महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना
लेक लाडकी
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत, लेक लाडकी ही अभिनव योजना राबविण्यात येते. ही योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही पॉडकास्ट मालिका तयार करण्यात आली आहे. समाजातील गरजू व वंचित घटकांमधील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत मोलाची मदत करते. म्हणूनच, काही प्रातिनिधिक गोष्टीवजा उदाहरणे, संवाद आणि माहिती यांतून सजलेली ही पॉडकास्ट मालिका आपणास निश्चितच आवडेल.
Autor
महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना
Kategorie
Neueste Folge
23. Sep 2024
Wo hören?
Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbarPodcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts
Folgen
योजना प्रतिसाद आणि अनुभव 23.09.2024 20:10
लेक लाडकी ही योजना नेमकी काय आहे, ती कशी राबविली जाते याची माहिती घेतानाच या पॉडकास्टमध्ये ऐका, ही योजना ज्या अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, तेथील प्रतिनिधीने योजनेस लाभणारा प्रतिसाद, योजनेविषयी सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, लाभार्थ्यांना दिली जाणारी मदत, येणारे अनुभव व अशा अनेक विषयी साधलेला संवाद.
मुलगी असण्याचे फायदे 23.09.2024 18:56
मुलगी म्हणजे ओझे या संकुचित आणि बुरसटलेल्या विचारांतून बाहेर पडून मुलगी असण्याचे फायदे कोणते आहेत, हे जर एकदा समजले तर सर्व समाजालाच नवी दिशा मिळू शकते. मुलींकडे अशा कोणत्या निसर्गदत्त क्षमता असतात, ज्या त्यांना इतरांपेक्षा अधिक सहनशील, धैर्यवान आणि कर्तृत्ववान बनवतात याचा संध्याताई नगरकर यांनी घेतलेला वेध.
मुलींच्या शिक्षणास प्राधान्य 23.09.2024 26:28
शाळागळती या समस्येत प्रामुख्याने मुलींचे थांबलेले शिक्षण, बालविवाह अशी मुख्य कारणे दिसतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या शिक्षणास प्राधान्य मिळाले तर तिचे कुटुंबच नव्हे तर सर्व समाज प्रगतीपथाला लागू शकतो. यासाठी लेक लाडकी सारखी योजना किती मोलाची मदत करते, याविषयी संवादरुपात केलेली उलगड.
अंगणवाडी आणि लाडक्या लेकी 23.09.2024 22:23
अंगणवाडीच्या माध्यमातून राज्यातील फार मोठा घटक शाळापूर्व शिक्षणाला जोडला गेला आहे. तिथे काम करणाऱ्या ताईंच्या माध्यमातून या मुलांची जडणघडण तर होतेच शिवाय पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. अशी ही अंगणवाडी सेवा नेमकी कशी चालते, त्याचा लाभ कुणाला व कसा होतो तसेच लेक लाडकी सारख्या योजनेला अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जाते आहे, याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी संध्याताई नग...
लेक झाली लाडाची 23.09.2024 18:04
एका भटक्या कुटुंबात अतिशय कष्टात दिवस काढणाऱ्या कुटुंबातील जानूबाई आणि त्यांची सून कविता यांच्या आयुष्यात लेक लाडकी योजना आली आणि त्यांच्या मनातील चिंतेची जागा आनंदाने घेतली. त्यांची लेक आता लाडाची लेक बनली होती... वंचित समाजघटकांमध्ये लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्माला आणि जगण्याला मिळू लागणारा सन्मान ही समाजाच्या प्रगतीचीच पायाभरणी करणारी बाब ठरते.
आशेचा किरण 23.09.2024 17:58
वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या शेखरच्या आयुष्यात मोठ्या आर्थिक अडचणी होत्या. अशातच आपल्याला मुल होणार असल्याची आनंदाची बातमी त्याला समजली पण मुलगी झाली तर कसं, याची चिंता त्याला सतावू लागली. अशातच, लेक लाडकी योजना त्याला समजली आणि मनात दाटलेल्या शंकांचं मळभ दूर झालं. लेक लाडकी योजना अशाच कित्येक मजुरांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आली आहे.
आनंदी आनंद गडे 23.09.2024 17:03
एखाद्या अनपेक्षित धक्क्यामुळे सारी घडीच विस्कळीत होऊन जाते, तेव्हा त्यातून सावरणं अवघड असतं. आनंदच्या आयुष्यातही असाच प्रसंग आला.. मुलगी झाली पण पत्नी गेली. अशा वेळी प्रश्नांची मालिका सुरु झाली. घरच्यांचा भक्कम पाठिंबा तर त्याला मिळाला होताच मात्र, लेक लाडकी सारखी योजनाही आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लाभदायी ठरु शकते, याची त्याला खात्री पटली. त्यामुळेच तो त्या दुःखातून बाहेर पडून पुन्हा आनंदी होण्...
सरकार नव्हे आधारवड 23.09.2024 19:06
आयुष्यात अकस्मात आलेल्या संकटांच्या मालिकांतून धैर्यानं पुढे जाण्याची जिद्द काही जणींमध्ये असते. पोटात जीव घेऊन घराबाहेर पडावं लागलेल्या शैलाच्या आयुष्यात अशाच संकटांची मालिका आली. पण तिनं माघार घेतली नाही. पती नाही, घरदार नाही, पैसा नाही अशा बिकट अवस्थेत असतानाच तिला सिव्हिल हॉस्पिटलचा आधार मिळाला आणि तेथील आशाताईचा भक्कम आधार मिळाला. मुलीचा जन्म झाला. मुलीला तिनं उत्तम शिकवलं आणि ती मोठी होऊन ति...
कचऱ्याचं झालं सोनं 23.09.2024 18:03
दररोज जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागणाऱ्या महिलांच्या आयुष्यात नव्या बाळाचं आगमन होण्याची बातमी आनंद आणते खरे पण मुलगी झाली तर काय व्हायचं अशी चिंताना त्यांना सतावत असते. कचरासंकलन करुन पोट भरणारी कुणी असो वा हॉटेलमध्ये मोलमजुरीचं काम करुन चरितार्थ चालणारी असो, समाजजीवनात वंचितांचं जीणं जगावं लागणाऱ्या महिलांना देखील लेक लाडकी योजना मोठा आधार देऊन जाते. त्यांच्या संघर्षाला नवी झळाळी मिळवून देते.
जगण्याचं नवं बळ 23.09.2024 16:58
आव्हानांचा डोंगर उभा आहे, अशा शेतकरी कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म झाला तर काय करायचं याची चिंता भेडसावू लागते तेव्हा `लेक लाडकी` योजना नवी आशा घेऊन येते. आपल्या मुलीला स्वप्नांचं नवं जग दाखवण्याची ऊर्मी मनात पेरणारं नवं बळ कुटुंबाला मिळतं...त्याची ही गोष्ट.
उज्ज्वल भविष्याची पणती 20.09.2024 18:13
एका आजीला स्वतःच्या बालपणातले दिवस आठवतात, जेव्हा घरी महिलेच्या नशिबी चूल आणि मूल हेच काम असायचे. तिच्याशी नशिबी असेच भोग आले. आता जेव्हा त्यांची सून आई होणार असते, तेव्हा तिला मुलगी तर होणार नाही ना आणि झाली तर कसं होणार अशा चिंतेने आजीबाई त्रस्त असतात. अशा वेळी एक अंगणवाडी ताई त्यांना भेटते आणि त्यांच्या संवादातून आजीपुढील चिंतेचे मळभ निघून जाते आणि नवी आशा पल्लवित होते. लेक लाडकी योजनेचा सांगाव...
निरागस चेहऱ्यावरचं हसू 20.09.2024 17:56
दूर डोंगरकपारीत छोट्याशा वाडीत भटक्या कुटुंबात राहणाऱ्या छोट्याशा रेखाला अंगणवाडीची ताई भेटली आणि त्यातून त्या कुटुंबालाच जणू जगण्याची नवी दिशा गवसली. त्या ताईने मग तिथल्या सर्वांना `लेक लाडकी योजना` समजावून सांगितली आणि वाडीवरच्या मुला-मुलींच्या निरागस चेहऱ्यावर हसू उमटलं.
सकारात्मक भविष्याची हमी 20.09.2024 18:30
अत्यंत कठीण परिस्थितीशी झुंजत नैना मोठी झाली. हुशार असली तरी शिक्षण अर्धवट सोडावं लागली. मोलमजुरी करीत, आपल्या दिव्यांग भावाचा, वृद्ध वडिलांचा सांभाळ करीत होती. लग्न झालं पण सासरी वागणूक चांगली मिळत नव्हती. त्यातच त्यांना वंशाचा दिवा हवा होता. पण मुलगी झाली अन् तिला कायमची माहेरी यावं लागलं. अशा भयानक परिस्थितीत तिच्यापर्यंत पोहोचली, लेक लाडकी योजना. त्यामुळे, तिच्या आयुष्याला सकारात्मक भविष्याची...
लेकींनो, स्वागत आहे तुमचं! 20.09.2024 20:13
झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा गरीबांच्या घरी मुलींनी जन्म घेणं हे आजही घोर अपराध घडल्यासारखं अनेकांना वाटतं. असाच अनुभव घेणाऱ्या वस्तीतील महिलांना यांना एक दिवस `लेक लाडकी` योजना समजली आणि त्यांच्या विचारांत सकारात्मक आणि आनंदी भावनेने पदार्पण केले. मुलींचा जन्म नकोसा वाटणाऱ्यांना आता त्यांचं स्वागत करावंसं वाटू लागलं...त्याचंच एक प्रातिनिधिक चित्र.
महिला सशक्तीकरणाची गुरुकिल्ली 20.09.2024 18:36
आपल्या आयुष्यात अत्यंत हालअपेष्टा सहन करुनही रिंकू न डगमगता आयुष्यात संघर्ष करीत होती. सामाजिक संस्थांच्या जगात तिनं पाऊल टाकलं आणि समाजापुढील खऱ्या प्रश्नांची जाणीव तिला झाली. मग तिनं अशाच गरजू मुली, स्त्रियांसाठी काम करण्यास सुरवात केली. लेक लाडकी सारखी योजना येताच तिला लक्षात आलं, की हीच तर गुरुकिल्ली आहे, आपल्याला समाजाला खरा संदेश देणारी. रिंकूसारख्या अनेक समाजसेविकांना लेक लाडकी योजना त्यामु...
स्वप्नांचे नवे क्षितिज 20.09.2024 16:16
सरकारी योजनांविषयी शहरातील तरुणाई काय विचार करीत असेल आणि अशा योजनांचा खरा लाभ ज्यांपर्यंत पोहोचतोय अशांशी त्यांचा संवाद झाला तर ते चित्र कसे असेल....मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या शर्मिलाने `लेक लाडकी` योजनेबाबत आपला अनुभव सांगत तरुण मुलामुलींना नवी दृष्टी दिली, त्याची ही गोष्ट. अशा अनेक शर्मिलांचं आयुष्य `लेक लाडकी` योजनेमुळे स्वप्नांचं नवं क्षितिज पाहायला शिकतंय.
उज्ज्वल पहाट 20.09.2024 19:28
महानगरी मुंबईतील धारावीत वास्तव्य करणाऱ्या हजारो कष्टकरी महिलांपैकी एक म्हणजे आयशा. चहाचा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आयशाच्या आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाबद्दल, नूरबद्दल अत्यंत चिंता होती. तेव्हाच, तिच्या संपर्कात आलेल्या मीराने असं काही सांगितलं जे ऐकून अन् अनुभववून आयशाला जणू नवी पहाट झाल्याचा भास झाला...लेक लाडकी योजना ही अशाच असंख्य आयशांच्या आयुष्यात उज्ज्वल पहाटेचा सांगावा घेऊन...
गूड न्यूज 20.09.2024 18:15
समाजातील गरजू लोकांसाठी काही करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या दौलत आणि रेणूची ही गोष्ट. इतरांसाठी अडीअडचणीला धाऊन जाणारे हे दाम्पत्य मुलीच्या जन्माविषयी असा कोणता सकारात्मक विचार करते, जे ऐकून आपणास असे दौलत अन् रेणू आपल्याही आसपास हवेत, असे वाटायला होतं...`लेक लाडकी` योजनेच्या निमित्ताने समाजात सापडणाऱ्या अशा सकारात्मक व प्रागतिक विचारांच्या तरुणाईचेही स्वागतच व्हायला हवे.
लाडक्या लेकी 20.09.2024 20:40
मुलगी असणं म्हणजे ओझं अशी भावना अनेकांमध्ये असते. बांधकामावर मजुरीचे काम करणाऱ्या एकाला असेच वाटायचे. मुलगी नकोच असं त्याला वाटत असताना पत्नीने त्याला खंबीरपणे विचार करायला शिकवले आणि लेक लाडकी सारखी योजना पुढे येताच त्याच्या विचारात परिवर्तन झाले... हातावर पोट असणाऱ्या समाजातील असंख्य परिवारांचं प्रतिनिधित्व करणारे हे उदाहरण `लेक लाडकी` सारखी योजना त्यांच्या आयुष्यात काय सकारात्मक संदेश घेऊन येते...
लेक लाडकी...सर्व घरांची! 19.09.2024 20:38
`मुलगी म्हणजे डोक्यावरचे ओझे` असा समज असणाऱ्या आपल्या समाजातील एक प्रतिनिधी म्हणजे बकुळाबाई. तिच्या मनातील चिंता दूर करणारी योजना म्हणजे लेक लाडकी...कसे ते ऐका, या गोष्टीत.
Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet