Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 episoder

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: www.storytel.com

Forfatter

Santosh Deshpande

Kategori

Arts

Podkastens nettsted

www.storytel.com

Siste episode

17. sep 2026

Hvor kan du lytte?

Podkaster i appen Replaio Radio Kommer snart

Podkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster

Last ned på Google Play Installer gratis Android nesten 10 mill. nedlastinger · 4,8 i vurdering iOS snart

Episoder

अशी साकारली 'जस्ट फ्रेंड्स'... 18.12.2021

स्टोरीटेलवर ऑडिओबुक्सप्रमाणेच ऑडिओड्रामालाही लोकप्रियता मिळू लागली आहे. नुकताच स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंड्स हा ऑडिओ ड्रामा रिलीज झाला. सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांनी लिहिलेला हा ध्वनिपट ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे यांनी वाचला आहे. 'जस्ट फ्रेंड्स'ची संकल्पना कशी साकारली, ती प्रत्यक्षात कशी आली, सांगत आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे... जस्ट फ्रेंड्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा - https://www.st...

साहित्य संमेलनात स्टोरीटेल... 11.12.2021

नाशिकमध्ये नुकतंच ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अगदी थाटामाटात आणि साहित्यप्रेमींच्या गर्दीत संपन्न झालं. या संमेलमात ग्रंथदालन हे नेहमीच साहित्यरसिकांना आकर्षित करत असतं. मात्र, यावेळी या ग्रंथदालनातील स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या दालनाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात स्टोरीटेल सबस्क्राईब करून घेण्यासाठी साहित्यरसिकांनी गर्दी केली होती. याच संमेलनाचा आणि स्टोरीटेलला दिलेल्या भरघो...

संमेलन स्पेशल स्टोरीटेल कट्टा : आनंद माडगूळकर 04.12.2021

मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक आणि रसिकांसाठी अनोखी पर्वणी. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिक येथे संपन्न होत आहे, यानिमित्ताने आपला कट्टाही अगदी खास मान्यवरांच्या संवादाने साजरा होतोय. गीतरामायणकार गदिमा यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लेखक, कवी, गायक आनंद माडगूळकर यांनी संमेलनाच्या आठवणी, गदिमांच्या व इतर दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देत हा कट्टा अगदीच स्पेशल केला आहे, त...

कट्टा स्पेशल : अरूण खोरे 27.11.2021

स्टोरीटेल कट्ट्यावर नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर संवाद साधण्यासाठी येतात. यावेळीही कट्ट्यावर ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी विविध विषयांवर, विविध पैलूंवर आपल्या दृष्टिकोनातून मतं मांडली आहेत... त्यामुळे स्टोरीटेल वर्धापनदिन विशेष कट्टा हा अधिक प्रगल्भ झालाय... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा... सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans  

स्टोरीटेल ऐकताना, चित्र काढताना... 20.11.2021

आजचा स्टोरीटेल कट्टा खूप खास आहे कारण, स्टोरीटेलच्या एका निस्सीम श्रोत्याशी प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी गप्पा मारल्या आहेत. चारूदत्त पांडे या चित्रकाराने  स्टोरीटेलवर तब्बल ९०० तास पुस्तकं ऐकली आहेत, तर आतापर्यंत त्याची २२५ पुस्तकं ऐकून झाली आहेत. याबाबतचा सर्व अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केलाय. तेव्हा ऐकायला विसरू नका हा स्पेशल कट्टा...

कट्टा स्पेशल : वसंत वसंत लिमये 13.11.2021

रहस्यमयी आणि थरारकथांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांची 'विश्वस्त' ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेलवर रिलीज झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा, आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका...

पुस्तकांचं अद्भुत जग 09.11.2021

वाचनाचा ध्यास आपल्याला जीवनाचं एक विलक्षण दर्शन घडवू शकतं. मराठी मुलखात वाचनसंस्कृती विकसित झाली, रुजली. कोल्हापूरातील पुस्तकप्रेमी अभ्यासक अरुण नाईक यांच्याशी झालेल्या संवादातून पुस्तकांची कूळकथा तर उलगडतेच शिवाय, अनेक रंजक आठवणी आणि माहिती यातून त्यांनी अनुभवलेलं पुस्तकांचं एक अद्भूत जग आपल्याला गवसतं...

तिमिरातुनी तेजाकडे... 06.11.2021

गेले दीड वर्ष आपण सगळेच एका अतिशय कठीण काळातून जातो आहोत. कधीही विचार केला नव्हता अशा गोष्टी घडल्या, आपण घरात अडकून पडलो, अनेकांच्या रोजगाराचे प्रश्न तयार झाले, मुलांबरोबर आपल्या सगळ्यांचं आयुष्यही डिजिटल झालं, कोरोनाने फक्त आपल्याला घरात डांबलं आपल्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण केली. या सगळ्याचा प्रचंड मानसिक ताण आपल्यावर आला. अस्वस्थता निर्माण झाली. पण आता यातून बाहेर पडलंच पाहिजे. दिवाळी न...

श्रवणीय दिवाळी... 30.10.2021

दरवर्षी प्रमाणेच यंदाही स्टोरीटेलवर दिवाळी अंकांची रेलचेल आहे... या दिवाळी अंकांचा इतिहास, पार्श्वभूमी, विषय, विचार या सर्व पैलूंबाबत संवाद साधला आहे, युनिक फिचर्स व समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी यांच्याशी... तसेच स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणते दिवाळी अंक आणि ऑडिओबुक्स येत आहेत याबाबत माहिती दिली आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी... सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/...

'केस नंबर 002'ची केस! 23.10.2021

स्टोरीटेलवर नुकतीच 'केस नंबर 002' ही ऑडिओ सिरीज रिलीज झालीय. स्टोरीटेलवर नेहमीच क्राईम थ्रिलर कथांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. या ही कथेला उत्तम प्रतिसाद मिळतोय... या निमित्ताने कथेची लेखिका सायली केदार आणि जिच्या दमदार आवाजात ही कथा रेकॉर्ड झालीय अशी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने.. तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा!  'केस नंबर 002' ऐकण्...

कट्टा स्पेशल : श्रीपाद ब्रह्मे 16.10.2021

आजचा कट्टा अगदी विशेष आहे, कारण आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शैलीदार लेखक व महाराष्ट्र टाईम्सचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे आहेत. तसंच स्टोरीटेलवर या आठवड्यात अनेक ऑडिओबुक्सची भरगच्च अशी श्रवणीय मेजवानी असणार आहे... ती नक्की काय आहे यावर चर्चा केली आहे श्रीपाद ब्रह्मे, प्रसाद मिरासदार,संतोष देशपांडे यांनी.  सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans...

वारसा 'मिरासदारी'चा! 09.10.2021

'मिरासदारी'ने अवघ्या महाराष्ट्राला हसविणारे साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी नुकताच आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, दमांचे पुतणे व स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी... आवर्जून ऐका हा मिरासदारी कट्टा... या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.   सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठ...

महात्मा गांधी जयंती विशेष : अज्ञात गांधी 02.10.2021

स्टोरीटेलवर गांधी जयंतीनिमित्त ऐका - गांधीजींच्या अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा करणारं, स्वानुभवावर आणि खात्रीशीर अनुभवांवर आधारित आगळं -वेगळं ऑडिओबुक अतुल पेठे यांच्या आवाजात... तसेच पूर्वार्धात स्टोरीटेल कट्ट्यावर ऐका अभिनेता हरीश कुलकर्णी, प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्या खुमासदार गप्पा व जाणून घ्या या आठवड्यात स्टोरीटेलवर काय नवीन ऐकायला मिळणार...   अज्ञात गांधी ऐकण्यासाठी खालील लिंकवर...

मराठवाडी गप्पा! 25.09.2021

स्टोरीटेलवर कायमच दर्जेदार ओरिजिनल ऑडिओबुक्सची निर्मिती होत असते. अशीच एक भन्नाट ओरिजिन नुकतीच स्टोरीचेलवर रिलीज झालीय... सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड असं या सिरीजचं नाव असून माधवी वागेश्वरी यांनी ही सिरीज लिहिली आहे. मराठवाडी लहेजा असलेली सुरेखा, पुणेरी सायली आणि मराठवाड्यातलाच सचिन अशा तिघांची ही कथा आहे. या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि साईनाथ गणुवाड यांचा... तसेच या सिरीजचे...

स्त्री साहित्य... अरूणा ढेरेंच्या नजरेतून! 18.09.2021

मराठी साहित्याला स्त्री साहित्यिकांची मोठी देणगी लाभली आहे. स्टोरीटेलवरही लेखिका आणि अभिवाचक या दोन्ही भूमिका उत्तमपणे वठविणाऱ्या अनेक महिला आहेत. मराठीत स्त्रियांच्या लेखणीतून साकारलेले साहित्य आणि महिलांचे प्रखर विचार याबाबत स्टोरीटेल कट्ट्यावर भाष्य केलं आहे ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांनी... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा... अरूणा ढेरे यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - http...

कट्टा स्पेशल : यमाजी मालकर 11.09.2021

स्टोरीटेलवर रिलीज होणाऱ्या ऑडिओबुक्सच्या यादीसोबतच आज आपल्याला एक वेगळा आणि माहितीपूर्ण संवाद ऐकायला मिळणार आहे. या कट्ट्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक यमाजी मालकर यांनी स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबद्दल आणि त्याच्या विषयांवर अर्थपूर्ण गप्पा मारल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आहे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी... सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscr...

'स्टोरीटेल'च्या पटावर 'मावळा'! 04.09.2021

सध्या ‘मावळा’ या बोर्डगेमची सर्वत्र चर्चा आहे. मराठीतील एकमेव ऐतिहासिक असा हा बोर्डगेम कसा साकारला गेला, या गेमची संकल्पना काय, हा गेम कसा खेळावा या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे निती इन्फोटन्मेंटचे सहसंस्थापक अनिरूद्ध राजदेरकर यांनी... ‘मावळा द बोर्ड गेम’चे वैशिष्ट्य म्हणजे या गेममध्ये एकमेकांविरूद्ध न खेळता, सोबत हा गेम खेळावा लागतो. स्वराज्याचा संपूर्ण प्रवास या गेममध्ये मांडण्यात आलेला आहे. फ...

भन्नाट ऑगस्ट एंड!!! 28.08.2021

ऑगस्ट महिन्यात स्टोरीटेलवर नानाविध ऑडिओबुक्सची बरसात झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा शेवटही अशाच भन्नाट पुस्तकांनी होणार आहे... या आठवड्यात कोणकोणत्या ऑडिओबुक्सची श्राव्यमेजवानी श्रोत्यांना मिळणार यावर सविस्तर संवाद साधला आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी...  सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

एक कट्टा असाही…! 21.08.2021

आज तुम्हाला कट्ट्यावर एकदम अनपेक्षित गप्पा ऐकायला मिळणार आहेत... दर आठवड्याला आपण येत्या आठवड्यात स्टोरीटेल काय नवीन घेऊन येतंय याबद्दल माहिती ऐकतो, पण यावेळी त्यासोबतच नवीन येणाऱ्या ऑडिओबुक्सबद्दल, त्यासंबंधित विषयांवर सविस्तर माहिती आपण ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत संजय सोनवणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत... त्यांना बोलतं केलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी! तेव्हा जरूर ऐका हा नवाकोरा अ...

शिवचरित्रावर उधळलेला 'बेल भंडारा'! 14.08.2021

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड जीवन आपल्या समोर तेजस्वीपणे मांडणाऱ्या बाबासाहेबांंचं आयुष्य नक्की कसं होतं याचा वेध डॉ. सागर देशपांडे यांनी घेतला आणि साकारली 'बेल भंडारा' ही कादंबरी... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून...

पाणी! पाणी!! अन् विनय आपटेंची वाणी... 07.08.2021

पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे मानवी संबंध कसे प्रभावित होतात याचा वेध घेणाऱ्या मनःस्पर्शी कथा आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पाण्यावाचून होणारी परवड अन् त्या मागचे विविध पैलू 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहात गोष्टीरूपात मांडले आहेत. या कथांना आवाज लाभला आहे दिवंगत अभिनेते विनय आपटे, लालन सारंग व डॉ. गिरीश ओक यांचा... आवर्जून...

'61 मिनिट्स'- बिहाइंड द सिन्स! 31.07.2021

ऐकण्याचा पुरेपुर आनंद देणारा, मराठीतील थरारक ध्वनीपट स्टोरीटेलने नुकताच रिलीज केलाय... '61 मिनिट्स' या थरारक आणि गूढ ध्वनिपटाची कहाणी रंगते एका अंधाऱ्या खोलीत... ४ अनोळखी लोकांना किडनॅप केलं जातं आणि मग रंगतं सूडाचं नाट्य... नक्की काय होतं शेवटी? ऐका स्टोरीटेलवर... ही कथा कशी साकारली गेली, त्यासाठी दर्जेदार आवाजांची निवड कशी करण्यात आली अन् हा ध्वनीपट कसा पूर्णत्वास गेला हा सर्व प्रवास आम्ही जाणून...

गोष्ट 'हौस हसबंड'ची! 24.07.2021

स्टोरीटेलने एका भन्नाट विषयावर ऑडिओ सिरीज आणली आहे... रोहित आणि रेवाची ही गोष्ट ऐकून तुम्हालाही मजा वाटेल... कारण नवरा-बायको या रोलबद्दलच्या त्यांच्या कन्सेप्ट्स जरा वेगळ्याच आहेत... स्वयंपाकाचं गणित न जमलेली रेवा आणि जॉबचं कोडं न उलगडलेला रोहित... आणि त्यांच्या असं असण्याने झालेली पंचाईत... या  सगळ्याला ते दोघं कसं तोंड देतात, इतरांची बोलती कशी बंद करतात या सर्व मजेशीर किश्शांनी भरलेली हाऊस हसबंड...

प्रेरणादायी असं काही... 17.07.2021

माजी सनदी अधिकारी आणि उत्तम व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांचं आणि श्रवणाचं नातं कसं आहे. उत्तम श्रवणामुळे आज ते देशसेवेसारखे उदात्त कर्तव्य बजावू शकले. धर्माधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनातून अनेक उत्तम अधिकारी तयार केले, आपल्या व्याख्यानांतून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले, देशसेवा हा जीवनाचा गाभा मानत कर्तव्य बजावले... त्यांचा हा आजवरचा प्रवास आणि ऐकण्याशी असलेलं त्यांचं असीम नातं आणि यावर...

ज्ञातापासून मुक्ती 10.07.2021

मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल जे. कृष्णमूर्तीं यांनी 'ज्ञातापासून मुक्ती' या पुस्तकात आपले प्रगल्भ विचार मांडले आहेत. धर्मामुळे होणारा संघर्षच नको या भावनेतून कृष्णमूर्ती यांनी सर्वच धर्म नाकारले. स्टोरीटेलवर जे. कृष्णमूर्ती यांच्या ज्ञातापासून मुक्ती या पुस्तकाला अनिरूद्ध दडके यांचा आवाज लाभला आहे. ऐकू आनंदे या कार्यक्रमात दडके यांनी या ऑडिओबुकमध...

Hør på podkasten स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio og podkaster i én app - gratis og uten registrering. Installer i dag, og ikke gå glipp av lanseringen

Last ned på Google Play

Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.