BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

Science MR ↓ 182 episodi

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: www.bbc.co.uk

Autore

BBC Marathi Audio

Categoria

Science

Sito del podcast

www.bbc.co.uk

Ultimo episodio

8 mag 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi 11.06.2022

आता 10वी-12वीच्या निकालांचा काळ आहे. आणि निकाल म्हटलं की प्रत्येक वेळी एक हेडलाईन पाहायला मिळतेच – ‘मुलींचीच सरशी, मुलांना मागे टाकलं’. असं का होतं? शालेय परीक्षांमध्ये मुलीच मुलांवर मात कशी करतात? ऐकू या ही खास परीक्षांच्या निकालांच्या तोंडावर विशेष गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर एडिटिंग: तिलक राज भाटिया

भाग 31: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 04.06.2022

आज जगभरात दर मिनिटाला 10 लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात, वर्षाला किमान 400 अब्ज. एक अभ्यास सांगतो, खरोखरंच 2050 पर्यंत आपल्या समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल आणि त्या माशांच्या पोटातही प्लास्टिकच असेल. मग आपण प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं बंद का नाही करू शकत? ऐका ही खास पर्यावरण दिन विशेष गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आ...

जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 28.05.2022

दरवर्षी आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. कुठे मलेरिया, कुठे डेंगू, कुठे चिकुनगुन्याची साथ पाहायला मिळते. तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण जगभरातल्या डासांना एकदाचं संपवून का नाही टाकत? मूळ निर्मिती: द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर सहनिर्मिती – वात्सल्य राय एडिटिंग: तिलक राज भाटिया

भाग 29 - सेंद्रिय शेतीच्या स्वप्नाने श्रीलंकेचं वाटोळं केलं का? 21.05.2022

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभया राजपक्षे यांनी एप्रिल 2021 मध्ये घोषणा केली की देशातली संपूर्ण शेती सेंद्रीय किंवा ऑरगॅनिक पद्धतीने केली जाईल. ही योजना जितकी महत्त्वाकांक्षी होती, तितकीच ती अनियोजितसुद्धा होती. त्यामुळेच आज श्रीलंका ज्या आर्थिक गर्तेत सापडलाय, त्यासाठी या निर्णयालासुद्धा जबाबदार ठरवलं जातं. आपण गोष्ट दुनियेची ऐकताना हेच जाणून घेणार आहोत, की खरच सेंद्रिय शेतीमुळे श्रीलंकेचं वाटोळ...

भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 14.05.2022

नॉर्ड स्ट्रीम-1 – जगभरात चर्चेचा विषय असलेली ही पाइप लाईन बाल्टिक सागराच्या खालून जाणारा आणि रशियाला जर्मनीशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. कुणे एके काळी या पाईपलाईनला जर्मनी आणि रशियामधल्या विश्वासाच्या नात्याचं प्रतीक मानलं जायचं. रशियाहून येणाऱ्या या गॅसपासून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. पण युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून युरोप रशियावर संतापलाय आणि त्याच्यापासून दूर जायच...

भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 07.05.2022

गेल्या दोन वर्षांत जवळजवळ जगातल्या प्रत्येक देशाने कोविडची लाट पाहिलीय. आता पुन्हा याचा उद्रेक चीनमध्ये पाहायला मिळतोय आणि भारतातही काही ठिकाणी केसेस वाढताना दिसत आहेत. अशात एक प्रश्न विचारला जाणं सहाजिक आहे – की आपल्या सध्याच्या लशी या नवीन व्हेरियंट्सवर काम करतील की नाही? तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण कायमची एक अशी लस नाही का बनवू शकत जी सगळ्याच कोरोना...

भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 30.04.2022

या आठवड्यातली सर्वांत मोठी बातमी कदाचित हीच असेल, की इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलंय. ट्विटर, ज्यावर 280 कॅरॅक्टर्समध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असतं. ते जगातलं सर्वांत मोठं तर नाही, पण नक्कीच सर्वांत जास्त प्रभाव टाकणारं सोशल मीडिया ॲप आहे. कुठेही बाँबस्फोट झाला वा भूकंप, कुठे सरकार पडलं वा कुठली मोठी राजकीय उलाढाल झाली, पहिली बातमी इथेच फुटते, पहिल्या प्रतिक्रिया इथेच उमटतात. त्यामुळे...

भाग 25: भविष्यातले युद्ध ड्रोन लढतील का? रशिया युक्रेन युद्ध | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 24.04.2022

या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन सैन्याचा एक मोठ्ठा ताफा युक्रेनची राजधानी कीव्हकडे कूच करताना दिसत होता. तिकडे कीव्हमध्येही रशियाच्या या हल्ल्याचा सामना करायची तयारी सुरू होती. रशियन सैन्य युक्रेनपेक्षा कैक पटींनी मोठं आहे – त्यांची संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक, लष्करी विमानं, रणगाडे, आणि लष्करी साधनांचं उत्पादन आणि शस्त्रसाठा युक्रेनच्या तुलनेत खूप जास्त मोठा आहे. पण काही आठवड्यांपूर्वी हे स्पष्ट...

भाग 24: व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधल्या युद्ध गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊ शकते का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 16.04.2022

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनशेजारच्या पोलंडमध्ये तेच वक्तव्य पुन्हा केलं, जे अमेरिकन प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केलं होतं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या मारियोपोलमध्ये युद्ध गुन्हा केलाय, war crime केलाय, असा आरोप त्यांनी केला. याच दरम्यान नेदरलँड्सच्या द हेगमध्ये 38 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले...

भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा लागतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 09.04.2022

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर एक महिन्यानंतरही रशिया कीव्हवर नियंत्रण नाही मिळवू शकलाय. त्यांचं सैन्य जवळजवळ शून्य डिग्री तापमानात संघर्ष करताना दिसतंय. कुठे ट्रक दलदलीत फसून निकामी होतायत तर कुठे इंधन पुरवठाच होत नसल्याने ताफा खोळंबलाय. तर युक्रेनच्या इतर भागांमध्ये भुकेने व्याकूळ झालेल्या रशियन सैनिकांनी दुकानं लुटल्याच्या बातम्या येतायत. यामुळे जगातल्या सर्वांत मोठ्या लष्करी शक्तींपैकी एक...

भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 02.04.2022

2005 मध्ये झोई रॉस या पाच वर्षांच्या मुलीचा एक फोटो व्हायरल झाला. ती एका जळत्या घरासमोर उभी होती, आणि ती अशी हसत होती, जणुकाही ती आग तिनेच लावलीय किंवा तिला त्याचा आनंद झालाय. तिचा हा फोटो इतका व्हायरल झाला की तिचं मीमच बनलं – The Disaster Girl. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये त्याच फोटोची विक्री 4 लाख 73 हजार डॉलर्सना करण्यात आली, पण एक NFT म्हणून. NFT म्हणजे non fungible token – म्हणजे एकप्रकारे त्या...

भाग 21: बिटकॉईनच्या जन्माची गूढ, रंजक गोष्ट - क्रिप्टोकरंसी कुणी का आणली? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 26.03.2022

#BBCMarathi #History #Bitcoin #CryptoCurrency #गोष्टदुनियेची 22 मे, 2010 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील जॅकसनविलमध्ये लॅझलो हॅन्येक्झ याने दोन लार्ज पिझ्झांसाठी दिले 10 हजार बिटकॉइन. हा जगातला पहिला बिटकॉइन व्यवहार होता. . तेव्हा 10 हजार बिटकॉइन्सचं मूल्य साधारण 40 डॉलर्स असेल. आज 2022 मध्ये याच 10 हजार बिटकॉइन्सचं मूल्य अब्जावधी रुपयांमध्ये असेल. बिटकॉइनच्या मूल्याचा काही भरवसा नसतो, कधी अचा...

भाग 20: रशिया युक्रेन एकच आहेत, असा आग्रह व्लादिमीर पुतिन का करतात? 19.03.2022

12 जुलै 2021 – रशियाच्या सरकारी वेबसाइटवर युक्रेनबद्दल जवळजवळ साडेसहा हजार शब्दांचा एक लेख प्रकाशित झाला. या लेखात रशिया आणि युक्रेनच्या गेल्या अनेक शतकांच्या संयुक्त इतिहासाची माहिती सविस्तर लिहिण्यात आली होती. यात दावा करण्यात आला होता की रशिया, युक्रेन आणि बेलारूसमध्ये राहणाऱ्यांचे पूर्वज हे मुळात प्राचीन रशियन लोकच होते, आणि कोणे एके काळी हा विशाल प्राचीन स्लाविक देश युरोपातला सर्वांत मोठा देश...

भाग 19: रशिया युक्रेन युद्ध व्लादिमीर पुतिन यांच्यावर निर्बंध लादून संपेल का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 12.03.2022

24 फरवरी 2022 ला रशियाने पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूंनी युक्रेनवर आक्रमण केलं. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर बाहेर पडलेला युक्रेन दुसरा सर्वांत मोठा देश होता. रशियाच्या हल्ल्यावर जगभरातून पडसाद उमटले. संयुक्त राष्ट्र, युरोपियन महासंघ, अमेरिका, ब्रिटेन, कॅनडासह अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावायला सुरुवात केली. पण आर्थिक निर्बंध लादलेला रशिया काही पहिला देश नव्हता. यापूर्वीसुद्ध...

भाग 18: रशिया युक्रेन संघर्षाचं अणू युद्धात रूपांतर होऊ शकतं का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 05.03.2022

24 फेब्रुवारी 2022, रशियात सकाळची वेळ. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील भागात विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली आणि आधीच सीमावर तैनात रशियन सैन्याला युक्रेनमध्ये घुसण्याचे आदेश दिलेत. यानंतर 27 फेब्रुवारीला रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपली अण्वस्त्र हाई अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिलेत. जगात अण्वस्त्रांचा सर्वांत मोठा साठा रशियाजवळ आहे. अशात जाणकारांना भीती आहे की पुतीन...

भाग 17: टर्कीमध्ये महागाईवर एर्दोआन कशी मात करणार? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 26.02.2022

टर्कीचं चलन लिराचं मूल्य सतत घसरतंय. त्यामुळे टर्कीमध्ये महागाई प्रचंड वाढलीय. अर्थतज्ज्ञांचं म्हणणंय की महागाईला नियंत्रणात ठेवायला देशातल्या केंद्रीय बँकेने व्याज दरात वाढवायला हवेत. पण टर्कीमध्ये असं होताना दिसत नाहीय, कारण राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन व्याजदर वाढविण्याच्या विरोधात आहेत. पुढच्या वर्षी इथे निवडणुका होणार आहेत आणि वाढत्या महागाईने जनता हैराण आहे, त्यामुळे एर्दोआन यांची लोकप...

भाग 16: ग्रीन इलेक्ट्रिसिटी - खरंच आपण आपलं पूर्ण जग वि‍जेवर चालवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 19.02.2022

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात युकेमधल्या एका प्रयोगशाळेत न्युक्लिअर फ्यूजनच्या मदतीने 5 सेकंदांमध्ये 59 मेगाज्यूल ऊर्जा किंवा 11 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली. 1997 मध्ये अशाच प्रकारच्या प्रयोगांमधून जे यश मिळालं होतं, हे त्याच्या दुपटीपेक्षा जास्त होतं, त्यामुळे हा आजवरचा विश्वविक्रमच म्हणावा. यात अजूनही अनेक तांत्रिक अडचणी आहेत, पण जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि याचं प्रमाण आणखी वाढवता आलं, त...

भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक्यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 12.02.2022

#BBCMarathi #SpaceMissions #Russia #US #गोष्टदुनियेची 1982मधे सोवियत संघाने कॉसमॉस-1408 नावांचं एक गोपनीय उपग्रह अंतराळांत लाँच केलं. पण दोनच वर्षात ते खराब झालं, आणि त्याच्या कक्षेत आजवर ते तसंच फिरत राहिलं. अखेर नोव्हेंबर 2021मध्ये रशियाने एक अँटी-सॅटलाइट मिसाइल लॉन्च करत याला नष्ट केलं. पण याचे जवळजवळ 1,500 तुकड़े अंतराळात पसरले. यापूर्वी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असंच केलं होतं....

भाग 14: तुरुंगात येणारे ड्रग्स आपण थांबवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 05.02.2022

तुरुंगात ड्रग्सचा प्रॉब्लेम जगभरात आहे, आणि सगळीकडेच न्यायपालिका या समस्येला तोंड देत आहेत, कारण तुरुंगांमध्ये अमली पदार्थ अखेर पोहोचतात कसे, हा त्यांच्यासमोरचाही मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कुणालाही सापडेना. तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की तुरुंगांमध्ये पोहोचणाऱ्या ड्रग्सला आळा कसा घालावा? यावर चर्चा करायला आमच्यासोबत आहेत चार तज्ज्ञ. संशोधन – द...

भाग 13: 5G मुळे कोरोना पसरतो, अशा अफवा कुठून येतात? कशा पसरतात? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 29.01.2022

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत AT&T आणि Verizon सारख्या टेलेकॉम कंपन्या 5G सेवा सुरू करणार होत्या. पण हे नवीन 5G सिग्नल, जे आपला मोबाईल आणि इंटरनेट वापर आणखी वेगवान करू शकतात, ते काही विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आणू शकतात, असं सांगत एअरबस आणि बोइंग या विमान निर्मात्यांनी 5g सेवा सध्या सुरू करू नका, अशी मागणी केली. 5G बद्दल आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐकतोय, पण अजूनही जगभरात त्याविषयी सां...

भाग 12: अंतराळातला कचरा आपण कसा साफ करणार? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 22.01.2022

अंतराळात वेगवेगळ्या स्पेस मिशनचे कित्येक लहानमोठे तुकडे तरंगत आहेत, ज्यांपासून इतर मोहिमांना धोका कायम आहे. अंतराळातल्या कचऱ्याचा हा प्रश्न मोठा आहे, कारण यामुळे हे स्पेस मिशन्स संकटात सापडू शकतात. पण या कचऱ्याची विल्हेवाट आपण लावू शकतो का, जेणेकरून भविष्यात असे धोके टाळता येतील? या प्रश्नांची उत्तरं आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना मिळवणार आहोत. संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गु...

भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 15.01.2022

भविष्यात क्वांटम कंप्युटिंगमुळे आपलं जग आणि आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. या नवीन तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊनच 2020च्या अर्थसंकल्पात भारत सरकारनेही या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी 8 हजार कोटींची तरतूद केली होती. भारताच नव्हे तर जगातले अनेक मोठे देश आणि काही कंपन्यासुद्धा क्वांटम कम्प्युटर्सच्या विकासासाठी मोठमोठी गुंतवणूक करत आहेत. तर यंदाची गोष्ट दुनियेची याच विषयावर, की हे क्वांटम...

भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 08.01.2022

संपूर्ण जगभरात अन्नाधान्य, तेल, वीज आणि इतर वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत. अगदी दररोज लागणारा चहाही आता गोड लागत नाही, इतके साखरेचे भावही वधालयेत. बऱ्याच देशांनी अनेक वर्ष महागाई पाहिलेली नव्हती, पण कोरोनाची साथ फक्त आरोग्याचंच नव्हे तर एक आर्थिक संकटही घेऊन आलीय, जे गेल्या दशकभरात पाहण्यात आलं नव्हतं. महागाईवर नियंत्रण मिळवायला अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढवले. पण ही दुधारी तल...

भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का? 01.01.2022

25 डिसेंबर 2021 रोजी फ्रेंच गियानाच्या एका स्पेसपोर्टवरून जेम्स वेब नावाची एक महाकाय दुर्बिण अवकाशात झेपावली. ज्या बिगबँगपासून झाली, विश्वाची उत्पत्ती, तेव्हा जन्माला आलेल्या काही अगदी सुरुवातीच्या ताऱ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ही दुर्बिण करणार आहे. तब्बल १० अब्ज डॉलर्सचा खर्च आणि तीस वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेली ही दुर्बिण मुळात दूरच्या ग्रहांवर जीवनाची शक्यता पडताळून पाहणार आहे. त्यामुळे...

भाग 8: ओमिक्रॉनची लाट आली तर तिचा सामना आपण कसा करू? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 25.12.2021

या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवानामध्ये शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसच्या एका नवीन प्रकारच्या सँपलला निरखून पाहत होते. त्यांना या व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये असे अनेक बदल आढळून आले, जे यापूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते. याच्या तीन आठवड्यातच व्हायरसचा हा व्हेरिअंट जवळजवळ 40 देशांमध्ये पसरलेला होता. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने या व्हेरिअंटला नाव दिलं ओमिक्रॉन, आणि याला...

Ascolta il podcast गोष्ट दुनियेची su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici