Vechleli Phule

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Arts MR ↓ 138 episódios

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: shows.acast.com

Autor

Vechleli Phule

Categoria

Arts

Site do podcast

shows.acast.com

Último episódio

16 de ago de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

साऱ्याच पायवाटा | Saryach Payvata 27.10.2023

साऱ्याच पायवाटा डोंगर - दऱ्यातून आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या या पायवाटा. छोट्या पण तितक्याच महत्वाच्या. आपल्याला इच्छित ठिकाणी पोचविण्याचा मार्ग सोप्या करणाऱ्या या पायवाटा खूप भारी असतात.चालुयात या पायवाटांवरती कवितेची साथ घेऊन. 1. पायवाट कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन 2. साऱ्याच पायवाटा कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण Hosted on Acast. See acast.com/privacy for more informatio...

Bahuli | बाहुली 24.10.2023

बाहुली गोड - गोड दिसणाऱ्या, आपली सखी सवंगडी असणाऱ्या, लहानपणी आपलं सगळं ऐकून घेणाऱ्या या बाहुल्या. त्या असतात नेहमीच तिथं. फक्त आपण दूर गेलो असतो. उगाच कोणत्यातरी आविर्भावात जगत राहून आपलं स्वत्व हरवून बसतो. चला तर मग जाऊयात या मजेशीर दुनियेत परत. 1. बाहुली कवी - रजनी परूळेकर कवितासंग्रह - स्वीकार 2. बाहुल्या कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या Hosted on Acast. See acast.com/privacy for more i...

अजून उशीर झालेला नाही | Ajun Ushir Jhalela nahi 20.10.2023

अजून उशीर झालेला नाही पर्यावरणाचा समतोल ढासलळा आहे हे आपण गेली कित्येक वर्षं पाहतो आहोत. त्याचे दुष्परिणाम दरवर्षी वाढतच चालले आहोत. म्हणून आपण हातावर हात धरून बसून चालणार नाही. आशेवर सारं जग चालतं. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या परीने प्रयत्न केले तर परिस्थिती नक्कीच बदलेल आणि हे विश्व परत सुंदर होईल. चला तर मग लागुया तयारीला कारण अजून उशीर नाही झालेला. 1. अंतिम स्फोट कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह...

दर्शन | Darshan 17.10.2023

दर्शन आपल्या सर्वांच्याच लाडक्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण खूप धडपड करतो. भरपूर प्रवास करतो, ताटकळत रांगेमध्ये उभे राहतो, उन्हातान्हात चालतो. का? तर फक्त त्या विधात्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. पण दर्शन काय फक्त देवलायामध्येच होतं का? याचं उत्तर पाहूया काव्यारुपात. 1. दर्शन कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी आणि माझा आवाज 2. दर्शन कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी Hosted on Acas...

सोनेरी सण | Soneri San 13.10.2023

साडे तीन मुहूर्तापैकी एक असा हा सोनेरी सण. याची सुरुवात घटस्थापना करून होते. खूप उत्साहाने नवरात्र साजरी केली जाते. आदिशक्तीची वेगळी रुपे, त्याचं महत्व, त्याचा अनुभव घेणं हे प्रचंड भारी असतं. चला तर सोनं बनुया, सोनं लुटुया कवितेच्या खजिन्यासोबत. 1. नवरंगांची उधळण कवी - उमा पाटील 2. दसरा कवी - गोविंदाग्रज कवितासंग्रह - पिंपळपान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

खिडकीशी बसून | Khidkishi Basun 10.10.2023

खिडकीशी बसून लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच खिडकी प्रिय असते.ती आणते वाऱ्याची झुळूक, पावसाचे थेंब, सोनेरी किरणे आणि सुंदर करून टाकते आजुबाजूच जग. खिडकीत बसून आपण स्वप्न रंगवतो, दुनिया पाहतो, स्वतःशीच गप्पा मारतो. चला तर मग उघडूयात खिडकीची दारे कवितेच्या दारातून. 1. खिडकीशी बसून कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 2. खिडकी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे Hosted on Ac...

घर कौलारू | Ghar Kaularu 06.10.2023

घर कौलारू सर्वांना विसावा ,ऊब आणि प्रेम देणारं घर. प्रत्येकालाच आपलं घर प्रिय असतं. त्या फक्त भिंती नसतात, तिथं आपलं बालपण, गोड आठवणी आणि असंख्य आवडत्या गोष्टी असतात. जगातला कोणताच महाल आपल्या घराची जागा घेऊ नाही शकत. चला तर मारुया फेरफटका घराकडे कवितांसोबत. 1. घर कौलारू कवी - अनिल भारती 2. घर कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #mar...

वर्तमान | Vartman 03.10.2023

वर्तमान  आपल्यातले किती जण वर्तमानात जगतात? आपण एक तर भूतकाळात जाऊन स्वतःला आणि झालेल्या गोष्टींना दोष देत बसलो असतो किंवा उद्याच्या भविष्याची रंगीत स्वप्नं रेखाटत गुंग झालो असतो. पण जे होऊन गेलं त्याचा विचार हा व्यर्थ आणि जे व्हावं असं वाटतंय त्याबद्दल आज काम करावं लागेल. पण आपण हे पुरते विसरतो. चला या आता या वर्तमानात जगूया 1. वर्तमान कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना 2. वर्तमान कवी - स...

जन्मदिवस | Janmadivas 29.09.2023

जन्मदिवस  या पृथ्वीतलावर आपण जेव्हा आलो तो खास दिवस,आपला वाढदिवस. केक, फुगे, औक्षण, थोरांचे आशीर्वाद अन् खूप सारं प्रेम यांनी भरलेला हा दिवस. यामुळेच तर आपल्याला हे सुंदर जग बघण्याची अन् आयुष्य जगण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या दिवशी जितकं नाचावं , गावं, कृतज्ञता व्यक्त करावी ती थोडीच. तर मग स्विकार करा कवितांची ही अमूल्य भेट तुमच्या खास दिवसासाठी. 1. जन्मदिवस कवी - अमोल शिंगणे 2. औक्षण...

भिंत | Bhint 26.09.2023

भिंत भिंती किती प्रकारच्या असतात ना. काही भिंती उभारून नवीन जग बनवता येतं, तर काही भिंती उभारून असलेलं जग विभागलं जातं. काही भिंती निधड्या छातीने आपलं रक्षण करतात तर काही भिंती लोकांच्या मनामध्ये फूट पाडून शांतीचं भक्षण करतात. त्यांच्या पल्याड काही छानही असेल याची वेडी आशा दाखवतात पण कधी त्यांच्या निगरगट्ट स्वभावाने मनं तोडतात. बघुयात या भिंतीमुळे मनाची घरे कशी पडतात आणि उभी राहतात. 1. भिंती कवी -...

डेरिंग-फिरिंग | Daring-Pheering 22.09.2023

डेरिंग-फिरिंग मानव जातीने कितीही प्रगती केली असली तरी ती आपल्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीमुळे. एखादा सिनेमा पाहिला की आपल्याला वाटतं मी पण असाच या नायकासारखं जग बदलवून टाकेन. पण आपलं आयुष्य आपल्या घर - ऑफिस या वर्तुळापर्यंतच मर्यादित राहातं. मग कुठलं जग बदलणार. आपल्या प्रगतीचा झेंडा गर्वाने मिरवणाऱ्या या मनुष्य प्राण्याने हे विसरू नये की तो या विश्वाची निर्मिती आहे. बघुयात कवी मंडळी कसं ज...

कविता | Kavita 19.09.2023

कविता तिच्या फक्त २ ओळींनी हसवणारी, प्रेरणा देणारी ही कविता. किती श्रेष्ठ असते. पण तिला समजणं, कागदरुपी जाळ्यात पकडणं तितकच कठीण काम. पण ती जेव्हा येते तेव्हा नुसती बहार आणते. चला तर मग कवितेच्या गावांत कवितांच्या नावेतून. 1. कविता 1 कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे 2. कविता कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more informati...

तू सुखकर्ता - गणेश चतुर्थी विशेष | Tu Sukhkarta - Ganesh Chaturthi Special 15.09.2023

बाप्पा मोरया आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं दैवत - गणपती बाप्पा. तो आला की सगळीकडे नुसता उत्साहाला उधाण येते. आरत्या, आरास, मोदकाचा नैवेद्य यांनी वातावरण मंगलमय होऊन जाते. त्याच्या आगमनाने जणू आपल्याला एक मित्र भेटायला आल्यासारखं वाटतं. तो बुध्दीचा देवता, विघ्नहर्ता अन् सुखकर्ता तर आहेच. पण तो नक्कीच एक जादूगार आहे असं मला वाटतं. त्याच्या फक्त आगमनाने आपल्याला संकटांचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. चल...

आशा उद्याची | Asha Udyachi 12.09.2023

आशा उद्याची वादळं नेहमीच येत असतात आपल्या आयुष्यात. आपण सगळी उमेद हरवून बसतो. पण आशेचा हात धरून आपण एक एक पाऊल टाकत जातो. मग दिसते ती सुंदर सोनेरी सकाळ. आशेच्या जोरावरच आजपर्यंत मानवाने इतकी प्रगती केली आहे. या आशेची कास धरूया कवितांच्या पक्तींतून. 1. जिवलगा, खिन्नता का ही? कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - आरसपानी 2. आशा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन Hosted on Acast. See acast.com/pri...

पुस्तकांची किमया | Pustakanchi Kimya 08.09.2023

पुस्तकांची किमया पुस्तकं काळी - पांढरी, अबोल पण बोलकी, निर्जीव पण तितकीच सजीव, छोटी पण तितकीच महान. आपल्या पानातून वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडतात. खूप लोकांशी संपर्क येतो, आपल्याला आयुष्याचे धडे मिळतात. अनेक न पाहिलेले प्रसंग आपण परत जगतो. अशी जादूमय असतात ही पुस्तकं. भरुभरून आनंद, प्रेरणा, ज्ञान देतात. चला तर मग स्वार होऊयात पुस्तकांच्या जगात कवितेच्या विमानातून. 1. पुस्तकांचे कौतुक कवी - ओम कंटाळे...

जिप्सी | Gypsy 05.09.2023

जिप्सी जगरहाटीची फिकीर न करता पायाची भिंगरी करुन फिरणारे हे भटके. त्यांना कोणतीही बंधनं नसतात. येईल तो दिवस आनंद अन् कुतूहल यांनी भरलेला ठेवतात. कशाचीच त्यांना भीती नसते. एक वेड मनाशी घेऊन ते फक्त फिरत राहतात. बघूया निदान काव्याचं जाळं तरी अडवू शकतं या जिप्सीना. 1. जिप्सी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह -जिप्सी 2. जिप्सी कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मित्रास #podcast #marathikavita #mahara...

मनमोहन श्रावणघन | Manmohan Shravanghan 01.09.2023

मनमोहन श्रावणघन हिरव्यागार धरतीने नटलेला, इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेला, आणि मृदगंधाच्या अत्तराने बहरलेला श्रावण. हा महिना धरतीसोबतच आपल्या मनालाही न्हाऊ घालतो. सगळं जग कसं नवीन चित्तवेधक रूप धारण करतं.सणांची अन् गोडधोडाची रेलचेल, पाऊस ऊनाचा खेळ, पावसाची गाणी, चहा भजी यांनी तर नुसती धमाल येते आयुष्यात. असा हा मनमोहक श्रावण बघुयात कवितेच्या वर्षावातून. 1. श्रावणाचा पारिजात कवी - इंदिरा संत क...

रेशीम धागा - रक्षाबंधन विशेष | Reshim Dhaga - Rakshabandhan Vishesh 29.08.2023

रेशीम धागा | रक्षाबंधन विशेष भावाबहिणींच्या नात्याचा गोडवा साजरा करण्यासाठीचा खास सण. हा रेशीम धागा बांधून ठेवतो मनाचेही घट्ट धागे घट्ट अन् हो मिठाईचा डब्बाही राहत नाही मागे. प्रसंगी एकमेकांवर भांडताना तुटून पडणारे ही दोघंजणं तितक्याच खंबीरपणे उभी राहतात प्रसंगी. चला तर मग राखीपौर्णिमा साजरी करूया कवितेच्या गोडव्यासोबत. 1.राखी पोर्णिमा कवी : प्रा.विजय पोहनेरकर 2. बालपणाचे गाव कवी : प्रभाती बेनाडे...

आयुष्याचा ग्रंथ | Ayushyacha granth 25.08.2023

आयुष्याचा ग्रंथ एक एक पान या ग्रंथाचं आपण रोज वाचतो. कधी - कधी लिहायलाही बघतो. आपले अनुभव, काही व्यक्ती, प्रसंग त्यात भर टाकतात आणि आपण त्या परीने भर टाकत राहतो त्या ग्रंथात. पण तो ग्रंथ सर्वतो परी सुंदर व्हावा म्हणून किती प्रयत्न करतो आपण. बघूया काही क्लृप्त्या कवितेच्या ओळीमधून. 1. आयुष्याच्या पायापाशी कवी - संदीप खरे कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे 2. आयुष्याचा ग्रंथ कवी - वि स खांडेकर कवितासंग्र...

नदीकिनारी | Nadikinari 22.08.2023

नदीकिनारी नदी कोणाला प्रिय नाही?.गंगा, यमुना, सरस्वती यांनी फक्त नदीकाठच नाही तर सुकलेल्या मनाचे कोपरेही त्यांच्या वाहत्या पाण्याने नुसते हिरवेगार करून टाकले आहेत. या नद्या निसर्गाला रूप आणतात, सर्व जीवांना पोसतात. फक्त प्रवाहासोबत वाहत राहिल्याने आपण कसे निर्मळ राहतो हा धडा शिकवत राहतात. चला तर मग बसुया नदीकिनारी आणि विसरून जाऊयात चिंता सारी. 1. नदीकाठ कवी - ना धों महानोर कवितासंग्रह - पक्ष्यांचे...

पाहुणे | Pahune 18.08.2023

पाहुणे ' पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ' ही म्हण उगाचच नाही आली. कोणी पाहुणे येणार म्हटलं की घरात गोडधोडाची रेलचेल. खूप गप्पा, आठवणींची उजळणी आणि परत लवकरच भेटण्याच्या आणाभाका, हे अगदी ओघानं आलंच. काही पाहुणे खूप लाघवी तर काही अगदी तिखट नकोसे. पण गंमत तर आणतातच. बघूया पाहुण्यांचा कवितारुपी आगथ्य सोहळा. 1. पाहुणा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - महावृक्ष 2. पाहुणा कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह...

स्वातंत्र्यलक्ष्मी | SwantartyaLakshmi 15.08.2023

स्वातंत्र्यलक्ष्मी १५ ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा दिवस. या दिवशी ७७ वर्षापूर्वी आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊन देशाची सूत्रं आपल्या हातात घेतली. यासाठी अनेक गांधी, टिळक, आगरकर आपल्याला गमवावे लागले. पण हा सोनियाचा दिवस त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला आणि आपण हे स्वातंत्र्य आज अनुभवतो आहोत. चला तर मग वंदन करूया या महान व्यक्तींना आणि भारत मातेला. 1. वंदे मातरम! कवी - ग दि म...

पोकळी | Pokli 11.08.2023

पोकळी  काही व्यक्ती, वस्तू, जागा अतिशय महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. त्यांच्या नसण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण होते. ती भरून कधी शक्य होतं कधी नाही. ही जाणीव खूपच उशिरा सर्वांना. बघुयात या पोकळीबद्दल कवीवर्य काय म्हणतायत 1. पोकळी कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना 2. पोकळी कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही.. #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #ma...

चहा | Chai 08.08.2023

चहा आपल्या सर्वांचा लाडका चहा. त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नाही. तो आपल्याला फक्त तरतरीच अन् उबच नाही तर साथही देतो. कधी - कधी नवीन नात्यांच्या सुरुवातीचं तो गोड कारण असतो. अश्या सर्वगुण संपन्न अश्या लाडक्या पेयाच कौतुक कवितारुपी स्तुतीसुमनांनी झालं नाही तर नवलच. चला तर मग घेऊया आस्वाद. 1. गवती चहा कवी - वलय मूळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं 2. चहा कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मि...

' जीवन ' त्यांना कळले हो | Jeevan Tyana Kalale Ho 04.08.2023

' जीवन ' त्यांना कळले हो  आयुष्याचे टप्पे - टोणपे कधी आपल्याला उंच उडवतात तर कधी जोरात जमिनीवर आपटतात. पण काही धडे मात्र नक्की शिकवतात. आपल्या मानव जातीचा अहंकार काही क्षणात धुळीस मिळवला जातो. पण खरंच आपल्याला जीवन कळतं का , कळलं तर मग ते खरंच आपण ते खरंच जगतो का असे नाना प्रश्न उभे राहतात. पाहुयात कवीवर्यांचा काव्यमय दृष्टिकोन. 1. कुणि मारावे कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांच...

Ouça o podcast Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos