Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 episoder

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: www.storytel.com

Forfatter

Santosh Deshpande

Kategori

Arts

Podkastens nettsted

www.storytel.com

Siste episode

17. sep 2026

Hvor kan du lytte?

Podkaster i appen Replaio Radio Kommer snart

Podkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster

Last ned på Google Play Installer gratis Android nesten 10 mill. nedlastinger · 4,8 i vurdering iOS snart

Episoder

123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! 28.11.2020

पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का, असेल तर कशी असेल, एलियन्स खरोखर असतात का, मंगळावर पाणी आहे तर तिथे जीवसृष्टीची शक्यता किती, भारतात या विषयावर शोधकार्य सुरू आहे, त्यात शास्त्रज्ञांना काय आढळून आले, अशा इंटरेस्टिंग आणि रहस्यमयी प्रश्नांची  वैज्ञानिक उत्तरं सायकास्ट सिरीजमध्ये आपल्याला मिळणार आहेत... शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे आपल्याला याची उत्तरं देणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पत्रकार मयुर...

121: कवींचं करिअर... 23.11.2020

कवी पूर्णवेळ कवी म्हणून त्याचं करिअर घडवू शकतो का, अनेक कवींना त्यांचा छंद जोपासताना उपजीविकेसाठी अन्य नोकरी, व्यवसायाचा आधार का घ्यावा लागतो? त्यामुळे फक्त कला जोपासणं, त्यालाच आपलं करिअर बनवणं आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं हे कवींना खरंच शक्य असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या पॉडकास्टमधून... आपल्या सर्वांचा लाडका कवी संदीप खरे याच्याकडून!    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐ...

120: झलक 'सायकास्ट'ची... 21.11.2020

कोरोना आला कोठून, पसरला कसा, त्याची रचना कशी आहे, त्यावर उपचार सापडतील का, लस कशी असेल, हा लढा कुठपर्यंत चालणार अशा अनेक प्रश्नांवर भटनागर पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. संजीव गलांडे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी ‘सायकास्ट’ या स्टोरीटेलवरील नव्या पॉडकास्टमध्ये...  याशिवाय येत्या आठवड्यात स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशप...

118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? 15.11.2020

काही लोक आयुष्यात झटकन निर्णय घेऊन मोकळे होतात, तर काहींची लहान-सहान गोष्टींबाबत निर्णय घेतानाही द्विधा मनःस्थिती होते. महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच दैनंदिन जीवनातले निर्णय घेणं ही तशी साधी वाटणारी गोष्ट, मात्र हीच गोष्ट अनेकांना धर्मसंकटात टाकते. याच निर्णयक्षमतेवर भाष्य करणारा ‘निर्णय घ्यावा की न घ्यावा?’ हा मॅनेजमेंट-गुरू एस. बी. मंत्री यांचा हा विशेष पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडका...

119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! 14.11.2020

मराठी श्रोत्यांना स्टोरीटेल अॅप जितकी भरभरून ऑडिओबुक्सची मेजवानी देतं तितकाच विचार बाळगोपाळांचाही करतं बरं का! त्यामुळे आज १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्त आपला स्टोरीटेल कट्टाही बालमय झालाय... स्टोरीटेलवरील बालकुमारांसाठी विशेष साहित्य, व्हॉईस ओव्हर आर्टिस्टकडून खास बालमित्रांसाठी काढलेले आवाज तसेच या छोट्या दोस्तांसाठी उभारलेलं स्टोरीलवरचं सुंदर जग! या सगळ्याबद्दल स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसा...

116: माध्यमांचीच ‘मीडिया ट्रायल’! 09.11.2020

सध्या मीडियाबाबत असं झालंय की, सेलिब्रेटींबाबत गॉसिप चालवल्याशिवाय बातमीच पूर्ण होत नाही. सध्याच्या माध्यमांना झालंय काय, बातमीचा विषय काय असावा, वार्ताहारांची भाषा कशी बदलली आहे, कोणाला किती महत्त्व दिलं जातंय अशा एक ना अनेक प्रश्नांना हात घालत मीडियालाच फैलावर घेणारी ही ‘मीडिया ट्रायल’ नक्की ऐका!    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/searc...

117: हेमांगीची हटके ‘आर्टिफिशियल मॉम’ 07.11.2020

घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... ‘आर्टिफिशियल मॉम’ हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय...  याशि...

115: बात क्रिकेटची! 02.11.2020

बदलतं क्रिकेट, त्यानुसार बदलत जाणारे प्रेक्षक, बदलत्या नियमांमुळे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट, गोलंदाजांची परीक्षा आणि फलंदाजांचा गवगवा, कसोटी की टी-२०? यावर प्रसिद्ध क्रीडा पत्रकार द्वाकानाथ संझगिरी यांच्याशी खुसशुशीत चर्चा... तुमच्या आमच्या मनातली खास अशी ‘बात क्रिकेटची!’ फक्त ऐका स्टोरीटेल अॅपवरील 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्ट सिरीजमध्ये! 'बात क्रिकेटची' स्टोरीटेलवर ऐकण्यासठी क्लिक करा - http...

114: 'केस नंबर 001' ओपन होते तेव्हा... 31.10.2020

मर्डर मिस्ट्री म्हणलं की कथेत अनेक पात्रं येतात... त्यात ‘केस नंबर 001’ सारखं ऑडिओबुक असेल तर इतक्या पात्रांचे वेगवेगळ्या ढंगाचे आवाजही काढावे लागतात... हेच शिवधनुष्य पेललं आहे अभिनेत्री स्मिता तांबे हिने. स्टोरीटेल मराठीवर लेखिका सायली केदार आणि स्मिता तांबे द्विवेदी हिचा आवाज असलेली ‘केस नंबर 001’ ही कथा नुकतीच रिलीज झाली आहे. यानिमित्ताने स्टोरीटेल मराठी ओरिजनल्सची पब्लिशर सई तांबे हिने स्मिता...

113: ‘अॅडिक्ट’वर मुक्ता मैफल! 24.10.2020

मराठीतील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने स्टोरीटेलच्या ऑडिओ जगात प्रवेश केलाय आणि वाचलंय भन्नाट ऑडिओबुक ‘अॅडिक्ट’! माणसाला फक्त दारू, सिगरेट, ड्रग्ज यांचंच व्यसन असतं असं वाटत असेल तर तुम्ही ‘अॅडिक्ट’ ऐकायलाच पाहिजे! आणि त्यासोबतच मुक्ताचा ‘अॅडिक्ट’साठी वाचन करतानाच अनुभव कसा होता, हे जाणून घ्या पल्लवी वाघ-केळेकर यांनी घेतलेल्या स्पेशल मुलाखतीतून... याशिवाय या आठवड्यात स्टोरीटेलमध्ये कोणती नवीन ऑ...

112: उदाहरणार्थ- कोसला! 17.10.2020

मराठी साहित्यजगतातील मैलाचा दगड असं जिला समजले जाते ती कलाकृती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला'. या अजरामर साहित्यकृतीचे आता स्टोरीटेल वर आगमन झाले आहे. त्यानिमित्त, आजच्या पॉडकास्ट मध्ये सादर आहे 'कोसला' ज्याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ते अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांसमवेतची गप्पांची मैफल आणि उत्तरार्धात बोनस म्हणून 'कोसला'च्या पहिल्या प्रकरणात...

111: रोल 'प्ले' करताना... 10.10.2020

स्टोरीटेलवर तुम्हाला एकदम बोल्ड, थ्रिलर आणि डोळ्यासमोर थरारक चित्र उभं करणारी गोष्ट ऐकायला मिळली तर? आणि त्या गोष्टीचे दोन शेवट आहेत, त्यातला तुम्हाला हवा तो निवडायला सांगितला तर? भन्नाट आयडिया आहे ना! लेखक भूषण कोरगांवकर यांची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी वाचलेली हटके इरोटिक क्राईम थ्रिलर ‘रोल प्ले’ ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे... सेक्स, क्राईम, थ्रिलिंग यांची गुंफण असलेल्या 'रो...

110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! 03.10.2020

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवलेली गुणवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ऑडिओबुक्सच्या जगात प्रवेश करत आहे. स्टोरीटेलवर तिने 'हाकामारी' या ऑडिओबुकला आवाज दिलाय. त्यामुळे आता चित्रपट, नाटकांसह ऑडिओबुकचं क्षेत्र गाजवायला सोनाली आता सज्ज झाली आहे. याचनिमित्ताने स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी सोनाली कुलर्णींशी साधलेला संवाद नक्की ऐका! तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात क...

109: स्टोरीटेलवर अनुभवा मंगळाची हटके सफर! 26.09.2020

स्टोरीटेलच्या श्रोत्यांनी नुकतीच 'माय लॉर्ड' ऐकून कोर्टाची पायरी चढली... आणि आता स्टोरीटेलचा श्रोतृवर्ग मंगळावर जायला सज्ज झालाय! हो... योगेश शेजवलकर लिखित आणि क्षितीश दाते यांचा आवाज असलेलं 'वाढीव ऑनसाईट Mars Tight' हे ऑडिओबुक नुकतंच रिलीज झालंय आणि या मार्फत जमदग्नीसह तुम्हीही मंगळाची सफर करणार आहात... त्याबरोबरच शेकडो मराठी पुस्तकं ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्ट मराठी लगेच सबस्क्राईब करा.  याशिवा...

108: श्रवणीय 'पर्व'णी! 19.09.2020

डॉ. एस. एल. भैरप्पा लिखित ‘पर्व’ ही अत्यंत गाजलेली साहित्यकृती आता मराठीमध्ये स्टोरीटेल वर आली आहे. ती श्राव्य स्वरुपात रसिकांपुढे घेऊन आले आहेत हरहुन्नरी गायक, संगीतकार मिलिंद इंगळे. त्यांच्याशी राहुल पाटील यांसमवेत रंगलेली गप्पांची खास मैफल. तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवं येतं आहे, याचा घेतलेला वेध... सारं ऐका, या एकाच पॉडकास्ट मध्ये!  सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लि...

107: माय लॉर्ड : कायद्याचं ‘ऐका’! 12.09.2020

स्टोरीटेल कट्ट्याच्या दणदणीत शंभरीनंतर आता श्रोत्यांना कट्टा नव्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे. स्टोरीटेल आता प्रत्येक आठवड्याला मराठीतील दर्जेदार साहित्य घेऊन ऑडिओबुकप्रेमींना भेटणार आहे आणि याचीच झलक तुम्हाला स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकायला मिळणार आहे. मराठी श्रोत्यांसाठी स्टोरीटेलने 'सिलेक्ट मराठी' हे नवीन फिचर आणलं आहे, ज्यावर तुम्ही शेकडो मराठी ऑडिओबुक्स ऐकू शकता. आजच अच्युत गोडबोले आणि अॅड. माधुरी...

106: स्टोरीटेल कट्टा : बहरताना... बदलताना! 29.08.2020

असं म्हणतात की, ' The Only Constant Is Change' असाच काहीसा इंटरेस्टींग बदल आता स्टोरीटेल कट्ट्यावर होणार आहे... याच नवीन बदलांबाबत आणि संकल्पनांबाबत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांना बोलते केले आहे संतोष देशपांडे यांनी. श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभलेला 'स्टोरीटेल कट्टा' आता आपल्याला नव्या आणि खास स्वरूपात ऐकायला मिळेल त्याची उलगड करणारा हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका हा विशेष पॉड...

105: राज-ए-विराजस! 22.08.2020

लहानपणापासूनच अभिनय, लेखन, साहित्याची परंपरा असलेल्या कुटुंबात तो मोठा झाला... सगळ्यांनाच अभिनेता व्हायचं असतं, याला मात्र लेखन, दिग्दर्शनात रस... आई-वडिलांनी लावलेली वाचनाची सवय, आजोबांचा दर्जेदार अभिनय, आजोळी पणजोबांच्या समृद्ध साहित्याचं गारूड, आजी-आजोबांचं भाषाज्ञान या सर्व गोष्टी आत्मसात करून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता विराजस कुलकर्णी याने सर्जनशीलतेची कास धरत, अथक परिश्रम घेत स्वतःचा वेगळा ठसा...

104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! 15.08.2020

झगमगीत चित्रपट, मसालेदार वेबसिरीजच्या जगात श्राव्य माध्यमातील पॉडकास्टदेखील आता लोकप्रिय झाले आहेत. या पॉडकास्टिंग क्षेत्राचा वेध आम्ही घेतलाय थेट पॉडकास्टमधूनच... या विषयावर मनमोकळ्या आणि इंटरेस्टींग गप्पा मारल्या आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या म्हणजेच कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी! एकूण श्राव्य माध्यमाशी त्यांचं जुळले...

103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 08.08.2020

पदोपदी अपयशाशी गाठ पडत असतानाही जिद्द, चिकाटी अन् संयमाने ध्येय कसं गाठता येतं, हा थक्क करणारा प्रवास आहे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचा. त्यांनी लिहिलेली बेस्टसेलर पुस्तकं 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' तसेच 'गावकुसातील जितराबं' आता स्टोरीटेलवर रसिकांसाठी उपलब्ध झाली आहेत. या निमित्ताने, खुद्द त्यांच्याशी रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं चुकूनही चुकवू नये, असाच. 'गरुडझेप - एक ध्येयवे...

102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! 01.08.2020

महाराष्ट्राचे राजकारण हल्ली ज्या काही मोजक्या नेत्यांच्या भोवती केंद्रित असते त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे खा. संजय राऊत. मुळात एक हाडाचा पत्रकार, लेखक, संपादक असणारे संजय राऊत हे आपल्या लिखाणातील रोखठोक शैलीसाठी आपले वेगळेपण टिकवून आहेत. त्यांच्या या शैलीचा आणि एकूणच त्यांच्या शैलीवर प्रभाव टाकणार्‍या गोष्टी कोणत्या? भाषा, वृत्तपत्रे यांची आजची स्थिती याबाबत त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे,...

101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! 25.07.2020

सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं, आवडत्या व्यक्तिंना भेटणं तसं दुर्मिळच झालंय... पण काळजी नको... स्टोरीटेलवर उत्तम मराठी पुस्तकं तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. तसेच ऑगस्टमध्ये तुमच्या कानांची आतुरता वाढवण्यासाठी आणखी काही छान ऑडिओबुक्स आणि शॉर्टस्टोरीजची भर स्टोरीटेलमध्ये पडणार आहे... कोणती आहेत ती पुस्तकं, काय एक्सायटिंग ऐकायला मिळणार आहे या महिन्यात, जाणून घेण्यासाठी ऐका उर्मिला-सुकीर्तच्या या गप्पा...

100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे! 18.07.2020

विविध माध्यमांमध्ये आपल्या लेखणीचा ठसा उमटवित स्टोरीटेलच्या माध्यमातून श्राव्य माध्यमाला आपलंसं करते, तिथे दर्जेदार ओरिजनल सिरीज लिहिते, त्यांना रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभतो अन् मग सुरु होतो त्या लेखिकेचा श्राव्यलेखनाचा आगळा प्रवास. होय....गौरी पटवर्धन. स्टोरीटेलची आघाडीची लेखिका. बालमित्रांसाठी ‘मिशन हिमालय’, ‘अळी आणि कोळी’, ‘डॉल हाऊस’ या ऑडिओ बुक्सचा खजिना घेऊन आल्यानंतर गौरी यांनी ‘फिर...

99: ‘अजातशत्रू’मागचे गूढ उकलते तेव्हा... 11.07.2020

इतिहासातील एक विस्मरणात गेलेला योद्धा अजातशत्रू... अनेक लोकांसाठी तसा तो अज्ञातच राहिला... पण स्टोरीटेलमध्ये ‘अजातशत्रू’वर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि बघता बघता अजातशत्रू या ऑडिओ बुकचा दुसरा सिझन स्टोरीटेलवर आला... या पराक्रमी अजातशत्रूला आपल्या समोर आणणारा लेखक सुमेधकुमार इंगळे आणि अजातशत्रूला साजेसा असा खणखणीत आवाज दिलेला अभिनेता अंबरिश देशपांडे यांच्याशी उर्मिलला निंबाळकरने दिलखुलास गप्पा मारल्य...

98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... 04.07.2020

उत्तम अभिनय आणि त्यास खणखणीत आवाजाची जोड यामुळे स्वानंदी टिकेकर रसिकांची नेहमीच दाद घेऊन जाते. आईबाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच त्यात आपल्या आनंदाच्या नवनव्या वाटा शोधणारी स्वानंदी स्टोरीटेल कट्ट्यावर उर्मिलापाशी आपलं मन मोकळं करते, तेव्हा तिला ऐकण्याची ही संधी का सोडावी? ' फिरंग सिझन २' ऐकण्यासाठी क्लिक करा - https://bit.ly/2YVhC5P ' डेट बाय चान्स' वाचण्यासाठी क्लिक करा - htt...

Hør på podkasten स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio og podkaster i én app - gratis og uten registrering. Installer i dag, og ikke gå glipp av lanseringen

Last ned på Google Play

Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.