Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 episodi

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: www.storytel.com

Autore

Santosh Deshpande

Categoria

Arts

Sito del podcast

www.storytel.com

Ultimo episodio

17 set 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

`डॉक्टर` बाय प्रोफेशन, `रायटर` बाय पॅशन! 18.11.2023

डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतानाच त्यानं लिहिलेलं पहिलं इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढचं पुस्तक तर बेस्ट सेलरच्या यादीच झळकलं. देशभरात आता त्याची ओळख एक आघाडीचा इंग्रजी रोमॅंटिक लेखक म्हणून बनली आहे. पुण्यातील आदित्य निघोटची गोष्ट लय भारी आहे. एकीकडे डॉक्टरकी आणि दुसरीकडे लेखनप्रपंच सांभाळत हा तरुण लेखक स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करतो आहे. डॉ. आदित्यचा आजवरचा भन्नाट लेखन...

अशी प्रवाहे... अक्षरधारा 11.11.2023

मराठी पुस्तकांना मागणी नाही, ही ओरड खोटी ठरवित या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली ती `अक्षरधारा`ने! ग्रंथयात्रेत काम करताना पुस्तकांच्या प्रेमात पडलेल्या रमेश राठिवडेकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी अव्याहत कष्टातून, चिकाटीने आणि कल्पकतेने ही `अक्षरधारा` राज्यभरात प्रदर्शनांच्या माध्यमातून पोहोचविली. व्यवसाय व व्यवहाराच्या पलीकडे जाऊन वाचक, प्रकाशक, लेखक अशा तिन्ही घटकांना एका सूत्रात बांधत त्या...

गोष्ट एका सेवाकार्याची! 04.11.2023

समाजातील दुर्लक्षित घटकांचे सक्षमीकरण झाले तरच तो समाज खऱ्या अर्थाने पुढं येऊ शकतो. पुण्यानजिक वेल्हे व भोर तालुक्यांमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी  तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेने विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून मोठं काम उभा केलं आहे. त्याचीच उलगड केली आहे, संस्थेचे सचिव मंदार अत्रे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून. सेवाभावाने केलेल्या कार्यातून इतरांचं आयुष्य...

वक्तृत्वावर बोलू काही... 28.10.2023

वक्तृत्व ही दैवी देगणी असते, अंगभूत प्रतिभा असते की सहजसाध्य कला असते असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याची उत्तरे शोधण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, प्रसिद्ध संवादक, वक्ते आणि माध्यमविद्या क्षेत्रातील प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांना. वक्तृत्वकला कशी जोपासता येऊ शकते, त्यासाठी काय करायला हवं, उत्तम वक्त्यांमधील वेगळपण काय असते यावर प्रा. भिंगारकर या गप्पांमधून प्रकाश टाकतात. ज्यांना आपण उ...

मराठी भाषिकांनी इंग्रजी साहित्याकडे कसे वळावे? 21.10.2023

इंग्रजी ही जगाची भाषा. उत्तम मराठी साहित्यरसिक असणाऱ्यांना इंग्रजी साहित्याचाही आस्वाद घेण्याची ईच्छा असते. मात्र, त्यांना हे धाडस वाटते. या पार्श्वभूमीवर, मराठी साहित्यरसिकांनी इंग्रजीकडे कसे वळावे, सुरवात कशी करावी, अडचणी कोणत्या असू शकतात आणि त्यावर मार्ग कसा काढता येतो, मराठी लेखकांना इंग्रजीत लिहिता येऊ शकते का, इंग्रजीतील भारतीय लेखकांचे स्थान कसे आहे या व अशा अनेक बाबींची उलगड प्रसिद्ध इंग्...

`शककर्ते शिवराय`च्या निर्मितीमागची गोष्ट! 14.10.2023

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आज शिवरायांवर अनेक पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतानाही शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या `शककर्ते शिवराय` या शिवचरित्राला मानाचे स्थान आहे. हे शिवचरित्र कसे साकारले गेले, या ग्रंथामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वाचकांना आणि अभ्यासकांना खिळवून ठेवतात, या ग्रंथनिर्मितीमागची पार्श्वभूमी काय होती या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणार...

इस्त्रायल युद्धाच्या `टायमिंग` मागचं गूढ! 11.10.2023

इस्त्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. त्याचे भीषण परिणामही आता पुढे येऊ लागले आहेत. सर्व काही सुरळीत चालू असतानाच हे युद्ध का सुरु झाले आहे असाच प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील या युद्धामागची नेमकी काय कारणं आहेत यापेक्षा त्याची वेळ हीच का निवडण्यात आली असावी, त्याचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होऊ शकतो, यातून ग्लोबल ऑर्डर बदलल्याचे संकेत मिळत आहेत का या व अ...

झलक- रहस्य `डीएनए`चं! 07.10.2023

एका बाळाच्या डीएनए सॅम्पलवरुन त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळतं का, याची रहस्यमय कथा म्हणजेच `रहस्य डीएनएचं`. स्टोरीटेलवरील खाकी स्टोरीज् मालिकेतील ही कथा श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली आणि अभिनेते शशांक शेंडे यांच्या दमदार आवाजातून साकारलेली ही कथा ऐकणं, हा एक आगळा अनुभव ठरावा.  अशा या कथेची एक झलक आपल्या सर्वांसाठी, स्टोरीटेल कट्ट्यावर.  ही संपू...

व्यक्तिमत्व घडविणारे खरे पैलू कोणते? 30.09.2023

आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारे खरे घटक कोणते असतात, हा सर्वांच्याच मनात डोकावणारा प्रश्न. अशा कोणत्या बाबी असतात, ज्या व्यक्तीचं महत्त्व वाढवितात, तो नेमका कोणता दृष्टिकोन असतो जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं राखतो या व अशा विविध बाबींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. ज्येष्ठ पत्रकार, संवादक राजेंद्र हुंजे यांनी आजवर अनुभवलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्वांमधील वेगळेपण अध...

ग्रंथालयांचं आता भवितव्य काय? - उज्ज्वल आहे!! 23.09.2023

ग्रंथालय म्हणजेच वाचनालयांनी आपल्या महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाला पुस्तकांच्या, विचारांच्या जवळ ठेवले आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा कायमच देशात आपले अग्रस्थान राखू शकले. गेल्या काही वर्षांत आलेल्या स्थित्यंतरांमुळे आता महाराष्ट्र ज्यातून घडला अशा ग्रंथालयांचे, पर्यायाने येथील वाचनसंस्कृतीचे काय होणार अशी शंका सर्वांच्या मनात डोकावू लागली. याच विषयाचा समग्र अभ्यास केलेल्या आणि...

मराठी उद्योजकांचा `सक्सेस कोड` काय आहे? 16.09.2023

उद्योजक म्हणजे समाजाला पुढे घेऊन जाणारा धाडसी घटक. अशा उद्योजकांच्या वेगळेपणाला अधोरेखित करीत त्यातून प्रेरणादायी असं काही समाजापुढे आणत राहणं, ही नक्कीच आगळी बाब ठरते. छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, उद्योजक दत्ता जोशी यांनी आजवर तब्बल हजारोंहून अधिक उद्योजकांशी संवाद साधून त्यांची वाटचाल आपल्या पोलादी माणसं, मुव्हींग एस्पिरेशन्स अशा पुस्तकमालिकांमधून समाजापुढे उलगडून दाखवली आहे. य...

पॉडकास्टिंगच्या जगात.... 09.09.2023

मराठी पॉडकास्टिंगमध्ये स्टोरीटेल कट्टा अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. यानिमित्ताने, एकूणच पॉडकास्टिंगमध्ये सध्या काय सुरु आहे, जगातील चांगले पॉडकास्ट कोणते, मराठीत पॉडकास्टर बनण्यासाठी काय करावं लागतं, या विषयावर गप्पा मारल्या आहेत, स्टोरीटेलचे इंडिया हेड योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. जरुर ऐकावा असा हा पॉडकास्टिंगवरला पॉ़डकास्ट! 

`एआय` आणि `हॉलिवुड`मधील संप 26.08.2023

आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञान आता सर्वत्र झपाट्याने वापरले जाऊ लागले आहे. मात्र, लेखन, कला, अभिनय अशा सर्जनशील क्षेत्रांत `एआय`च्या आगमनाने अनेक प्रश्नही पुढे आणले आहेत. यातून बेरोजगारीपासून स्वामीत्व हक्कांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. सध्या अमेरिकेत, तेथील चित्रपटसृष्टी म्हणजेच, हॉलिवुडमध्ये लेखक, तंत्रज्ञान वगैरे यांच्या संघटनांनी याच मुद्द्यांवरुन संप पुकारलेला आहे. हा प्रश्न...

हरीभाऊ नरके आणि मी 21.08.2023

प्रा. हरी नरके.... पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचे विचारवंत, लेखक, वक्ते. हरीभाऊंच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. या पार्श्वभूमीवर, त्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे प्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी यांनी हरीभाऊंच्या आठवणी जागवल्या. हरीभाऊंचे अनेक अज्ञात पैलू या संवादातून पुढे आले. एक विचारवंत जेव्हा कार्यरत असतो, तेव्हा त्याच्या जगण्यात किती संघर्ष, उद्विग्नता ठासून भरलेली असते आणि...

नाशिक मधील शिक्षण `रेषा`! 12.08.2023

शाश्वत शिक्षण या संकल्पनेच्या आधारावर नाशिकमध्ये मिलिंद कुलकर्णी यांनी रेषा शिक्षण संस्था सुरु केली. शाश्वत शिक्षण म्हणजे नेमके काय, मुलांना शिक्षणातून नेमकं काय मिळणं अपेक्षित आहे, का अपेक्षित आहे आणि त्यासाठी कोणत्या वेगळ्या संकल्पना पुढे आल्या आहेत, याचा उहापोह केला आहे खुद्द मिलिंद कुलकर्णी यांनी. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून नव्या शिक्षणपद्धतीची थोडक्यात ओळखही होऊन जात...

लेखन ते संघटन- संदीप काळे 05.08.2023

श्री. संदीप काळे म्हणजे एक सक्रीय लेखक. आपल्या लेखणीतून विविध व्यक्ती, अनुभवांशी भिडत असतानाच `व्हॉइस ऑफ मीडिया` च्या माध्यमातून ते पत्रकारांचं संघटनही करतात. आजवरच्या वाटचालीत त्यांचा लेखक, संपादक व संघटक अशा तिन्ही आघाड्यांवर झालेला प्रवास, त्यातील अनुभव, निरीक्षणे यांविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी. जरुर ऐकायला हवा, असा पॉडकास्ट. 

सुने, सुने माळरान.... 04.08.2023

आपल्या एकाहून एक सुरेल गीतांनी आणि कवितांनी मनामनांत निसर्ग जिवंत ठेवणारे रानकवी ना.धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांवर दैनिक लोकमत मध्ये ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला अग्रलेख म्हणजे त्यांचं आगळंपण आणि आपलंपण साठवणारी एक सुरेल शब्दमैफलच. ती फुलवली आहे  संपादक संजय आवटे यांनी. महानोरांचे काव्य, त्यांची प्रतिभा, त्यांचं कार्य आणि त्यांची मातीशी आणि माणसांशी असणारी बांधिलकी अशा अनेक पैलूंची ग...

भारत आर्थिक महासत्ता बनतंय म्हणजे नेमकं काय? 29.07.2023

भारत आता जगातील एक महत्त्वाची आर्थिक महासत्ता बनते आहे, असे आपण ऐकतो, वाचतो. खरेच भारत आर्थिक महासत्ता बनते आहे का, असेल तर त्यामागची कारणे काय आहेत, सर्वसामान्यांना यातून काय मिळणार आहे या व अशा अनेक बाबींवर अगदी सोप्या शब्दांत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ. विनायक गोविलकर यांनी प्रकाश टाकला आहे. आर्थिक महासत्ता या संकल्पनेची अतिशय सुलभ भाषेतील ही उलगड झाली आहे, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या ग...

विजू पेणकर...मराठीसाठी `गेन`कर! 22.07.2023

काही लोकं खरोखर `अवलिया` प्रकारात मोडतात. मुंबईत माझगावातील डोंगरी भागात गेली १५० वर्षे एक मराठी शाळा ज्यू समाज चालवितो. त्याची धुरा सांभाळणारे विजू पेणकर हे खरोखर अवलिया. अत्यंत संघर्षातून ज्यांनी आपलं आयुष्य फुलवलं, आयुष्यातील नानाविध प्रांतांत मुशाफिरी केली, बॉडीबिल्डिंगपासून कब्बडीपर्यंत सारं क्रीडाक्षेत्र ताब्यात घेत अभिनय क्षेत्रातही ज्यांची कारकीर्द फुलली, असे विजू पेणकर प्रसंग येताच आपल्या...

श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवणारी पुस्तके 15.07.2023

पुस्तक वाचून श्रीमंत होता येतं का, हा एक प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचं नेमकं उत्तर या पॉडकास्टमधून मिळतं. स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख व वाचन विश्लेषक योगेश दशरथ यांसमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादात श्रीमंतीचे मार्ग दाखवणाऱ्या जगाती अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचा, त्यातील आशयाचा वेध घेतला गेला आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांच्या विचारांना दिशा देणारा हा संवाद जरुर ऐका...

प्रा. मोटेगावकर सरांचा `लातूर पॅटर्न`! 08.07.2023

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये आणि विशेषतः वैद्यकीय व अभियांत्रिकी  प्रवेश परीक्षांत(नीट आणि जेईई) हमखास भरसोस यश लातूरमधील विद्यार्थ्यांना मिळवून देतो, तो `लातूर पॅटर्न` नेहमीच चर्चेत असतो. हा पॅटर्न नेमका कसा विकसित झाला, बदलत गेला आणि आज त्याचा एवढा बोलबाला का आहे, याचं कुतूहल अनेकांना असते. याची उलगड करण्यासाठी लातूरसह राज्यातील अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व राज्यात अव्वल स्थानी असल्याचा दावा...

'काया' ही पंढरी..आत्मा हा 'विठ्ठल'! 01.07.2023

प्लास्टिक सर्जरी क्षेत्रात सर्वोच्च वैद्यकीय पदवी घेऊन आपले ज्ञान, कौशल्य ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी पणाला लावणारे लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. विठ्ठल लहाने यांचे कार्य आणि विचार दोन्ही महान. 'डॉक्टर्स डे' निमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना डॉ. लहाने केवळ आपले अनुभव सांगत नाहीत तर प्रेरणेची पेरणीही करतात.    प्रत्येकाने जरुर ऐकावा आणि समृद्ध व्हावे, असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

करिअर कोठे नि कसे....सांगती बोटांचे ठसे! 24.06.2023

करिअर हा विषय प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय. योग्य वेळेत योग्य दिशा लाभली तर उत्तम करिअर घडू शकतं...मात्र ते नेमकं कसं साधायचं हा सर्वांपुढे प्रश्न असतो. `डर्मेटोग्राफिक एनालिसिस` च्या माध्यमातून तुमच्या बोटांच्या ठशांवरुन तुमचं व्यक्तिमत्व उलगडतं आणि त्याच्या सखोल विश्लेषणातून तुमच्यासाठी कोणतं करिअर उत्तम ठरेल, हे सूचविण्यात येतं. या क्षेत्रात कार्यरत असणा...

`दिनविशेष`कार संजीव वेलणकर 17.06.2023

समाजमाध्यमांत दररोज निरनिराळ्या लोकांचे परिचय, त्यांच्याविषयीची माहिती अचूकपणे गेली ८ वर्षे सातत्याने, निरपेक्ष भावनेने लिहित राहणे ही सोपी गोष्ट नाही. पुण्यातील संजीव वेलणकर आपला केटरिंगचा व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर व्यक्तींचे परिचय आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम अथवा व्हॉटस्अप ग्रुप अशा माध्यमांतून करुन देतात. एखादा अपवाद वगळता, दररोज त्यांचे हे लेखन हजारो, लाखो लोकांप...

आली पाहा दारी...कैवल्यवारी! 10.06.2023

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे विशुद्ध दर्शन. आळंदी-देहूतून ज्ञानोबा माऊली व तुकोबारायांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात. या मार्गावरील त्यांचा प्रवास मग केवळ वारकऱ्यांचा राहात नाही, तो सर्वांच्याच मनातून सुरु होतो. याच जाणिवेतून वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक व संवादक राजेंद्र हुंजे यांनी  `कैवल्यवारी` या सांगीतिक वारीची संकल्पना साकारली व रसिकांनी त्यास भरभरुन प्रतिसाद दिला. कैव...

Ascolta il podcast स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici