Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ Epizody: 394

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: www.storytel.com

Autor

Santosh Deshpande

Kategorie

Arts

Web podcastu

www.storytel.com

Nejnovější epizoda

11. čvc 2026

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

पी.आर.चं बदलतं जग.. 09.06.2025

पब्लिक रिलेशन्स (पीआर) किंवा जनसंपर्क क्षेत्रात मागील काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. मूळात हे `पीआर` क्षेत्र कसे विकसित झाले, सध्या ते कुठे आहे, भविष्यात त्यातील संधी काय असणार या विषयी अनेकांना कुतुहल आहे. अनेक नामवंत संस्था व वलयांकित व्यक्तींसाठी `पीआर`चा चेहरा म्हणून प्रसिद्ध असणारे या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ तुषार जोशी यांच्याशी संतोष देशपांनी यांनी याच विषयावर संवाद साधला आणि त्या...

नाना पाटेकरांमधला `माणूस` समाजासाठी बोलतो तेव्हा... 30.05.2025

निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी लोकसहभागातून सातारा जिल्ह्यातील आपल्या निढळ या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची उलगड करणारे सुनील चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक निढळ – ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नुकतेच प्रकाशित झाले. प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नानांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी, मनस्वी,...

अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी! 22.05.2025

अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी अर्थात, श्रीमंत बनण्याचे रहस्य!  गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गाने न जाता असे कोणते मार्ग आहेत जे तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतील, सध्या जगभरात अस्वस्थता असताना गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवे, सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील, गुंतवणुकीचे नेमके नियोजन का व कसे करायचे या व अशा प्रश्नांची उलगड गुंतवणूक सल्लागार संदीप भुशेट्टी यांनी केली आह...

ऑपरेशन सिक्रेटस्, सरप्राइजेस् आणि सैनिकांचे मनोधैर्य 10.05.2025

`ऑपरेशन सिंदूर`च्या निमित्ताने अनेक गोष्टींवर चर्चा, विश्लेषण होते आहे. त्याचवेळी अशा लष्करी ऑपरेशनच्या वेळी सिक्रसी (गुप्तता), सरप्राइजेस का आणि किती महत्त्वाचे असते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोधैर्य कसे असते, कसे टिकते याविषयी ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद. 

खडतर मार्ग...परखड भूमिका (शरद पोंक्षे) 03.05.2025

शरद पोंक्षे म्हणजे एक अवलिया कलाकार. आपल्या कट्टर सावरकरभक्तीमुळे अनेक वादळे ओढवून घेत विचारांशी असणारी बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व. कलाजीवनात आणि समाजजीवनात अशा आव्हानांना भिडताना, त्यांना नेमके काय जाणवते, याची उलगड संतोष देशपांडे यांसमवेतच्या त्यांच्या या संवादातून होते.आवर्जून ऐकावा असा हा हटके पॉडकास्ट. 

सावधान...Information Warfare चालू आहे! 30.04.2025

इन्फर्मेशन वॉरफेअर म्हणजेच माहिती युद्धतंत्र हे माध्यमांच्या मदतीने केले जाणारे एक प्रकारचे युद्धच असते. त्यात शत्रू राष्ट्राकडून मीडिया युजर्स, चॅनल्स यांचा वापर केला जातो. कळत-नकळत अनेक जण त्यात ओढले जातात आणि त्याचा फायदा शत्रूला होतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगानंतर भारत सरकारने प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या पा...

लाखमोलाचे सोने, पुढे काय? 28.04.2025

सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, असे नेमके कशामुळे घडले, भारतीयांना सोन्याचे इतके आकर्षण का आहे, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते का, भविष्यात याकडे कसे पाहायला हवे अशा अनेक बाबींचा उहापोह ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसोबतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये केला आहे. सोन्याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेग...

चित्रपटांतून `इतिहास` शोधावा का? 19.04.2025

चित्रपट असो वा साहित्यकृती त्याला इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर त्यातून वाद निर्माण होतात. अलीकडच्या काळात रायगडावरील वाघ्यावरुन उफाळून आलेला वाद असो, छावा चित्रपटामुळे निर्माण झालेले वातावरण असो वा फुले चित्रपटाच्या ट्रेलवरवरुन सुरु झालेला वादंग असो....चित्रपट अथवा लेखनाकडे आपण इतिहास म्हणून खरंच पाहावा का, त्यातून समाजात जाणाऱ्या संदेशाकडे कसे पाहिले जातेय, त्यातून कलास्वातंत्र्याचा संकोच होतोय...

प्राण्यांशी संवाद साधताना... 12.04.2025

प्रत्येक प्राण्याला मन असतं, ते व्यक्त करणारी त्यांची एक भाषाही असते. मात्र, मानवी जीवनात येणाऱ्या प्राण्यांच्या मनात काय चाललं आहे, ते काय बोलू पाहतात हे काही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. अशा वेळी टेलिपथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र उपयोगी येतं. त्यातील तज्ज्ञ असणाऱ्या प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे ही चक्क प्राण्यांशी संवाद साधते. हे नेमके कसे जमते, प्राणी तिच्याशी काय बोलतात, त्यांच्याशी बो...

तेजोमय भारत`मित्रा`! 25.03.2025

मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गो...

दिल्लीतील सच्चाईशी `सामना`! 21.03.2025

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सामना या दैनिकाचे दिल्लीतील ब्युरो चिफ नीलेशकुमार कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षांत दिल्लीतील राजकारण विशेषतः तेथील मराठीजनांचा प्रभाव अनुभवलेला आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांशी जवळून संबंध आला आहे. त्यांची नोंद ठेवतानाच दिल्लीतील संसदेच्या आठवणींचा पट उलगडणारे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `संसद भवन...

निवेदनातील `स्नेहल`वाट... 17.03.2025

निवेदन हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडून अत्यंत मेहनतीतून त्यात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याची किमया स्नेहल दामले यांनी साधली आहे. अभ्यासपूर्ण, आशयघन आणि संयत अशा निवेदनशैलीमुळे स्नेहलला रसिकप्रियता लाभली आहे. सांस्कृतिक, सांगीतिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारांतील कार्यक्रमांना तिचे निवेदन, सूत्रसंचालन उंची देऊन जाते. पुण्यातील प्रतिष्ठीत वसंतोत्सव असो, अ.भा. मराठी साहित्य संमेलन असो, जागतिक म...

पुस्तकं झपाटून टाकतात तेव्हा... 10.03.2025

पुस्तक वाचनातून उत्तम वाचकच घडतो असं नव्हे तर त्यातून प्रेरणा घेत उत्तम लेखकही घडू शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित युवा लेखक, संपादक प्रणव सखदेव हे त्याचेच एक आदर्श उदाहरण. प्रणव सखदेवचा लेखनाकडे झालेला प्रवास, त्यातील अनुभव, त्याचे चौफेर वाचन आणि साहित्यनिर्मितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट. 

पाकिस्तान abnormal का आहे? 07.03.2025

पाकिस्तानची आजची अवस्था पाहता देश म्हणून तो सपशेल अपयशी असल्याचे पुढे येते. प्रत्येक आघाडीवर त्याची केवळ पिछेहाटच नव्हे तर तर दयनीय अवस्था झालेली आहे. हे असे का झाले, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेथील लष्कर काय करते, राज्यकर्ते दिशाहीन का आहेत, तिथे मध्यमवर्ग का नाहीय या व अशा प्रश्नांची मालिका पुढे येते. त्याचीच संगतवार मांडणी करणारे `पाकिस्तान का मतलब क्या` हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. स...

मिशन जेएनयू 08.02.2025

देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते...

दिल्लीत मराठी माणूस रमतो का? 03.02.2025

देशाची राजधानी दिल्ली मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. मात्र, तरीही मराठीजनांना दिल्ली कायमच दूर वाटते. आगामी मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होते आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील टीव्ही माध्यमात कार्यरत असणारे युवा पत्रकार सोमेश कोलगे यांच्य़ाशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक वेगळ्या बाबींची उलगड झाली. मराठी माणूस दिल्लीत रमतो का, तेथील मराठी संस्कृती कशी आहे, अन्य घटकांना मर...

स्टोरीटेलवरची एआय गोष्ट, डीपसीक आणि अमेरिका! 31.01.2025

स्टोरीटेलवर नुकतीच संपूर्ण एआय निर्मिती असणारी गोष्ट दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रयोग नेमका काय आहे, चीनच्या डीपसीकने अमेरिकेची झोप का उडवली आहे आणि ट्रम्पतात्यांचे धोरण काय सांगते अशा साऱ्या गोष्टींची गप्पांमधून उलगड केली आहे, योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. नवी आणि वेगळी माहिती देणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि संपन्न व्हा! 

रहस्यकथांची, `वागळे की दुनिया`! 18.01.2025

रहस्यकथा आवडणाऱ्या वाचकांना एक नवा लेखक लाभला आहे. त्याचं नाव सौरभ वागळे. स्वतः आयआयटीएन असलेल्या या युवा लेखकाने रहस्यकथा या साहित्यप्रकारात आपली अशी एक दुनिया उभी केली आहे. त्यास वाचकांचा विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी सौरभला त्याची ही दुनिया उलगडून दाखवण्यासाठी बोलतं केलं आहे. नव्या पिढीतील हा आश्वासक लेखक नेमकं काय वाचतो, त्याच्या ले...

११५ वर्षांपूर्वी...मराठी जाहिराती! 11.01.2025

मनोरंजन हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. या अंकातील वैविध्यपूर्ण संपादकीय लेखनाबरोबरच यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीही अत्यंत रंजक होत्या. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमध्ये. ११५ वर्षांपूर्वीच्या या जाहिरातींमधून त्या काळातील व्यवसाय, उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये कशी भाषा वापरली जायची, हे ऐकणे रंजक ठरेल. तेव्हा अनुभवू या...

२०२५ साठीचे सोप्पे संकल्प 04.01.2025

नवे वर्ष लागल्यानंतर असे कोणते साधे-सोपे संकल्प आपण करु शकतो आणि ते पूर्ण करु शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नवे पर्व येईल..त्याविषयी वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी. 

पाकिस्तान बनलयं भिकारीस्तान! 28.12.2024

जगात दहशतवाद पसरवण्याबद्दल आधीच प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची ओळख आता भिकाऱ्यांचा निर्यातदार अशीही बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंधही बिघडण्याच्या मार्गावर आहेत. खुद्द पाकिस्तानात भिक मागणे हा एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. हे सारं नेमकं काय चाललं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा. 

समलैंगिक ओळख उघड झाली तेव्हा... 24.12.2024

अशोक रावकवी.... देशातील एलजीबीटीक्यू समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव. पुण्यात झालेल्या मूकनायक २०२४ या एलजीबीटीक्यू समूहाच्या साहित्य संमेलनात त्यांनी एका सत्रात आपले अनुभव सांगितले. या प्रसंगी, त्यांनी आपली समलैंगिक ओळख उघड झाली तो क्षण पुस्तकातून ज्या लेखातून मांडला, त्याचेही प्रकट वाचन झाले. खरे तर हे मोठे धाडसच म्हणायचे. मात्र, त्यांनी ते दाखवले. तेव्हाचे हे रेकॉर्डिंग. 

आता जगात `गर्जे मराठी`! 16.12.2024

जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं... 

पुस्तक वाचन टाळण्याच्या ५ सबबी! 07.12.2024

अशी कोणती कारणं आहेत, जी आपणास पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात... खरं तर ही कारणं नव्हेत तर चक्क सबबी आहेत. या सबबी कोणत्या आणि त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याचा वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तुमच्यासमवतेच्या संवादातून. 

दिल्लीचे तख्त...फोडले की राखले? 30.11.2024

दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

Poslouchej podcast स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály