Vechleli Phule

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Arts MR ↓ Επεισόδια: 138

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...

Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: shows.acast.com

Δημιουργός

Vechleli Phule

Κατηγορία

Arts

Ιστοσελίδα του podcast

shows.acast.com

Τελευταίο επεισόδιο

16 Αυγ 2024

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

आकाशवेड | Akashwed 01.08.2023

आकाशवेड प्रत्येकालाच त्याच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं असतं, आकाशाला गवसणी घालायची असते. हे उंच, विस्तीर्णग आकाश त्याच्या सुंदर रूपांनी तर आपल्याला भरुळ घालतेच पण आपण किती उंच उडू शकतो याची जाणीवही करून देते. आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणाऱ्या आणि नवीन भरारी घेण्यास प्रेरणा देणाऱ्या या आभाळाला कवितातून गवसणी घालूया. 1. आपले आभाळ कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे 2. आकाशवेडी कव...

झोका | Jhoka 28.07.2023

झोका झोका म्हणजे नुसती धमाल. हे समीकरण अगदी ठरलेलं. झोक्यावर बसलं की वेगळ्याच जगात आपण फिरतो आहोत असं वाटतं. त्याच्या सोबत आकाशाला गवसणी घालत भरारी घेण्यासारखी मज्जा दुसरी काय असू शकते. चला बसुया या कवितांच्या झोक्यावर. 1. झोका कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. झोका कवी - ग्रेस कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश #marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #मर...

पाऊस | Paus 25.07.2023

आनंदाची उधळण करणारा हा पावसाळा. मातीचा सुगंध, हिरवळ, इंद्रधनू यांची नुसती बरसात करत राहतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणतो. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांच्या वृष्टीत. 1. पाऊस कवी - ना धों महानोर कवितासंग्रह - पावसाळी कविता 2. पावसाचा शृंगार कवी - सावनी शेंडे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

हिमालयाची हाक | Himalayachi Haak 21.07.2023

हिमालयाची हाक उत्तुंग पर्वत नेहमीच आपल्याला विविध गोष्टी देत राहतो. त्यांच्याकडे फक्त पाहिलं तरी खंबीरपणा ज्याला म्हणतात ते हेच असावं वाटतं. प्रत्येक ऋतूत वेगळंच रूप ते धारण करतात. कधी हिरवागार, कधी सोनेरी. त्यांच्या माथ्यावरून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांना तोड नाही. त्यांची महती काव्यातून पाहूया. 1. हिमालयाची हाक कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - आनंदभैरवी 2. गिरीगान कवी बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ Ho...

साडी | Saree 18.07.2023

साडी साडी हा सर्व भारतीय स्त्रियांचा, मुलींचा अगदी जिव्हाळयाचा विषय. वय कितीही असो, साड्या भुरळ पाडतातच. लग्नाच्या शालू, भावाची साडी, ओटी भरणाची अश्या विविध प्रसंगांच्या साड्या वेगळीच रंगत आपल्याला कपाटाला आणत राहतात. मिरवूया या लाडक्या साड्यांना कवितेच्या बाजारात. 1. मऊ रेशमाची घडी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 2. पैठणी कवी - शांता शेळके  कवितासंग्रह - गोंदण Hosted on Acast....

देव्हारा |Devhara 14.07.2023

देव्हारा घरातला, मनातला असा आल्हाददायक कोपरा जो खूप काही देतो, आणि खूप काही घेतो आपल्या काळज्या, मागण्या, प्रार्थना. धूपदीप, फुलं आणि आपली श्रध्दा अशा गोष्टींनी सजलेला देव्हारा जगात कुठंही असू शकतो. एखाद्या जागेत, एखाद्या माणसात, एखाद्या दगडात सुद्धा. पाहुयात कवितारुपी माळांनी देव्हारा कसा सजवला आहे ते. 1. देवदेव्हारा मांडला कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या 2. देव्हारा कवी - कुसुमाग्रज कवित...

कवी कोण? | Kavi kon 11.07.2023

कवी कोण? आपणा सर्वांना त्यांच्या काव्य प्रतिभेने आनंद आणि जीवनाचं सूत्र सांगणारे हे कवी. अगदी उजेडापासून ते अंधारापर्यंत कोणतीही गोष्ट यांच्या काव्यजाळात अडकली नाहीये असं झालं नाहीये. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये कविता रचल्या गेल्या आणि त्यांनी नेहमीच सर्वांना प्रसन्नता दिली. पाहुयात कविंबद्दल कविलोक काय म्हणतायत. 1 सृष्टी आणि कवी कवी - केशवसुत कवितासंग्रह - समग्र केशवसुत 2. कवी कोण? कवी - बा भ...

लोक काय म्हणतील | Lok kaay mhantil 07.07.2023

लोक काय म्हणतील रोज वावरताना आपण चार चौघात बरोबर वाटू असंच आपण वागत राहतो. अगदी आयुष्यभर. खूप इच्छांना मुरड घालत बसतो. समाजाच्या चौकटीत बसण्याची धडपड करत असतो नेहमी. त्यामुळे खूप वेगळं काही करायची इच्छा असूनही ते न केल्यामुळे शेवटी फक्त पश्चात्ताप उरतो. बघुयात काय काय आहेत अश्या गोष्टी कविवर्यांच्या सोबत. 1. पण .. लोक काय म्हणतील कवी - गुरू ठाकूर 2. जन पळभर म्हणतील हाय हाय कवी - भा रा तांबे कवितास...

निसर्ग | Nisarg 04.07.2023

निसर्ग सूर्योदय, खळखळ वाहणारे धबधबे, चांदण्यांनी भरलेले आकाश अश्या असंख्य मनोवेधक दृश्यांची उधळण निसर्ग आपल्यावर नेहमी करत असतो. ह्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाला प्रसन्न करून टाकतात. निसर्ग आपल्याला जगायला लागणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घ्यावा अश्या नेहमीच मुबलक प्रमाणात देत असतो. चला हरवून जाऊयात या रंगांमध्ये कवितांच्या सहवासात. 1. निसर्ग कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा 2....

आठवणी | Athavani 30.06.2023

आठवणी बालपण, शाळा, कॉलेज मग नोकरी या आयुष्याच्या प्रवासात असंख्य आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात साठवत असतो. काही गोड, काही कटू पण त्यांच्या सोबत आपण काही क्षण पुन्हा जगतो. त्या आपल्याला खूप लोकांशी, घटनांशी जोडायला मदत करतात. चला तर हरवून जाऊयात आठवणीच्या गावी. 1. आठवण कवी - बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ 2. तुझी आठवण कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी..वगैरे.. Hosted on Acast. See acast.com/privacy for...

विठ्ठल विठ्ठल |Vitthal Vitthal 27.06.2023

विठ्ठल विठ्ठल हा नाद मनात, जीभेवर ठेऊन अख्खी मांदियाळी पंढरीकडे वाटचाल दरवर्षी तितक्याच उत्साहाने करते. कित्येकांना त्यांची माऊली, त्यांचा सखा, पाठीराखा विठ्ठलामध्ये सापडतो. भक्त्यांच्या वेड्या मायेपुढे तर तो हतबल आहेच पण काव्यारुपी मायाजळात तर तो गेली कित्येक वर्षे प्रेमाने अडकून आहे. चला तर मग विठोबाची महती आज कवितेच्या संगतीने ऐकू. १. पांडुरंग कवी - बा.भ. बोरकर कवितासंग्रह - चिन्मयी २. विठ...

जुई | Jui 23.06.2023

जुई आपल्या सुगंधाने भारून टाकणारे ते जुईचे नाजूक फुल. त्याच्या प्रेमात कोणी पडणार असं होऊच शकत नाही. चांदण्याप्रमाणे दिसणारी ही सुंदर गोड फुलं कवितेच्या माळेमध्ये काय बहार आणतात ते पाहूया. 1.जुई कवी - अनिल कवितासंग्रह - दशपदी 2. फुलांचे भांडण कवी - दा वि फफे कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 3 Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

झंझावात | Jhanjhavaat 20.06.2023

झंझावात एखादा झंझावात पूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकतो. काहीवेळा तो आपल्याला आपल्या प्रतिभेची ओळख करून देतो. नवीन गोष्टींची कल्पना अचानक होते. कधी - कधी स्वतःलाच झंझावात बनून जीवनाला आव्हान द्यावं लागतं. बघूया कसा सामना करतात या वादळाचा कविवर्य. 1. झंझावात कवी - सुरेश भट कवितासंग्रह - एल्गार 2. झंझावात कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला Hosted on Acast. See acast.com/privacy for more infor...

बाप | Baap 16.06.2023

बाप अख्ख्या घरासाठी रात्रंदिवस राबणारा तो बाप. त्यांच्या भावना, समस्या ते सहसा बोलून दाखवत नाहीत. लढत राहतात जगाशी सर्वांच्या सुखासाठी. आपला भक्कम आधार असणाऱ्या अश्या या आपल्या लाडक्या बाबांविषयी काय म्हणतायत कविवर्य. 1. माझी कन्या कवी - बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ 2. बाप कवी - इंद्रजीत भालेराव Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

शाळा | Shala 13.06.2023

शाळा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ. वर्ग, मित्र, शिक्षक, पुस्तकं, शिक्षा, मैदान या गोष्टींनी किती दिलंय आपल्याला. आपल्याला फक्त पुस्तकातलेच नाही तर जीवनाचे पण धडे शिकवले या शाळेने. तिचं ऋण आपण कधीच फेडू नाही शकणार. बघूया कवितेच्या शब्दात शाळेची गोडवी जिथं आपण हे शब्द बनवायला शिकलो. 1. शाळेचा रस्ता कवी - ना गं लिमये 2. शाळा कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा #podcast #marath...

रंगमंच | Rangmanch 09.06.2023

रंगमंच चेहऱ्यावर रंग लाऊन स्टेजवरती ते पात्र करणं जेवढं अवघड आहे तितकंच अवघड तुमचं आयुष्यातलं पात्र समाजाच्या नियमांनुसार निभावणं. हा जीवनाचा रंगमंच आपल्याला बहुपात्री/बहुरंगी बनायला भाग पाडतो. या तारेवरच्या कसरतीचा चित्रपट काव्यारुपात कसा सजला आहे ते बघूया. 1. रंगमंच कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह - पूरीया 2. रंगमंच कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - मेंदी Hosted on Acast. See acast.com/privacy for...

शीळ | Shil 06.06.2023

शीळ मनाला वेड लावणारी, दाद देणारी, मजेशीर वाटणारी अशी ही शीळ. याचेही खूप प्रकार असतात. ती एका तऱ्हेची कलाच. ही धून कशी अडकलीय या काव्यरुपी माळेमध्ये. 1. शीळ कवी - ना घ देशपांडे कवितासंग्रह - शीळ 2. शीळ कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

पालखी | Palakhi 02.06.2023

विविध प्रकारच्या पालख्या आपण सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर तर असतोच. कारण पालख्या खूप महत्त्वाच्या व्यक्तींना, गोष्टींना वाहून नेतात. पाहुयात आज कोण घेतायत पालखीची स्वारी. 1. पालखी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - चित्कळा 2. पालखी कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी.. वगैरे.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

मुखवटे | Mukhvate 30.05.2023

मुखवट्यानी अख्ख जग व्यापले आहे. जो तो ते घालूनच रोजचं आयुष्य जगतोय. काळाची गरज होऊन बसले आहेत हे मुखवटे. भावनाशून्य, नाटकी असे हे मुखवटे कधी कधी खूप त्रासदायक ठरतात. आपण स्वत्व हरवत चाललोय याची खंत भासवतात. 1. मुखवटे कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. मुखवटा कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

मेंदी | Mendi 26.05.2023

मेंदीचा तो रंग, सुगंध मनाला खूप मोहून टाकतो. आपण स्वप्नांत हरवून हरवून जातो त्या नक्षिसोबत. खूप हवीशी वाटणारी ही गोड मेंदीही आपल्या कवितेच्या शब्दांनीही सजली आहे. बघूया कसा रंग चढतोय. 1. मेंदी कवी - शांता शेळके कवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती 2. मेंदी कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी वगैरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

हुरहूर | Hurhur 23.05.2023

कोणाला आठवून, काहीतरी हरवल्यानंतर, कधी विनाकारण हुरहूरही लागतेच. ती आपला वेळ आणि चैन दोन्ही हिरावून घेते. पण काही गोष्टींची हुरहूर खूप गोड असते. चला बघूया कशाची हुरहूर लागलीय आपल्या लाडक्या कविवर्याना. 1. हुरहूर कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा 2. हुरहूर कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - सहवास Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

गुंता | Gunta 19.05.2023

गुंता अगदी एखाद्या कपापासून ते घरापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतत जातो. त्यापासून दूर होणं आपल्याला खूपच अवघड होऊन बसतं. या गुंत्यामध्ये आपण इतके गुंतून पडतो की आपण सारं काही विसरून बसतो. चला बघूया या गुंत्यातून बाहेर पडता येतं का कवितांचा आधार घेऊन. 1. नाही गुंतून जायचे कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - पक्ष्यांचे ठसे 2. पाऊल तरी उचलू कशी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on...

गंध | Gandh 16.05.2023

मोगरा, धूप-दीप, पहिला पाऊस यांचा सुगंध मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. त्या-त्या सुवासाच्या आठवणी आणि त्यांचे संदर्भ वेगवेगळे असतात पण ते विस्मरणीय असतात. चला तर मग हरवून जाऊयात या काव्यरुपी गंध गाभाऱ्यात. 1. गंधांतून गूढ उकलते कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2. गंध कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

आई | Aai 12.05.2023

आईची महती काय सांगावी. ती शब्दात बसवणं शक्यच नाही. ती आपला पहिला गुरू तर असतेच पण असंख्य भूमिका पार पाडते. डॉक्टर, मैत्रीण, आधार. नेहमी पाठीशी घालणारी, आपल्याला समजून घेणारी आईच असते. अश्या या माऊलीची थोरवी कशी मांडलीय बघूया कवी मंडळींनी. १. आई  कवी - अनिल कवितासंग्रह - सांगाती २. आईचे मन कवी - यशवंत  कवितासंग्रह - पाणपोई ३.आई कवी - मिलिंद जोशी  कवितासंग्रह - असेच होते ना तुलाह...

Touch Screen 09.05.2023

विज्ञानाच्या साह्याने मानवाने गगनभरारी घेतलीय. आपलं आयुष्य आता मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गोष्टींशिवाय अपूर्ण वाटतं. प्रत्येक कामासाठी विज्ञानाचा टेकू घ्यायची वाईट खोडचं लागलीय आपल्याला. बघूया कवितेच्या शब्दांमध्ये सापडते का ही विज्ञानाची घोडदौड. 1. √-1 कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - मृदगंध 2. Touch screen कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही 3. थँक गॉड कुसुमाग्रज! कवी - वैभव जोशी...

Άκου το podcast Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS