Sakal Media
"राज"कारण " Rajkaran
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...
Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: audiowallah.com
Kde poslouchat?
Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzyPodcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty
Epizody
RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक 08.05.2026 8:38
१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या...
RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य? 01.05.2026 11:42
पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभ...
RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा 24.04.2026 10:49
धाराशिवच्या राजकारणात पवन राजेनिंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील या चुलत भावांच्या नात्याने एक वेगळाच इतिहास घडवला. सहकार क्षेत्रातून सुरू झालेला त्यांचा एकत्र प्रवास पुढे सत्तेच्या संघर्षात बदलला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा बँक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. 2004 च्या निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीनंतर हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि 2006 मध्ये पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्ये...
RAJ'KARAN PODCAST : खरात, एरंडे प्रकरणाआधी ‘जळगाव स्कँडलने’ हादरला होता महाराष्ट्र : 30 वर्षांनंतरही पीडित महिलांचा होतो थरकाप 17.04.2026 10:11
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या जळगाव सेक्स स्कँडलची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रभावशाली टोळीने महिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा हा धक्कादायक प्रकार होता. मीरा बोरवणकर यांच्या तपासातून प्रकरण उघडकीस आले, पण अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates...
RAJ'KARAN PODCAST : भारताने स्वतःच्याच विमानाचं हायजॅक घडवून आणलं अन् ऑपरेशन बांग्लादेश फत्ते झालं... 10.04.2026 13:34
1971 मध्ये Research and Analysis Wingच्या रणनीतीतून भारतीय विमान हायजॅक प्रकरण घडले. यामुळे भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली, त्यांचा हवाई मार्ग बंद केला आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोठा रणनीतिक व लष्करी फायदा मिळवला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, 1971 hijacking, Ganga aircraft, Indian A...
RAJ'KARAN PODCAST : संघर्ष, सत्ता, ग्लॅमर आणि वाद... रुपाली चाकणकरांचा गृहिणीपासून महिला आयोग अध्यक्षपदापर्यंतचा सगळा प्रवास 03.04.2026 12:12
रुपाली चाकणकर यांचा गृहिणीपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि वादांनी भरलेला आहे. महिलांसाठी काम करताना त्यांनी प्रभावी उपक्रम राबवले, मात्र विविध आरोप, टीका आणि राजकीय वादांमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आणि राज्यातील वादग्रस्त नेत्या म्हणून ओळख निर्माण झाली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Mahara...
RAJ'KARAN PODCAST : गुलमंडीत पहिली पाटी लागली अन् मराठवाड्यात सुरु झाला ठाकरेंच्या भगव्याचा प्रवास 27.03.2026 19:34
1985 मध्ये Bal Thackeray यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मराठवाड्यात एन्ट्री झाली. औरंगाबाद (आताचे Chhatrapati Sambhajinagar) येथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष वाढला. महापालिका जिंकत शिवसेना मजबूत झाली. पुढे फुट, बंड आणि भाजपच्या उदयामुळे आता मराठवाड्यात सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political up...
RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी 20.03.2026 12:08
आज अहिल्यानगरचे राजकारण राधाकृष्ण 'विखे पाटील' यांच्या शब्दाभोवती फिरते. सरकार कोणाचेही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचे फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असो की दूध संघ असो की जिल्हा बँक असो सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य क्षेत्रातही विखे पाटील यांचं साम्राज्य मोठं आहे. पण त्यांनी हे सगळं एका रात्रीत मिळवलं का? नाही. विखे पाटील कुट...
RAJ'KARAN PODCAST : भाजपच्या निष्ठावंतांना जमलं नाही, ते 'पँथर'ने करून दाखवलं... पण कसं? 13.03.2026 14:06
रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळवले असून तिसऱ्यांदा राज्यसभेत प्रवेश केला आहे. पण साधं ग्रामपंचयातीचंही तिकीट फायदा असल्याशिवाय न देणारा भाजप आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभा का देतोय? यामागील राजकारण काय आहे? तेच समजून घेऊ. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, bjp, Ramdas Athwale, RPI, Dalit Panther
RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला तो 'महाराष्ट्रानेच'! 06.03.2026 14:31
इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपरा...
RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाखतायत! 27.02.2026 8:44
'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत वसंतराव भागवत आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष...
RAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरी 20.02.2026 11:31
बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना चर्चिले जायचे. मग एवढ्या जीवघेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले? नेमका कुठे खडा पडला? पाहुया...
RAJ'KARAN PODCAST : राजीव गांधींच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला... 13.02.2026 12:59
केंद्रात काँग्रेसची ताकद वाढत होती. विरोधी पक्षात बसून राजकारण करण्यापेक्षा सत्तेत यावं असे राजीव गांधी यांचे मत होते. खासदार असताना शरद पवार यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. त्यावेळी त्यांनी बोललेल्या एका वाक्यानंतर शरद पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political upda...
RAJ'KARAN PODCAST : कधी पक्षाविरोधात जाऊन, कधी कोंडून ठेवून तर कधी शरद पवारांचा विरोध डावलून अजितदादांनी नेते तयार केले... 06.02.2026 12:16
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारे 'विद्यापीठ' म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकेच खरे आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ajit Pawar, NCP, Pune
RAJ'KARAN PODCAST : रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणार संघर्ष... 30.01.2026 14:15
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोचला आहे. दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोचला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Phal...
RAJ'KARAN PODCAST : 'पायलट' नातवाने 'मुख्यमंत्री' आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं... 23.01.2026 17:24
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा 2 राजकीय भागात विभागला गेला.
RAJ'KARAN PODCAST : विलासरावांनी निलंगेकरांविरोधात पुकारलेलं बंड राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता... 16.01.2026 8:14
शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी पुकारलेले हे बंड म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता. KEYWORDS : Political podcast, Ma...
RAJ'KARAN PODCAST : बलाढ्य काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला... बाळासाहेबांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेचा 'महापौर' बसवला! 09.01.2026 13:41
मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा झाला? त्याचाच हा इतिहास KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussio...
RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध' 02.01.2026 16:07
सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shivsena, NCP, BJP, Congr...
RAJ'KARAN PODCAST : किंगमेकर' विरुद्ध 'जायंट किलर'! गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधील वर्चस्वाच्या लढाईचा धगधगता इतिहास 26.12.2025 12:36
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ निवडणुकीतील टक्कर आणि राजकीय वर्चस्वात आहे, ज्यामुळे हे वारंवार चर्चेत राहिले आहेत. या टोकाच्या संघर्षाची सुर...
RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं! 19.12.2025 14:09
नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discuss...
RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन 12.12.2025 9:30
बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं. पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का? तर नाही. गेवराईत यापूर्वीदेखील असे राडे झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आ...
RAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण 05.12.2025 10:46
एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण...
RAJ'KARAN PODCAST : केशरकाकूंनी निर्माण केला दबदबा... क्षीरसागर कुटुंबाने 70 वर्षे गाजवलं बीडचं राजकारण 28.11.2025 21:18
राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात दशकांची राजकीय परंपरा आजही कायम आहे. केशरकाकूंना चार मुले — जयदत्त, रविंद्र, भारतभूषण आणि पवित्रा. या चौघांस...
RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री? 21.11.2025 11:57
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक...
Podobné podcasty
Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály