BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

धनगर आरक्षणाचा तिढा काय आहे? | BBC News Marathi 22.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

खलिस्तान चळवळ कशी आणि कधी सुरु झाली? BBC News Marathi 20.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारत - कॅनडा संबंध का बिघडले आहेत? BBC News Marathi 19.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सूर्यमालेत पृथ्वीसारखा नवीन ग्रह सापडला आहे का? BBC News 18.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

एलियन्स खरंच असतात का? NASA उडत्या तबकड्यांबद्दल काय म्हणतं? | BBC News Marathi 15.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवर नेमका वाद काय? BBC News Marathi 14.09.2023

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरून गेला काही काळ देशात चर्चा सुरू आहे. वर्तमान पद्धतीला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला यासंदर्भात कायदा आणायला सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने मधल्या काळात एक समितीही नेमली पण सरकारने त्या समितीच्या रचनेत बदल करून एक विधेयक राज्यसभेत मांडलं, हे विधेयक आता लोकसभेत चर्चेसाठी येणार आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे विधेयक निवडणूक आयुक्तांना ‘पंतप्रधानां...

भारतात डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार का? BBC News Marathi 13.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताला युरोपशी जोडणारा इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे? BBC News Marathi 12.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सिनेमा वाटावा अशा नाट्यमय पद्धतीने चंद्राबाबूंना अटक केली गेली, पण त्यांच्यावर आरोप काय आहेत? | BBC News Marathi 12.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

शुक्राणू, स्त्रीबीज आणि गर्भाशिवाय प्रयोगशाळेत भ्रुणाची निर्मिती | BBC News Marathi 08.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात? | BBC News Marathi 07.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारत, हिंदुस्तान, इंडिया - देशाची इतकी नावं कशी पडली? | BBC News Marathi 07.09.2023

संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र मागच्या दोन दिवसांपासून आपल्या देशाचं नाव इंडिया असं वगळून फक्त भारत ठेवलं जाण्याची चर्चा सध्या सुरूय. जून 2020 मध्ये भारताच्या संविधानातून इंडिया हा शब्द काढून तिथे फक्त भारत असा उल्लेख करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं क...

G20 परीषद का होतेय? भारतासाठी हे अध्यक्षपद का महत्त्वाचं आहे? | BBC News Marathi 05.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

एक देश, एक निवडणूक शक्य आहे का? फायदे काय? तोटे काय? सोपी गोष्ट | BBC News Marathi 05.09.2023

‘एक देश एक निवडणूक’ या शक्यतेच्या चाचपणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनही बोलावलं आहे. पण खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? त्याचे फायदे काय? तोटे काय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन – आशय येडगे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

दुष्काळ कधी जाहीर केला जातो? सरकार टाळाटाळ का करतं? BBC News Marathi 01.09.2023

2023च्या पावसाळ्यात काही आठवडे धोधो पाऊस कोसळला, पण मग पावसाने अशी काही दडी मारली की शेतंच्या शेतं कोरडी ठक्क पडली. धरणांचा साठा पुरेल की नाही, गुरांचं काय होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दुष्काळ पडला तर शेतीचं काय, हे सगळं प्रश्न आ वासून उभे आहेत. पण दुष्काळ कसा ठरवतात? तो कोण जाहीर करतं? आणि दुष्काळ जाहीर करण्यात सरकार टाळाटाळ करतंय, असे आरोप नेहमी का होतात, याबद्दल बोलणार आहोत. मी सिद्धना...

इस्रो आता सूर्याकडे आदित्य L1 मोहीम का पाठवतंय? BBC News Marathi 30.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

चंद्रावरच्या मातीत रोप लावणं शक्य आहे का? BBC News Marathi 30.08.2023

भारताचं चंद्रयान-3 23 ऑगस्टला यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं. आणि त्यातून आता प्रज्ञान रोव्हर बाहेरही आलं आहे, ज्याच्या मदतीने इस्रो पुढचं संशोधन सुरू करेल. पण हे सगळं संशोधन चंद्रावरच होईल, कारण चंद्राची माती आणि इतर खडक काही पृथ्वीवर परत आणणं सध्याच शक्य नाही. पण तुम्हाला माहिती असेलच, यापूर्वीच्या अनेक चांद्र मोहिमांमध्ये रशिया, अमिरेका आणि चीनने चंद्रावरून बराच मालमसाला पृथ्वीव...

आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाईल? | BBC News Marathi 29.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

विक्रम, प्रग्यान 14 दिवसांनंतरही काम करतील? | BBC News Marathi 28.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

गेल्या 50 वर्षांत चंद्रावर अंतराळवीर का नाही गेले? BBC News Marathi 25.08.2023

भारताचं चंद्रयान तर चंद्रावर पोहोचलंय. आता ते तिथून त्याचं लँडर रोव्हर काय माहिती, काय फोटो पाठवतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण हो, तिथून आपल्याला काही माती किंवा खडक आत्ताच आणता येणार नाही. कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते. पण मग जर चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल, तर कल्पना करा ना, चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर कसं आणलं जात असेल? आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांत...

चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार? BBC News Marathi 23.08.2023

अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे. आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – श्रीकांत...

चंद्रयान 3 सारख्या चांद्र मोहिमांमुळे आजवर मिळालेल्या 5 कामाच्या गोष्टी | BBC News Marathi 23.08.2023

चंद्रयान-3च्या लँडिंगची उत्सुकता शिगेला आहे. रशियाच्या अपयशानंतर नक्कीच जरा धाकधूकही वाढली आहे. कारण फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या मोहिमेवर आहे. पण तुम्हाला माहितीय, चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय. पण कोणत्या गोष्टी? पा...

चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर नेमकं कसं उतरेल? BBC News Marathi 21.08.2023

चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील. या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का लँड करणार आहे? | BBC News Marathi 18.08.2023

इस्रोचं चांद्रयान-3 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन – जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi 17.08.2023

तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता तामिळनाडू सरकारने राज्यातून NEET हद्दपार करायचं ठरवलंय. पण काय असते ही परीक्षा? ती रद्द झाली तर काय पर्याय काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निव...

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds