Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 epizód

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: www.storytel.com

Szerző

Santosh Deshpande

Kategória

Arts

A podcast weboldala

www.storytel.com

Legutóbbi epizód

2026. szept. 17.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

अस्मिता टोकदार झाल्यामुळे कलानिर्मितीत बाधा? 10.12.2022

चित्रपट, नाटक, गाणी, जाहिरात, सीरीज असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये क्षितिज पटवर्धन हे महत्त्वाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ताली या बहुचर्चित सिनेमाच्या निमित्ताने ते हिंदीत पदार्पण करत आहेत. थिंकबुक्स दिवाळी विशेष या मालिकेत क्षितिज पटवर्धन यांच्याशी संवाद साधला आहे, विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी. आजच्या घडीला रसिकांची बदलत...

भविष्यात वाचनाची जागा ऑडिओबुक्स घेणार? 03.12.2022

ऑडिओबुक्स संकल्पना भारतामध्ये लोकप्रिय होत असतानाच प्रश्न उपस्थित होतो, की यामुळे वाचनसंस्कृतीवर परिणाम होतो आहे का? भविष्यात पुस्तकांची जागा, ऑडिओबुक्स घेणार का? स्टोरीटेलच्या पाच वर्षांच्या प्रवासाविषयी या विषयाची उलगड केली आहे, स्टोरीटेल इंडियाचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ व प्रसाद मिरासदार यांनी, थिंकबॅंकचे विनायक पाचलग यांच्यासमवेतच्या संवादातून.

हॅपी बर्थ डे, `स्टोरीटेल` 26.11.2022

२७ नोव्हेंबर रोजी स्टोरीटेल इंडियाचा पाचवा वर्धापनदिन. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणाऱ्या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने मनमोकळा संवाद साधला आहे, संतोष देशपांडे यांनी. स्टोरीटेलनं श्रोत्यांना नेमकं काय दिलं, आजवरचा प्रवास कसा राहिला, यापुढे काय बदल अपेक्षित आहेत अशा अनेक प्रश्नांचा त्यात उहापोह झाला आहे. जरुर ऐकावा असा स्टोरीटेल...

आठवण `सुशिं`ची.. 19.11.2022

सुहास शिरवळकर यांचं साहित्य रसिक वाचकांच्या अन् श्रोत्यांच्याही मनात अजरामर आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच, स्टौरीटेलवर सुशिंची लोकप्रियता किती आहे, याची उलगड होते. वाचकांचं निस्सिम प्रेम लाभलेल्या सुशिंच्या एकाहून एक सरस कादंबऱ्या ऐकणं हा देखील सुरेल अनुभव ठरतो.  स्टोरीटेलवर सुशिंची पुस्तकं ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/authors/50157-Suhas-Shirvalkar   स्टोरीटेलचे सभ...

मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चालली आहे का? 12.11.2022

प्रादेशिक भाषेत विश्वकोश निर्माण करण्याची गरज का असते? विश्वकोषामुळे भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेत कोणती भर पडते? इतिहास अभ्यासण्याचे कोणते फायदे असतात? मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चाललीय का? ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.

पैशापाण्याच्या प्रश्नांची प्रफुल्ल उत्तरे! 05.11.2022

प्रकाशनापूर्वीच अठरा हजारांपेक्षा अधिक पुस्तक नोंदणीचा विक्रम प्रफुल्ल वानखेडे यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने नोंदवला आहे .३०,००० पुस्तकांची पहिली आवृत्ती संपून तेवढ्याच प्रतींची दुसरी आवृत्तीदेखील आली आहे. साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. पैसै कमावण्यापेक्षा ते कुठे खर्च करावे हे आपल्याला माहिती नसतं. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण अजूनही खूप अनभिज्ञ आ...

निसर्गाशी नाळ तुटते आहे? 29.10.2022

विषय चाकोरीबाहेरचा आहे. शैली धारदार आहे. थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे. 'नदीष्ट 'ही' केवळ कादंबरी नाही, तो आहे प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. या कादंबरीचे लेखक, मनोज बोरगावकर यांच्याशी प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी साधलेला संवाद. स्टोरीटेलवर नदीष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/books/nadishta-2005731 स्टोरीटेलचे...

चला, दिवाळी समजून घेऊया! 22.10.2022

दिवाळी दरवर्षीच येते...पण अशा काय गोष्टी असतात, ज्यामुळे आपणास नवा आनंद, ऊर्जा लाभू शकते. प्रसन्नतेची पखरण आपल्या मनात आणि समाजात होऊ शकते...याचाच वेध घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक व संवादक श्री राजेंद्र हुंजे यांनी, संतोष देशपांडे यांच्यासमवेतच्या दिवाळी स्पेशल गप्पांमधून.

गप्पा `इकॉन गली` पॉडकास्टरशी! 14.10.2022

अर्थकारण हा विषय अनेकांना पचवण्यास कठीण असतो. मात्र, स्वप्निल करकरे या तरुण चार्टर्ड अकाउन्टटने सर्वसामान्य लोकांना कोणत्याही घटनेमागील अर्थकारण सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी इकॉन गली हा पॉडकास्ट सुरु केला. त्याच्या या प्रयोगाविषयी ऐकुया त्याच्याकडूनच.  हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-  Series - econGully Marathi Podcast - Storytel स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा-  Storytel...

कहाणी `इन्क्लाब विरुद्ध जिहाद`ची! 08.10.2022

एका बाजूला अफगाणिस्तानच्या जनतेचा इन्किलाब, आणि दुसऱ्या बाजूला तालिबानी धर्मांधांचा जिहाद... या संघर्षाची कहाणी कादंबरीच्या रूपाने मराठी वाचकांसमोर आणणारी कादंबरी म्हणजे इन्किलाब विरूध्द जिहाद! या कादंबरीचे लेखक, लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांच्याशी रंगलेला संवाद. स्टोरीटेलवर `इन्किलाब विरुद्ध जिहाद` ऐकण्यासाठी क्लिक करा - Inqilab Viruddha Jihad - Audiobook - Laxmi...

`रावण`चं उदात्तीकरण होतंय? 01.10.2022

रावण- राजा राक्षसांचा ही लोकप्रिय कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध झाली आहे. त्यास दमदार आवाज दिला आहे प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी. स्टोरीटेल वर या कादंबरीच्या आगमनाच्या निमित्ताने लेखक शरद तांदळे यांच्याशी संवाद साधला आहे प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी. रावण- राजा राक्षसांचा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- Ravan Raja Rakshsancha - Audiobook - Sharad Tandale - Storytel स्...

दिलीप प्रभावळकर, बोक्या सातबंडे आणि नवी गुगली ! 24.09.2022

अभिनेते म्हणून उत्तुंग यश मिळवत असतानाच दिलीप प्रभावळकर यांनी आपला लेखनाचा छंदही जोपासला. त्यांनी निर्माण केलेले बोक्या सातबंडे हे पात्र मराठी मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले. बोक्या सातबंडे चे दहा भाग राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. दिलीप प्रभावळकरांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. बोक्या सातबंडेच्या सर्व भागांबरोबरच त्यांनी लिहिलेल्या व राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पत्रापत्री, गुगली आण...

`थोडेसे अतिप्रेम` च्या निमित्तानं.... 17.09.2022

परशुरामची डायरी या मालिकेमधील `थोडेसे अतिप्रेम` ही स्टोरीटेलवर नुकतीच दाखल झालेली रहस्यकथा अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यानिमित्ताने, या कथेचे लेखक योगेश दशरथ आणि प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद श्रोत्यांना लेखकाच्या मनात काय चालू असतं, त्याचं विश्व काय असतं याची उलगड करुन देतो. थोडेसे अतिप्रेम ऐकण्यासाठी क्लिक करा- Parshuramchi Dairy - Thodese Ati...

ॲट एनी कॉस्ट! आणि इन्शाल्लाह 10.09.2022

प्रसिद्ध लेखक, नाटककार अभिराम भडकमकर यांची ॲट एनी कॉस्ट! आणि इन्शाल्लाह ही दोन्ही अत्यंत गाजलेली पुस्तके स्टोरीटेलवर आलेली आहेत. या दोन्ही पुस्तकांविषयी प्रसाद मिरासदार यांसोबत रंगलेला त्यांचा हा संवाद.

अद्भूतरम्यतेच्या जगात.... 04.09.2022

प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी ज्या विविध लेखनप्रकारांमध्ये मुक्त मुशाफिरी केली आहे, त्यातील एक महत्त्वाचा म्हणजेच अद्भूतरम्य अर्थात फॅन्टसी. स्टोरीटेलवर त्यांच्या याच प्रकारातील नवंनवं साहित्य रसिकांच्या भेटीस आलं आहे. जंबू ग्रहावरच्या कथा, हे त्यातील एक. या कथा आबालवृद्ध श्रोत्यांना  भूरळ घालत आहेत. त्यानिमित्ताने, त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादामध्ये वेध घेतला आहे अद्भूतरम...

विचार बदला, उद्योजक बना! 27.08.2022

करिअरची दिशा बदलण्याची वेळ आल्यानंतर उद्योगाचा पर्याय नजरेपुढे येतो. हा पर्याय स्वीकारताना काय विचार करावा? या विषयी प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला विचारप्रवर्तक लेख ऐकणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकणे.  जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.  स्टोरीटेलचे सबक्रिप्शन घेण्यासाठी क्लिक करा-  Storytel - Subscriptions

शोध...`शोध`च्या यशाचा! 20.08.2022

राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' ही कादंबरी प्रचंड गाजली. छत्रपती शिवरायांनी सुरतेत लुटलेल्या खजिन्याचा काही भाग नाशिक परिसरात लपवला जातो आणि आजच्या काळातील काही तरूण याचा शोध घेतात असे उत्कंठावर्धक कथानक असलेली ही कादंबरी स्टोरीटेलवर उपेन्द्र लिमये आणि केतकी थत्ते यानी वाचली आहें. स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशन आयोजित ऐकू आनंदे या उपक्रमात या कादंबरीच्या यशाचा शोध घेण्यात...

लोकमान्य ते महात्मा- डॉ. सदानंद मोरे 13.08.2022

स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशनच्या वतीने आयोजित ऐकू आनंदे कार्यक्रमात वाचा आणि ऐका योजनेच्या निमित्ताने लोकमान्य ते महात्मा या डॉ.सदानंद मोरे लिखित ग्रंथांवर लेखकाशी चर्चा केली आहें स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार यांनी !   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने ऐकावी अशी मुलाखत ! लोकमान्य ते महात्मा ही मालिका स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- Series - Lokmanya Te Mahatma - Story...

अस्थिर जगात जगावं कसं? 06.08.2022

सध्याचे जग कसे आहे असा प्रश्न कणालाही विचारला तर साधारणपणे जी उत्तरे येतात त्यात आपले जग फार वेगवान होत चालले आहे असे बरेच जण म्हणतात. अनेकांना नेमकं काय चालले आहे ते समजतच नाही. पुढे काय होणार? आपल्या मुलांचे काय होणार? आपल्या गुंतवणूकीचे आणि भविष्याचे काय होणार या चिंतेने जो तो हैराण असतो. पूर्वी ज्याप्रमाणे पुढील पाच पन्नास वर्षांचे नियोजन करता यायचे, एकदा नोकरी मिळाली की चिंता नाही असे अनेकांन...

झलक- साठा उत्तराची.... 30.07.2022

श्रावणातल्या कहाण्यांकडे नव्याने पाहात, त्याला आधुनिकतेचा स्पर्श देत सौ. श्रृती बोंद्रे यांनी साठा उत्तराची... ही मालिका लिहिली. आजच्या समाजातील मानवी नातेसंबंध, पर्यावरण, अर्थकारण, महिलाविषयक दृष्टिकोन आदींचे विविध पैलू कहाण्यांमधून उलगडतात. कधी रुपकाचा आधार देत, तर कधी वास्तवतेचं दर्शन घडवत मानवी जीवनाला आकार देणाऱ्या मूल्यांचा विचार त्यात आढळतो. खास श्रावणमासानिमित्त, स्टोरीटेल कट्ट्यावर साठा उ...

कवितांमधल्या श्रावणसरी... 24.07.2022

श्रावण आणि कवितांचे एक अद्वैताचं नातं असतं. याच नात्यातून जन्म घेतात आशयघन शब्द आणि त्यातूनच फुलतं काव्य. श्रावणाच्या आगमनानिमित्त  कवी संतोष देशपांडे यांच्यासमवेत प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांची श्रावणमैफल कट्ट्यावर रंगते, तेव्हा आपसूकच त्यातून सुरेल काही हाती लागतं....प्रत्येकानं आपल्या मनात जपलेल्या श्रावणाची आठवण करुन देतं. 

मराठीला ज्ञानभाषा बनविताना.... 16.07.2022

गुंतागुंतीचे वाटणारे विषय सहजशैलीतून उलगडून दाखवणारे वाचकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांची थिंकबॅंक चॅनलवर विनायक पाचलग आणि प्रसाद मिरासदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणं हा एक अनुभव आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवता येऊ शकतं का, त्यात कोणती आव्हानं आहेत आणि त्यांवर मात कशी करता येऊ शकते या व अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा संवाद आज कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी घेऊन येत आहोत. जरुर ऐका आणि समृद्ध व्हा. स्...

आषाढी विशेष- कैवल्यवारी 09.07.2022

पंढरीच्या वारी म्हणजे मराठी संस्कृतीचं आगळं वैशिष्ट्यं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी निघते आणि आळंदी-देहू ते पंढरपूर या प्रवासात विविध टप्प्यांवर पोहोचते तेव्हा नेमकं काय होतं, वारकऱ्यांच्या मनात कोणते भाव असतात आणि ते कसे व्यक्त होतात याचं आगळं सांगीतिक दर्शन घडविणारा प्रयोग म्हणजे कैवल्यवारी. यातून महाराष्ट्रातील दिग्गज गायकांनी, कलाकारांनी भक्तीसंगीत नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या संकल्पनेचे शि...

वारीचा सांगावा, स्टोरीटेलवर ऐकावा! 02.07.2022

स्टोरीटेल ऐकणं म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर त्यातून विचारांना दिशाही मिळते. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं, संत साहित्य व अध्यात्म यांवर आधारित असं कोणतं साहित्य स्टोरीटेल श्रोत्यांसाठी घेऊन आलं आहे आणि त्यात नेमकं काय दडलं आहे याचा उहापोह केला आहे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी. वारीनिमित्त स्टोरीटेलवर खास उपलब्ध असणारी पुस्तकं- Anand Ovari - Audiobook - Di. Ba Mokashi - Storytel Wari -...

`स्टोरीटेल`वर नवं काही, वेगळं काही! 25.06.2022

पुस्तकं अगणित आहेत पण ऐकण्यापूर्वी त्यांची निवड करायची कशी असा प्रश्न स्टोरीटेलच्या अनेक श्रोत्यांना पडू शकतो. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयाचा वेध घेण्यासाठी स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी संवाद साधला. स्टोरीटेलवर दाखल झालेल्या नव्या आणि वेगळ्या पुस्तकांची ओळख करुन देतानाच, श्रोत्यांना अशा अनेक पुस्तकांची वैशिष्ट्यं, त्यातील आशय यांची उलगड ते करतात.  स्टोरीटेल सबस्क्राइब क...

Hallgasd a(z) स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.