BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ Epizody: 963

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Kategorie

Health

Web podcastu

www.bbc.co.uk

Nejnovější epizoda

25. bře 2026

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 16.03.2023

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत. (यांना पोलिसांनी अटक केली आहे). 14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे...

सिलिकॅान व्हॅली बॅंक का बुडली? त्याचा भारतावर काय परिणाम? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 15.03.2023

स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला. असं का घडलं?सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती? या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. संशोधन - विनीत खरे लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 14.03.2023

जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते? समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्राएलमध्ये लोक एवढे का चिडले आहेत? 13.03.2023

इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव. नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्भसंस्कारांचा फायदा होतो का? 09.03.2023

RSS ची महिला संघटना राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का गर्भावस्थेत मूल काही आवाजांना प्रतीक्रिया देतं, पण त्या ध्वनीचा अर्थ बाळांना कळतो का? ? विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत. संशोधन – सुशीला सिंग लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात एवढ्या महिला घराबाहेर का पडत नाहीत? 08.03.2023

बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं. काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टम...

जांभळा रंग महिला दिनाचं प्रतीक कसा बनला ? BBC News Marathi 07.03.2023

दरवर्षी 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवसामागे महिला हक्कांसाठी लढ्याची एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. तसंच महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, सेलिब्रेशन किंवा आंदोलनामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. यामागची कारणं काय आहेत? पुरुष दिवसही कधी साजरा केला जातो का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : धुळवडीचे रंग साफ कसे करायचे? 06.03.2023

होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या. संशोधन – बुशरा शेख लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सभागृहाचा हक्कभंग म्हणजे काय? 02.03.2023

विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर नेमकं पुढे काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्तानं विधिमंडळाचे विशेषाधिकार आणि हक्कभंग पुन्हा चर्चेत आले आहेत. हक्कभंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे आणि संजय राऊतांवर काय कारवाई होऊ शकते, जाणून घेऊयात. संशोधन – टीम ब...

EPS अंतर्गत EPFOची वाढीव पेन्शन कशी मिळवायची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 28.02.2023

तुम्ही किंवा तुमचे आईबाबा, किंवा आणखी कुणीही नोकरी करत असेल, तर एक प्रश्न नेहमी चर्चेत असतो – 60नंतर काय? पेन्शन आहे का? आपल्यापैकी काही जणांना पेन्शन मिळतही असेल किंवा काही जण पेन्शनसाठी झगडत असतील. पण आता सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे काही आजी-माजी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही EPS, EPF, EPFO ची भानगड आहे तरी काय? लाखो आजी-माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी 3 मार्च...

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात एवढा उकाडा का वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 28.02.2023

गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय. याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमच्या मुलाला शाळेत कधी घालायचं? 23.02.2023

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्ष हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत. आता हे वय सहा वर्ष असं कोणी निश्चित केले?शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, जाणून घेऊयात लेखन – जान्हवी मुळे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

बीबीसीची सुरुवात कशी झाली? बीबीसीला पैसा कुठून येतो? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 21.02.2023

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हे नाव तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आजीआजोबांनीसुद्धा ऐकलंय, पाहिलंय आणि वाचलंयसुद्धा. पण ही संस्था नेमकी काय आहे? ती कशी काम करते? तिला पैसा नेमका कुठून येतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

470 नवीन विमानांमुळे कसा बदलणार एअर इंडियाचा प्रवास? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.02.2023

एअर इंडिया 470 नवीन विमानं खरेदी करतेय. कशी असतील ही विमानं आणि यामुळे भारताच्या हवाई प्रवासाला टेकऑफ करता येईल का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

टर्की-सीरिया भूकंपांनंतर बचावपथक कसं काम करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.02.2023

तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही. अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत कार्याला हातभार लावला आहे. पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात? संशोधन – टीम बीबीसी लेखन - जान्हवी मुळे निवेदन – विशाखा निकम...

तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 15.02.2023

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपानंतर भारतात आणि महाराष्ट्रात अशी आपत्ती ओढवण्याची शक्यता किती आहे, याविषयी चर्चा होते आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुर्कीत भूकंपानं इतकं नुकसान का झालं? 13.02.2023

तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला. तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा ३३ हजारांवर गेलाय. हे एवढं नुकसान कशानं झालं? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

अमेरिका चीन तणाव एका फुग्यावरून कसा वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 11.02.2023

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय. त्यांनी नंतर तो शूट करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

उपग्रह असताना फुगा का? भारताला चिनी फुग्याचा किती धोका? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 11.02.2023

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला. त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय, आणि नंतर त्यांनी तो लक्ष्य करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन : गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदींची बोहरा समाजाशी जवळीक का आहे? 09.02.2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोहरा मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील. अंधेरी पूर्व मधल्या मरोळ इथे 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटनप्रसंगी मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमाचा संबंध मुंबईसह राज्यात नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांशी आहे का अशी चर्चा सुरू आहे. पण खरंच असं आहे का? दाऊदी बोहरा मुस्लीम कोण आहेत आणि त्यांचं मुं...

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणातल्या संज्ञा समजून घ्या | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 08.02.2023

अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून शॉर्ट सेलिंग, शेल कंपनी, टॅक्स हेवन, एफपीओ असे वेगवेगळे शब्द तुमच्या कानावर पडले असतील. पण हे शॉर्ट सेलिंग काय असतं आणि ते का केलं जातं? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या निमित्ताने अशाच वेगवेगळ्या संज्ञांचा अर्थ जाणून घेऊयात. संशोधन – मानसी कपूर निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 07.02.2023

24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला, तर काय करायचं, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : AB फॉर्म म्हणजे काय? 06.02.2023

कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, चुकीच्या फॉर्ममुळे उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. पण हा एबी फॉर्म काय असतो आणि तो का महत्त्वाचा आहे? जाणून घेऊयात. लेखन – हर्षल आकुडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-64528474

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शाळा प्रवेशासाठी आता 'या' कागदपत्राची सक्ती, काय आहेत नवे नियम? 02.02.2023

येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघांना आधार कार्डची सक्ती आहे. बीडमध्ये एका शिक्षण संस्थेनं बोगस विद्यार्थी दाखवूत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यामुळे असे प्रकार थांबवण्यासाठी सरकार पावलं उचलतंय. प्रत्येक शाळेत 'व्यवस्थापन समिती' असते हीच समिती आता 'प्रवेश देखरेख समिती' म्हणून काम पाहणारे. काय आहेत शाळा प्रवेशासाठीचे नवीन नियम? जाणून घेऊया आजच्या सोपी...

इन्कम टॅक्स भरण्यासाठी तुम्हाला कोणती करप्रणाली सोयीची ठरेल? BBC News Marathi 01.02.2023

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला. कररचनेत त्यांनी काही मोठे बदल जाहीर केले आहेत. नवी की जुनी - कोणती करप्रणाली तुम्हाला सोयीची ठरेल? तुम्हाला आता नेमका किती कर भरायचा आहे हे कसं मोजाल? दोन्ही करप्रणालींचे तरुणांवर, पेन्शनर वर्गावर वेगवेगळे परिणाम होणार आहेत का? सविस्तर जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. लेखन, निवेदन – अमृता दुर्वे एडिटिंग – अरविंद पारेकर

Poslouchej podcast सोपी गोष्ट v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály