Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

शेतीमाल बाजारात मंदी येणार का? 04.07.2022

गहू, सोयाबीन, क्रुड तेल, पामतेल यांच्या दरात घट झाली आहे.  मध्यवर्ती बॅंकांनी केलेली व्याजदर कपात आणि हेज फंडांनी सुरू केलेला विक्रीचा मारा यांचा देशातील शेतीमाल बाजारावर काय परिणाम होईल, शेतीमाल बाजारात मंदी येईल का, हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

यंदा तूर भाव खाणार की शेतकऱ्यांना रडवणार? 02.07.2022

पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर तुरीचा पेरा २५ टक्के घटेल, असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. 

Pulses: महाराष्ट्रात कडधान्यांची पेरणी का घटली? 01.07.2022

 देशात कडधान्यांचा पेरा वाढत असला तरी राज्यात मात्र पेरणी घटलीय. पावसाने ओढ दिल्यामुळे आता कडधान्य पेरणीची वेळ साधता येईल का? काय आहे राज्यातलं आणि देशातलं चित्र?

Palm oil: पामतेलाचे दर वाढतील का? 30.06.2022

 जागतिक बाजारपेठेत पामतेलाची घसरगुंडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी किमती थोड्या वाढल्या होत्या. परंतु शिल्लक साठ्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच पुढचा उत्पादन हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर पामतेलाचे व्यवहार होत आहेत.

Soybean: सरकारच्या धोरणामुळे तेलबियांचा पेरा घटणार? 29.06.2022

केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क हटवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपाने केली आहे. सोपाचे अध्यक्ष दाविश जैन यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय.

Soybean sowing: देशात सोयाबीनचा पेरा केवळ २६ टक्के 28.06.2022

देशात यंदा आतापर्यंत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २६ टक्के आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)ने ही माहिती दिली आहे

Export ban, प्रतिकूल Climate मुळे जगावर अन्न संकट ओढवणार 27.06.2022

जगातील प्रमुख देशांत प्रतिकूल हवामानामुळे शेतीमालाचे उत्पादन घटेल. तसेच निर्यातबंदीच्या पवित्र्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जगाला भीषण अन्नसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

Oilseeds and Pulses Import थांबविण्याची मागणी | Soybean Bajarbhav | ॲग्रोवन 25.06.2022

सरकार तेलबिया आणि कडधान्य आयातीवर दरवर्षी मोठा निधी खर्च करते. त्यामुळे सरकराने आयातीवर खर्च करण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांनाच उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली. त्यासाठी त्यांनी सरकारला दोन उपाय उचविले. ते उपाय कोणते आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

अनेक देशांत Wheat Production Decrease होणार |Wheat Bajarbhav|ॲग्रोवन 24.06.2022

चालू हंगामात गव्हाची टंचाई असल्याने जागतिक बाजारात दर जवळपास ४० टक्क्यांनी वाढले. मात्र युएसडीएसह महत्वाच्या संस्थांनी पुढील हंगामातही गहू उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील हंगामात गहू उत्पादनाचा अंदाज काय आहे?  ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Excess Chana Stock मुळे NAFED ची गोची?|Chana Bajarbhav|ॲग्रोवन 23.06.2022

सरकारकडे सध्या कडधान्याचा अतिरिक्त साठा आहे. अन्नसुरक्षेसाठी २३ लाख टनांची गरज असताना नाफेडकडे ३६ लाख टन कडधान्य असल्याची माहिती आहे. त्यातही हरभरा सर्वाधिक आहे. त्यामुळे हा हरभरा सरकार बाहेर काढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाजारावर त्याचा काय परिणाम होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

International Market मध्ये Cotton, Turmeric Rate मोठ्या प्रमाणात घटले | Cotton Bajarbhav | ॲग्रोवन 22.06.2022

जागतिक महागाईमुळे अनेक वस्तुंची मागणी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दरही नरमले. २०२२ मधील उच्चांकी दराच्या तुलनेत कापूस आणि हळदीच्या दरात मोठी घसरण झाली. या शेतीमालांचे दर नेमके किती कमी झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Cotton and Soybean Sowing खरिपात आघाडीवर |Kharif Sowing|ॲग्रोवन 21.06.2022

देशात अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीन आणि कापूस आघाडीवर आहे. त्यातही कोणत्या पिकाची लागवड आघाडीवर आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात या पिकांच्या दराची काय स्थिती आहे?  ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Chana Export Subsidy ची केंद्राकडे मागणी | Chana Bajarbhav |ॲग्रोवन 20.06.2022

 देशात यंदा हरभऱ्याचे १३९ लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले. सरकराने मात्र २३ लाख टनांचीच खरेदी केली. त्यामुळे बाजारात सध्या हमीभावापेक्षा १००० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारातही दर वाढतील, असे व्यापारी आणि निर्यातदारांनी म्हटले आहे. पण खरंच याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का?  ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Cotton Import in India यंदा वाढण्याची शक्यता नाही | Kapus Bajarbhav | ॲग्रोवन 18.06.2022

 चालू हंगामात कापूस उत्पादनात मोठी घट आली. देशातील कापूस उत्पाद ३१५ लाख गाठींवरच स्थिरावेल, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे. तर कापूस वापर आणि आयात कशी राहील? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Wheat Flour Export भारतातून अचानक वाढला |Gahu Bajarbhav|ॲग्रोवन 17.06.2022

 देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले. निर्यात चांगली झाल्याने खुल्या बाजारात दर वाढले. परिणामी सरकारची खरेदी कमी झाली. त्यामुळे सरकारने गहू निर्यातबंदी केली. मात्र यानंतर गहू पिठाची निर्यात वाढली. त्यामुळे सरकार पीठ निर्यातीवर निर्बंध आणू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Russia Ukraine War मुळे Global Wheat Production घटणार |Gahu Bajarbhav|ॲग्रोवन 16.06.2022

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या गहू टंचाई निर्माण झाली. त्यामुळे दर तेजीत आहेत. परंतु ही गहू टंचाई केवळ याच हंगामात नाही तर पुढील दोन हंगामात राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामागची नेकमी कारणे काय असू शकतात? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

राज्यात यंदा 137 lakh Tonnes Sugar Production झाले | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन 15.06.2022

 राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या एफआरपीची काय परिस्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Government Wheat Procurement ला प्रतिसाद वाढला | Wheat Procurement | ॲग्रोवन 14.06.2022

गहू निर्यातबंदी केल्यानंतर सरकारी खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. काही राज्यांत प्रतिसाद मिळाला तर काही राज्यांतील खरेदी कमी झाली आहे. मात्र सरकारची खरेदी अद्यापही उद्दीष्टापेक्षा कमीच आहे. सरकारची गहू खरेदी नेमकी किती झाली? शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

जागतिक Palm Oil Production Increased होण्याचा अंदाज |Edible Oil Rate|ॲग्रोवन 13.06.2022

जागतिक पामतेल उत्पादन घटल्यामुळे दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. परंतु २०२२ आणि २०२३ मध्ये पामतेल उत्पादन वाढीची शक्यता एका अवालातून व्यक्त करण्यात आली. तर उत्पादनात किती वाढीची अपेक्षा आहे? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Soybean, Cotton Seed Rate Hike मुळं शेतकरी अडचणीत | Seed Price | ॲग्रोवन 11.06.2022

इंधन, खते, किटकनाशके, मजूरी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी आधिच अडचणीत आहेत. त्यातच आता खरिपासाठी कापूस आणि सोयाबीन दरात मोठी वाढ झाली आहे. बियाणे दरात नेमकी किती वाढ झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

भारत Rice Export Ban करण्याची शक्यता कमी | Rice Bajarbhav | ॲग्रोवन 10.06.2022

जागतिक पातळवीर सध्या तांदळाची टंचाई भासत आहे. जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर तांदूळ निर्यातीवर बंधने येण्याची भीती व्यक्त होत आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर खरचं बंधनं आणली तर काय होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

चीनधील Crushing Industry ला Bullish Soybean Rate चा फटका | Soybean Bajarbhav | ॲग्रोवन 09.06.2022

जगात सर्वाधिक सोयाबीन आयात चीन करतो. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यांत चीनची सोयाबीन आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली. मात्र मे महिन्यात अचानक वाढली. चीनची सोयाबीन आयात वाढण्याचं नेमकं कारण काय? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

देशात Chana, Tur Import मार्च महिन्यात घटली |Chana Bajarbhav|ॲग्रोवन 08.06.2022

देशात सरकारच्या धोरणामुळे कडधान्य आयात सुरुच आहे. मात्र सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हरभरा आणि तूर आयात घटली. परंतु याचा बाजारावर काही परिणाम झाला का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Russia ने शब्द मोडल्यामुळे जगभरात गव्हात तेजी 07.06.2022

 रशियाने काळ्या समुद्रातून होणारी शेतीमालाची निर्यात सुरळीत करण्याचा शब्द दिला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेनमधील मायकोलाईव बंदरावर हल्ला केला. त्यामुळे रशियाच्या भुमिकेबद्दल संशय बळावला. जगभरात गव्हाच्या दरात मोठी तेजी आली. 

Rice Cartel रोखण्यासाठी फिलिपाईन्सला भारताचा आधार | Agrowon 06.06.2022

फिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. थायलंड, व्हिएतनामला शह देण्यासाठी फिलिपाईन्सनं ही खेळी केली आहे.

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos