Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Tur Market: सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल | Agrowon 21.01.2023

देशातील तूर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. तसंच मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य आहे. सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. मात्र हे दर पुढील काळात  टिकतील का ? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: देशातील जिरा उत्पादन घटल्यानं दर तेजीत | Agrowon 20.01.2023

यंदा जिरा पिकाला बदलते हवामान आणि अतिथंडीचा फटका बसत आहे. त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यातच जिऱ्याला पुढील काळात निर्यातीसाठी आणि देशात लग्नसराईमुळं उठाव मिळेल. मागील हंगामातील साठाही कमी प्रमाणात शिल्लक आहे. मग या स्थितीत जिऱ्याचे भाव काय राहू शकतात? जिरा यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Tur Market: मागील वर्षी आतबट्ट्याची ठरलेली तूर यंदा आधार देणार | Agrowon 19.01.2023

 यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पण देशातील तूर उत्पादन कमी राहील, हे गृहीत धरुन सरकारने आयात वाढवायला सुरुवात केली आहे. यंदा देशात विक्रमी तूर आयात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीला काय भाव मिळू शकतो? तुरीची सरासरी दरपातळी काय राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Chana Market: हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज | Agrowon 18.01.2023

 देशात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र दर अद्यापही दबावातच आहेत. त्यातच यंदा हरभरा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या हरभऱ्याला किमान दरात उठावही मिळत आहे. तसंच सरकार हमीभावानेही खरेदीत उतरणार आहे. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? हरभरा भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Cotton Market: कापूस बाजारभाव पुन्हा वाढण्याचा अंदाज | Agrowon 17.01.2023

कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही परिणाम होत असतो. कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते. तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव बदलत असतात. मग सध्या सरकीचा भाव काय आहे? सरकी दराचा कापूस बाजाराला आधार मिळतो का? कापूस दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon 16.01.2023

जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा ग्राहक म्हणजे चीन. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळं चीनची सोयबीन आयात कमी राहिली. पण यंदा चीन यंदा सोयाबीन आयात वाढवण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात चीनने किती सोयाबीन आयात केली? चीनची सोयाबीन आयात वाढल्यास बाजारावर काय परिणाम होईल? सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या  पॉडकास्टमधून मिळेल.

महाराष्ट्रात संकरित बियाणे कशी रूजली? | Adoption of Hybrid Seeds in Maharashtra | Agri Unplugged 15.01.2023

 एकेकाळी महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित बियाण्यांना विरोध होता. ७२च्या दुष्काळामुळे हा आकस संपला. आज संकरित बियाण्यांच्या क्षेत्रात आपण मोठी मजल मारली आहे. The Maharashtra Government initially opposed Hybrid seeds. But Hybrid seeds proved very beneficial during drought in 1972. This was the turning point. 

Chana Market: महाराष्ट्रात हरभरा लागवड का वाढली ? | Agrowon 14.01.2023

देशातील बाजारात नवा हरभरा दाखल होत आहे. सध्या हरभरा आवक कमी असली तरी मिळणारे दर हमीभावापेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे हरभरा लागवड घटली आहे. मग सध्या हरभरा लागवड किती कमी झाली? नव्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Tur Market: नव्या तुरीची आवक वाढली का? | Agrowon 13.01.2023

 देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली. मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे. तसेच पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून आयात कमी होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळतील? सध्या नवी तूर काय दरानं विकली जातेय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Chana Market: New Chana has been enter in the market | Agrowon 12.01.2023

देशातील हरभरा उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला. पण या हरभऱ्याला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मग नव्या हरभऱ्याला बाजारात काय दर मिळला? हरभऱ्याची दरपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Wheat Market: Government may sell wheat in the open market | Agrowon 11.01.2023

देशात सध्या गव्हाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार खुल्या बाजारात गहू विकण्याची शक्यता आहे. तसेच पिकाला पोषक हवामान असल्याने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मग याचा गव्हाच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या गव्हाचे दर काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Maize Market: Maize rates are above MSP | Agrowon 10.01.2023

देशात यंदा मक्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर निर्यातीसाठी मागणी चांगली आहे. त्यामुळे दरही टिकून आहेत. सध्या मक्याला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. पण पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून मका निर्यातबंदीसाठी लॉबिंग सुरू आहेत. या स्थितीत पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहील, मक्याचे दर वाढतील का, याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Tur Market: Government may intervene in the tur market if price rose | Agrowon 09.01.2023

देशातील बाजारात पुढील काळात तुरीची आवक वाढणार आहे. देशातील सध्या तुरीला चांगले दर मिळत आहेत.  आयात पडतळ असल्याने म्यानमारमधून तुरीची आयात होऊ शकते. त्यातच सरकारने स्टाॅकिस्टना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तुरीचे दर जास्त वाढल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉड...

Monsoon and its impact on Indian culture and social life | मॉन्सून आणि त्याचा भारतीय संस्कृती व समाजजीवनावर होणारा परिणाम | Agri Unplugged 08.01.2023

पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकऱ्यांकडे असतं. अन्यथा त्याची शेती तोट्यात जाते. शेतकऱ्यांना  मान्सूच्या हवामान प्रणालीची काहीही माहिती नसते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. Farmers hav...

Tur Market : तुरीला यंदा चांगला दर मिळण्याचा अंदाज, Tur may get good price this season | Agrowon 07.01.2023

यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तसेच सरकार दरनियंत्रणासाठी तूर आयातही वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ९ ते १० लाख टन तूर आयात होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मग या काळात तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीची विक्री कशी फायदेशीर ठरेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. .

Chilli Market: देशातील लाल मिरचीचे उत्पादन यंदा घटले? | Agrowon 06.01.2023

देशातील महत्वाच्या मिरची उत्पादक राज्यांमध्ये यंदा पिकाला पावसाचा फटका बसला. त्यामुळे मिरचीचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर सध्या बाजारातील लाल मिरचीची आवक जवळपास ३० टक्क्यांनी घटली. मग सध्या बाजारात लाल मिरीचीला काय दर मिळतोय? मिरचीचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मधून मिळेल.  

Soybean Market : अर्जेंटीना, ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका? | Agrowon 05.01.2023

 आंतरराष्ट्रीय  बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाकडे सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोयाबीनचे दर स्थिर आहेत. ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पानाकडे बाजाराचे विशेष लक्ष का आहे? देशात सोयाबीन बाजार कसा राहिला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉ...

Kabuli Chana Market: काबुली हरभरा उत्पादन यंदा वाढणार का? | Agrowon 04.01.2023

 देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र पुढील काळात निर्यातीसाठी मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर देशातील उत्पादनही यंदा वाढण्याचा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीत सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळत आहे? काबुली हरभऱ्याचे दर पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Soybean Market: Tur arrival decreased in the domestic market | Agrowon 03.01.2023

 देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर आयात वाढूनही सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण मालाला जास्त उठाव असल्याने दरही चांगले आहेत. मग सध्या तुरीला काय दर आहे? यंदा उत्पादन कसं राहील? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. .Listen to today's podcast to know the details. 

Soybean Market : Why are edible oil rates high in India in spite of a downward trend in the international market?| Agrowon 02.01.2023

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक खाद्यतेल उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी झाले. मात्र देशातील दर आजही कायम आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घटल्यानंतरही देशातील दर कमी का झाले नाही? सरकारच्या खाद्यतेल  आयातशुल्क कपातीचा सोयाबीनवर काय परिणाम झाला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

The story of a toilet paper | कागज के फुल | Agri Unplugged 01.01.2023

 रशिया हा संपूर्ण युरोपचा सर्वात मोठा 'टॉयलेट पेपर' पुरवठादार आहे. पण युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर संपूर्ण युरोपभर रशियावर बंदी घालायची लहर दौडतेय. त्यांच्या प्रॉडक्ट्सवर, प्रवाशांवर युरोपमध्ये बंदी घातली जातेय. पाश्चिमात्यांनीच नव्हे तर जगातील इतर देशांनी देखील त्यांचं अनुकरण करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. याचाच भाग म्हणून युरोपियन महासंघाच्या संसदेने रशियातून आयात होणाऱ्या टॉयलेट पेपरवर बंदी...

Maize Market: Maize export may decrease this season | Agrowon 31.12.2022

 देशातील मका उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र देशातील मका वापर वाढणार असल्याचंही सांगितले जात आहे. मात्र सध्या व्यक्त होत असलेल्या अंदाजापेक्षा मका उत्पादन कमीच राहील, असे शेतकरी सांगत आहेत. मग देशात मका उत्पादन किती होईल? निर्यात वाढेल की कमी होईल? मक्याला काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल.   

Chana Market: What is the status of chana sowing in the country? | Agrowon 30.12.2022

 हरभऱ्याला मागील वर्षभर कमी दर मिळाल्यानं शेतकरी हरभऱ्याची लागवड कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, देशातील हरभरा लागवडीचा वेग मागील काही आठवड्यांमध्ये जास्त होता. मात्र चालू आठवड्यात हरभरा लागवडीचा वेग कमी राहिला. मग देशात हरभरा लागवडीचे चित्र कसे राहिले? त्याचा हरभरा बाजारावर काही परिणाम होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Tur Market: Free tur import extended by one year | Agrowon 29.12.2022

 केंद्र सरकारने मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तूर आयातीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे यंदा गेल्यावर्षी एवढी तूर आयात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? तुरीचा भाव काय राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

Urad Market: Urad availability is less in the domestic market | Agrowon 28.12.2022

 यंदाच्या खरिपातील उडदाचे उत्पादन कमी राहीले. त्यातच सध्या बाजारातील उडदाची आवक कमी आहे. तर उडदाला उठाव चांगला मिळतो आहे. फेब्रुवारीपासून म्यानमारमधून उडीद आयात वाढू शकते. मग देशातील उडदाला सध्या काय दर मिळतोय? भविष्यात उडदाला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos