आरोग्यम्
आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)
आरोग्यम् धनसंपदा असं म्हणतात. प्रत्येकाने आपले आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, काही विकार झालाच तर त्यावर कशी मात करता येऊ शकते, विविध रोगांवरच्या उपचारपद्धती नेमक्या कशा आहेत, कोणता विकार झाल्यास काय उपचार घेता येतात, फीट् आणि हेल्दी राहण्यासाठी उत्तम जीवनशैली कोणती …आपल्या मनातील अशा कितीतरी प्रश्नांची उलगड आरोग्यम् या आपल्या पॉडकास्टवर मान्यवर डॉक्टर्स, विषयतज्ज्ञांकडून केली जाणार आहे. उत्तम आरोग्यासाठी हे एक उत्तम श्रवण…त्याचा जरुर आस्वाद घ्या आणि निरोगी राहा….आनंदी राहा!प्रस्तुतकर्ता: संतोष देशपांडे (Mediacura Infoline)
Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: audioboom.com
Var kan du lyssna?
Poddar i appen Replaio Radio Kommer snartPoddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar
Avsnitt
7: दंतोपचाराची किमया! 01.08.2020 28:22
दाताच्या दुखण्याने वेदनेची परिसीमा गाठली की आपली पावलं आपसूकच डेंटिस्टकडे वळतात. दातांचं दुखणं हे असं दुखणं आहे, ज्याला डॉक्टरांच्या हातांचा गुण आल्याशिवाय रूग्ण बराच होऊ शकत नाही... त्यामुळे बाह्य सौंदर्याबरोबरच दातांचं आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे, दातांची निगा कशी राखावी, कोणत्या दंतरोगावर कोणते उपचार करावेत आणि दातांच्या दुखण्याकडे कसं बघावं अशा सर्वच प्रश्नांची उत्तर ऐका दंतरोगतज्ज्ञ डॉ. व...
6: कोरोना येता दाराशी... 16.07.2020 33:27
कोरोना आता थेट घरादारात पोहोचलाय. त्याच्या प्रादुर्भावाची भीती पहिल्यापेक्षा अधिक बळावली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, आपण आता कसे वागावे? घरात अथवा शेजारपाजारी कोणास त्याची लागण झाली तर काय करावे? होम क्वारंटाईन कोणाला केले जाते? टेस्ट पॉझिटिव्ह आली तर रुग्णावर काय उपचार केले जातात? निगेटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकतो का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकुया प्रसिद्ध अतिदक्षतातज...
5: अस्थिरोग ‘अनलॉक’ करताना... 13.07.2020 46:21
गुडघेदुखी, हाडांचं दुखणं, सांधेदुखी हे प्रकार आता सर्रास सर्वांमध्ये दिसतात. त्यापासून सुटका मिळवायची असेल तर अनेकांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे संचेती हॉस्पिटल! कोरोना संसर्ग, लॉकडाऊनचा काळ आणि त्यातच अनेकांना होणारा अस्थिरोगाचा त्रास... या सगळ्यांवर मात करत अस्थिरोगतज्ञ्ज डॉ. पराग संचेती व संचेती हॉस्पिटलने या कठीण परिस्थितीतही आपली रूग्णसेवा कशी अखंड सुरू ठेवली हे ऐका थेट डॉ. पराग संचेती यांच्या...
4: औषधं, आहार अन् आपलं आरोग्य! 09.07.2020 48:48
आयुष्यात आहार आणि औषधं यांंचं नेमकं काय महत्त्व आहे? ते एकमेकांशी कसे निगडित आहेत आणि औषधांच्या `गोळी`बार नको असेल, तर आहाराचं `बुलेटप्रुफ जॅकेट` कसं काम करतंं....? आपल्या दैनंदिन गोष्टींना, विचारांना सहज स्पर्श करणारे आणि आहार आणि औषधांबाबत नेमकी समज, उमज आणि दृष्टी काय असावी, असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालतात. त्यांचाच वेध अगदी सहज-सुलभ पद्धतीने घेणाऱ्या `मिशन प्रिव्हेंशन` उपक्रमाचे प्रवर्तक...
3: कोरोना, आयुर्वेद अन् आपलं आरोग्य.. 14.06.2020 1:03:14
निरामय आरोग्याचा शाश्वत मार्ग आयुर्वेदाने दाखवलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे धास्तावलेल्या जगाला आयुर्वेदाने सांगितलेला हा मार्ग नक्कीच नवी दिशा दाखवणारा आहे.. त्याची सुस्पष्ट उलगड करणारा, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य योगेश बेंडाळे यांसमवेतचा हा मुक्त संवाद.
2: कोरोना- मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी? 24.05.2020 36:50
कोरोनाच्या सावटाखाली जगताना सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे. ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाबासारखे विकार आहेत, अशांनी या परिस्थितीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यावर भाष्य करणारा डॉक्टर शिशिर जोशी यांसमवेत हा विशेष पॉडकास्ट.
1: कोरोना - तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे! 14.03.2020 28:18
कोरोना व्हायरस.... सध्या ज्याने अवघ्या जगाला वेढीस धरले आहे, जगभरातील नागरिकांमध्ये दहशत पसरवलेली आहे अशी ही साथ. कोरोना आता आपल्या भारतात, अगदी महाराष्ट्रात येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेकांच्या मनात उद्भवणाऱ्या शंका-कुशंका दूर करण्यासाठी आरोग्यम् च्या विशेष भागामध्ये प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ व रुबी हॉल क्लिनिकच्या एनटीयूचे संचालक डॉ. कपिल झिरपे यांच्याशी साधलेला हा संवाद.
Liknande poddar
Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden