Pramod Dhokale
मी पुस्तक प्रेमी
मला पुस्तक खुप खुप आवडतात. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध होत. मला ठावुक आहे की तुम्हालाही पुस्तक खुप आवडतात. मला आवडलेली पुस्तक मी खास तुमच्यासाठी आणली आहेत. कशी वाटतात ते सांगा. त्यावर आपण गप्पा मारुयात. सम्पर्कात राहुयात.
Δημιουργός
Pramod Dhokale
Κατηγορία
Ιστοσελίδα του podcast
Τελευταίο επεισόδιο
30 Μαϊ 2025
Πού να ακούσεις;
Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομαΤα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast
Επεισόδια
भुरा.. ले. प्रा.शरद बाविस्कर.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकले 30.05.2025 10:42
भुरा ही शरद बाविस्कर यांचं आत्मकथन आहे.
ऱ्हासचक्र.. ले. डॉ अरुण गद्रे.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे 30.05.2025 9:11
डॉक्टर अरुण गद्रे या महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध डॉक्टर लेखकाची ही आरोग्य या विषयावर लिहिलेली महत्त्वाची कादंबरी आहे. काल्पनिक जरी असली तरी त्यातील प्रसंग हे वास्तव आहेत. भारतातील आरोग्य क्षेत्राची सध्याची स्थिती, त्यात भांडवलदारांनी केलेला शिरकाव,त्यामुळे अनैतिक प्रकारांना मिळणार उत्तेजन .अशा अनेक गोष्टी या कादंबरीत वाचायला मिळतात. आपल्याला माहिती नसलेल्या परंतु पैशासाठी कोणत्याही थराला जाण्यास...
द कॉमन वेल्थ ऑफ क्रिकेट लेखक रामचंद्र गुहा पुस्तक परिचय प्रमोद ढोकळे 09.01.2025 8:31
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली परंतु आपण टेस्ट मॅच खेळू शकत नाही तेवढं कौशल्य आपल्याकडे नाही हे वेळीच ओळखून ते इतिहासकार झाले परंतु त्यांचा पिंड मात्र क्रिकेट प्रेमीच राहिला कॉलेज जीवनात विसंग बेदी राजेंद्र गोयल अशा अनेक दिग्गज खेळाडूंच्या सानिध्यात ते होते क्रिकेटचा क्रिकेटपटूंचा आणि क्रिकेटच्या प्रशासनाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे म्हणूनच ह...
गांधी...पराभूत राजकारणी विजयी महात्मा..ले. रावसाहेब कसबे... 09.01.2025 4:23
गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष रंगवणे मध्ये अनेकांना इंटरेस्ट असतो परंतु गांधी विरुद्ध आंबेडकर म्हणजे नेमकं काय त्यांच्यात नेमके मतभेद कोणते होते कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी संघर्ष केला आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांचं एकमत झालं या सर्वांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून लेखक रावसाहेब गजबे यांनी हे 740 पानांचा पुस्तक लिहिला आहे या दोन्ही थोर महापुरुषांवर लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्यातील संबंध नेमके कसे ह...
प्रकाश...लेखक.. अच्युत गोडबोले.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे 29.11.2024 8:14
लेखक अच्युत गोडबोले यांनी जनसामान्यांना विज्ञान कळावे या साठी अथक प्रयत्न करून अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. प्रकाश या त्यांच्या पुस्तकात आपल्याला या विषयावर झालेलं संशोधन आणि लागलेले शोध याची माहिती तर मिळतेच परंतु संशोधकांची माहिती त्यांनी अत्यंत रसाळ रित्या सांगितली आहे . मराठीला ज्ञान भाषा बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकार झाले आहे. त्यांना कडक सलाम दिलसे!
द ओल्ड मॅन अँड द सी.. अर्नेस्ट हेमिंग्वे...पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे 09.06.2024 9:41
हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा हेमिंगवेची ही उत्कृष्ट कथा आहे.एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी या कमालीच्या शौर्य कथेने हेमिंगवेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो.
मिराबेन अंतरातम्याची शोधयात्रा..ले.. मिराबेन उर्फ मंडेलीन स्लेड..पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकळे 09.06.2024 8:55
महात्मा गांधींच्या शिष्या मीराबेन यांच मराठीत अनुवादित आत्मचरित्र. फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोलॉ यांनी गांधीजींवर लिहिलेले पुस्तक वाचून आपल्याला आयुष्याचं ध्येय सापडल्याचे वाटल्याने त्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आल्या. रॉयल नेव्हीच्या ॲडमिरलची सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही मुलगी. मीराबाईंचे जीवन , तिचा गांधीजींशी जोडलेला स्नेह आणि तिची सर्वस्वाने कामात झोकून देण्याची वृत्ती केवळ अत...
टु किल अ मॉकिंग बर्ड...ले हार्पर ली.. पु. परीचय.. ॲड प्रमोद ढोकळे 24.05.2024 8:03
1960 च्या दशकातील ही अजरामर कादंबरी आता मराठीतून वाचायला मिळते. आठ वर्षाची निरागस स्काऊट ही केंद्रस्थानी आहे. तिच्या निरागस भावविश्वात झालेली प्रचंड उलथापालथ वाचताना आपण गहिवरून जातो. तिच्या वडिलांच्या म्हणजे अटिकसच्या विवेकनिष्ठ जीवन मुल्याने मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत राहतो. वडील मुलांचं भाव विश्व जपण्यासाठी काय काय करतात हे सर्व वाचणं म्हणजे वेगळा अनुभव आहे. तेव्हा नक्की वाचा.
सात पाटील कुलवृत्तान्त...ले..रंगनाथ पठारे 24.05.2024 8:55
अत्यंत रंजक पद्धतीने आपल्या पूर्वजांची कहाणी या महाकादंबरीत वाचायला मिळते.
बीइंग मॉरटल.. ले. डॉ अतुल गवांदे... पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे 21.04.2024 8:00
वार्धक्यात माणसाला नेमकी कसली गरज असते? वृध्द मृत्यूला भितात का? वार्धक्य सुसह्य करण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचा अभ्यास करून आपल निरीक्षण वाचकांसमोर डॉ अतुल गवंदे यांनी या पुस्तकात मांडलं आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
गणिती.....लेखक अच्युत गोडबोले व डॉ माधवी ठाकूर देसाई... पुस्तक परिचय.... ॲड प्रमोद ढोकळे 19.04.2024 6:33
गणित या विषयावर अत्यंत रंजक पद्धतीने हे पुस्तक लिहिलं आहे. या विषयाची आपली भीती हे पुस्तक वाचून दूर होते... प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं या दर्जाचं ते आहे.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! 25.01.2024 5:34
भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीला 74 वर्षे पूर्ण झाली. पुढील आव्हाने काय काय आहेत हे देखील पहावे लागते
वॉल्डन ---लेखक हेन्री डेव्हिड थोरो --अनुवाद जयंत कुलकर्णी --पु. परिचय अॅड प्रमोद ढोकले 02.08.2023 11:01
वॉल्डन पुस्तकाने टॉलस्टॉय,मार्क्स,आणि गांधी अश्या जगप्रसिध्ह लोकांची आयुष्य बदलुन गेली. जगण्यासाठी माणसाला नेमक्या काय गरजा आहेत याचा शोध घेता यावा म्हणून वयाच्या 28 व्या वर्षी वॉल्डन तळ्याकाठी त्यांनी दोन वर्षे व्यतीत केली. दररोजच्या खाण्यापिण्याच्या नोंदी केल्या. बटाटा, घेवडा अशी पीक उजाड जमिनीत घेतली. स्वतः च्या हाताने घर बांधलं. समाजापासून वेगळं राहून निसर्गातील मुक्त जीवनाचा अनुभव घेतला .यासा...
अमेरिकेचा न सांगितलेला इतिहास- लेखक ऑलिव्हर स्टोन व पीटर कुजनिक- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळे 21.07.2023 9:46
मित्रांनो या एपिसोड मध्ये अमेरिकेचा जगाला ज्ञात नसलेला इतिहास ऑलिव्हर स्टोन आणि पीटर कुजनीक यांनी सांगितला आहे. आपली लोकशाही मिरवणारा आणि जगाला लोकशाहीचे धडे देण्यात धन्यता मानणारा देश म्हणजे अमेरिका अशी आपल्या सर्वांना अमेरिकेची ओळख आणि खात्री आहे. परंतु या पुस्तकात मात्र इतिहासकार पीटर कुजनीक यांनी पुराव्या सकट अमेरिका आपल्या भांडवलाच रक्षण करण्यासाठी जगामध्ये काय काय उच्छाद मांडत आहे याची जंत्र...
गर्जा महाराष्ट्र ..ले डॉ सदानंद मोरे...पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे 16.05.2023 9:03
महाराष्ट्राचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो? मराठे कुणाचे वंशज आहेत? जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहेच परंतु मराठी इतिहासकार ही जातनिरपेक्ष इतिहास लिहू शकले नाहीत. असे ठाम मत मोरे या पुस्तकात व्यक्त करतात. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
इंदिरा गांधी एक वादळी पर्व - ले माधव गोडबोले...पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळे 11.05.2023 15:45
इंदिरा गांधी यांची कारकीर्द अतिशय वादळी होती. त्यांनी निर्माण केलेल्या बांगला देशासाठी त्यांचं कौतुक झालं. परंतु त्यांनी लादलेल्या आणीबाणी मुळे त्या हुकूमशहा ठरल्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं होत हे या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे. त्याची समग्र माहिती लेखकाने दिली आहे. इतिहास या पुस्तकाची दखल घेईल.
प्रेमातून प्रेमाकडे - ले अरुणा ढेरे .. पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकळे 11.05.2023 13:00
अरुणा ढेरे यांनी लोकोत्तर स्त्री पुरुषांच्या आंतरसंबंधाची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्यासाठी सखोल संशोधन करून अतिशय जबाबदारीने हे पुस्तक लिहिले आहे. मैत्री ने हे लोकोतर पुरुष कसे कसे प्रगल्भ होत गेले याची माहिती मिळते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, श्रीधर व्यं केतकर, मिराबेन, सिस्टर निवेदिता, अन्नपूर्णा तर्खड, सरला घोषाल या व्यक्तींच्या संबंधाबद्ल वाचकांना महत्वा...
जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व एक सिंहावलोकन- लेखक- माधव गोडबोले- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळे 29.03.2023 24:21
प्रमोद ढोकळे यांनी केलेला लेखक माधव गोडबोले लिखित जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व या पुस्तकाचा परिचय . या पुस्तकासाठी लेखकाने सखोल संशोधन केले आहे. आपल्या मतांची सत्यासत्यता पडताळून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नेहरूंचे गुण सांगताना त्यांच्या दोषांची परखड चर्चा या पुस्तकात आहे. इतिहासाची आवड भारतीय माणसांना कमी असल्याने 50 वर्षापूर्वी काय घडल या विषयीच अज्ञान जनमानसात आहे. This episode is also availabl...
शोध नेहरूंचा आणि भारताचाही– लेखक शशी थरूर– पुस्तक परिचय- प्रमोद ढोकळे 02.03.2023 10:22
मित्रांनो या एपिसोड मध्ये मी शशी थरूर यांच्या शोध नेहरुंचा आणि भारताचाही या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे .शशी जरूर हे काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेते . परंतु नेहरूंच्या जीवनावर विश्लेषणात्मक पुस्तक लिहून त्यांनी नेहरूंच्या चुका कोणत्या आणि नेहरूंची बलस्थान कोणती याची चर्चा या पुस्तकात केली आहे . शशी थरूर हे स्वतः इतिहासाचे अभ्यासक असल्याने त्यांच्या पुस्तकाला आणि मताला आंतरराष्ट्रीय वर्तुळांमध्ये...
Exciting Experience in Gir Lion Park 05.01.2023 13:14
Friends I visited Gir national park between 13th to 17th November 22. I could experience some unforgettable incidents. In this episode have narrated it . Hope it will motivate you to visit Gir lion park and witness more such thrilling spectacle.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लेखक... डॉ सदानंद मोरे.... पुस्तक परिचय... ॲड प्रमोद ढोकले 24.09.2022 16:01
सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा काही अटींवर माफ करण्यास ब्रिटीश सरकार तयार होते. परंतु अशा पद्धतीने अटी स्वीकारणे आणि सुटका करून घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या जीवन कार्यावर हरताळ फासणे आहे मी केवळ स्वतः करता किंवा कुटुंबाकरता जगत नसून सदैव लोकसेवेचे कर्तव्य बजावत आलो आहे. असं म्हणत त्यांनी माफी नाकारली' टिळक नक्की कसे होते हे समजून. घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.
आमदार आचार्य अत्रे 24.09.2022 16:57
आमदार आचार्य अत्रे यांची विधान सभेतील भाषणे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात .आचार्य अत्रे यांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात महाराष्ट्र का पडला हे पुस्तक वाचल्यावर कळतं. त्यांचं मद्द्यप्रेम त्यांनी कधीही लपवलं नाही. विधानसभेत त्यांनी दारूबंदीचा निषेध करताना केलेलं भाषण आपली चांगलीच करमणूक करत .संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी केंद्र सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी जेरीला आणल. महारा...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 24.09.2022 12:29
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण नागरीकांच्या स्वातंत्र्याचा दिवसोंदिवस संकोचच!
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी लोकशाहीची बहात्तरीच! — ॲड प्रमोद ढोकले 17.08.2022 12:32
This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/08/14/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4/
काळे करडे स्ट्रोक्स .... लेखक प्रणव सखदेव .... पुस्तक परिचय - अॅड प्रमोद ढोकले 11.07.2022 6:56
समीर या मनस्वी तरुणाची ही गोष्ट आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसंग त्याने दिलेला प्रतिसाद लेखकाने विलक्षण ताकदीने रंगवला आहे. पट्टिच्या वाचकाने चुकवू नये या प्रकरातील ही कादम्बरी आहे.
Παρόμοια podcast
Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS