BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk

Auteur

BBC Marathi Audio

Categorie

Health

Website van de podcast

www.bbc.co.uk

Nieuwste aflevering

25 mrt. 2026

Waar luisteren?

Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaar

Podcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts

Download het op Google Play Gratis installeren Android bijna 10 mln downloads · beoordeling 4,8 iOS binnenkort

Afleveringen

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू का झाल्या नाहीत? BBC Marathi News 13.02.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi 13.02.2024

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे रफामधल्या लाखो निर्वासितांच्या मनात चिंता आणि भीतीचं सावट आहे. रफा शहर महत्त्वाचं का आहे आणि इस्रायल इथे बाँबहल्ले तीव्र का करत आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

कॉपी रोखण्यासाठीचा कायदा काय आहे? तो किती उपयुक्त ठरेल? BBC News Marathi 09.02.2024

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये ल...

लिव्ह इन रिलेशनविषयी उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय म्हटलंय? | BBC News Marathi 08.02.2024

उत्तराखंडच्या भाजप सरकारनं राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता 2024 विधेयक पास केलं. पण या कायद्यातल्या लिव्ह इन म्हणजे एकत्र राहणाऱ्या अविवाहित जोडप्यांबाबतच्या नियमाने जास्त लक्ष वेधून घेतलं आहे. या कायद्यात आहे तरी काय? आणि त्यावरून वाद का होतोय? पाहा ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi 07.02.2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi 06.02.2024

लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते. पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi 06.02.2024

पाकिस्तानात सलग तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या देशात मतदान होणार आहे. सध्या तिथे सत्तेच्या खेळात नवाझ शरीफ, इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्यात त्रिकोणी राजकीय चढाओढ सुरू आहे. नेमकी काय समीकरणं आहेत आणि त्यांचा भारतावर काही परिणाम होईल का, जाणून घ्या. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? | BBC News Marathi 02.02.2024

जमिनीत मिसळलेल्या प्लॅस्टिकमुळे शेकडो एकर जमीन खराब झाल्याचं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात गेल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय काय आहेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ठेवणं कितपत सुरक्षित? BBC News Marathi 02.02.2024

भारतात सुमारे 9.3 कोटी लोक पेटीएम वापरतात. पण 31 जानेवारी 2024 ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली. आता पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होईल? रिजर्व्ह बँकेने कोणते निर्बंध लादले आहेत? भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकेकाळी पहिल्या नंबरवर असणाऱ्या पेटीएमवर अशी वेळ का आली? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे, गुलशनकुमार वनकर निव...

मेंदूत चिप बसवली तर फक्त विचार करून काॅम्प्युटर चालवता येईल का? | BBC News Marathi 01.02.2024

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिलीय. आता मेंदूतल्या विचारांच्या जोरावर मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस चालवता येईल असं मस्क म्हणालेत. नेमका हा प्रयोग काय आहे? शस्त्रक्रिया करून मेंदूत चिप बसवली तर त्याचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

म्यानमार सीमेवर भारत कुंपण का घालणार? | BBC News Marathi 30.01.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi 26.01.2024

दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निव...

कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi 24.01.2024

जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिं...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणात ‘हे’ प्रश्न विचारले जाणार | BBC News Marathi 22.01.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? त्यापासून वाचायचं कसं? BBC News Marathi 19.01.2024

युट्युबचे काही व्हिडिओ लाईक करा आणि घरबसल्या पैसे कमवा, दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील. तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश...

काश्मीरमध्ये बर्फ का पडला नाही? BBC News Marathi 18.01.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi 18.01.2024

एकीकडे येत्या दशकात जगाला पहिला Trillionaire मिळेल तर दुसरीकडे याच काळात आणखीन कितीतरी लोक गरिबीत ढकलले जातील. ऑक्सफॅमचा रिपोर्ट नेमका काय आहे आणि वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टीच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

दहशतवादाचे आरोप करत इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? | BBC News Marathi 17.01.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पॅकेजची माहिती आता जाहीर केली जाणार नाही, कारण... | BBC News Marathi 15.01.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताच्या नाराजीचा मालदीववर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi 09.01.2024

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेक भारतीयांनी असं ट्विट केलंय की आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला पर्यटनासाठी जायला हवं. पण मालदीवच्या काही मंत्र्यांनी याला विरोध केला आणि सोशल मीडियावर एक वॉर सुरु झालं. खरंच भारतीय लोकांनी मालदीवचा बहिष्कार केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या...

महाराष्ट्रात जानेवारी उजाडला तरी थंडी का आली नाही? | BBC News Marathi 03.01.2024

कॅलेंडरवर हिवाळा सुरु झाला, पण अजून महाराष्ट्रात थंडी दिसत नाही. डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं पण आता जानेवारीतही थंडी येणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नेमकं असं का होतंय? मागच्या वर्षीचं तापमान नेमकं किती होतं? जानेवारी ते मार्च या थंडीच्या महिन्यांमध्ये नेमका कुठे पाऊस पडेल आणि याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय...

'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi 01.01.2024

नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही. गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरु झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिट...

हूती बंडखोरांनी समुद्रात केलेल्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढणार? | BBC News Marathi 29.12.2023

येमेनची माजी राजधानी सनावर ज्यांचा ताबा आहे अशा हूती बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात हूती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे एक नवीन आघाडी उघडली गेली आहे. याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल? भारतात यामुळे महागाई वाढेल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं, सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi 27.12.2023

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे होणारे बदल नेमके काय आहेत? सामान्य माणसाच्या आयुष्यात यामुळे कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? आणि विरोधकांनी या कायद्यांमुळे केंद्र सरकारवर का टीका केलीय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | BBC News Marathi 26.12.2023

महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या मुलाला त्यांच्या आईची जात लावता आली नव्हती पण तशाच एका प्रकरणात न्यायालयाने गुजरातमध्ये मुलाला आईची जात लावण्याची परवानगी दिली होती. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये आईची जात मुलांना लावण्याबाबत कायदा काय सांगतो? याआधी अशी प्रकरणं घडली आहेत का? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग...

Luister naar de podcast सोपी गोष्ट in Replaio

Radio en podcasts in één app - gratis en zonder account. Installeer vandaag nog en mis de lancering niet

Download het op Google Play

Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds