन व्हेरिअंटचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलीय, प्रशासन सतर्क झालंय आणि पुन्हा मास्कची सक्ती होणार की काय, म्हणून तुमचीआमची काळजी वाढलीय. पण अशात एक गोष्ट सगळेच विचारतायत, की मी काही महिन्यांपूर्वी ती कोव्हिडची लस घेतली होती, आणि तो बूस्टर डोसही घेतला होता. त्याचं काय? या नवीन को...

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds