Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Soybean Market: पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ धीम्या गतीने होत असल्याचा दावा |ॲग्रोवन 01.09.2022

 देशात सध्या सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा काहीसा घटला आहे. पण सततचा पाऊस आणि कीड-रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर होत आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी राहू शकते असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तर उद्योगाच्या मते यंदा सोयाबीन बाजारात उशीरा येऊ शकते. पण सोयाबीनला यंदा उशीर का होईल? कोणत्या भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसत आहे? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. ...

Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा | ॲग्रोवन 31.08.2022

 देशात यंदा कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. या अंदाजात कितपत तथ्य आहे? जाणकारांना याविषयी काय वाटत? कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या मार्केट पॉडकास्टमधून.  The cotton sowing increased in the...

Tur Market: सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावल्यावर काय दर राहील? |ॲग्रोवन 30.08.2022

सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी झाली. देशात तुरीचा पुरवठा कमी असतानाही दर कमी झाले. तर चालू हंगामातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या स्टाॅक लिमिटच्या भीतीमुळं दर दबावात आल्याचं व्यापाऱ्यांंचं म्हणण आहे. मग तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पुढील काळात दर किती वाढू शकतात? सरकारने स्टाॅक लिमिट लावलं तर दर किती घसरतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Bullish trend of tur has been...

Onion Market: बाजारात कांदा आवक घटेल का? |ॲग्रोवन 30.08.2022

बाजारात अद्यापही कांद्याचे दर नरमच आहेत.  सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे कांदा दर घसरल्याचे व्यापारी सांगतात. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी फटका बसत आहे. पण तो कसा? बाजारात कांदा आवक का वाढली? सध्या कांद्याला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The onion rates are under pressure in the markets. The supply is more than the demand. Traders are sayin...

Chana Market: देशात सध्या हरभरा दर दबावात |ॲग्रोवन 27.08.2022

देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात हरभरा दर सुधारतील का? हरभऱ्याचा बाजारभाव काय राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. . The country has produced re...

Cotton Market: नवीन कापसालाही चढा दर |ॲग्रोवन 27.08.2022

 हरियाणा आणि पंजाबनंतर आता आणखी काही ठिकाणी नवा कापूस बाजारात दाखल झालाय. नवीन कापसालाही जुन्या मालाप्रमाणं दर मिळतोय. देशात कापसाची टंचाई आहे. कापसाची मागणी वाढलीय. त्यामुळे दर तेजीत आहेत. कोण-कोणत्या बाजारात नवीन कापसाची आवक सुरु झालीय? १२ हजार रुपये दर कोणत्या बाजारात मिळाला? कापूस पिकाची स्थिती काय आहे?  The new cotton crop is arriving on some markets in the country. Cotton rates are in a bull...

Maize Market: मका पिकावर लष्करी अळीचं आक्रमण वाढलं |ॲग्रोवन 25.08.2022

 देशात सध्या मक्याचा दर तेजीत आहे. त्यामुळं लागवडही काही प्रमाणात वाढली. मात्र मका पिकावर काही राज्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. तर पावसानंही नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग या काळात मका उत्पादन कसं काहील? मक्याचा भाव वाढेल का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The corn rates are in a bullish trend in the country. Due to high price maize sowing increa...

Cotton Market: देशातील कापूस पिकाचं नुकसान वाढलं |ॲग्रोवन 24.08.2022

 देशात सध्या कापसाचा तुटवडा असून दर तेजीत आहेत. जुना कापूस सध्या सरासरी १० हजार ७०० रुपयाने विकला जात आहे. तर नवीन कापसालाही १० हजार रुपये दर मिळाला. पण नवीन हंगामात हा दर टिकेल का? कापसाला काय दर मिळू शकतो? देशातील कापूस उत्पादनाची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  Cotton shortage is a main concern in the country. The old cotton stock is getting 10,700 rupees per...

Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन 23.08.2022

देशात सध्या तुरीचे दर स्थिरावले. वाढलेल्या दरात तुरीला उठाव मिळत नसल्याने तुरीचे दर एका भावपातळीवर आहेत. पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीच्या दरातील तेजी कायम राहील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  The tur rate stabilized in the country. Tur demand has decreased on the higher pric...

Dalimb Market: पावसामुळं डाळिंबाचे दर दबावात |ॲग्रोवन 22.08.2022

 पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा दर्जा घसरत आहे. तर बाजारात अपेक्षित मागणीही नाही. त्यामुळे बाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक कमी असूनही दर घसरले. डाळिंबाचे दर सध्या गेल्यावर्षीपेक्षा किलोमागे ६० रुपयांपर्यंत कमी आहेत. पण डाळिंबाचे दर पुढील काळात सुधारतील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  The pomegranate quality is decreasing due to the rain and variation in the weather....

Potato Market: बटाटा दर गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी वाढले |ॲग्रोवन 20.08.2022

 पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या महत्वाच्या बटाटा उत्पादक राज्यांमध्येही दर तेजीत आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बटाटा उत्पादक पश्चिम बंगालमध्ये दर गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी अधिक आहेत. मात्र बटाटा दर का सुधारले? बटाटा दरातील तेजी टिकेल का? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.  The potato rates in the main producing states like West Bengal, Uttar Pradesh, Punjab a...

Urad Market: उडदाचे दर टिकून राहतील का ? |ॲग्रोवन 19.08.2022

 देशात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. सध्या उडदाला सरासरी प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र देशातील काही बाजारांमध्ये नवीन उडदाची आवक सुरु झाली. पुढील काळात नवीन उडदाची आवक वाढणार आहे. मग या काळात उडदाचे दर कसे राहतील? आवकेचा दरावर दबाव येईल का? The Urad market rate is in a bullish trend in the country. Urad is getting 7500 rupees average rate in the market. But the new urad arri...

Cotton Market: देशासह, आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर सुधराले |ॲग्रोवन 18.08.2022

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील आठवडाभरात कापूस दर १४ टक्क्यांनी वाढले. यामुळं देशातही कापसाचे दर सुधारले. देशातील वायदे बाजारात कापसाने ५० हजार रुपये प्रतिगाठीचा टप्पा गाठला. मात्र कापूस दरात अचानक तेजी का आली? आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारण्याचे कारण काय? याची माहिती आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. The cotton rate in the international market is in a bul...

Soybean Market: पिकाचं नुकसान होऊनही सोयाबीनमध्ये तेजी का नाही? |ॲग्रोवन 17.08.2022

देशात यंदा सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा काहीसा अधिक आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रेदशात पिकाला पावसाचा फटका बसतोय. पावसानं नुकसान होत असल्यामुळं तूर आणि कापसाचे दर वाढलेत. मग सोयाबीनच्या बाबतीत मात्र पावसामुळे पिकाचं नुकसान होऊनही दर का स्थिरावले? नवीन हंगामात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? The Soybean sowing increased a little bit compared to last season in the country. But the rain is heat...

Tur Market: केंद्र सरकार तुरीवर स्टाॅक लिमिट लावणार का? |ॲग्रोवन 16.08.2022

देशात तुरीचा तुटवडा असल्यानं दरात वाढ होऊन तूर डाळही महागली. त्यामळं सरकारनं स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांकडील तुरीच्या साठ्याची माहिती देण्याची सूचना केली. याचा परिणाम सध्या बाजारावर जाणवतोय. बाजारात तुरीचे दर कितीने नरमले? तुरीच्या बाजारात सुधारणा होईल का? शेतकऱ्यांचा माल येईल तेव्हा काय परिस्थिती असू शकते? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Listen today’s #Shetmarketpodcast to know deta...

Moong Market: महाराष्ट्रासह देशात मुग लागवड पिछाडीवर |ॲग्रोवन 13.08.2022

देशात मागील आठवड्यापर्यंत मुगाची लागवड जास्त होती. मात्र या आठवड्यात पेरा घटला. त्यातच महत्वाच्या मूग उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसतोय. मात्र सध्या अनेक बाजारांमध्ये मुगाचा दर हमीभावापेक्षा कमी आहे. पुढील काळात मुगाचा बाजारभाव कसा राहील? भविष्यात दर सुधारतील का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Cultivation of mung bean was high in the country till last week. But this week the...

Tur Market: देशात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता |ॲग्रोवन 12.08.2022

 देशात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची लागवड कमी झाली. त्यातच सततच्या पावसानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला फटका बसला. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आलीय. आता तुरीच्या दराला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तुरीच्या दरवाढीची कारणं काय आहेत? सध्या काय दर आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  Plantation of turi has decreased in the country compared to last year. Meanwhile, incessa...

Soybean Market: देशात सोयाबीनचं गाळप २० लाख टनांनी घटलं |ॲग्रोवन 11.08.2022

 देशात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने दर तेजीत होते. परिणामी एक ऑगस्टपर्यंत देशातील बाजारांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ८ लाख टनांनी आवक कमी झाली. तसंच गाळपही कमी झालं. देशात सोयाबीनचा शिल्लक साठा अधिक आहे. मग या शिल्लक साठ्याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? देशात नेमकं किती सोयाबीन शिल्लक आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  This season in the country, the prices were rising due t...

Cotton Market: कापसाचा पेरा वाढला, पण उत्पादन वाढणार का? |ॲग्रोवन 10.08.2022

 गेल्या वर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांत कापूस लागवड वाढली. परंतु  अतिवृष्टी आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढलं तरी कापसाचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. निर्यातीसाठीही मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत यंदा कापसाला किती भाव मिळणार, शेतकऱ्यांनी कोणत्या किंमतपातळीवर नजर ठेऊन कापूस विक्री करावी, ह...

Urad Market: उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा |ॲग्रोवन 09.08.2022

 देशात यंदा उडदाची पेरणी ६ टक्क्यांनी घटलीय. तसेच पावसामुळे प्रमुख राज्यांत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे बर्मामधून स्वस्त उडीद आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत उडदाचा बाजार कसा राहील? उडदाच्या दरातील तेजी टिकेल का?  Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the urad market. urad sowing in the country is lagging by 6 percent compared to last year. Rains also damage...

Cotton Market: तुरीच्या दराने ओलांडला ८ हजारांचा टप्पा|ॲग्रोवन 08.08.2022

 देशात तुरीची लागवड आतापर्यंत १०.४२ टक्क्यांनी कमी झाली. तर सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. परंतु पुढील काही दिवसांत तुरीची आयात वाढेल. मग या परिस्थितीत तुरिचा बाजार कसा राहील? तुरिचे दर आणखी किती वाढू शकतात? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.  Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the Tur market. Tur sowing lagging by 10.42 pe...

Cotton Market: कापूस वायद्यांत एक ते दोन टक्क्यांची सुधारणा | ॲग्रोवन 06.08.2022

देशातील खरीप लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशातील कापसाखालील क्षेत्र जवळपास ७ टक्क्यांनी वाढले. मात्र तरीही देशातील बाजारांत कापसाचे दर वाढले आहेत. पण लागवड वाढली असताना कापसाचे दर का सुधारले? आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कसे आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Listen today’s #Podcast to know details about the Cotton market. Cotton sowing is 7 percent increased compared...

Turmeric Market: हळदीचे दर वाढण्याची शक्यता|ॲग्रोवन 05.08.2022

 देशात यंदा हळदीची लागवड घटली आहे. अनेक भागांत पीक आता अडीच महिन्यांच झालं. मात्र काही भागात सततच्या पावसाने पिकाला फटका बसत आहे. तर मग या काळात हळदीला काय दर मिळतोय? पावसामुळं पिकाचं कसं नुकसान होत आहे? भविष्यात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  Watch today’s #Shetmarketpodcast to know details about the Turmeric market. Turmeric  sowing completed in th...

Tur Market : बाजारात तुरीची आवक घटल्याने दरात सुधारणा|ॲग्रोवन 04.08.2022

देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आक कमी झाली. मात्र सणांमुळे तूर डाळीला मागणी वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या तुरीचे दर हंगामातील उचांकी पातळीवर आहेत. पण सध्या तुरीला काय दर मिळत आहे? बाजारात आवक कशी होत आहे? आयात तुरीचे दर काय आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the Tur market. Tur arrival in...

Soybean Market: सोयाबीनच्या दरातील वाढ का थांबली? | ॲग्रोवन 03.08.2022

देशात मागील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र मागील दोन दिवासांत दर पुन्हा नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारातील काही कारणांमुळं हे घडल्याचं जाणकार सांगितात. सोयाबीन दर नेमके का वाढले होते? तसेच दर लगेच का नरमले? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.   Listen today’s #Podcast to know details about the Soybean market. Soybean rates in the country were increased in the last few days....

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos