Sakal Media
"राज"कारण " Rajkaran
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता... 16.01.2026 8:14
शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी पुकारलेले हे बंड म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता. KEYWORDS : Political podcast, Ma...
RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला! 09.01.2026 13:41
मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा झाला? त्याचाच हा इतिहास KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussio...
RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध' 02.01.2026 16:07
सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shivsena, NCP, BJP, Congr...
RAJ'KARAN PODCAST : किंगमेकर' विरुद्ध 'जायंट किलर'! गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधील वर्चस्वाच्या लढाईचा धगधगता इतिहास 26.12.2025 12:36
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ निवडणुकीतील टक्कर आणि राजकीय वर्चस्वात आहे, ज्यामुळे हे वारंवार चर्चेत राहिले आहेत. या टोकाच्या संघर्षाची सुर...
RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं! 19.12.2025 14:09
नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discuss...
RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन 12.12.2025 9:30
बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं. पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का? तर नाही. गेवराईत यापूर्वीदेखील असे राडे झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आ...
RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण 05.12.2025 10:46
एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण...
RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण 28.11.2025 21:18
राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात दशकांची राजकीय परंपरा आजही कायम आहे. केशरकाकूंना चार मुले — जयदत्त, रविंद्र, भारतभूषण आणि पवित्रा. या चौघांस...
RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री? 21.11.2025 11:57
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक...
RAJ'KARAN PODCAST | अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर घरी गेलेला नेता पुन्हा आला थेट अर्थमंत्री झाला 14.11.2025 15:05
संघाचे स्वयंसेवक ते मंत्री असा राजकीय प्रवास राहिलेल्या ज्येष्ठ भाजप नेते, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महादेवराव शिवणकर यांची राजकीय कारकीर्द संघर्ष, समर्पण आणि दूरदृष्टीने गाजलेली अशीच राहिली आहे. शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे एक वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला. यासह १९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे...
RAJ'KARAN PODCAST: एका दुधवाल्याने नगरच्या राजकारणात उडी घेतली — सरपंच, आमदार ते थेट मंत्री झाला! 07.11.2025 13:52
राजकारणातील प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या एका साध्या दुधवाल्याचा, ज्याने नगरच्या राजकारणात प्रवेश करून सरपंच, आमदार आणि शेवटी मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. ऐका हा खास भाग RAJ'KARAN PODCAST मध्ये! KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, BJP, Congress, NCP, Shivajirao Kardile
RAJ'KARAN PODCAST | भास्कर जाधव, सतेज पाटील 31.10.2025 11:28
विधानसभा आणि विधान परिषद या राज्यातील दोन्ही सभागृहांमध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही. सत्ताधारी पक्षांकडून किमान १० टक्के सदस्यसंख्येकडे लक्ष वेधले जात आहे, तर विरोधी पक्षांकडून आतापर्यंतच्या परंपरेची उदाहरणे दिली जात आहेत. राज्यासमोर सध्या अतिवृष्टी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाचे वाद यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. अशा काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षि...
RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई! 24.10.2025 10:46
राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मागील दशकात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही निवडणूक सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, प्रभागरचनेमध्ये सोयीप्रमाणे बदल केल्याचा आरोप होत असून, त्...
RAJ'KARAN PODCAST | अतिवृष्टीमुळे भाजप टेन्शनमध्ये : निवडणुका जिंकण्याचे आव्हान 17.10.2025 10:44
पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर आधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली तरी अन्य महापालिकांत भाजपला मित्रपक्षाची गरज नाही. स्वबळावरच निवडणुका लढविल्यास पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची भावना आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचा विषय ला...
RAJ'KARAN PODCAST | धुमसणाऱ्या लडाखमधील भडका, ऐका भुमिपुत्राच्या तोंडून... 10.10.2025 12:03
लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले. लडाखचे संकट संपलेले नसून, ते अद्याप कायम आहे. लडाखच्या जनतेसाठी सोनम वांगचुक यांची भूमिका, त्यांचे ठाम राहणे सरकारने मांडलेल्या रचितकथनापेक्षा अधिक वजनदार आहे. लडाखमधील नागरिकांचा त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा कायम आहे. तो का आहे? आणि हा भडका नेमका का पडला...
RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते? 03.10.2025 12:14
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच कांदाप्रश्नी आक्रोश मोर्चाही आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेत मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने सातत्याने साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला शह देण्यासाठी पवारांनी ना...
RAJ'KARAN PODCAST | महाराष्ट्राच्या सुरक्षाव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारा मराठमोळा अधिकारी... 26.09.2025 7:53
पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात. पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
RAJ'KARAN PODCAST | एकनाथ शिंदेंचा 'बाण' कोणाच्या वर्मी लागणार? 19.09.2025 10:24
गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबु...
RAJ'KARAN PODCAST | देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे राजकीय नायक? 12.09.2025 8:03
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मुंबईत का धडकले, सरकारने आंदोलकांना थोपविण्यासाठी काय प्रयत्न केले, मुंबईतील मराठा आंदोलन सरकारने कशा पद्धतीने हाताळले... या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मार्ग काढत असताना राजकीय पातळीवर आंदोलन कसे हाताळले गेले, हेही तपासणे गरजेचे आहे.
RAJ'KARAN PODCAST | संघशताब्दी निवडणूक इच्छुकांसाठी नामी संधी 05.09.2025 10:58
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात असल्यानंतर संघाच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाकडे एक नामी संधी म्हणून भाजप कार्यकर्ते पाहत आहेत.
RAJ'KARAN PODCAST | एका एका शिलेदाराने अडचणीच्या काळात काढला पळ; मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा! 29.08.2025 12:47
मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपात दाखल झाले. तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
RAJ'KARAN PODCAST | संघाच्या मुशीत घडलेला नेता पुन्हा भाजपमध्ये... अण्णा डांगेंनी घरट्यासाठी बदललं अंगण 22.08.2025 10:39
80-90 च्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल.
RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे.. 15.08.2025 7:16
मुंबई शहरात कबुतरप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत, तर तिकडे कोल्हापूरातील शिरोळ येथील मठामधील माधुरी हत्तीणीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत जैन समाज हा समान धागा आहे.
RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच? 08.08.2025 10:19
राज ठाकरे जेथे जातील तेथे प्रसारमाध्यमे पोहोचतातच. ते प्रसारमाध्यमांना काही ना काही बातम्या पुरवतातच. इगतपुरीच्या या ‘रिसॉर्ट’वर ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. त्या गप्पांच्या ओघात त्यांनी ‘तुमच्या नाशिकमध्ये काय चाललेय हे तुम्हाला माहीत नाही का? असा सवाल पत्रकारांना केला. तिथूनच 72 अधिकारी, राजकीय नेत्यांच्या ‘हनी ट्रॅप’च्या चर्चेला तोंड फुटले.
RAJ'KARAN PODCAST | मराठीचा लळा प्रेमाने लागावा... पण त्यासाठी काय करायचं हेही राज्यपालांनी सांगायला हवे! 01.08.2025 7:26
मराठी भाषा मारहाण करून शिकून येणार नाही, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मात्र आवड, सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा, यासाठी प्रेमाने काय करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici