Kaushal Inamdar

KaushalKatta - कौशलकट्टा

Music MR ↓ 13 Folgen

The fascinating journey inside the world of a music composer. एका संगीतकाराची मुशाफिरी

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: kaushalsinamdar.in

Autor

Kaushal Inamdar

Kategorie

Music

Podcast-Website

kaushalsinamdar.in

Neueste Folge

18. Feb 2024

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

कौशलकट्टा। पर्व ४। भाग १। AI मेरे दिल तू गाये जा। कौशल इनामदार 18.02.2024

संगीतामध्ये Aritificial Intelligence (कृत्रिम मेधा) आता सर्रास वापरली जात आहे. त्याच बरोबर अनेक नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही या वापरातून उद्भवत आहेत. काय आहे संगीतामधील एआयचं भवितव्य? कौशलकट्टाचा हा भाग संगीतामध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम मेधेबद्दल एक मुक्त चिंतन आहे. AI has now begun to invade all spheres of life and music is also one of them. Music composer Kaushal Inamdाr discusses the implica...

कौशलकट्टा। पर्व ३। भाग ११। संगीतक्षेत्रातील मराठी। कौशल इनामदार KaushalKatta| Kaushal Inamdar 26.11.2022

काही वर्षांपूर्वी ग्रंथालीच्या ‘शब्दरुची’ या अंकात ‘संगीतक्षेत्रातील मराठी’ हा लेख मी लिहिला होता. आजच्या कौशलकट्ट्यावर मी या लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेख ५-६ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यामुळे काही त्यावेळचे संदर्भ जरी लेखात असले तरी भावसंगीत आणि मराठी भाषेचे संबंध कसे बदलत चालले आहेत हा विषय आजच्या काळालाही लागू आहे. ‘संगीताला भाषा नसते’ असं म्हणतात ती खरोखर नसते का? प्रेमगीतांची मिश्र भाषा मराठीत...

कौशलकट्टा। पर्व ३। भाग १०। योगायोग। कौशल इनामदार | KaushalKatta| Kaushal Inamdar 19.11.2022

‘अमर अक़बर ॲन्थनी’ सारखे वर वर निरर्थक वाटणारे चित्रपट आपल्याला  का आवडतात? त्यात असं काय सूत्र आहे जे आपल्याला खिळवून ठेवतं? आजचा ‘कौशलकट्टा’ - योगायोग!! Find this podcast on YouTube as well. https://youtu.be/GHWA_mwg9R8

कौशलकट्टा। पर्व ३। भाग ९। एका सिंदबादची कहाणी। कौशल इनामदार | KaushalKatta| Kaushal Inamdar 11.11.2022

१९३३ साली पुण्याचा एक तरूण व्हायोलीनवादक लंडनला जायचं म्हणून ‘कॉन्टे रॉस्सी’ नावाच्या जहाजावर चढला आणि लंडनऐवजी व्हेन्तिमिलिया नावाच्या इटली आणि फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावात येऊन पोहोचला. एरवी मितभाषी असणारा पण सिंदबादच्या आणि सिंड्रेल्लाच्या कथा नातवंडांना रंगवून सांगणारा, रात्रभर जागून व्हायोलिन वाजवणारा, स्वतःच्या यशोगाथा कधीही स्वत:हून न सांगणारा या अवलियाचं नाव शंकरराव बिनिवाले - म्हणजे म...

कौशलकट्टा। पर्व ३। भाग ८.१।प्रश्नोत्तरं - साधी सोपी गाणी। कौशल इनामदार KaushalKatta| Kaushal Inamdar 01.11.2022

#marathi #marathimusic #qanda #podcast  चित्रपट संगीतात सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशी गीतं लिहिण्याचा गीतकरांना आग्रह केला जातो. साधारणपणे 'आकाशी झेप घे रे पाखरा' या गीतासारखी, तशी 'आशयघन' गाणी लिहिली तर नाकारली जातात, इतकं जड जड नको सांगितलं जातं. पण दुसरीकडे 'वाट दिसू दे गा देवा', 'खेळ मांडला' सारखी गाणी प्रसिद्ध होतात. तर आशयघन गीतं हा प्रॉब्लेम आहे की फारसं काळजात न उतरणारं संगीत ही...

कौशलकट्टा।पर्व ३।भाग ७।आधी शब्द का आधी चाल।KaushalKatta| Kaushal Inamdar 30.10.2022

गाण्याच्या निर्मितीकडे पोहोचण्याचे दोन पंथ आहेत. यांतील शैव पंथ म्हणतो की आधी शब्द आणि नंतर चाल! तर वैष्णव पंथ म्हणतो की आधी चाल आणि नंतर शब्द! आजच्या ‘कौशलकट्टा’च्या भागात गप्पा मारू या दोन पंथांवर आणि त्यातून काय काय शक्यता उद्भवतात. हा भाग यूट्यूबवर पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा! https://youtu.be/DS9O4qdPODM

कौशलकट्टा।पर्व ३।भाग ६।एका चालीची गोष्ट।कौशल इनामदार। KaushalKatta| Kaushal Inamdar 15.10.2022

नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं म्हणतात. यात मी आणखी एका गोष्टीची भर घालतो - गाण्याच्या चालीचा उगमही शोधायला जाऊ नये असं म्हणतात! तरी हा प्रश्न हैराण करणारा आहे. आपल्याला नेमकं सुचतं कसं? हे सगळं कुठून येतं? Watch this on my channel on YouTube. 

कौशलकट्टा।पर्व ३।भाग ५।एक संध्याकाळ भूतकाळात।कौशल इनामदार।KaushalKatta| Kaushal Inamdar 12.10.2022

#nostalgia #reunion #podcast   आपल्याला भूतकाळाची इतकी ओढ का असते? कॉलेजचं रियुनियन होतं तेव्हा नेमकं काय घडतं आपल्या मनात?

कौशलकट्टा।पर्व ३।भाग ४।सुर ना सजे।कौशल इनामदार 11.10.2022

#kaushalinamdar #musicappreciation #listening  लोकांना संगीत कसं आकळतं? आपण बेसूर असणं म्हणजेच सुरांची जाण असणं का? अशा अनेक प्रश्नांचा मी या व्हिडिओत उहापोह केला आहे. जरूर ऐका आणि शेअर करा! Watch this episode on YouTube https://youtu.be/TU0VSoezPK0

कौशलकट्टा । पर्व ३। भाग ३। सरता संपत नाही। #लता_मंगेशकर। कौशल इनामदार| Lata Mangeshkar 28.09.2022

#latamangeshkar #kaushalinamdar  सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्वरांचे लता मंगेशकर यांच्यावर संगीतकार कौशल इनामदार यांनी केलेलं विवेचन.

कौशलकट्टा।पर्व ३।भाग २।तनुजा, तीन संगीतकार आणि एक रस्ता।कौशल इनामदार। KaushalKatta | Season 3 | Ep. 2 |Kaushal S Inamdar 28.09.2022

 कौशलकट्टा पर्व ३, भाग २ आज अभिनेत्री तनुजा यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने आठवलेली ही मजेशीर गोष्ट. तनुजा, तीन संगीतकार आणि दादरमधला एक रस्ता - यात काय संबंध आहे? 

कौशलकट्टा।पर्व ३।भाग १।दीपस्तंभ।शंकर वैद्य।कौशल इनामदार। KaushalKatta | Season 3 | Ep. 1 | Deepastambha | Shankar Vaidya | Kaushal S Inamdar 26.09.2022

कविवर्य शंकर वैद्य - हे नाव प्रत्येक मराठी काव्यप्रेमीला माहित आहेच. मी महाविद्यालयातच असताना सरांना भेटलो. तेव्हापासून जे आमचे ऋणानुबंध जुळले ते सर जाईपर्यंत. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाचं मी केलेलं हे अभिवाचन आहे.  माझ्या पॉडकास्टला जरूर सब्स्क्राइब करा. आवडला तर नक्की शेअर करा!  हा पॉडकास्ट यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे.  कौशलकट्टा। पर्व ३। भाग १दीपस्तंभ । शंकर वैद्य।

KaushalKatta Intro 02.06.2021

‘कौशलकट्टा’ हा माझा पॉडकास्ट मी यूट्यूबवर चालवतोच आहे. पण केवळ आवाजाची दुनिया ही मला कायमच आकर्षित करत आली आहे. गेली अनेक वर्षं माझ्याकडे टीव्ही नव्हता परंतु रेडियो हा माझा घट्ट सवंगडी होता. आजवर तुम्ही मला दिलंत तसंच प्रेम माझ्या या पॉडकास्टला तुम्ही द्याल याची मला खात्री आहे.  यूट्यूबच्या माझ्या चॅनललाही जरूर सब्स्क्राइब करा त्याचा दुवा मी खाली देतो आहे.  कौशल इनामदारची यूट्यूब वाहिनी

Höre den Podcast KaushalKatta - कौशलकट्टा in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet