shailesh Jawadekar

जरा चुकीचे जरा बरोबर!

Society MR ↓ Epizody: 57

आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.

Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: podcasters.spotify.com

Autor

shailesh Jawadekar

Kategorie

Society

Web podcastu

podcasters.spotify.com

Nejnovější epizoda

2. lis 2024

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

आपल्या घरातल्या "ती"ची काळजी कशी घ्याल? - सांगत आहेत डॉ. ( Breast Cancer Surgeon) राजश्री केळकर 02.04.2023

स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदलण गरजेचं आहे तसच काही नियम पाळण आवश्यक आहे आणि तरीही कर्करोग झाल्यास घाबरुन न जाता त्यावर मात करुन सुखी आयुष्य जगता येत असा विश्वास देताहेत डॉ. राजश्री केळकर

Stoicism - स्टोईसिझम भाग २ - रोजच्या जगण्यतला प्राचीन शहाणपणा. 02.04.2023

रोजच्या छोटय़ा छोटय़ा बदलातून आपल्या आयुष्यात फ़ार मोठे मोठे बदल घडू शकतात, हे लवकरच जाणवेल तुम्हाला.

Stoicism - स्टोईसिझम भाग १ - रोजच्या जगण्यातला प्राचीन शहाणपणा. 29.03.2023

हा एपीसोड तुमचं आयुष्य बदलून टाकेल!

आपल्या आयुष्यातील नाती ( Relationships) आणि आपण. 16.03.2023

आपल्या आयुष्यातील नात्यांची ( Relationships) जपणूक करण, ती फुलवण्यासाठी प्रयत्न करण, ही एक आपली मुलभूत गरज आहे आज!! हे वेळीच ओळखू या.

Never give up - प्रयत्न करणे थांबवू नका! अवघड आहे, खास करुन जेव्हा तुम्हाला यश मिळत नाहिये तेव्हा. 24.02.2023

प्रयत्न करत रहाणं, तेही रोज़ नव्या दमान हे खरच खूप कठिण काम आहे. पण तोच एकमेव मार्ग आहे. So don't give up!!

मेमेंटो मोरी!... ह्याचा अर्थ, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक दिवस मरणार आहात. 20.01.2023

आपण हे सत्य कधीच नाकारू शकत नाही आणि ह्या सत्याची आपण पदोपदी, अगदी दररोज आठवण ठेवलीच पाहिजे. जेणेकरून आपल्या हातात असलेल्या वेळेचा आपण आदर करायला शिकू.

मी आहे का खरच लूजर? तुम्ही समजता का स्वतःला लूजर?? कोण असतो खरा लूजर??? 21.12.2022

मला कित्येक वर्षांपासून पडलेला एक प्रश्न. की मी लूजर आहे का? ह्या एपीसोडमध्ये हेच एकमेव उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ह्या प्रयत्नांचा नक्कीच फ़ायदा होईल.

Ikigai - Part 3 मिळाली!! मला माझी Ikigai मिळाली. 21.12.2022

काही लोकांना वाटेल खुप उशिर झालाय. But it's better late than never. मला तरी नक्कीच असं वाटतयं की अजूनही पुष्कळ आयुष्य जगायचं बाकी आहे आणि त्यासाठी ह्या ikigai चा खुप उपयोग होणार आहे.

Ikigai - Part 2 इकिगाय! एक आनंदी आयुष्य जगाण्याची पद्धत. भाग दुसरा. 23.11.2022

इकिगाय विषयी प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यात लवकरात लवकार माहिती मिळवली पाहिजे आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Ikigai - Part 1 इकिगाय! एक आनंदी आयुष्य जगाण्याची पद्धत. भाग पहिला. 23.11.2022

इकिगाय! जपानी लोकांची आनंदी आयुष्य जगण्याची एक अतिशय यशस्वी पद्धत आणि म्हंटलं तर समजायला सोपीसुद्धा !!

तक्रार... आपण न थकता दररोज किती तक्रारी करतो? काही कल्पना आहे का? 05.11.2022

आपण अगदी दररोज न चुकता, न थकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करतो याचा कधी तरी नक्की विचार व्हायला पाहिजे. हा एपीसोड ऐकून तुम्ही तो करावा, तुम्ही तो करालच !

तुम्ही "साहस" "धाडस" कशाला समजता ? आयुष्यात आपण साहसी, धाडसी असावं का ? 14.10.2022

आयुष्यात आपण साहसी, धाडसी असावं का ? मी तर म्हणीन, असायलाच हवं !! साहसी वृत्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. मी "साहस" हा शब्द ह्या एपिसोडमध्ये खूप वेळा वापरलाय त्या बद्दल क्षमस्व.

Midlife crisis - मिड लाइफ हे एक संकट आहे की नाही? 07.10.2022

मिड लाइफ हे एक संकट आहे की नाही, माहित नाही पण एक नक्की की त्या न दिसणार्या संकटासाठी आपण तयार मात्रं रहायला हवं. चला करूया तायरी.

