Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Agriculture Product Export 2021-22 विक्रमी राहिली | Agriculture Export | ॲग्रोवन 06.05.2022

देशातून कृषी उत्पादनांची निर्यात विक्रमी पातळीवर पोचली. निर्यातीने ५ हजार कोटी डाॅलरचा टप्पा गाठला. परंतु गेल्या काही वर्षांत आयातीची गती अधिक राहीली. कृषी उत्पादनांची आयात किती झाली? त्यात किती वाढ नोंदली गेली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Indonesian Palm Oil Export Ban मे महिन्यात काढण्याची शक्यता | Edible Oil Bajarbhav | ॲग्रोवन 05.05.2022

खाद्यतेलासाठी आयातीवरील अवलंबित्व भारताला मागील दोन वर्षांपासून चांगलच भोवलं. इंडोनेशिया मे महिन्याच्या शेवटी पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. परंतु असे झाले नाही तर काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Sunflower Oil Shortage मुळे अनेक देशांत Edible oil दर वाढले | Sunflower Oil | ॲग्रोवन 04.05.2022

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सूर्यफुल तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. याचा फटका केवळ भारताला बसतोय असं नाही तर जगातील सर्वंच देश अडचणीत आलेत. सूर्यफुल तेलाची टंचाई कोणत्या देशांना जाणत आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

देशात Sugar Demand विविध क्षेत्रांतून वाढली | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन 03.05.2022

 देशभरात उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले सभा, समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखर मागणीवर दिसून येत आहे. मग बाजारात साखरेची मागणी किती आहे? साखरेचे बाजारभाव काय आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Open Market Chana Rate दबावात असल्याने NAFED Procurement वाढली | Chana Bajarbhav | ॲग्रोवन 02.05.2022

बाजारात हरभरा आवक वाढली. मात्र खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. मग या स्थितीत सरकारची हरभरा खरेदी किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Global Soybean Production पुढील हंगामात वाढण्याची शक्यता? |Soyaben Bajarbhav | ॲग्रोवन 30.04.2022

जागतिक सोयाबीन उत्पादनात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली. तसेच वापरही कमी राहिला. ब्राझील आणि अर्जेंटीनात घटलेल्या उत्पादनामुळे पुरवठा कमी राहिला, असे इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंशीलने म्हटले आहे. तर पुढील हंगामाबाबत या संस्थेने काय अंदाज व्यक्त केला?  ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Spring Sowing in Ukraine पोचील 36 Lakh हेक्टरवर | Ukraine Sowing | ॲग्रोवन 29.04.2022

युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणीला वेगात सुरु आहे. आत्तापर्यंत ३६ लाख हेक्टरवर पेरा झाला. परंतु उद्दीष्टाच्या केवळ २५ टक्के लागवड झाली. सरकारने पेरणीसाठी कंबर कसली. मात्र तरीही येथील समस्या कायम आहेत. मग या समस्या कोणत्या? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

ब्राझीलमधून Soybean Oil Import चा मागील Five Years Record मोडला | Soyabean Bajarbhav | ॲग्रोवन 28.04.2022

भारताने जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत ब्राझीलमधून सोयातेल आयात वाढविली. यंदा ब्राझीलमधील आयातीने मागील पाच वर्षांचा विक्रम मोडला आहे. पण ब्राझीलमधून यंदा सोयातेल आयात का वाढली? आयात नेमकी कितीवर पोचली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून

Argentina Soybean Production 2022-23 च्या हंगामात वाढणार | Soyabean Bajarbhav | ॲग्रोवन 27.04.2022

चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत आहेत. त्यामुळे अर्जेंटीनात २०२२-२३ च्या हंगामात सोयाबीन लागवड ६.५ लाख हेक्टरने वाढेल. तर उत्पादनात मोठी वाढ होईल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. अर्जेंटीनातील उत्पादन कितीने वाढेल? चालू हंगामातील काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Russia-Ukraine War मुळे Global Food Grains Crisis वाढला | Wheat Bajarbhav | ॲग्रोवन 26.04.2022

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसत आहे. रशिया आणि युक्रेन गहू, मका, सूर्यफूल आणि खते उत्पादनात आघाडीवर आहेत. युद्धामुळे या सर्व मालांची निर्यात ठप्प झाली. त्यामुळे दरात वाढ होऊन महागाई वाढली. नेमक्या कोणत्या मालाचे भाव वाढले? भाववाढ किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

देशातील Pomegranate Turnover मागील तीन वर्षांत घटला | Dalimb Bajarbhav | ॲग्रोवन 25.04.2022

 देशांतर्गत डाळिंबाची दरवर्षी सरासरी २० हजार कोटींची उलाढाल होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत डाळिंबाची उलाढाल कमी झाली. महाराष्ट्रातील घट ही सर्वाधिक आहे. यामागची कारणे कोणती आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. 

सरकारचे Record Crop Production चे अंदाज नेहमीच का चुकतात? | Market News | ॲग्रोवन 23.04.2022

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी पीक उत्पादनाचे अंदाज जाहिर केले जातात. मात्र नंतर त्यात कपात केली जाते. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. पण सरकारच्या आकड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कसे होते? यंदा उत्पादनाचे काय अंदाज आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. 

सरकारचा Fertilizer Subsidy Cost यंदा विक्रमी पातळीवर पोचणार | Fertilizer BajarBhav | ॲग्रोवन 22.04.2022

खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मागील दोन वर्षांपासून मोठी वाढ झाली. त्यामुळे खतांचे दरही वाढले. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारला खत अनुदानावरील खर्च वाढवावा लागेल. त्यामुळे हा खर्च यंदा विक्रमी पातळीवर पोचेल. पण हा खर्च नेमका किती होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. .  

Ukraine Foodgrain Export एप्रिल महिन्यात काहीसा वाढला | Ukraine Export | ॲग्रोवन 21.04.2022

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे युक्रेनची शेतीमाल निर्यात घटली. एप्रिल महिन्यात निर्यातीत काहीशी वाढ झाली. मात्र रेल्वेच्या उपलब्धतेमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होत आहे? ऐकुयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून.

देशात यंदा Kharif Season ला पोषक वातावरण | Foodgrain production| ॲग्रोवन 20.04.2022

यंदा देशात माॅन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदजा हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण केंद्राने नेमके किती उत्पादनाचा अंदाज ठेवला? ऐकुयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. 

Wheat Procurement reaches above 69 Lakh tonnes in India | Gahu Bajarbhav | ॲग्रोवन 19.04.2022

 केंद्र सरकारने या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ६९ लाक २४ हजार टन गहू खरेदी केला. हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या या गव्हापोटी १४ हजार कोटी रुपये अदा करण्यात आले? तर भाताची खरेदी कशी राहिली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

China's Soybean Import मार्च महिन्यात कमी जाली _ Soyaben Bajarbhav _ॲग्रोवन 18.04.2022

चीनमध्ये सोयाबीनचा तुटवडा निर्माण होऊन दर तेजीत आले होते. त्यामुळे सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाले. त्यातच ब्राझीलमधून निर्यात धीमी सुरु आहे. त्यामुळे चीनची सोयाबीन आयात घटली. चीनच्या सोयाबीन आयातीत किती घट झाली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.  Watch today’s #marketbulletin to know about China's Soybean Import. Adverse weather conditions in Brazil affect soybean production. At the same time, de...

Shet Market Trailer 14.04.2022

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos