Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.

Forfatter

Sudhakar Chodankar

Kategori

Religion

Podcastens hjemmeside

sudhakar-chodankar.com

Seneste episode

15. jan. 2025

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

जिणे गंगौघाचे पाणी 06.01.2023

जीवन प्रवाही आहे. गंगेच्या प्रवाहासारखे. गंगा पवित्र मानली जाते तसे जीवनही पवित्र आहे. गंगोत्रीपाशी उगम पावलेली गंगा पुढे प्रवाहीपणे अधिकाधिक सखोल अन व्यापक होत गंगासागर होऊन समुद्राला मिळते. जलतत्वाला जल मिळाले. गंगा आणि सागर तत्वाने एकच आहेत. म्हणूनच ती संगमा नंतर सागराशी एकरूप होते. मानवी जीवनही असेच परमेश्वराशी एकरूप होत असते. किंबहुना व्हायला हवे. कारण एकमेव ईश्वरी तत्वच  सर्वाभूती आहे....

अगा पंढरीच्या राया 30.12.2022

अगा पंढरीच्या राया - हा माझा पांडुरंग ज्या चंद्रभागेच्या तीरावर,  कमरेवर हात ठेवून, अनेक युगे भक्ताची वाट पाहत आहे. अनेक युगे लोटली तरी वाट पहाणे काही संपत नाही. इथेच या पांडुरंगाची  व्यथाही दिसू लागली मला.  भगवंताची व्यथा भक्ताला नाही जाणवली तर तो भक्त कसला ?   प्रश्न पडला मला ! मी भगवंतापासून विभक्त आहे की काय ? असे मनात येताच मी व्याकुळ झालो.  या पांडुरंग...

कुठे जागेपनी तुले सपनं पडलं 23.12.2022

देवा असं कसं हे मन आसं कसं रे घडलं , कुठे जागेपनी तुले सपनं पडलं- संत बहिणाबाइंचे हे उद्गार आहेत. केवळ स्वप्नाविषयी त्या नाही बोलत आहेत त्या तर जागे असताना जे स्वप्नवत जगणे घडते त्यासाठी जागे करत आहेत आपल्याला. मनाला वढाय वढाय, पाखरू पाखरू, उंडारलं उंडारलं, चपय चपय, मोकाट मोकाट , लहरी लहरी, मन जहरी जहरी  हे शब्द संत बहिणाबाईंचे आहेत. ते लाइटली घेवून नाही चालणार. त्यात शिरावं लागेल. चला तर आपण...

शृंगार लेवूनी या घडीला- 16.12.2022

भक्ति सुंदर आहे, अति सुंदर. Beautiful आहे. तशी ती अगदी निर्भय अन सामर्थ्यवान आहे. ब्युटिफुल तशी बोल्डही आहे. पण म्हणून ती प्रदर्शन मांडत नाही. किंबहुना भक्ताला स्वताच्या अंतरंगात होणारे भगवंताचे दर्शन, त्याच्या  अंग प्रत्यंगातून सहज स्वाभाविकतेने प्रकट होत असते. यासाठी मी भक्ति बोल्ड आणि ब्युटिफुल म्हणतो. विशेष करून भक्तीला बोल्ड म्हणायचे तर ही भक्ति मानवी अहंकार, स्वभाव, मान्यता, बुद्धी, समज...

सर्व सुखं देवा ठायी 09.12.2022

सर्व सुखं देवा ठायी, माझा भाव देवा पायी - यथार्थ सुख देवाच्या ठायी असतं. ठायी म्हणजे ठिकाण वा कोणती  बाहयांगाची  जागा नाही. जी बोटाने दाखवता येईल. ठायी म्हणजे देवाच्या अंतर्गत. त्या सुखाचा ठाव वा  ठेवा देवाच्या अंतरंगातच असतो. भक्ताला त्याचा ठाव ठिकाणा लागतो अन लाभतोही. त्यासाठी भक्त देखील  "ठायीच बैसोनी एकचित्त " व्हावा लागतो. खर्‍या सुखाचा उद्भव अशा भक्तिमय अवस्थेतूनच हो...

तू मज संगे ने 02.12.2022

"जीवनाच्या अखेरीस काहीच सोबत नेता येत नाही , सर्व इथेच सोडून जावे लागते.  आपण गेल्यानंतर पुढे काय होईल याची चिंता नको. मातीत देह मिळाल्यानंतर कोणी कौतुक केले काय वा निंदा केली काय ?"  अशी वचने म्हणा सुविचार व्हाट्सअ‍ॅप वर आले. त्या निमिताने जे काही जागेपण आत उद्भवले तेच इथे प्रकट झाले आहे  "तू मज संगे ने"  या एपिसोड मधून. 

जीवनाविषयी बोलू काही 25.11.2022

जीवनाविषयी बोलू काही- असाच एक मित्र फोनवर बोलताना  काहीसे नाराजीचे , निराशेचे  सूर प्रकट करू लागला. जीवनात  विविध माणसं येतात आणि जातातही. सतत सोबतीला नसतात. या निजबत  त्याच्याशी जे बोलणे झाले तेच इथे प्रकट होत आहे. ऐकल्यानंतर "आपण फ्रेश झालो"  अशी कबुली दिली त्याने. जीवन रसपूर्ण का होत नाही याचा मागोवा यात घेतला आहे.  चला तर आता  ऐकू या आयुष्याविषयी काही.....&nb...

काया मन वाचे देव प्रगटे 18.11.2022

काया मन वाचे देव प्रगटे-  परमेश्वराने आधीच सांगून ठेवले आहे. " मद्भक्ता यत्र गायंति, तत्र तिष्ठामि नारद " माझे भक्त जिथे गायन करतात तेथे मी आहेच. याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे भक्त. म्हणूनच भक्त म्हणतो " काया मन वाचे देव प्रगटे. मी नाहीच देवच प्रकट होतोय.  असे भक्ताचे यथार्थ अस्तित्व  देवासाठीच शिल्लक उरते.

काय येथे माझे सर्वचि देवाचे-२ 11.11.2022

काय येथे माझे सर्वचि देवाचे-२. लहानपणी सहज म्हटले जायचे "देवा तुझे किती सुंदर आकाश , सुंदर प्रकाश सूर्य देतो " छान दिवस होते ना? अबोध पणाचे होते तसेच निष्पाप पणाचे होते. मग आज गेले कुठे हे अबोधपण ?  निरागस अस्तित्व ?  अस्तित्वाचा यथार्थ बोध झाला म्हणजे संपत नाही,  उलट बोधाच्या पलीकडे देखील अथांग अबोधपण रहातेच. या  जाणीवेत जो निरहंकारी झाला तोच यथार्थाने "संबोधि" असे म्हणावे लाग...

काय येथे माझे सर्वचि देवाचे-१ 04.11.2022

काय येथे माझे सर्वचि देवाचे, काया मन वाचे देव प्रगटे || माझे सद्गुरु श्री परमानंदस्वामी याचे हे पद. या पदाच्या निजबत बोलण्याची माझी योग्यता नाही हे खरे. कारण यासाठी अंतरंगात जो ठेहराव लागतो, जी जाणिवेची सखोलता हवी  ती नाही माझी. परंतु अशी वचने अमुलाग्र उत्कटतेने आत्मशोधला  प्रवृत्त करतात मला. मी आतमध्ये समंजसपणे अधिकाधिक वेडा होत रहातो. असेच काहीसे झाले, "काय येथे माझे सर्वची देवाचे " या...

झाले मोकळे आकाश 28.10.2022

झाले मोकळे आकाश-  प्रकाशाच्या अस्तित्वाने अंधाराचे जाळे नाहीसे होते.  फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश. वास्तविक अंधार , प्रकाश असा काही अनुभव सूर्याच्या ठिकाणी नाही.  दिवस, रात्र हा प्रकार सूर्याच्या खिजगणतीतही नाही. हा सारा पृथ्वीचा अनुभव. नाहे . हा सूर्य स्वयंप्रकाशी आहे म्हणूनच तेचस्वी, देदीप्यमान आहे. " तमसो मा ज्योतिर्गमय" असे आपले ऋषि-मुनि  सांगत आले अगदी तेच,  ...

शाम पिया मोरी रंग दे चुनरिया 21.10.2022

शाम पिया मोरी रंग दे चुनरिया- संत मीराबाई यांचा हा अभंग आहे. ती प्रेम भक्तीच्या  उन्मादात श्रीकृष्णाकडे मागणे मागतेय. " शाम पिया मोरी रंग दे चुनरिया".   रंग हवाय तिला , पण कोणता रंग ? लाल, निळा, पिवळा, हिरवा की शाम रंग. हे सारे लौकिकाचे रंग झाले. या रंगांसाठी ती आतुर नाही.  ती अधीरतेंने  सांगते आहे   " अपनेही रंग मे रंग दे चुनरिया ". आता हा "अपना रंग"  कोणता...

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले-२ 14.10.2022

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले - ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वाचे दुख: यथार्थाने जाणते,  कारण आपल्या तीनही भावंडांसह त्यांनी  पराकोटीचे दुख: काय असते हे व्यक्तीगत जीवनात त्यांनी  वारेमाप अनुभवले आहे. अवहेलना ,  सामाजिक बहिष्कार या सार्‍यातून ते गेले.  " विश्व रागे झाले वन्ही,  संते सुखे व्हावे पाणी , योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा " इथपर्यंत ही चारही भावंडे प...

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले-१ 07.10.2022

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले -  संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलीचे हे शब्द आहेत.  माऊलीच्या अंत:करणातील  अंनुभवातून  उगवून आलेत  हे शब्द.   अनुभव कारुण्याचा त्यातून ते आर्त झालेत आणि पसायदानाची प्रार्थना करत आहेत आपल्या सद्गुरूनाथांकडे. समग्र विश्व सुखाने समाधानाने आनंदाने नांदो म्हणून वर मागत आहेत. माऊलीचे आर्त प्रकाशित झाले म्हणजे  काय ? या चिंतनातून  जे...

सूर नवा ध्यास नवा.. श्वास नवा 30.09.2022

सूर नवा ध्यास नवा.. श्वास नवा - सध्या टीव्हीवर सूर नवा, ध्यास नवा ही सिरियल लागते. डोळ्यांच्या व्याधीमुळे  पहाणे अशक्य होते. तरी देखील कानावर संगीत येतच असते.पत्नी अधून मधून लावते ही मालिका. मी  बंद डोळ्यांनी  कधी ऐकत असताना मधूनच  अचानक काहीसा अलिप्त होत असतो. अलिप्त होत असलो तरी आतून सातत्याने तरंगीत होत असतो. सूर नवा ध्यास नवा ऐकताना असेच काहीसे अंतरंगात नाविन्याने उद्भ...

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली 23.09.2022

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली || श्रीप्रभू राम यांच्या चरित्रातील हा प्रसंग जेव्हा माझ्या परमानंद स्वामींच्या अंत:करणातून प्रकट होतो तेव्हा एका विलक्षण अलौकिकतेचा स्पर्श मला होतो. पारंपरिक कथा काय सांगते या पेक्षा अपरंपार कारुण्य कसे उत्कटतेने अन विलक्षण हटकेपणाने प्रकट होते हे जाणून मी चकित होतो. हे तर माझ्या प्रेभुंचे करूणामय अंत:करण.  तेव्हा नेमकेपणाने ही कथा मल...

त्या अंगी खेळे ती लहर मी 16.09.2022

त्या अंगी खेळे ती लहर मी - सागर आणि त्यावर उद्भवणारी लाट समुद्रापासून वेगळी नाही. तत्वाने नाही अन स्वभावाने देखील. सागर एकीएक आहे पण लाटा  अनंत. सागर अविनाशी तर लाट अल्पजीवी. लाटेला उदयास्त असतो सागराला नाही. लाट  आणि सागर यामध्ये इवलासा देखील अवकाश नाही. सलोकता, समीपता, सरूपता,  सायुज्यता या सार्‍याच अंगांनी लाट अन सागर एकत्वाने आहेत.  लाट आहे तर सागर आहेच. पण लाट नसेल तर सागर...

अथांग व्यापक सागर तू - 09.09.2022

अथांग व्यापक सागर तू - भक्त त्याच्या दैवताचे, भगवंताचे, प्रभूञ्चे वर्णन स्वानुभवाने करतोय. जे काही  प्रत्यक्ष सहवासात आत्मियते पोटी घडत राहिले त्यानेच भक्त घडत राहिला. भक्ताकडून प्रकट होणारे हे वर्णन केवळ बाहयांगाचे नाही तर भक्ताच्या अंतरंगाचा हा हृदयंगम विलास आहे." अथांग व्यापक सागर तू  " ऊच्चारताना भगवंताचे हे अथांगपण नेमके काय आहे ? हे भगवंताचे व्यापकत्व नेमके काय आहे याचा काहीसा फील...

राधा गौळण बावरली -२ 02.09.2022

राधा गौळण बावरली -२ श्रीकृष्णाचे राधेला पहाणे केवळ राधाच यथार्थतेने जाणते. म्हणूनच ती म्हणते ना " कृष्ण मज ना वेगळे पाही , मी मग त्याची होऊनी राही. एकदा तर कृष्णाकडे अनिमिष नेत्रांनी डोळे भरून पहाणार्‍या राधेला तिची सखी चिडवते " नको डोळे भरून पाहुस, या सावळ्या हरीला , ठेव थोडीतरी जागा डोळ्यात काजळाला " या सखीच्या चिडवण्याला राधा एकदम  काहीसे हटके उत्तर देते. कारण हरीचीच राधा ना ती ! राधेचे खड...

राधा गौळण बावरली -१ 26.08.2022

राधा गौळण बावरली -१ भक्ताचे बावरणे हे भगवंतासाठी असतं. राधा बावरली आत्यंतिक कृष्णप्रेमापोटी. संत एकनाथ महाराज बावरले सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रगाढ प्रेमापोटी. किंबहुना त्यांचे हे बावरणे म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींचा  कृपाप्रसाद आहे हे जाणवत आहे  एकनाथ महाराजांना.  " एका जनार्दनी पूर्ण कृपेने " हे  जे बावरणं झालं ते काही एका भेटीत नाही घडलं. भेट झाली असेल पहिली. पहिल्या भ...

आला रे आला, गोविंदा आला 19.08.2022

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या निमिताने भगवंताचे, या परमानंदाचे भावपूर्णतेने गायन घडावे या आर्ततेपोटी हा एपिसोड प्रकट होत आहे. " ऐसा परमानद श्रीहरी मम हृदयी वसावा " या स्वरचित श्रीकृष्णाष्टकाचे काहीसे गायन व त्यानिजबत कीहीसे कथन घडले आहे. श्रीकृष्णाष्टक हे असे आहे. कदाचित कालिंदीतटी सुरस वेणुगायन करी जो स्वानंदे सहज गोपीमुखकमलांसी फुलवी जो ब्रह्मा, महेशा, गणेशा पदारविंदी विसावा ऐसा परमानंद...

नभासारखे रूप या राघवाचे-१ 12.08.2022

"नभासारखे  रूप या राघवाचे" की " राघवासारखे रूप हे नभाचे " नेमकेपणाने काय प्रकट होते आहे श्री समर्थ रामदास स्वामींकडून.? हा द्रुष्टान्त नेमकेपणाने कोणते दर्शन देतोय  आपल्याला? अनादी, अनंत, असीम आकाश, त्यात वहात येणारे ढग , पांढरे,  काळे,  विविध रंगाने नटलेली आकाशाची प्रभा हे  माझ्या समग्र अस्तित्वाला   अचंबित करते. काहीसे मूळ अस्तित्वाकडे प्रेरित करणारे हे शब्द आह...

आता कुठे प्रेम प्रभुंचे --- गझल 05.08.2022

आता कुठे प्रेम प्रभुंचे  --- प्रेम ही मुळात मजबूरी आहे. श्रद्धा आहे तिथे सबुरी असेल पण प्रेम आहे तिथे  मजबूरी असते. रहावत नाही हो ! सर्वसाधारणपणे प्रेमी  व्यक्तींच्या संबंधात असे घडत असले तरी ईश्वरी प्रेमातील मजबूरी भक्ताला परिपूर्णतेकडे नेत असते.  ईश्वरी प्रेमाने जो जगला त्याला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रेमानंदाचा अनुभव असतोच असतो.  म्हणूनच या  ईश्वरी प्रेमाबद्दल...

वर्तमानेषु वर्तन्ते 29.07.2022

वर्तमानेषु वर्तन्ते- प्रत्येकाला आपले जीवन आनंदाचे , शांतीचे , समाधानाचे व्हावे असे स्वाभाविकपणे वाटत असते. पण जीवन म्हणजे नेमकेपणाने काय हा प्रश्न आहेच. वास्तविक जीवन हे क्षणाक्षणातूनच जगले जात असते आणि तसा तसा अनुभव येत असतो. तेव्हा जीवन म्हणताना प्रत्येक क्षण समोर येतो.  म्हणूनच  वर्तमानाला टाळता येत नाही. तोच तर सातत्याचा खरा सोबती आहे. प्राप्त घडीला दुर्लक्षित करता येत नाही. प्राप्त...

जेथे नीरवता शांततेची 22.07.2022

"जेथे नाही भय , जेथे नाही चिंता , जेथे नीरवता शांततेची". भगवंताचे, या नारायणाचे वर्णन शांताकारं, भुजगशयनं असे केले गेले आहे. शांति हेच त्याचे अस्तित्व. पण मला ती कधी अनुभवास येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी भय , चिंतेने ग्रस्त आहे. हे भय , ही चिंता आहे कुठे? अनुभवास येते कुठे ?  हा  शोध कसा घडतो ? या शोधाला कोण आणि कसे प्रेरित करते ?  ही चेतना कुठून कुठे प्रवाहीत होते ?  हे चिं...

Lyt til podcasten Sudhakar Chodankar i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.