Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 episoder

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: www.storytel.com

Forfatter

Santosh Deshpande

Kategori

Arts

Podkastens nettsted

www.storytel.com

Siste episode

17. sep 2026

Hvor kan du lytte?

Podkaster i appen Replaio Radio Kommer snart

Podkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster

Last ned på Google Play Installer gratis Android nesten 10 mill. nedlastinger · 4,8 i vurdering iOS snart

Episoder

`क्रिप्टो करन्सी`चं भवितव्य काय? 03.06.2023

आभासी चलन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी (उदा. बिटकॉइन) हा अनेकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय आहे. वेगानं डिजिटाइज होत चाललेल्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये क्रिप्टो करन्सीच्या आगमनामुळे खळबळ माजली आहे. ती का माजली आहे, या करन्सीला भवितव्य आहे का, गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहता येईल का ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उलगडणारा हा पॉडकास्ट. स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवे...

मान्सून जगावा, जाणावा... मान्सून केरळी अनुभवावा! 27.05.2023

`मान्सूनच्या स्वागताला, चला केरळाला` असा एक आगळा उपक्रम पुण्यातील `भवताल मंच`ने  हाती घेतला आहे. पर्यटनातील रंजनाबरोबरच त्यातून निसर्गाच्या, पर्यावरणाच्या आणि स्थानिक लोकजीवनाच्या आणखी जवळ जात आपण समृद्ध होऊ शकतो, अशा विचारांतून प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक, पत्रकार अभिजित घोरपडे यांनी `भवताल`च्या माध्यमातून अशा विविध संकल्पना राबवण्याचा संकल्प सोडला आहे. मान्सून अनुभवणं म्हणजे नेमकं काय याची उलगड कर...

हानिट्रॅप, हेरगिरी - किती खोटी? किती खरी? 20.05.2023

 हेरकथा म्हणजे वाचकांना कायम खिळवून ठेवणारा साहित्यप्रकार. हेरगिरी जी आपण पुस्तकांतून वाचतो किंवा पडद्यावर पाहतो, त्यापेक्षा वास्तवात कशी चालते याचीही उत्सुकता अनेकांना असते. हेरांचे मुख्य काम काय असते? हानी ट्रॅप हा प्रकार नेमका कसा घडतो? माहिती मिळवण्यासाठी हानी ट्रॅप कामी येतो का? आंतरराष्ट्रीय हेरगिरीमध्ये शत्रुंप्रमाणे मित्रदेशांवरही हेरगिरी होते का? अशा प्रकरणांत हेरगिरी उघडकीस आली तर गुप्तच...

ऐकू या, `बिनचूक मराठी` लिहायचं कसं? 13.05.2023

आपली मराठी भाषा किती लोभस, सुंदर! मात्र, मराठीत लिहिताना अनेकदा आपण कळत नकळत चुका करतो. या चुका नेमक्या कोणत्या, मराठी शब्द लिहिताना कोणती काळजी घ्यायला हवी, व्याकरणाच्या गुंतागुंतीत न अडकता मराठीचे साधे, सोपे नियम कोणते आहेत, इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द कोणते आहेत, शहरांची नावे, अंकलेखन करताना काय काळजी घ्यायला हवी? आपणास रोजच्या व्यवहारात पडणाऱ्या या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारे पुस्त...

`मनी` की बात! 06.05.2023

पैसा हे सर्वस्व नाही, मात्र व्यवहारात पैशाविना सारं काही अडतं देखील. मग, या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याचं अर्थभान प्रत्येकालाच असणं गरजेचं ठरतं. आपल्या  मराठी समाजाचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हवा, गुंतवणुकीपासून बचतीपर्यंत, विमाखरेदीपासून शेअर बाजारापर्यंत अर्थव्यवहारातील कोणत्या बाबींची माहिती आपल्याला हवी, अल्पकालीन व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य म्हणजे काय व ते कसे असायला हवे अशा अन...

`लिबरल आर्टस्` मध्ये `करिअर` शोधताना... 29.04.2023

इंजिनिअरिंग, मेडिकल या पल्याड जात ज्यांना कला शाखेच्या माध्यमातून वेगळं काही करावंसं वाटतं अशा सर्वांना आकर्षित करणारा विषय म्हणजे लिबरल आर्टस्. हा विषय नेमका काय आहे, त्यातून काय साध्य होऊ शकतं, नव्या शैक्षणिक धोरणाशी त्याचं काय नातं असू शकतं आणि लिबरल आर्टस् हा विषय भविष्यात आपणास काय देऊ शकतो, या व अशा अनेक गोष्टींची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. एमआयटी वर्ल्ड युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ लिबरल...

`चॅट जीपीटी` वाचनसंस्कृतीवर काय परिणाम करणार? 22.04.2023

कृत्रिम बुद्धमत्ता म्हणजेच आर्टिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान जसजसे विकसित होते आहे, तसतसे त्याचा प्रभावही विविध क्षेत्रांवर दिसून येऊ लागला आहे. `चॅट जीपीटी` सारख्या चॅटबोटमुळे क्रिएटिव्ह म्हणजेच कला, लेखन अशा क्षेत्रावर कसा आणि कितपत प्रभाव पडू शकतो, याची अनेकांना उत्सुकता आहे. याच विषयावर स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांना. भवि...

वाचनवाटेवरची वेगळी पुस्तकं! 15.04.2023

वाचनाची आवड ही वेगळ्या पुस्तकांमुळे बहरते, समृद्ध होते. अनेक पुस्तकं अशी असतात, ज्यांची नावं आपल्याला ठाऊकही नसतात पण ती अत्यंत वेगळी ठरतात. काही लेखकही अनेकांसाठी अज्ञात असतात पण त्यांचे लेखन तुम्हाला खिळवून ठेवते. वाचनवाटेवरील अशाच अनेक पुस्तकांवर संतोष देशपांडे यांनी मुक्त संवाद साधला आहे, वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक व वाचन चळवळीचे अभ्यासक सुनील चव्हाण यांनी. पुस्तकांशी असणारं नातं नव्यानं उलगडणार...

एप्रिल पुलं... 09.04.2023

एप्रिल महिन्यात स्टोरीटेलवर श्रोत्यांसाठी खास पर्वणी आहे...ती म्हणजे सर्वांचे लाडके लेखक पु.ल. देशपांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यांची. पुलंच्या अजरामर लेखणीतून आपल्या सर्वांना ज्यांचा परिचय घडला, ज्यांनी आपल्या मनात स्थान निर्माण केलं अशी व्यक्तीचित्रे या महिन्यात आपल्याला भेटायला येत आहेत. गुण गाईन आवडी, उरलंसुरलं, आपुलकी, मैत्र अशा त्यांच्या अजरामर पुस्तकांतील निवडक व्यक्तिचित्रे आपणापुढे द...

कैकयी- वैरीण की माता? 01.04.2023

स्टोरीटेलवर नुकतीच दाखल होत श्रोत्यांची पसंती मिळवणारी `माता कैकयी` या पुस्तकानिमित्त, ज्येष्ठ लेखक, संशोधक संजय सोनवणी यांनी एकूणच कैकयी या पात्राविषयी, त्या अनुषंगाने ऐतिहासिक पात्रांकडे पाहण्याची भारतीय रसिकांची दृष्टी कशी आहे व ती कशी असायला हवी यावर सुंदर विवेचन केले आहे. जिला खलनायिका समजतो, त्या कैकयीच्या आयुष्यात नेमके अशा काय गोष्टी घडल्या ज्यांची उलगड अद्याप झालेली नाही व त्यामुळेच तिला...

स्टोरीटेलवर `टॉप टेन` पुस्तकं कोणती? 25.03.2023

ऑडिओबुक्सचा सर्वांचा आवडता प्लॅटफॉर्म म्हणजे स्टोरीटेल. स्टोरीटेलवर गेल्या तीन महिन्यांत गाजत असलेली, लोकप्रिय पुस्तकं कोणती? लोकांना कोणत्या प्रकारातली पुस्तकं ऐकायला अधिक आवडतात, अशी कोणती पुस्तकं आहेत, जी आपण ऐकायलाच हवीत याची उलगड केली आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी. जरुर ऐकावा असा हा खास पॉडकास्ट, खास आपल्यासाठी सादर.  स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- http...

'ऑस्कर'च्या निमित्ताने- साहित्यातून चित्रपटनिर्मिती होते तेव्हा..! 18.03.2023

यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या निमित्ताने जगभरातील रसिकांना आवडलेल्या अनेक चित्रपटांच्या मुळाशी प्रसिद्ध कादंबरी असते हे अधोरेखित होते. त्याच अनुषंगाने पडद्यावर रसिकांना भेटणारी कलाकृती साहित्यकृतीचा आविष्कार कशी असते,  अशा कोणत्या चित्रपट, मालिकांचा त्यात समावेश होतो याचा वेध घेतला आहे,  स्टोरीटेल इंडिया चे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यां सोबत रंगलेल्या या पॉडकास्ट मध्ये!! 

मराठी भाषा जपण्यासाठी 'हे' करायलाच हवं! 11.03.2023

मराठी भाषा जपण्यासाठी काय केलं पाहिजे? मराठीतील वाचनसंस्कृती बदलली आहे का? मराठी भाषेच्या प्राध्यापक म्हणून काम करतानाचा अनुभव कसा होता? ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद. 

महिलांनी `करिअरिस्ट` असायलाच हवं! 04.03.2023

महिलांनी करिअरकडे कसं पाहायला हवं, घर की करिअर या द्वंदात सापडले असताना काय विचार करायला हवा, त्यांनी वेळेचं व्यवस्थापन कसं करायला हवं, या सर्व प्रक्रियेत कुटुंबाने कशी मदत करायला हवी, या व अशा आपल्या अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची सोपी आणि थेट उत्तरे दिली आहेत प्रसिद्ध उद्योजिका व व्यवस्थापनतज्ज्ञ सौ. विजया पाटील यांनी. `सकाळ`च्या माजी सरव्यवस्थापक व मुक्ता पब्लिशिंग हाउसच्या संचालिका असणाऱ्या सौ...

इन्फॉर्मेशन वॉरफेअर समजून घेताना.. 25.02.2023

युक्रेन-रशिया युद्धाला वर्ष उलटले. या निमित्ताने, एकूणच  युद्ध हे किती आघाड्यांवर खेळले जात असते याची एव्हाना कल्पना जगाला आली. आधुनिक काळात इन्फॉर्मेशन वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट ही देखील या युद्धात वापरली जाणारी महत्वाची आयुधे आहेत, याची फारशी कल्पना सर्वसामान्य लोकांना नसते. त्याचीच नेमकी उकल केली आहे ज्येष्ठ संरक्षण पत्रकार व युद्धवार्ता अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांच्या सो...

`असा` साजरा करुया मराठी राजभाषा दिन! 18.02.2023

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र, हा दिवस केवळ नावापुरता साजरा न करता तो खऱ्या अर्थाने मराठी गौरवदिन म्हणून साजरा करण्यासाठी एक विशेष उपक्रम स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आला आहे. या संकल्पनेबाबत खुद्द योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद. 

साहित्य संमेलने व्हावीत का? 05.02.2023

साहित्य संमेलनांमुळे खरंच भाषेला, साहित्याला चालना मिळते का, की हा निव्वळ उत्सव असतो यावर आपली रोखठोक मते मांडली आहेत ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि प्रसाद मिरासदार यांनी संतोष देशपांडे यांसमवेत थेट वर्धा साहित्य संमेलनातून रंगलेल्या लाइव्ह पॉडकास्टमधून.

स्टोरीटेल@वर्धा संमेलन 04.02.2023

वर्धा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रसिकांचे लक्ष वेधून घेते आहे. या संमेलनाकडे स्टोरीटेल कसे पाहते, स्टोरीटेलने काय ऑफर आणली आहे, याविषयी योगेश दशरथ, प्रसाद मिरासदार यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद, थेट संमेलनस्थळावरुन.

उत्तम संवादक कसं बनावं? 28.01.2023

उत्तम संवादक असणं ही एक कलाच. ही कला कशी उमलते, फुलते आणि तुमच्यातील वेगळपण जोपासते, याची उलगड केली आहे, ज्येष्ठ पत्रकार, संवादक राजेंद्र हुंजे यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून.

संतसाहित्याचा माध्यमस्पर्श... 21.01.2023

महाराष्ट्र ही संतांच्या विचारांनी समृद्ध झालेली भूमी आहे. येथील साहित्य, संस्कृती आणि व्यवहाराची पाळेमुळे संतविचारांतूनच रुजलेली आहेत. मात्र, माध्यमांमध्ये त्याचे पुरसे प्रतिनिधित्व होते आहे का, त्यात नवे प्रयोग कोणते पाहावयास मिळतात, नव्या पिढीला संतांचे विचार म्हणजे नेमके काय, हे कसे समजावून सांगता येईल...या व अशा अनेक बाबींची सहज उलगड होते ती, विविध माध्यमांमध्ये मुशाफिरी करणारे संतसाहित्याचे अ...

इतिहास आणि आपण 14.01.2023

इतिहास हा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मात्र इतिहासाची मांडणी, त्यात होत राहणारे बदल, त्या अनुषंगाने समाजमनावर पडणारे निरनिराळे पडसाद या साऱ्यांकडे इतिहासाचे अभ्यासक, पॉडकास्टर कसे पाहतात, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरते. भारतनामा या पॉडकास्टचे सादरकर्ते योगेश काळे हे यासर्व बाबींकडे कसे पाहतात याची उलगड करणारा हा स्टोरीटेल कट्ट्यावरील खास पॉडकास्ट आपल्या विचारांना नक्कीच नवी दिशा देऊन जातो.

कट्टा- नाबाद २५० 07.01.2023

श्रोतेहो, आपला लाडका स्टोरीटेल कट्टा हा मराठीतील आघाडीचा पॉडकास्ट म्हणून गणला जातो. त्याचा हा २५० वा भाग. यानिमित्ताने, स्टोरीटेल कट्टा कसा सुरु झाला, कसा बहरला आणि तुमच्या मनाचा ठाव घेत गेला, याबद्दल संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्यात रंगलेला संवाद.

31 डिसेंबर स्पेशलः गाणी जुनी...कहानी नवी! 31.12.2022

जुन्या गाण्यांचं गारुड आपणा सर्वांवर कायमच राहिलेलं आहे. तरीही या गाण्यांमध्ये असं काय असतं, जे आपणास खरोखर आनंद मिळवून देतं याची सुरेल उलगड करणारा ३१ डिसेंबर स्पेशल पॉडकास्ट. संगीतजगतात कलाकार, अध्यापन आणि लेखन अशा विविध माध्यमांतून रसिकांशी संवाद साधणाऱ्या प्रा.डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद जेव्हा एक मैफल होऊन जातो...तेव्हा त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा...नाही का...

`स्टोरीटेलर कपल` मुलांना काय ऐकवते? 24.12.2022

मुलांना गोष्टी आवडतात..मात्र ती आवड पालकांकडून जोपासली जायला हवी. ती कशी, हे स्टोरीटेलचे योगेश दशरथ आणि त्यांची पत्नी सायली यांच्याशी रंगलेल्या गप्पांमधून सहज उलगडते. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी गोष्टींचा खजिना असणाऱ्या स्टोरीटेलचा कसा उपयोग होऊ शकतो...तुम्हीच ऐका. स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि आस्वाद घ्या...हजारो गोष्टींचा. https://bit.ly/3I0OCk7

तोरमानची अद्भूत कथा.. 17.12.2022

स्टोरीटेलवर नुकतेच दाखल झालेले तोरमान आणि दैवी तलवार हे पुस्तक श्रोत्यांना आकर्षित करते आहे. तोरमानची ही कहानी नेमकी काय आहे, इतिहास आणि काल्पनिक लेखनातील सीमारेषा काय असते, तोरमानचे कथाबीज कसे रुजले या व अशा अनेक गोष्टींची उलगड या कथेचे लेखक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून होते. तोरमान आणि दैवी तलवार ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/...

Hør på podkasten स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio og podkaster i én app - gratis og uten registrering. Installer i dag, og ikke gå glipp av lanseringen

Last ned på Google Play

Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.