Sakal Media

Shet Market

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

Business

Site do podcast

bingepods.com

Último episódio

15 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Market Rate: कापसाच्या भावात काहीशी नरमाई | Agrowon 31.10.2023

सध्या कापूस आणि सोयाबीनसह महत्वाच्या शेतीमाल बाजारात चढ उतार सुरु आहेत. माल विकताना आपल्याला मालाला नेमका काय भाव मिळतोय? भावावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Market Rate: सोयाबीनची बाजारातील आवक आज कशी झाली? | Agrowon 30.10.2023

आपली सोयाबीन काढणी झालीच असलं किंवा काढणीच्या तयारीत असाल. दुसरीकडं कापसाचीही पहिली वेचणी अनेक ठिकाणी सुरु झाली. ही पीक आता आपल्या घरात यायला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्वाच्या पिकांचा सध्याचा बाजार कसा आहे? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Turmeric Market: हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का? | Agrowon 28.10.2023

दसरा आणि दिवाळीत मसाल्यांना मागणी वाढत असते. हळदीलाही उठाव चांगला असतो. त्यामुळे हळदीचे भाव वाढलेले असतात. पण यंदा हळदीचे भाव ऐन दिवाळीच्या तोंडावरही स्थिर आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? पुढील काळात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभऱ्याचे भाव कमी होतील का? | Agrowon 27.10.2023

तूर, उडीद आणि मुगाच्या दरात वाढ झाल्याचा आधार हरभरा भावालाही मिळत आहे. हरभऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? हरभऱ्याचे भाव आणखी किती दिवस तेजीत राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Masur Market: भारताला मसूरचीही टंचाई भासणार? | Agrowon 26.10.2023

तुरीच्या डाळीचे भआव वाढल्यानंतर देशात मसूरलाही उठाव मिळत असतो. देशात मागील काही महिन्यांपासून मसूरला उठाव वाढत आहे. परिणामी मसूरच्याही भावात सुधारणा झाली आहे. मग सध्या मसूरला काय भाव मिळत आहे? पुढील काळात मसूरचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: बाजारातील टोमॅटो आवक कशी होतेय? | Agrowon 25.10.2023

मागील दोन महिन्यांपासून टोमॅटोचा बाजार उत्पादन खर्चापेक्षा निम्म्यावर आहे. शेतकऱ्यांचा टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला आला आहे. मग टोमॅटोचे भाव कितीवर पोचले? यापुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल

Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 24.10.2023

काबुली हरभऱ्याला मागील काही दिवसांपासून मागणी वाढलेली दिसते. त्यामुळे काबुली हरभऱ्याच्या भावात काहिशी सुधारणाही दिसून आली. मग सध्या काबुली हरभऱ्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowon 23.10.2023

जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. वाढलेल्या भावात जिऱ्याची विक्री वाढल्याने दरातील तेजी नरमली. मग जिऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? पुढील काळात जिऱ्याचे भाव कमी होतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटोची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowon 21.10.2023

शेतकऱ्यांसाठी टोमॅटो उद्यापही तोट्याचाच ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? बाजारातील टोमॅटो आवक कशी होतेय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळद बाजारातील स्थिती काय? | Agrowon 20.10.2023

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती. मग या सर्व परिस्थितीचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या बाजारात हळदीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: तुरीच्या डाळीला उठाव मिळण्याची शक्यता | Agrowon 19.10.2023

केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. मग तुरीला भावाला नेमका कशाचा आधार मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Sugar Market: देशात साखरेला काय भाव मिळतोय? | Agrowon 18.10.2023

देशात सध्या साखरेचे भाव वाढले आहेत. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या भावात तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गेल्या १२ वर्षांमधील उच्चांकी पातळीवर आहेत. सणांच्या काळात देशात साखरेला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मग याचा साखर दरावर काही परिणाम होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Wheat Market: सरकारच्या दबावानंतही गव्हाचे भाव का वाढले? | Agrowon 17.10.2023

सणांच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढत आहेत. सणांमुळे गव्हाला मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतोय. त्यामुळे गव्हाचे भाव काहिसे वाढले. मग सरकारचा दबाव असतानाही गव्हाचे भाव का वाढले? पुढील काळात गव्हाचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Kabuli Chana Market: काबुली हरभरा आणखी भाव खाईल का? | Agrowon 16.10.2023

काबुली हरभऱ्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. दरातील वाढ दिवसेंदिवस आता वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला उठावही चांगला मिळतोय. मग काबुली हरभऱ्याच्या तेजीला कशाचा आधार मिळतोय? दरातील तेजी कमी होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटोचे भाव का वाढत नाहीत? | Agrowon 14.10.2023

टोमॅटोचे बाजारभाव आद्यापही दबावातच आहेत. टोमॅटोची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून आवकही घटलेली दिसते. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? पुढील काळात टोमॅटो बाजाराची दिशा काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या  शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांदा भावावरील दबाव पुढील काळातही कायम राहील का? | Agrowon 13.10.2023

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा झालेली दिसते. पण सध्याची झालेली सुधारणा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या भावापेक्षा कमीच आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Chana Market: हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon 12.10.2023

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशात मागील काही महिन्यांपासून तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. याचा आधार हरभरा दरालाही मिळत आहे. तूर, मूग आणि उडदाच्या भावात तेजी आल्याने हरभराही तेजीत आला. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tur Market: तुरीच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon 11.10.2023

केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. आता आफ्रिकेतून तूर आयात वाढत आहे. मग याचा तूर बाजारावर काय परिणाम होत आहे? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळदीचा बाजार पुन्हा सुधारेल का? | Agrowon 10.10.2023

एकिकडे यंदा देशातील हळद लागवडीत घट झाली. पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झालेला दिसतो. तसेच हळद उत्पादक केंद्रांवर हळदीचा स्टाॅक पडून आहे. मग याचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हळदीचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Tomato Market: टोमॅटोचे भाव सुधारतील की कमीच राहतील? | Agrowon 09.10.2023

टोमॅटो उत्पादकांची कोंडी अद्यापही कायम आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon 07.10.2023

जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. जिऱ्याचे वायदे उच्चांकी ६५ हजार रुपये प्रतिटनांवरून कमी झाले. जिऱ्याचे वायदे ५९ हजार ८८० रुपयांवर होते. मग जिऱ्याचे वायदे कमी का झाले? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याची भावपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Sugar Market: साखरेतील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? | Agrowon 06.10.2023

यंदा जागतिक साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत. यंदा भारत आणि थायलंडमध्येही साखर उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. मग सध्या साखरेला काय भाव मिळतोय? पुढील काळात साखर दराची स्थिती काय राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Onion Market: कांदा बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon 05.10.2023

देशाचे कांदा हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात लिलाव सुरु झाले. पण पहिल्या दिवशी बाजारातील आवक कमीच होती. तर दरही दबावातच दिसले. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Jeera Market: जिऱ्याला उठाव वाढेल का? | Agrowon 04.10.2023

जिऱ्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ झाली. जिऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. मग भावात तेजी आल्यानंतर दर कशामुळे स्थिरावले? जिऱ्याचा बाजार पुढील काळात कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

Turmeric Market: हळद बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon 03.10.2023

गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे भाव तब्बल दुप्पट झाले आहेत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा बाजार स्थिर दिसतो. मग हळदीचे भाव कशामुळे स्थिरावले? हळदीच्या दरात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.

Ouça o podcast Shet Market no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos