Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

Religion MR ↓ 144 episodi

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.

Autore

Sudhakar Chodankar

Categoria

Religion

Sito del podcast

sudhakar-chodankar.com

Ultimo episodio

15 gen 2025

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

सदा सर्वदा योग तुझा 23.06.2023

सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा - ही प्रार्थना आपण अनेक वेळा करत असतो. पण खरेच माझा योग जुळून येतो का या भगवंताशी ? हा प्रश्न मला सातत्याने जागा ठेवत असतो. हा योग केवळ भक्तीनेच जुळून येऊ शकतो. संस्कार केवळ सवयीचे होऊन चालत नाही. संस्काराने जीवन आकाराला यावे लागते. आचार विचार उच्चारातून देवाशी जुळून आलेला योग माझ्या जीवनाची रियालिटी होणे आवश्यक नाही का? या निजबत जे काही स्फुरण...

अवघा रंग एकची झाला- 16.06.2023

अवघा रंग एकची झाला-पांडुरंगाच्या परम भक्त संत सोयराबाईंचा हा अभंग माझ्यात कुठेतरी सातत्याने स्पार्क निर्माण करतो. मी उत्तेजित होतो अन मी मलाच अबाधितपणे अनुभवत असतो. एकत्व अभंगच असते. त्याचे विभाजन नाही होत. आपल्याला विविध रंग दिसतात , काही आवडीचे काही नावडीचे होत असतात . त्या बाह्य रंगाचा, त्या विचाराचा, त्या वृत्तीचा , स्वभावाचा, मताचा मी होत रहातो आणि हाच मी हा "अहम" साकारत असतो. तोच अ...

तुका आकाशा एवढा-२ 09.06.2023

तुका आकाशा एवढा-२ अणूहुनिया तोकडा तुका आकाशा एवढा याचा पूर्वार्ध प्रकट झाला आता पुढचा 'तुका आकाशा एवढा-2' प्रकट होत आहे. . संत तुकाराम महाराज पूर्णपणे जाणून आहेत की त्यांचा, देह एका अणुपेक्षा आकाराने मोठाच आहे आणि आकाशाहून छोटाच आहे. तरी देखील ते अणूहुनिया तोकडा अन आकाशा एवढा का म्हणतात ? स्वताची ओळख अशी का करून देतात ? कारण त्यांना स्व ची खरी ओळख पटलेली आहे, किंबहुना ते त्यांचे सहज जगणे आ...

अखंडित गातो आता - 02.06.2023

अखंडित गातो आता - दाटून आलेल्या आभाळाला धुवाधार बरसावं असं सारखं होत असतं. वास्तविक भरून पावल्याची ती अपरिहार्यता असते आभाळाची. भक्ताचेही काही वेगळे नाही. भक्तिपोटी तोही सर्वांगाने बरसतो. कंठाला ओलांडून शब्द ओठांवर येतातच. संगीताची  जाण असेल वा नसेल त्याला. पारंगत होण्यासाठी संगीताचे शास्त्रशुद्ध ज्ञान आवश्यक आहे पण तरंगीत होण्यासाठी , आपणच आपल्यात रमण्यासाठी हृदय पुरेसे होते हो. म्हणूनच  तो गातो,...

अणूहुनिया तोकडा, तुका आकाशा एवढा-१- 26.05.2023

अणूहुनिया तोकडा, तुका आकाशा एवढा-१ - संत तुकाराम महाराजांचे, उत्कट आनंदापोटी उद्भवलेले हे शब्द आहेत. हा काही कल्पनेचा विलास नाही. त्यांच्या आंतरिक उत्कट अनुभवाचा अहोभाव आहे. त्यांच्या अस्तित्वाची वास्तवता आहे ही. त्यांची reality आहे. त्यांचे हे असे 'असणे' आहे. 'beingness' आहे. या जाणीवेतून मी उत्तेजित होत रहातो. ध्यासाने एकांतिक होत रहातो. वास्तविक तोकडा आणि आकाशा एवढा यातून विरोधा...

केले तुका झाले माका 18.05.2023

भक्ताकाडून जे काही घडत असते ते केवळ देवाच्या भक्तीपोटीच. भक्ताच्या सर्व क्रिया देवप्रेमापोटी घडत असतात. देवासाठी करता करता स्वत: घडत असतो भक्त. देवाला सुखावता सुखावता तो सुखी होत असतो. देवाला प्रसन्न करता करता भक्त प्रसन्न होत असतो. "केले तुका, झाले माका" असेच भक्ताच्या बाबतीत घडत असते. केवळ बाहयांगाने नाही तर अंतरंगाने देखील सुंदर होत असतो भक्त. देवामुळे आणि देवासाठी जे केले जाते तेच भक...

तुझ्याचसाठी सजण्याचे मला लागले वेड 11.05.2023

तुझ्याच साठी सजण्याचे मला लागले वेड- भक्ताला वेड असते केवळ भगवंताचे. भक्ताचे असणे, सजणे, धजणे केवळ देवासाठीच असते. भक्ताच्या सार्‍या वृत्ती भगवंताकडे प्रवाहीत होत असतात म्हणूनच तो गात असतो " तुझ्याचसाठी सजण्याचे मला लागले वेड , शृंगाराला समर्पणाची किती अनावर ओढ " शृंगाराची सारी साधने उपलब्ध होतात भक्ताला पण ती केवळ साधनेच राहतात. साध्य मात्र भगवंत असतो भक्तासाठी. म्हणूनच भक्ति, भक्तासाठी...

कसा भरवसा धरू ? 03.05.2023

कसा भरवसा धरू ? कुणावर भरवसा ठेवायचा ? व्यक्तीवर, परिस्थितीवर, मनस्थितीवर. भरवसा फक्त अन फक्त देवावर अन देवाच्या ठिकाणीच स्थिर होऊ शकतो. हाच देव सर्व चराचरात व्यापून उरला आहे. साहजिकच मीही अपवाद नाही याला. जसे डोळे माझे , दृष्टी माझी म्हणूनच हे विश्व मी पहातो नाही का ? तसेच हृदय माझे अंत:करण माझे . या अंत:करणातिल देवाच्या अनुभवापोटीच भक्ताला सर्व ठिकाणी देवच दृष्टीला पडत असतो. म्हणून भरवसा स्वतावर...

भिजतांना मज उमजत गेले 27.04.2023

भिजतांना मज उमजत गेले- हे सखीचे चिंब भिजणे सख्याच्या धुवाधार प्रेमवर्षावात भिजणे आहे. ही काही कल्पना नाही, स्मृति नाही विचार नाही. हा प्रत्यक्ष जीवंत अनुभव आहे भक्ताचा सद्गुरूंच्या सहवासातील आत्यंतिक प्रेमाचा, आत्मियतेचा. जसा आई हा बाळाचा जीवंत अनुभव असतो अगदी तसाच. सहवासातील सातत्याचे श्रवण स्मरण मनन चिंतन ध्यास या सार्‍या प्रक्रियेतून जेव्हा भक्तीचा उद्भव होतो तेव्हा तो म्हणतो " भिजताना मज...

स्मरणालाही सलत रहाते विस्मरण 20.04.2023

स्मरणालाही सलत रहाते विस्मरण - भगवंताचे सातत्याने स्मरण असावे असे भक्ताला वाटत असले तरी तसे सर्वार्थाने सर्वकाळ अनुभवास येत नाही हे खरे. त्यामुळे भक्त अगतिक होत असतो. वास्तविक स्मरण विस्मरण मनाचे खेळ आहेत. देव जर केवळ मनाचा असेल तर असे होणे स्वाभाविक आहे. कारण मन स्वभावत: चंचल असते. त्यामुळे स्मरणाला बाधा येणारच. या अगतिकतेमुळेच भक्त बेचैन होतो. काकुळतीला येतो. देवाच्या अस्तित्वाचे मनाच्याही पलीकड...

परमानंद अंतरी सापडे 14.04.2023

परमानंद अंतरी सापडे-परमानंद स्वानुभवाने अंतरातची सापडे- वास्तविक परमानंद ही अंतरंगाची स्थिति आहे. सर्वच भक्त जीवनामध्ये या परम आनंदाच्या अनुभवाला पावले. केवळ भक्तीपोटी. भक्ति ही अनंतप्रसवा आहे. या भक्तीनेच अनेक भक्तांना जन्म दिला, त्यांचा सांभाळ केला अन परमानंदी रमविले अखेरच्या श्वासापर्यंत. आनंद, समाधान, शांति कारुण्य या सार्‍याच दैवी गुणांचे वास्तव्य केवळ ईश्वर भक्तीतच संभवते. या भक्तीच्या पोटीच...

हे जीवन प्रेम प्रवाही 05.04.2023

हे जीवन प्रेम प्रवाही - नदीचे  सागराशी मिलन झाल्यानंतरही वाहणे थांबत नाही. सागराशी  मिलन हे नदीचे ध्येय म्हटले तरी, ध्येय पूर्ती झाल्यानंतरही ती सागराला मिळतच रहाते. प्रवाह थांबत नाही तिचा. ध्येय पूर्ण आले, पण जीवन तर चालूच राहिले प्रवाहीपणे. भक्ताचे जीवनही असेच असते. देवाची भेटी झाली तरी भेट अखंडपणे चालू राहते भक्ताची. जसे लहान बाळ आईच्या कडेवर असावे तरी ते आईला सांगत असते " जवळ घे , अज...

तेथेच स्फुरते रामायण- 30.03.2023

तेथेच स्फुरते रामायण-जो न राहिला रामाविण || प्रभू रामाचे स्मरण सार्‍यांनाच होत असते. परंतु प्रभुरामाचे स्फुरण भक्ताच्या ठिकाणी सातत्याने उद्भवत असते. आज रामनवमी त्यानिमिताने काहीसे चिंतन येथे प्रकट होत आहे. वाल्ल्या कोळ्याचे नारद महर्षींच्या कृपेने व मार्गदर्शनाने वाल्मिकी ऋषीत रूपांतरण घडले ही कथा सर्वांनाच माहीत असते. हे रूपांतरण अंतरंगाचे आहे. जीवन केवळ सदाचारी असणे पुरेसे नाही, तर या सदाचाराला...

रंगात तुझ्या रंगुनी-१ 24.03.2023

रंगात तुझ्या रंगुनी -१ - भक्ताचे सजणे, धजणे , सुशोभित होणे केवळ भगवंतासाठीच असते. सगळा साज शृंगार घडतो देवासाठी. भले बाहयांगाने असेल सुरूवातीला पण तो नेत असतो भक्ताला देवाच्या अंतरंगा कडे आणि हे देवाचे अंतरंग जाणता जाणता भक्त स्वताच्या अंतरंगात उतरत जातो. हे सजणे आंतरिक होत जाते. या मुळेच भक्ताच्या ठिकाणी पुढे समर्पणाचा भाव घटित होतो. तेव्हा तो गातो - " तुझ्याच साठी सजण्याचे मला लागले वेड, शृ...

सण आनंदाचा पाडवा - अंतरी देवप्रेमाचा गोडवा 22.03.2023

सण आनंदाचा पाडवा - अंतरी देवप्रेमाचा गोडवा - आज गुढीपाडवा - आनंदाची गुढी उभारायची. पण या गुढीचे गूढ अंतरात उद्भवणार्‍या देवप्रेमात आहे जे सदा सर्वदा शुभ करून ठेवणारे आहे. गुढी पाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. संपूर्ण दिवस शुभकारक आहे असे सारीच पंचांगे सांगतात. ढवळे पंचांग, दाते, कालनिर्णय, निर्णयसागर सारेच शुभ म्हणतात. पण मला जाणवते, आपला देह देखील पंचांगच आहे. पृथ्वी, आप ,तेज ,वायु, अवक...

मेरा मुझमें कुछ नही, सब तेरा ... 17.03.2023

मेरा मुझमें कुछ नही, सब तेरा ...  कालच खिडकीपाशी उभे राहून अनंताचे झाड न्याहाळता कानावर हळुवारपणाने सुर आले, "मै तो तेरे रंगमे रंग चुका हूँ |बस तेरा बन चुका हूँ | मेरा मुझमे कुछ नही, सब तेरा S S सब  तेरा ..... "  ऐकताना मी तरंगीत झालो. खरे तर मेरा मेरा म्हणत मी जगत आलो. थकत आलो. " श्रमलो शिणलो बहू संसारी, मी अन माझे ओझे भारी , वाहूनी थकली काया सारी , ठाव तू दिधला पावन पदी या | परमान...

विठू माझा लेकुरवाळा - हृदयंगम सेल्फी 10.03.2023

विठू माझा लेकुरवाळा - हृदयंगम सेल्फी -संत जनाबाईंचा हा अभंग, अगदी गोड अन हृदयंगम. हा अभंग, त्यातील शब्द वा त्याची चाल गोड आहे असे नाही म्हणायचे मला. या सार्‍यांचे मूळ जे हृदय आहे ,  अंतरंग आहे, तिथे अनुभवास येणारा हा परमानंद गोड आहे हे जाणवते. हा परमानंद  प्रगाढ भक्तीशिवाय नाही. या परमानंदी हृदयाच  अभंगरूपाने प्रकट झालेला जणू  अलौकिक सेल्फिच आहे .  तेराशे चौदाशे शतकात...

हरीच असे एकला हरीच हसे ... 03.03.2023

हरीच असे एकला  हरीच हसे एकला - हरीच एकला व्यापून उरला आहे. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी - हरि पाहिला रे - हरी आहे, हरी पाहे,  हरी वाहे हीच वास्तवता आहे. या निमिताने एक प्रसंग सांगावासा वाटतो. द्वारका नगरीत  रामभक्त हनुमान  श्रीकृष्णाच्या दर्शनाला येतात. आता, रामरूपांतही  मला दर्शन द्यावे  अशी प्रार्थना करतात. पुढे जे काही अलौकिक जाणवले रुक्मिणीच्या अनुभवाचे, तेच...

हे गोप गोपिकांनो हरी तुमचे रूप - 24.02.2023

हे गोप गोपिकांनो हरी तुमचे रूप -भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून पुढे मथुरेला गेले. कृष्णभक्त राधा, भक्तीची अखंड धारा गोकुळातच राहीली. सुरवातीची केवळ राधा, नंतर कृष्णसहवासात  रंगलेली   राधा आणि कृष्ण मथुरेला गेल्यानंतर अथांगपणे उरलेली कृष्णस्वरूप राधा.  आधी "राधा" नंतर "राधा-कृष्ण" आणि पुढे कृष्णस्वरूप राधा. असे हे राधेचे जीवन .  ही अथांगपणे उरलेली राधा केवळ नावारूपाची राधा नव्हती....

देव (की) परमानंदम् 17.02.2023

परमानंदाच्या  अनुभवासाठी जणू काही   'देव '  ही  ' की' ( key)' आहे. किल्ली आहे.  गुरुकिल्ली आहे. ही किल्ली जेव्हा लाभते भक्ताला तेव्हाच परम आनंदाचे  भंडार भक्ताला उपलब्ध होते. संत तुकाराम महाराज म्हणतात " फोडिले भंडार धन्याचा हा माल , मी तो हमाल  ". हमालही मालामाल होतो,  जेव्हा प्रत्यक्ष  देव भक्ताच्या आंतरिक अनुभवाचा होतो. हा देव देऊळ, मंदिर , मूर्ती, तसबीर यातला नाही. भक्ताला यात तेवढा रस नाही ....

गीत तू संगीत तू या मैफिलीचा मीत तू 10.02.2023

"गीत तू, संगीत तू, या मैफिलीचा मीत तू " - हे गीत कोणते? , हे संगीत कोणते ?  या मैफिलीचा  हा मित  कोण?  ही मैफिल  कुठे संपन्न होते? हे सारेच अनुभव भक्ताचे आहेत.    जगण्याला  जोपर्यंत  नाद, लय, ताल आणि सूर  लाभत नाहीत, तोपर्यंत या मैफिलीचा अनुभव नाही. हे  नाद , सूर, लय सर्व काही  लाभते केवळ ईश्वराच्या आत्यंतिक  भक्तीपोटी.  म्...

हा कोणता मेघ आत्ताच दाटून आला 03.02.2023

हा कोणता मेघ आत्ताच दाटून आला - दाटून येणं म्हणजे काठोकाठ भरलेपणाचे, ओथंबलेपणाचे लक्षण. ही खरीतर भावभक्तीने भरलेल्या भक्ताच्या अंतररंगाची स्थिति असते.  या अनुभवाला निमित्त होतात विविध भक्तांच्या चरित्रातील प्रसंग. मग ती राधा असो,रुक्मिणी असो ,उद्धव असो वा पितामह भीष्माचार्य असोत. प्रसंग ऐतिहासिक असले किवा  काल्पनिक असले तरी आर्त भक्तासाठी हे प्रसंग निर्देशक (पॉइंटर्स)  ठरतात. ज्यामु...

महाभारतात खरेच राधा आहे का ? 27.01.2023

महाभारतात राधा आहे का ?मागच्या एपिसोडमध्ये  “ राधा, कृष्ण भक्तीचे मूळ आहे , तर कृष्ण, राधेच्या भक्तीचे फळ आहे “ असे काहीसे प्रकट आले. त्यांनंतर विचारणा झाली की महाभारतात राधा ही व्यक्तिरेखा आहे का ? प्रश्न योग्य आहे. वास्तविक मी काही महाभारत वाचले नाही. त्यामुळे माहीत नाही.  स्वताचा  विचार करता, मला महत्वाचे वाटते की,   माझ्यात राधा आहे का ? महाभारतात राधा असेल नसेल, त्याने माझ्या जगण्यात काही फरक...

कृष्णमुळाशी उगम अनावर राधेचा का व्हावा - 20.01.2023

कृष्णमुळाशी उगम अनावर,  राधेचा का व्हावा ? | राजमंदिरी इथे रुक्मिणी, घुमविते  कृष्णप्रेमपावा || कृष्णाचे मूळ राधेच्या भक्तीत आहे आणि राधेच्या भक्तीचे फळ कृष्ण आहे. "कृष्णकमळ हासरे" या नावाने एक भावभक्तीचे काव्य स्फुरले होते. त्यातलेच हे शब्द आहेत. कृष्ण हा काही विचार  नाही, कन्सेप्ट नाही. कृष्ण चैतन्य आहे म्हणूनच त्यां निजबत सारेच विचार, सारी समज, सारी उमज,सार्‍या भावना, कल्पना , स्...

सखे गं थांब जराशी 13.01.2023

कृष्णभेटीत रंगलेल्या, रमलेल्या एका सखीला दुसरी सखी  " अगं किती उशीर करतेस, चल आता निघूया " असं सारखे म्हणत असताना , कृष्णप्रेमी रंगलेली सखी उत्तर देते,  " सखे गं, थांब जराशी , थांब जराशी, घडू दे संग जरा गं, प्रभू हृदयाशी " ही सखी असे का म्हणते ऐकू या आता या सखीला अंतरंगापासून. 

Ascolta il podcast Sudhakar Chodankar su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici