Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Cotton Market तेजीत असल्यामुळे लागवड वाढणार? | Agrowon 04.06.2022 5:25
देशात यंदाच्या खरीप हंगामात कापसाची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. यंदा कापसाच्या लागवक्षेत्रात तब्बल १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे.
Wheat Export Ban नंतर १७ लाख टन गव्हाचं काय होणार? | Agrowon 03.06.2022 6:13
केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.
Food inflation रोखण्यात भारतीय शेतकऱ्यांचं योगदान 02.06.2022 6:22
भारतामुळे जगात आधीच वाढलेल्या महागाईत तेल ओतलं गेल्याची टीका होत आहे. पण खरं तर जगातील अन्नमहागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे.
Rainfall Forecast मुळे वीज तुटवड्यावर दिलासा? | IMD | Agrowon 01.06.2022 6:04
देशात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या तुटवड्याची समस्या तीव्र झाली आहे. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजामुळे काही प्रमाणात यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Argentina Wheat Export चालू हंगामात Rate Bullish असूनही घटण्याची शक्यता | Wheat Bajarbhav | ॲग्रोवन 31.05.2022 5:59
जागतिक बाजारात गहू निर्यातीत अर्जेंटीना महत्वाचा देश आहे. त्यातच यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गव्हाची टंचाई असून दर तेजीत आहेत. मात्र दर तेजीत असूनही अर्जेंटीनाची गहू निर्यात यंदा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Ukraine Maize, Wheat उत्पादन उद्दिष्ट गाठण्याचा अंदाज | Ukraine Sowing | ॲग्रोवन 30.05.2022 6:10
युक्रेनमधील वसंत ऋतुतील पेरणी अंतिम टप्प्यात आहे. येथील ३० शेती रशियन सैन्याच्या ताब्यातील क्षेत्रात आहे. तरीही युक्रेनमधील मका आणि गहू उत्पादन यंदा सरकारी उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. येथील उत्पादनाबाबत जाणकारांनी काय अंदाज व्यक्त केला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
इंडोनेशियाने Palm Oil Export Ban काढल्यानंतरही दरवाढ कायम | Palm Oil Bajarbhav | ॲग्रोवन 28.05.2022 6:18
इंडोनेशियाने १९ मे रोजी पामतेल निर्यातबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पामतलेचे दर कमी होईल, असे वाटत होते. मात्र १९ मे पासून २७ मे पर्यंत पामतेलाच्या दरात साडेचार टक्क्यांची वाढ झाली. या दरवाढीचा बाजारावर काय परिणाम होतो आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
युक्रेनमध्ये Spring Season Sowing अंतिम टप्प्यात | Ukraine Sowing | ॲग्रोवन 27.05.2022 6:10
युक्रेनमध्ये युद्धाची धग कायम आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारच्या उद्दिष्टाऐवढी पेरणी केली. युक्रनमध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी १२६ लाख हेक्टरवर पेरा केला. मात्र सूर्यफुल पिकाची लागवड घटली. सूर्यफुलाची पेरणी नेमकी किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Title: देशात Palm Oil Import यंदा 19 Percent ने घटणार |Sugar Export|ॲग्रोवन 26.05.2022 5:59
सध्या पामतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे देशात सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढत आहेत. त्यातच सरकराने सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयातीवरील शुल्क रद्द केले. या परिस्थितीत देशात पामतेल आयात कमी होण्याची शक्यता आहे. पामतेल आयात किती कमी होईल? सोयाबीन तेलाची आयात कशी राहील? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Sugar Export Ban झाल्याच्या बाजारात अफवा | Sugar Export | ॲग्रोवन 25.05.2022 6:21
भारत सरकारने साखर निर्यातबंदी केल्याची बातमी बाजारात पसरल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारने साखर निर्यातबंदी केली नसूर निर्यातीवर मर्यादा आणल्या आहेत. सरकारने नेमका काय निर्णय घेतला? साखर निर्यातीची काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
सरकारकडून 100 Lakh Tonnes Sugar Export ची मर्यादा|Sugar Export|ॲग्रोवन 24.05.2022 6:34
भारतातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले. तर त्यापैकी जवळपास ७१ लाख टनांची निर्यातही झाली आहे. ही निर्यात सरकारच्या अनुदानाशिवाय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी मजबूत आहे. असे असतानाही सरकारने साखर निर्यातीवर १०० लाख टनांची मर्यादा लावली. सरकारने हा निर्णय का घेतला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
सरकारचा Soybean Production Estimate उद्योगाला मान्य नाही | Soybean Production | ॲग्रोवन 23.05.2022 6:44
केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या तिसऱ्या अंदाजात सोयाबीन उत्पादन १३८ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगाला हा अंदाज मान्य नाही. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएलाही सोयाबीन उत्पादन यापेक्षा कमीच असल्याचे म्हटले आहे. मग एसईएच्या मते देशात सोयाबीन उत्पादन किती झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Wheat Stock 20.66 Lakh Tonnes भारतीय बंदरांवर पडून | Wheat on Ports | ॲग्रोवन 21.05.2022 6:31
केंद्र सरकारनं गहू निर्यातबंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गहू बंदरांवर पडून आहे. जाणकारांच्या मते भारतीय बंदरांबवर १६ मे पर्यंत जवळपास २० लाख ६६ हजार टन गहू पडून होता. परंतु यापैकी किती गव्हाला लेटर ऑफ क्रेडिट मिळाले, याची माहिती उपलब्ध नाही. कोणत्या बंदरांवर गव्हाचा किती साठा आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Palm Oil Rate वाढल्याने Soybean Oil Import वाढण्याची शक्यता | Soybean Oil Import |ॲग्रोवन 20.05.2022 6:05
इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठवण्याची निर्णय घेतला. मात्र पामतेलाचे दर तेजीत आले आहेत. त्यामुळे भारतात सोयाबीन तेलाचीची आयात अधिक होण्याची शक्यता आहे. सोयाबीन तेल आयातवाढीमागे आणखी कोणती कारणे आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
North India मध्ये Cotton Sowing 15%ने वाढण्याची शक्यता | Cotton Sowing | ॲग्रोवन 19.05.2022 6:12
चालू हंगामात कापासाला विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे चालू खरिप हंगामात देशात कापूस लागवड वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर भारतातातील हरियाना आणि राजस्थानमध्ये १० ते १५ टक्यांनी कापूस लागवडीत यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मग दराची स्थिती काय राहू शकते? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
युक्रेनमध्ये Sunflower Sowing ३० टक्क्यांनी घटली | Soybean Bajarbhaav | ॲग्रोवन 18.05.2022 5:51
युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणी सुरु आहे. आत्तापर्यंत येथे ७० टक्के पेरा पूर्ण झाला. पण काही भागांत खतांसह इंधानाची टंचाई भासत आहे. तसेच सूर्यफुल आणि सोयाबीनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. याचा काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Cotton Market Rate वाढल्यानं Textile Industry धोक्यात?|Cotton Bajarbhav|ॲग्रोवन 17.05.2022 5:35
चालू हंगामच्या सुरुवातीपासूनच देशात कापसाची साठेबाजी सुरु आहे. बाजारात आणखी ९० लाख गाठी कापसाची आवक व्हायची आहे. असे असताना बाजारात कापसाची मोठी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालावं अशी मागणी कापडे उद्योगाने केली. कापड उद्योगाने सरकारकडे आणखी काय मागण्या केल्या? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Wheat Export Ban मुळे मध्य प्रदेशातील Traders आक्रमक|Wheat Export Ban|ॲग्रोवन 16.05.2022 6:42
केंद्र सरकारने अचानक गहू निर्यातबंदी केल्याने स्थानिक बाजारात दर नरमले. यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान होत आहे. तसेच निर्यातीच्या प्रक्रियेत अडकलेल्या मालामध्ये मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचा माल जास्त आहे. त्यामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले. या निर्णयाचा मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना किती फटका बसू शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Cattle Fodder Production वाढीसाठी हरियाना देणार आर्थिक मदत | Fodder Demand | ॲग्रोवन 14.05.2022 6:28
देशात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर काही राज्यांत गोवंश हत्याबंदीमुळे मोकाट जनावरांसाठी चारा मिळणे दुरापस्त झाले. हरियान सरकारने या जनावरांसाठी गोशाळा बांधल्या. मात्र चारा कमी पडत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने गोशाळांना चारा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १० हजार रुपये मदत जाहिर केली. ही योजना नेमकी काय आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
देशात Record Tur Import मुळे बाजारभाव दबावात | Tur Bajarbhav | ॲग्रोवन 13.05.2022 6:04
सरकारने चालू हंगामात तूर आयातीसाठी पायघड्या घातल्या. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट तूर आयात झाली. या आयातीचा देशातील तूर बाजारभावावर दबाव आला. देशात यंदा किती तूर आयात झाली? महिनानिहाय आयातीची स्थिती काय होती? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
भारतानं Oil Palm Plantation चा अट्टाहास सोडण्याचा सल्ला | Edible Oil Bajarbhav | ॲग्रोवन 12.05.2022 5:39
भारताला गरजेच्या ६५ ते ७० टक्के खाद्यतेल आयात करावी लागते. आयात कमी करण्यासाठी पाम लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र भारताने पाम लागवडीचा अट्टाहास सोडावा. मोहरी आणि सोयाबीनसह इतर तेलबिया पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलास उत्पादन वाढले, असे इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशननं म्हटले आहे. देशाच्या खाद्यतेल आयातीबाबत असोसिएशनने आणखी काय निरिक्षणे नोंदवली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेट...
उत्पादन घटल्यानं Cotton rate मध्ये मोठी वाढ | Cotton Bajarbhav | ॲग्रोवन 11.05.2022 6:19
चालू हंगामात ब्राझील आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले. मात्र चीन आणि भरतात नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन घटले. कापसाच्या दराने ११ वर्षांतील उच्चांक गाठला. मात्र यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे कापूस दरवाढीस कोणते घटक कारणीभूत ठरले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
जगात Food Scarcity to 20 Crore People जाणतेय | Food Scarcity | ॲग्रोवन 10.05.2022 6:23
खाण्यासाठी पुरेशा अन्न मिळत नसलेल्या लोकांची संख्या २०२०-२१ मध्ये सर्वाधिक होती. त्यातच युक्रेन-रशिया युद्धामुळं जगभरातील अन्नसाठ्यावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती आणखीनच भयानक होण्याची शक्यता आहे. जगात किती लोकांना अन्न टंचाई जाणवते? ही समस्या का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Soybean Market Rate चांगले राहिल्याने Sowing वाढेल का? | Soyabean Sowing | ॲग्रोवन 09.05.2022 6:48
चालू हंगामात सोयाबीन जागतिक पातळीवर चांगला दर मिळाला. अद्यापही सोयाबीन दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतासही सर्वंच उत्पादक देशांत सोयाबीन पेरणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील आघाडीच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये चालू हंगामातही पेरणी वाढली होती. पुढील हंगामात येथील परिस्थिती काय राहू शकते? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
IPGA चा Lentil Import वाढीसाठी Argentina कडे पाठपुरावा | Argentian Lentil | ॲग्रोवन 07.05.2022 5:55
देशात कडधान्या आयात वाढल्याचा फटका हरभरा, तूर, मुग आणि उडीद दरालाही बसला. तूर आणि हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. असे असतानाही इंडियन पल्सेस अॅन्ड ग्रेन असोसिएशन अर्जेंटीनाकडून मसूर आयातीसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी असोसिएशन काय करतंय? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.