२०२१ वर्षाचा अखेरचा सूर्यास्त !! 02.10.2022

सूर्यास्त मला प्रचंड आवडतात आणि सूर्यास्त मला खूप काही शिकवून जातात.

Smile करा, हसतमुख रहा! 19.09.2022

तुम्ही जरी त्रासात असाल, तरीही हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फ़ायदा होईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरवात होईल.

आपलं मानसिक आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आज थोडं त्याबद्दल! 09.09.2022

जर तुम्हाला आनंदी, समाधानी आयुष्य हवं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्याचीहि काळजी घ्या, किंबहुना त्याची आज सर्वात् जास्त गरज आहे.

आपल्याला आयुष्यात काय करणं नेमकं गरजेचं आहे हे कळणं फ़ार महत्त्वाचं आहे. 05.09.2022

तुम्हाला आयुष्यात काय करायला आवडेल हे समजलं तर चांगलेच आहे पण त्याहीपेक्षा जर वेळ आलीच तर न आवडणारी एखादी गोष्ट गरज पडल्यास करायची तयारी तुम्ही ठेवलीच पाहिजे.

मला काही लोकांचा प्रचंड हेवा वाटतो. खास करुन त्या लोकांचा, जी आयुष्यात लवकर रिटायर होतात. 23.08.2022

पण मला त्याहीपेक्षा जास्त त्यांचं कौतूक वाटतं. त्यांना कुठले प्रश्न कधी पडले असतील आणि त्यांची उत्तर त्यांनी कशी शोधली असतील ते मला समजून घ्यायला आवडेल. आयुष्यात पुढे जाण्यसाठी आपल्याला प्रश्न पडलेच पाहिजेत.

सिनेमा : द टर्मिनल......हा सिनेमा आपल्यला आयुष्याचे काही interesting धडे शिकवतो ! 09.08.2022

ह्या सिनेमामुळे मी रोजच्या आयुष्यातले काही अतिशय महत्त्वाचे धडे शिकलो. मला त्यामुळे खरोखरच खुप फ़ायदा होतोय. हा सिनेमा तुम्ही प्रथम पहा आणि मग हा एपिसोड ऐकलात तर तुम्हाला बरोब्बर समजेल, मी काय म्हणतोय ते.

Taking stock of Life. आपल्या आयुष्यातील आपली जमा पुंजी आपण मोजत राहिली पाहिजे . 05.08.2022

इथे आपण पैसे, जमीन, गाड्या फ़क्त ह्या बद्दल नाही बोलत आहोत तर आपल्याकडे जमा असलेल्या अनुभवांची पुंजी किती आहे आणि त्याचं आपण काय करतोय ह्याचा वेळोवेळी विचार करण्याबद्दल बोलत आहोत.

तुम्ही आयुष्यlत unreasonable होण्याची गरज आहे! 02.08.2022

आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला unreasonable व्हावं लागतं. काही शब्दांचे अर्थ शब्दकोषlबाहेर शोधायचे असतात. हा एपीसोड ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल.

स्वातंत्र्य म्हणजे काय ? तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे ? 26.07.2022

स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. पण तरीही प्रत्येकासाठी स्वातंत्र्याचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे आणि स्वतंत्र आयुष्य जगण्यातला आनंद शब्दातीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर तुम्ही काय करणार हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे.

आनंदी जगाण्याचे १० नियम ! 26.07.2022

तुम्हाला आनंदी ,समृद्ध आणि समाधlनी आयुष्य जगायचे असेल तर हे १० नियम पाळा आणि पाहा आयुष्यlत किती गम्मत येते ते !

आयुष्य जगण्याचा नवा दृष्टीकोन देणारा जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! Kintsukuroi ! 29.06.2022

जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! आपल्याला आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टीकोन देतो. ह्या कलेचा उपयोग चिनी मातीचि फ़ूटलेली भांडी पुन्हा नव्याने जोड़ण्यासाठी होतो. हि भांडी जोडण्यासाठी सोने आणि चंlदी ह्याचि भुकटी वापरतात त्यामुळे ती अजूनच सुंदर आणि मजबूत होतात. आपल्या आयुष्यlतहि हे करण्याची गरज आहे.

तुम्ही Sorry आणि Thank you हें शब्द तुमच्या रोजच्या आयुष्यlत किती वेळा वापरता? 24.06.2022

आपण Sorry आणि Thank you हें शब्द इतके सवयींमुळे दररोज वापरत असतो किं ह्याचा अर्थ आपण खरच किती समजतो असा प्रश्न मला पडतो. ह्याचा नक्की विचार करण्याची वेळ आली आहे.

Poslouchej podcast जरा चुकीचे जरा बरोबर! v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály