Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचाच होऊन राहिलो. श्रीपरमानंदस्वामीच्या 'आनंदाचे डोही' या भक्तिरसपूर्ण काव्यसंग्रहाने वेडच लावले मला. त्यातील विविध पदांचा आस्वाद घेता घेता सुधाकर या नावारूपाचा मी, त्यांचा भक्त होऊन राहिलो. परिणामी मनन, चिंतन अन ध्यासाच्या अनुभवातून माझ्या ठिकाणी आनंदाच्या उर्मि सतत दाटून येत राहिल्या. या उर्मि शब्दरूप होताना "अंतरंग तरंगांचे" ही ऑडिओ मालिका साकार होऊन आपली भेट घेत आहे ही केवळ परमानंदाची कृपा.

Autor

Sudhakar Chodankar

Kategorie

Religion

Web podcastu

sudhakar-chodankar.com

Nejnovější epizoda

15. led 2025

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

न्यूटन, न्यू टर्न आणि युटर्न 15.12.2023

झाडावरचे फळ खालीच का पडले ? या प्रश्नाचा शोध घेता न्यूटनने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असे सिद्ध केले. मुळात एका बीजाचे जमिनीतून उगवणे वृक्ष होणे फळ होणे आणि पुन्हा जनिनिवर पडणे हा यु टर्न मला चकित करतो. वास्तविक मानवी जीवनात हा यू टर्न अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय स्व चा शोध लागणार नाही. हा शोध एखाद्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतो. मी केवळ सत् चित् आनंद स्वरूप आहे या अनुभवाचा करून ठेवतो....

सोSहं आणि तो मी नव्हेच 08.12.2023

धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर ! असे खेळकर पणाने सांगणाऱ्या संत भक्त जनाबाई देवभक्तीचे रहस्य सांगतात. हा विठ्ठल त्यांच्या अनुभवाचा झाला कसा? तर 'सोहं' शब्द नाद केला , विठ्ठल काकुळती आला!" . संत, सद्गुरू भक्ताला हेच सांगतात की " तोच तू आहेस" पण त्याला नाही पटत , तो सारखे म्हणतो " तो मी नव्हेच " . पुढे आत्यंतिक भक्तिनेच देव भक्ताचा होऊन रहातो. या अनुभवाचे गुपित प्रकट झाले आहे या एपिसोड मधून...

सत्संग-जागृत देवस्थान 01.12.2023

माझ्या अनुभवाचे एकच जागृत देवस्थान आहे , जे मला खऱ्या अर्थाने जागृत करीत परमानंदाचे कायम करून ठेवते. देव जागृतच आहे, मी पामर, मी निजलो याची जाण सद्गुरू करून देतात. ज्यांच्या संगाने उत्कट आनंदाची उपलब्धी होते तेच जागृत देवस्थान मला...असेच काहीसे प्रकट झाले आहे मजकडून त्यांच्याच कृपेने.

निर्गुणाचा संग धरीला जो आवडी 24.11.2023

निर्गुण संग ही माझी आवडी, पण या संगानेच मला पुरते लुटले. ही काही तक्रार वा दुःख नाही आहे विठ्ठलभक्त सत नामदेव महाराजांची. मला तर हा परम आनंदाचा उन्मादच जाणवतोय. नारद महर्षी म्हणतातच ना आपल्या नारद भक्ती सूत्रात की भक्ती भक्ताला तृप्त,संपृक्त, मत्त, अमृतस्वरुप करते. असेच प्रकट होत आहे या व्हिडिओ एपिसोड मधून. आता पाहू या .....

कामधेनू कामनाच नुरवी 17.11.2023

दत्तप्रभुंच्या पाठीमागे गाय उभी असते. जिला सर्व कामना पुरवणारी म्हणून कामधेनू म्हटलं जाते. अशा किती कामना कराव्यात एखाद्याने आणि किती कामना पूर्ण व्हाव्यात कामधेनू कडून याला काही अंत आहे का? वास्तविक भक्ताच्या ठिकाणी कोणतीच कामना उरवतच नाही ती खरी कामधेनू. भक्ताला कामनांच्या पलीकडे , पुढे नेते ती कामधेनू. पहा गाय दत्तप्रभूंच्या पुढे नाही, मागे आहे. ते तर आधीच कामना विरहित आहेत. भक्त देखील असाच असत...

देवा रंग तुझा मज 10.11.2023

देवा रंग तुझा मज कसा लागला न कळे | और रंग बाद होती , एक रंग तुझा खेळे| हा एकी एक भक्तीचा रंगच भक्ताला देवाच्या अंतरंगाचा अनुभव देतो. जिथे भक्त या भक्तीच्या उन्मादात , परमानंदात स्वताला अनुभवतो. असेच भक्त सांगत आहे या एपिसोड मधून

सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं 03.11.2023

सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं- पांडुरंगाचे परमभक्त श्री संत नामदेव महाराज यांचे हे उद्गार आहेत. सुख म्हणजे आपणा सर्वांना कळते.त्यासाठी देवाकडे आपण दुख: नको , सुखं हवे अशी वारंवार प्रार्थना करतो. पण नामदेव महाराज सुख न म्हणता सुखाचे सुख म्हणत आहेत. हे सुखाचेही सुख म्हणजे काय हो ? सुखालाही सुखी करणारे असे काय आहे? तर श्रीहरी मुख. जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आम्ही प्रसन्नतेच्या मागे नाही लागलो पण प्रस...

देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही 27.10.2023

उंबरठा नसणे म्हणजे असीम, अनंत, अमर्याद होणे. असा केवळ भगवंत आहे अन् त्याच्या एकांतिक भक्तीने केवळ भक्तच या अनुभवाचा होत असतो. मन बुद्धी,विचार, कल्पना , संस्कार, समज, मान्यता या साऱ्या मानसिकतेच्याही पलीकडे पोचणे म्हणजेच सूक्ष्माहून सूक्ष्म होणे अन् व्यापकाहून व्यापक होणे. या स्थितीला उंबरठा नसणे म्हणतात नाही का? नाहीतर मांजर आडवी गेली, कोणी शिंकला, तीन तिघडा काम बिघडा असे मानसिक विविध उंबरठे घेऊन...

कांदा, मुळा,भाजी 20.10.2023

कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी – परमभक्त श्री संत सावतामाळी यांचेकडून केवळ भक्तीच्या आवेगातून हे आनंदाचे उद्गार प्रकट होत आहेत. भक्ति हेच जिवन अन जीवन हीच भक्ति या आंतरिक अनुभवाची ते जणू ग्वाहीच देत आहेत. डोळ्यांनी कांदा, मुळा, भाजीपाला, लसूण मिरची कोथिंबीरच पहात आहेत ते, पण दृष्टीला दिसते काय तर अवघी विठाई, अवघा श्रीहरी. अवघा झाला माझा हरी. जर भगवंत अवघा भक्ताच्या अनुभवाचा होतो तसा भक्तही अवघा...

खरं-खोटं-खरकटं 13.10.2023

खरं खोटं खरकटं - राजपदाचा अनुभव घेणारा जनक राजा स्वप्नात अत्यंत दीन, केविलवाणा झाल्याचे अनुभवतो. दुसऱ्या राजाने त्याचा पराभव करून राजपद हिरावून काही दिवस बंदीवासात ठेवून, हाकलून दिलेले तो पाहतो. खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही असा रानोमाळ भिकेची याचना करणारा जनक राजा जेव्हा अचानक जागा होतो तेव्हा स्वताला रत्नजडित आलिशान पलंगावर पाहतो. त्याला समजेना हेखरे की ते खरे? तसाच उठतो अन् भेटेल त्याला व...

आर यू रेडी ( Are you Ready) 06.10.2023

" संध्याछाया भिवविती हृदया " ही एका काव्यातील ओळ आहे. उतारवयात हा प्रश्न म्हणा, चिंता म्हणा बहुतेक सर्वांनाच असते. पुढे कधीतरी घडणार्‍या या प्रसंगाची आठवण नको म्हणत दूर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न आतल्या आत सुरू होत असतो. त्यातून भय, चिंता, निराशा येत असते. असे हे मानसिक अस्तित्व जणू प्रत्येकालाच प्रश्न विचारत असते " तू तयार आहेस का ? " ( आर यू रेडी ?). आता ही तयारी कोणती ? ज्या...

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 29.09.2023

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे- जिथे महाभारत यूद्ध घडले ते कुरुक्षेत्र . महाभारत महर्षि व्यासांकडुन प्रकट झाले. व्यास महर्षि केवळ कुरुक्षेत्र म्हणून थांबत नाहीत तर धर्मक्षेत्र असेही म्हणतात । का बरे ? युद्धाला भूमी लागते. ती आहे , कुरुक्षेत्र. पण खर्‍या अर्थाने धर्माची स्थापना होते कुठे ? कुरू क्षेत्रावर? वास्तविक धर्मक्षेत्र हे कुठे बाहेर नाही. ते तर प्रत्येकाच्या ठिकाणी असते. तिथेच तर धर्माची स्थापना...

ए दिलें नादाँ 22.09.2023

भक्त म्हणजेच स्व च्या शोधात असलेला साधक जस जसा सावध अन जागृत होत असतो तस तसा तो अधिकाधिक एकांतिक होत रहातो. बहयांगाने जगात वावरतांना दिसतो तो पण त्याचे व्यवधान म्हणा , अवधान म्हणा त्याच्या आंतरिक अस्तित्वाला पहात असेते, काहीसे अलिप्तपणे. याला साक्षीभाव म्हणता येईल. या मुळे मनाच्या ठिकाणी येणारे अन जाणारे विचार , भावना, बहाव, कल्पना, आशा, इच्छा , आठवणी, या सार्‍यांचे न होता, अलिप्त रहाणे असेच काहीच...

मोको कहां ढुंढे रे बंदे 15.09.2023

मोको कहा ढुंडे रे बंदे- कुणीतरी विचारले “ बंदे, तेरा खुदा कहा है बता ?” जवाब आया “ कोई एक जगह हो तो बताऊ , खुदा यहाँ है “ असाच काहीसा प्रश्न श्रीसमर्थ रामदास स्वामीच्या शिष्याने विचारला स्वामींना “ वसे हृदयी देव तो कोण कैसा ? , पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा “ चला तर मंडळी घेऊया शोध या प्रश्नाचा आजच्या “ मोको कहाँ ढुंडे रे बंदे “ या एपिसोडमधून.

सुखालागी आरण्य सेवित जावे 08.09.2023

सुखालागी आरण्य सेवित जावे - समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्र्लोकातून सांगत आहेत. आपण अरण्यात जातो , पहातो. पण या अरण्याचे सेवन करावे असे समर्थ स्वामी संगत आहेत जेव्हा आपण एकध्या पदार्थाचे किवा रसाचे सेवन करतो तेव्हा अगदी समग्र रसपूर्णतेने आस्वाद घेतो नाही का ? या प्रक्रियेत एवढे एकरस होतो की डोळेही काही वेळा आपसूक मिटले जातात. बोलणे, ऐकणे, पहाणे सर्व काही स्तब्ध होते. निसर्गाचे असेच सेवन व्हावे. निष...

येतो तो तो क्षण अमृताचा - 01.09.2023

येतो तो तो क्षण अमृताचा -  असा कोणता क्षण आहे का, जो अमृत घेऊन येतो ?  क्षण ,  हे  असं काही भांडं आहे ज्यातून अमृत  देता घेता येतं?   तेव्हा प्रचलीत असलेल्या किवा प्रचलित नसलेल्या कोणत्याही भाषेतून मूळ सत्य  प्रकट होऊ शकत नाही. मुळात "क्षण म्हणून काही नाही " असे म्हणण्यापेक्षा  "मी आहे"  या जाणिवेचा हुंकार म्हणजेच क्षण. तेव्हा क्षण अमृताचे नसतात. जसा सिनेमागृहातला  पडदा कॉमेडी,...

श्रद्धावान लभते ज्ञानम् 25.08.2023

श्रद्धा हा शब्द वरचेवर पहिला तर फार ठिसुळ वाटतो. कुणाला विचारले " काय रे बाबा, असे का ?" तर क्षणात उत्तर मिळते " नाही , माझी तशी श्रद्धा आहे " मला तर जाणवते श्रद्धा तीच जी स्वताच्या ठिकाणी शोधाला प्रवृत्त करत माझ्यातून साधक घडवते. साधकत्व हे भक्तीचे आविभाज्य अंग आहे. नाही तर माझी श्रद्धा आहे. एवढेच म्हणणे पुरेसे आहे का? फूल स्टॉप, पुढे काय ?. ज्याच्या पुढे साध्य नाही तो साधणार तरी काय? श्रद्धा हा...

मोसे नैना मिलायके- 18.08.2023

छाप तिलक सब छीन ली रे , मोसे नैना मिलायके- हे उद्गार आहेत संत कवि अमीर खुसरो यांचे. ते म्हणतात, या सद्गुरुंनी कमालच केली. मी जो टिपिकल होतो, छापील होतो, मी जो माझ्या विचारांचा, समजूतींचा, संस्कारांचा , स्मृतीचा, भावनेचा, कल्पनेचा होतो आणि तोच हा "मी " या मठ्ठ मान्यतेचा होऊन राहिलो होतो ते सारे हरण केले सद्गुरूंनी. जेव्हा त्यांच्या नजरेला नजर मिळाली तेव्हा ही किमया घडली. त्यांच्या वृत्तीच...

उन्हाळा पावसाळा हिवाळा-जिव्हाळा 11.08.2023

उन्हाळा, पावसाळा हिवाळा, ऋतू येतात. कधी पुढे मागे, कधी कमी जास्त होतात आणि निघून जातात पुन्हा येण्यासाठी. असा या प्रकृतीचा खेळ रंगत असतो. पण मी काही या निसर्गापासून वेगळा नाही. किंबहुना मी देखील या प्रकृतीतूनच जन्मलो आणि त्यातच विलीन होणार. असे असताना मला नेहमी प्रश्न पडतो की, या निसर्गाचे जसे ऋतू असतात तसा माझा ऋतू कोणता ? माझी वृत्ती कोणती? असे माझेच मला विचारताना जाणवले की, जसे निसर्गाचे ऋतू उन...

जिणे मस्त मधुर बस-- 04.08.2023

जिणे मस्त मधुर - मस्त अन मधुर जगणे केवळ भक्ताचेच असते. कारण सदासर्वदा तो मधुराभक्तीतच असतो. ही त्याची रीयालिटि असते. वास्तवता असते. यामुळेच तो सदा मत्त असतो. या कैफातच असतो. माणूस खरे तर या अलौकिक धुंदीचीच अपेक्षा करतो. सर्वसामान्य मानसिकतेतून ही जेव्हा उपलब्ध होत नाही तेव्हा दुख: विसरण्यासाठी किवा तथाकथित सुखासाठी तो मादक पदार्थांचा आश्रय घेतो. खरेतर या कृतीने तो अचेतन असल्याचेच सिद्ध करत असतो. व...

फुलणे फुलांचे जगणे 28.07.2023

खरे तर फुलांचे फुलणे हेच जगणे असते नाही का? किंबहुना फुलांच्या अस्तित्वाला "जगणे" म्हणणे देखील फार रुक्ष वाटते. किती सहज सुंदर असतात फुलं ! प्रगाढ शांतीत, सखोल मौनात असलेली ही फुलं, जणू क्षणा क्षणाला अभूतपूर्व सौदर्याचा उत्कट साक्षात्कार करून देतात नाही का ? म्हणूनच फुलांचे जगणे, दिसा मासाने मोजणे हास्यास्पद वाटते मला. किती काळ जगलो म्हणण्यात काहीच रस नाही. त्या पेक्षा किती उत्कटतेने कित...

अंग चोरले तरीही 21.07.2023

भरवसा सर्वांवर नाही ठेवता येत. परंतु काहींच्या बाबतीत भरवसा असतो आपल्याला. माझे अनेक मित्र आहेत. प्रसंगानुरूप भेटत असतो आम्ही. त्यातले दोन तीन मित्र असे आहेत ते त्याघडीला कसे पेश होतील हे सांगता येत नाही. पण त्यावेळचे त्यांचे आमच्या सोबत असणे हे निश्चितच सर्वांना सहज खुशीचे आनंदाचे होणार याचा भरवसा असतो आम्हा सर्वांना. मग तो प्रसंग सुखाचा असो वा दु:खाचा. माझा भरवसा हा या आनंदाच्या स्थिति वर आहे. क...

यतो कृष्ण ततो सर्वम्- 14.07.2023

यतो कृष्ण ततो सर्वम्- " यतो धर्मस्ततो जय: " असे एक संस्कृत वचन आहे. जिथे धर्म तिथे जय. मला जर धर्म म्हणजे काय हेच माहीत नाही तर मी यशस्वी कसा होणार? जय कसा मिळणार? म्हणून जिथे धर्म तिथे जय हे काही माझ्या पचनी पडत नाही. धर्म-अधर्माची व्याख्या कोण करणार ? या तात्विक चर्चेत मला रस नाही. त्यापेक्षा " यतो कृष्ण ततो धर्म असे म्हणणे मला जास्त भावते. कारण हे वचन भावभक्तीच्या उबेचे जाणवते. भ...

रंगत रंगत येतो हरी हा 07.07.2023

रंगत रंगत येतो हरी हा - त्या दिवशी कोथिंबीर निवडता निवडता काही गुणगुणत होतो. अभंग होता "परब्रह्म निष्काम तो हा गौळीया घरी, वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी". गुणगुणताना पुढची ओळ, मला काहीच पत्ता लागू न देता अवचितपणे आली ती अशी " म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा, रंगत,रंगत येतो हरी हा राजमंदिरा ". मीच चकीत झालो. पत्नी देखील ऐकून बाहेर आली ,म्हणाली "अहो, चुकीचे काहीतरी काय बोलत...

हरीच असे हरीच दिसे एकला 30.06.2023

हरीच असे हरीच दिसे एकला - भक्त जसजसा एकांतिक होत जातो भक्तीपोटी, तसतसा त्याच्या अंग प्रत्यंगातून केवळ देवाचे महात्म्य प्रकट होत रहाते. हे महात्म्य म्हणजे देवाचे वर्णन एवढेच नसते तर भक्ताच्या अंतरंगाचा हा अंनुभवगम्य अन अवर्णनीय अविष्कार असतो . म्हणूनच तो गातो " हरीच असे एकला हरीच दिसे एकला". हरीच असे एकला म्हणजे एकटा नाही. एकच अनेक झाले तर एकटा कसे म्हणावे हरीला ? समग्र म्हणून जे जे आहे त...

Poslouchej podcast Sudhakar Chodankar v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály