Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 epizód

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: www.storytel.com

Szerző

Santosh Deshpande

Kategória

Arts

A podcast weboldala

www.storytel.com

Legutóbbi epizód

2026. szept. 17.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

71: ‘टॅबू’ विषयाला स्पर्श करताना... 07.01.2020

‘टॅबू’ विषयाला स्पर्श करताना... ‘एरॉटिका’ तसा संवेदनशील विषय... आणि त्याबद्दल ३ स्त्रिया बोलत असतील तर? सायली , सई तांबे  उर्मिला यांनी गप्पा मारल्या आहेत ‘एरॉटिका’... त्याचे प्रकार... त्याची साहित्यातील गरज आणि त्याबद्दल ‘स्त्रियांचा दृष्टीकोन... आणि त्या लिहितानाची प्राक्रिया... सोबत इतरही विषय त्या बोलता बोलता स्पर्श करून जातात... काय आहे, हे तुम्हीच जाणून घ्या... हा पॉडकास्ट नक्की ऐका, आणि तुम...

70: स्टोरीटेल स्पॉटलाइट: सौ. माया पार्डीकर 05.01.2020

खरं तर प्रत्येक रसिक असतो एक अव्यक्त साहित्यिक. तो शब्दांना आपल्या आपल्या कवेत घेऊ पाहतो अन् भावनांची गलबते त्या शब्दसागरी विहरत असतात. अशाच रसिक मात्र काहीशा अव्यक्त साहित्यिकांसाठी स्टोरीटेल घेऊन येत आहे खास हक्काचं व्यासपीठ...स्टोरीटेल स्पॉटलाईट. या मालिकेअंतर्गत आपण महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत मात्र फारसे प्रसिद्धीझोतात न आलेल्या साहित्यिक, कवींना संवादाचे व्यासपीठ देत आहोत. आपल्या आसपासच्य...

69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल 30.12.2019

नवीन वर्षाची सुरूवात आणि संकल्प याचे एक अतूट नाते आहे. असाच एक संकल्प स्टोरीटेल घेऊन आहेत रसिक वाचक-श्रोत्यांसाठी! नवीन वर्षाची सुरूवात कुठल्या ऑडिओबुकने करणार? नवीन वर्षात स्टोरीटेलच्या संग्रहात कुठली ऑडिओबुक दाखल होत आहेत? कुठले नवे दालन स्टोरीटेल रसिकांच्या समोर आणत आहे, हे जाणून घ्या स्टोरीटेलच्या पब्लिशर्स सुकीर्त गुमास्ते आणि प्रसाद मिरासदार यांच्याकडून. अर्थात त्यांना बोलते करायला आणि नवनवी...

68: मस्तानीचा ‘बाजीराव’ ते ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’ 23.12.2019

मस्तानीचा ‘बाजीराव’ ते ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’ हा प्रवास करणारा अंगद म्हसकर सांगत आहे स्वत:च्या या प्रवासातल्या गंमतीजमती! निमित्त आहे ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’चे! त्याला बोलती करायला सोबत उर्मिला आहेच! तर ऐका  या सुरेख पॉडकास्टच्या दिलखुलास गप्पा... आणि हो,  आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते? स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक...

67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी 16.12.2019

दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीचा विशेष विसावा... बेडटाईम स्टोरीज... काय आहे या पॉडकास्टमध्ये? पब्लिशर सई तांबे आणि व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट नेहा अष्टपुत्रे सांगत आहेत, बेडटाईम स्टोरीजचे धमाल किस्से आणि त्यांची गरज! आणि नेहमीप्रमाणे त्यांना बोलते करत आहे आपली होस्ट आणि दोस्त उर्मिला! तर ऐका आणि आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते? स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासा...

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? 06.12.2019

तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. ऑडिओबुक माध्यमासाठी लिहायची तयारी, त्याची प्रक्रिया आणि लेखन आणि कथानक निर्मितीमागची असणारी मेहनत आणि त्याचे मिळणारे गोमटे फळ... या सर्व गोष्टींबद्दल उर्मिला बोलते करत आहे सई आणि सुकीर्त या पब्लिशर्स जोडगोळीला. तर हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्त...

65: स्टोरीटेल: डिसेंबर स्पेशल 30.11.2019

सध्या उत्सुकता आहे नवीन वर्षाच्या आगमनाची. त्यातही हळूहळू गुलाबी थंडी मनावर ताबा घेत आहे. अश्यातच त्याला जोड मिळाली रहस्य आणि रोमान्सची तर? या डिसेंबर मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या सई तांबे आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! तर ऐकायला...

64: आवाजाच्या किमयागाराची ‘झेप’ 22.11.2019

ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता ‘प्रमोद पवार’ यांनी आणि निमित्त आहे ना.सं. इनामदार यांच्या ‘झेप’चे आणि शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’चे! आणि सोबत उर्मिला आहेच! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये! स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? 15.11.2019

तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनायचं आहे? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकला पाहिजे. कसे होता येते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट? काय मेहनत घ्यावी लागते? याबद्दल जाणून घ्या स्टोरीटेलच्या या नव्याकोर्‍या पॉडकास्टमध्ये, ज्यात उर्मिला बोलतं करत आहे ‘स्टोरीटेल’च्या प्रॉडक्शन मॅनेजर ‘राहूल पाटील’ यांना! स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा... 08.11.2019

श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा... कविता, सुनिताबाई आणि डॉ. अरूणा ढेरे....! काय होते यांचे नाते? जाणून घ्या स्टोरीटेलच्या नव्याकोर्‍या पॉडकास्ट मध्ये! ‘प्रिय जी.ए.’  ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा. ‘आहे मनोहर तरी’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा. ‘सोयरे सकळ’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

61: ‘अ‍ॅडम’ आणि विक्रम गायकवाड 02.11.2019

ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या ‘अ‍ॅडम’चे! अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी! यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अ‍ॅड्म आणि इव्ह’ यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा! रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देता...

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल 30.10.2019

दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन! तोपर्यंत करायचे काय? काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्...

59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... 25.10.2019

दिवाळी स्पेशल डिस्काऊंट असतो... दिवाळी स्पेशल फराळ असतो... दिवाळी स्पेशल अंकदेखील असतो... मग दिवाळी स्पेशल पॉडकास्ट पण हवाच! स्टोरीटेल मराठीची खरी सुरूवात गेल्या दिवाळी पासून सुरू झाली. ह्या दिवाळीपर्यंत स्टोरीटेल मराठीने खूप मोठी मजल मारली आहे. मुळात ऑडिओबुक काय असते आणि त्याचा उपयोग काय ह्या प्राथमिक प्रश्नापासून झालेली सुरूवात... आणि तिथून पुढे, मराठी साहित्यातील दिग्गज आणि नामवंत लेखक-प्रकाशका...

58: असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण! 18.10.2019

महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई व मुंबई उपनगरे, पुणे-पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर आणि मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा नुकताच स्टोरीटेलवर ‘निवडणूक रंग’ ह्या ५ भागांच्या सिरीजमधून आलेला आहे. त्या निमित्ताने ‘मिडियानेक्स्ट’चे संचालक अभय कुलकर्णी यांच्याबरोबर उर्मिला निंबाळकर यांनी येत्या निवडणूकीच्या दृष्टीने तरूणाईच्य...

57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... 12.10.2019

औदुंबर या स्टोरीटेलवर गाजलेल्या ओरिजनलचा लेखक प्रणव सखदेवशी रंगलेली गप्पांची ही मैफल. लेखकाच्या मनातील विचारांचा प्रवास, जगण्यातून भिडणारे अनुभव यातून त्याची अभिव्यक्ती कशी घडते आणि ते सारं त्याच्या साहित्यकृतीतून कसं साकारतं... याचा अगदी साध्या-सोप्या अन् `उर्मिला-स्टाइलनं` घेतलेला हा वेध...जरुर ऐका. आणि हो... हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. ‘औदुंबर’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. स्टो...

56: ‘सेक्स’चं गुपित... गप्पांच्या कुपीत! 05.10.2019

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक ‘टॅबू’ मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. ‘सेक्स’ हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील ‘काम’ विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण ‘सेक्स’च्या बाबतीत मानतो. स...

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल 29.09.2019

स्टोरीटेलवर ‘ऑक्टोबर’मध्ये काय? हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा! मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना? मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. त्यात ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ची ‘फर्जंद’ ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात. त्याबरोबरच समाजातील ‘खरेखुरे आयडॉल्स’स...

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... 20.09.2019

बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्य...

53: युगंधर- झलक 13.09.2019

युगंधर मलाही आज बोललंच पाहिजे!! असं चमकू नका! असं दचकू नका! 'शिष्टाई' करणारा, पट्टीचा संभाषणचतुर म्हणून तुम्ही मला चांगलंच जाणता. त्यासाठी सावध होऊ नका. साशंक तर मुळीच राहू नका. मी कसलीही 'शिष्टाई' आज करणार नाही. कसलंही चतुर समर्थन मी मुळीच देणार नाही. मग मी बोलणार आहे तरी का? कसं आणि कशासाठी ? माझी ‘गीता' युगानुयुगं तुम्ही ऐकलीत. वर्षानुवर्ष माझी 'उद्धवगीता' अभ्यासलीत. माझ्या जीवनाची म्हणून एक 'क...

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली? 06.09.2019

आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर! आणि निमित्त...? निमित्त आहे ‘बेडटाईम स्टोरीज’चे! लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या ‘बेडटाईम स्टोरीज’ रचायला जमले. तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टी...

51: मिशन ‘मंगळ’ 30.08.2019

जर तुम्हाला ‘मंगळा’वर राहायला जायला मिळालं तर? जर तुम्हाला ‘मंगळा’वर राहायला जायला मिळालं तर? `मंगळावरही पृथ्वीसारखे गॅंग्ज वॉर्स असले तर?'  अरे, आपण आत्ताची नाही, २०८० सालची गोष्ट करत आहोत. योगेश शेजवलकर यांनी लिहिलेल्या आणि क्षितीश दाते  यांच्या आवाजात ‘वाढीव ऑनसाईट... मार्स टाईट’ या थरारक विज्ञान-काल्पनिकेवर गप्पा मारत आहेत उर्मिला निंबाळकर, योगेश शेजवलकर आणि क्षितीश दाते! जमदग्नी कोण? ‘फावडा अ...

50: स्टोरीटेल कट्टा... नाबाद ५0 24.08.2019

स्टोरीटेल कट्टा... नाबाद ५0 बघता बघता स्टोरीटेल कट्ट्याने ५० वा पॉडकास्ट पूर्ण केला देखील! मराठी वाचनसंस्कृती कूस बदलत आहे. ती आता तंत्रज्ञानाच्या मदतीने श्राव्य माध्यमातून आपलं साहित्य वैभव फुलवित आहे. त्याचाच वेध घेण्याच्या दृष्टीने स्टोरीटेल कट्टा सुरू झाला. एका गिर्यारोहकाला प्रश्न विचारला होता, ‘तुम्ही डोंगर का चढता?’ त्याने शांतपणे उत्तर दिले, ‘कारण ते त्याच साठीच असतात.’ हाच प्रश्न आणि उत्त...

49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? 17.08.2019

सिरीअल किलर्स म्हणजे काय? त्यांना ओळखायची काही खूण असते का? की काही कॉमन पॅटर्न असतात? जसे काही किलर्स पावसात जाऊन खून करायचे, काही वाढदिवसाच्या पार्टीनंतर खून करायचे तर काही अल्फाबेट किलर होते; जे अक्षरांवरून खून करायचे. एवढंच काय तर काही खुनी राशींनुसार (झोडिअ‍ॅक) देखील खून करायचे. आणि मग...? असाच एखादा खुनी एखाद्या कहाणीत आला तर? जाणून घ्या ह्या खुसखुशीत गप्पा आणि अजूनही बरेच काही... ‘निसर्गदत्...

48: मैंने पुछा, तुम्हे कित्तेमे खरीदा? 10.08.2019

बरोबर अडोतीस वर्षांपूर्वी म्हणजे ७ ऑगस्ट १९८१ ‘कमला’चा पहिला प्रयोग झाला. आता अडोतीस वर्षांनंतर स्टोरीटेलने विजय तेंडुलकरांचे ‘कमला’ पुन्हा श्राव्य माध्यमात आणले.  एका बातमीने रुजलेल्या ह्या दोन दिवसाच्या कालावधीच्या कथानकात तेंडुलकरांनी करून दिलेली समाजाच्या भिन्न स्तरांची ओळख, त्या जाणिवेची दाहकता आजही त्याच तीव्रतेने जाणवते. प्रतिक्षा लोणकर, नेहा जोशी, अनुपमा ताकमोगे, अभय जोशी, देवेंद्र दोडके आ...

47: तो, ती आणि तिचा तो- भाग २- झलक 02.08.2019

जान्हवीचे नको त्या अवस्थेतले फोटो विक्रांतकडे होते. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं होतं पण विक्रांत त्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी कुठवर जाऊ शकतो हे तिला माहिती नव्हतं. आणि जेव्हा समजलं तेव्हा तिच्या हातातून परिस्थिती निसटून गेली होती... ऐका स्टोरीटेल ओरिजिनलची नव्या प्रस्तुतीची झलक....‘तो ती आणि तिचा तो-भाग २’! तो ती आणि तिचा तो-भाग २: गौरी पटवर्धन सह: स्वप्नाली पाटील ‘तो, ती आणि तिचा तो-भाग...

Hallgasd a(z) स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.