Vechleli Phule

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Arts MR ↓ 138 episodi

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !! 'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत. H...

Autore

Vechleli Phule

Categoria

Arts

Sito del podcast

shows.acast.com

Ultimo episodio

16 ago 2024

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

माय मराठी - मराठी भाषा गौरव दिन विशेष | Maay Marathi - Marathi Bhasha Gaurav Din Special 23.02.2024

माय मराठी - मराठी भाषा गौरव दिन विशेष आपली मराठी भाषा अमृताहूनही गोड आहे. याबाबत काही शंकाच नाही. संत तुकाराम असोत किंवा कुसुमाग्रज सगळ्यांनीच या बोलीची थोरवी भरभरून गायली आहे. साहित्य, गाणी, गोडी अश्या अनेक बाबतीत मराठीचं कौतुक करावं तितकं थोडं. चला तर करुया गौरव आपल्या मायबोलीचा. 1. मराठी कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा 2. माझी मराठी कवी - वि. म. कुलकर्णी कवितासंग्रह - बाल...

सेल्फ पोर्ट्रेट | Self Portrait 16.02.2024

सेल्फ पोर्ट्रेट आपण साऱ्या जगामध्ये उठून दिसावं म्हणून अतोनात प्रयत्न करत असतो जो तो. कधी ती मेहनत फळाला येते तर कधी साफ आपलं माकड होतं. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील या विचारात आपण हरवून जातो. आपल्याला काय वाटतं याचा विचार पुरेसा नाही होत. तर चला काढुया सेल्फ पोर्ट्रेट कवितेच्या कुंचल्यातून. 1. सेल्फ पोर्ट्रेट कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे 2. सेल्फ पोर्ट्रेट कवी - सौमित्र कवित...

विपश्यना | Vipasyana 09.02.2024

विपश्यना ही गोष्ट आहे जी करणं अवघड पण साध्य झाली तर आयुष्याचा चेहरामोहराच बदलून जातो. स्वतःचा स्वतःशीच संवाद, मग त्यात व्यत्यय आणायला कोणी आणि काहीही नाही. चला तर पाहूया असतं काय हे. 1. विपश्यना आणि यादव खैरनार कवी - सौमित्र कवितासंग्रह - बाऊल 2. विपश्यना कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

प्रश्न | Prashn 02.02.2024

प्रश्न मी काय करू आता पासून मी आयुष्यात कोणती वाट निवडू असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांना रोज पडत असतात. त्यांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करत असतो. कधी ती मिळतात तर कधी नाही. काही प्रश्न तर तसेच राहतात पण आपण पुढे जातो. चला तर मग बघुयात प्रश्न. 1. प्रश्न झाला कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - मृगजळ  2. प्रश्न कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - काळ सरकत राहिला Hosted on Acast. See acast.com...

झेंडावंदन | Zendavandan - Republic Day Special 25.01.2024

झेंडावंदन आज आपला ७५वा प्रजासत्ताक दिन. आपण काळाच्या खूप पुढे आलो आहोत. पण देश म्हणून, देशवासी म्हणून आपण खरंच किती पुढे आलो. ? जितके आपण करू शकलो या भारतभूसाठी तितके केलं? असे अनेक प्रश्न आपल्याला निरुत्तरित करून सोडतात. बघुया कविवर्य काय मार्गदर्शन करतायत. 1. हा देश माझा कवी - सेनापती बापट कवितासंग्रह - बालभारती 2. झेंडावंदन कवी - निरंजन उजगरे कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे Hosted on Acast. S...

देऊळ | Deool 19.01.2024

देऊळ मोठ्या भक्तिभावाने आपण देवळात जातो, प्रार्थना करतो. एक वेगळंच समाधान, शांती आपल्याला मिळते. पण या देवळांचाही एक अनोखा बाजार झालेला आजकाल दिसून येतोय. बघुयात देवळांची व्यथा. 1. देऊळ कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. देवळाच्या गाभाऱ्यात कवी - अरुणा ढेरे कवितासंग्रह - मंत्राक्षर #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता...

तुकोबा | Tukoba 12.01.2024

तुकोबा संत तुकाराम हे व्यक्तिमत्त्व किती मोठं. त्यांनी खूप केलं आणि खूप दिलं. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतं. चला तर बघुया काय म्हणतायत कवी मंडळी. 1. तुकोबा कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास 2. एक पत्र तुकोबांना कवी - वसंत बापट कवितासंग्रह - तेजसी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

संत ज्ञानेश्वर | Sant Dnyaneshwar 05.01.2024

संत ज्ञानेश्वर लहान वयातच मोठ्या मोठ्या पंडितांना चकित करून टाकणाऱ्या, रेड्याच्या मुखी गीता वदवणाऱ्या, गीतेचे सार सर्वसामान्य माणसांसाठी आणणाऱ्या या संताची महती जितकी सांगावी तितकी कमीच. खूप दिलं ,देतायत आणि देतच राहतील. चला तर मग जाऊया ज्ञानबांच्या गावा. १.ज्ञानदेवी माझी  कवी - बा.भ. बोरकर  कवितासंग्रह - कैवल्याचे झाड २. कै. ज्ञानेश्र्वर विठ्ठल कुळकर्णी    कवी - ग्रेस &nb...

नववर्ष : याला तयारी पाहिजे | Nav Varsh : Yala Tayari Pahije 29.12.2023

नववर्ष : याला तयारी पाहिजे २०२४ च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. कोणी पार्टीचे, कोणी फिरायचे, तर कोणी कशाचे मनसुबे रचत आहेत. या वर्षापेक्षा पुढचं वर्ष नक्की चांगलं असेल अशी उमेद उरी बाळगूनच आपण पुढं पाऊल टाकणार आहोत. चला तर मग करूया जल्लोषात स्वागत नववर्षाचे. 1. दोन दिवस कवी - नारायण सुर्वे कवितासंग्रह - सुर्वे 2. त्याला तयारी पाहिजे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - जातक #marathipodcas...

माणूस म्हणजे | Manus Mhanje 22.12.2023

माणूस म्हणजे या पृथ्वीतलावर अधिराज्य गाजवणारा एकमेव घटक म्हणजे माणूस. पण चंद्रपर्यंत भरारी मारूनही आपल्याला खरंच माणूस म्हणजे काय कळलं का हे आजही कोडंच आहे. प्रत्येकाचा अनुभव, व्याख्या निराळीच. चला बघुया सुटतंय का कोडं. 1. माणूस म्हणजे कवी - आरती प्रभू कवितासंग्रह - दिवेलागण 2. माणूस  कवी - राम मोरे कवितासंग्रह - बालभारती #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #ma...

थेंब | Themb 19.12.2023

थेंब एखाद्या थेंबाचे महत्व जेव्हा तो खूप मौल्यवान गोष्टीचा असेल तरच खूप वाटतं. मग भले तो महागड्या अत्तराचा असेल किंवा कुठल्या धातूचा असेल. पण तो एक एक ना थेंब असतो म्हणूनच तर सागर बनतो. प्रत्येक थेंबाचे योगदान हे असतंच. चला तर मग कवितरूपी पावसातून काही थेंब झेलुयात. 1. थेंब  कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2. थेंब कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन Hosted on Acast. See acast.co...

माहेराची वाट | Maherachi Vaat 15.12.2023

माहेराची वाट विवाहित स्त्रिया असोत किंवा कामानिमित्त बाहेर राहणारी मुले मुली असोत ' माहेर ' सगळ्यांनाच लागू पडतं. ते गोड घर, प्रेमळ माणसं, अमूल्य असंख्य आठवणी यांची शिदोरी तर तिथे असतेच. पण एक वेगळाच विसावा मनाला अन् तनाला तिथे मिळतो सगळ्यांना. चला तर मग रमुया परत एकदा माहेरच्या आठवणीत. 1. माहेराची वाट कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंच्या कविता 2. माहेर कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह...

पेपर : चहाचा सोबती | Paper : Chahacha Sobati 12.12.2023

पेपर : चहाचा सोबती सकाळी आपल्या सर्वांच्याच दिवसाची सुरुवात वर्तमानपत्राने होते. तो आपल्या चहा - नाश्त्याचा सोबतीच असतो. घरबसल्या आपण त्याच्यासोबत जगाची सफर करून येतो. कधी उसासे देतो, कधी टाळ्या पिटतो तर कधी नवीन गोष्टी शिकतो. असा हा पेपर कुटुंबातल्या प्रत्येकाचा लाडका असतो पण वेगवेगळ्या कारणांसाठी. चला तर काव्य पक्तींतून बघुया पेपर काय म्हणतोय ते. 1. थेंब  कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह -...

लग्न म्हणजे काय? | Lagna Mhanje Kaay 08.12.2023

लग्न म्हणजे काय? सप्तपदी करून दोन व्यक्ती एकमेकांचा हात हातात धरून जीवनभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. एक अनोख्या मोठ्या प्रवासाला त्यांची सुरुवात होते. खूप मोठा सोहळा केला काय किंवा नाही केला काय हा प्रवास त्या दोघांनाच न डगमगता , एकमेकांना समजून घेऊन पार करायचा असतो. तो जितका सुंदर वाटतो तितकाच तो खडतर असतो. चला तर बघुया हा सोहळा कवितेच्या माध्यमातून. 1. लग्न म्हणजे काय असतं कवी - रोहिणी रण...

सुंदरता | Sundarta 05.12.2023

सुंदरता आकाश, नद्या, झाडं, फुलं, पक्षी असे निसर्गाचे असंख्य घटक सौंदर्य म्हणजे काय हे आपल्याला शिकवत राहतात. सुंदरता पाहणाऱ्याच्या नजरेत असते. एखादं भग्न मंदिरही कोणाला मोहिनी घालू शकतं तर कोणाला प्राजक्ताचा सडाही सुंदर नाही वाटू शकत. नीट पाहिलं तर हे विश्व इतकं सुंदर आहे ना की आपल्या डोळ्याचे नुसते पारणे फिटेल. चला तर बघुया काय काय सुंदर आहे ते. 1. सुंदरता कवी - ना घ देशपांडे कवितासंग्रह - शीळ 2....

प्रार्थना | Prarthana 01.12.2023

प्रार्थना भले काही संकट असो किंवा नसो प्रार्थना आपण कोणत्या न कोणत्या कारणाने करतच असतो. प्रार्थना ही आशा , सकारात्मकता, दिलासा देणारी गोष्ट. एक छोटीसी प्रार्थना पूर्ण चित्रच पालटून टाकते. अवघड परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक वेगळंच बळ मिळतं. चला तर मग करूयात प्रार्थना. 1. प्रार्थना कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - नवा दिवस 2. प्रार्थना कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - छंदोमयी Hosted on Acast. See...

आव्हान माझे | Avhan Majhe 28.11.2023

आव्हान माझे  या जीवनप्रवासात आव्हानं झेलतच पुढचं स्टेशन गाठावं लागतं. कधी आपण आशा सोडून देतो, कधी त्यांच्याशी लढतो. फक्त दृष्टिकोन बदलला की चित्र वेगळंच दिसायला लागतं. चला तर मग दोन हात करूया आव्हानांनसोबत. 1. आव्हान कवी - अशोक थोरात कवितासंग्रह - बालभारती 2. आव्हानशृंग कवी - भा रा तांबे कवितासंग्रह - भा रा तांबे यांची समग्र कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

खोट्या पैश्याचे गाणे | Khotya Paishyache Gane 24.11.2023

खोट्या पैश्याचे गाणे पैसा कमावण्यासाठी आपण सगळेच जीवाची वाताहात करत असतो. ' दाम करी काम ' हे नाकारता तर येणारच नाही. पण या पैश्याच्या हव्यासापायी माणूस काय काय करतो हे तर सांगायलाच नको. चला तर बघुया दामाची कवितरुपी कहाणी. 1. खोट्या पैशाचे गाणे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - धृपद 2. दामायण कवी - रामदास फुटाणे कवितासंग्रह - सफेत टोपी लाल बत्ती Hosted on Acast. See acast.com/privacy for more infor...

आला शिशिर | Aala Shishir 21.11.2023

आला शिशिर हिवाळ्याची सुरुवात या ऋतूपासून होते. स्वेटर, शाली, टोप्या हळूहळू कपाटातून बाहेर येतात. गरम - गरम चहा आपला दिवसभराचा सोबती होऊन जातो. झाडांची पानगळती होते. एक वेगळंच वातावरण तयार होतं. चला तर मग करूया शिशिर ऋतूचं स्वागत कवितेच्या माध्यमातून. 1. शिशिर ऋतुचं गान कवी - वा रा कांत 2. शिशिर कवी - अनिल कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

समुद्र | Samudra 17.11.2023

समुद्र अथांग, निळाशार असा हा सागर. त्याच्या किनारी बसून पाण्याशी खेळणं, उसळत्या लाटा पाहणं, सूर्यास्त पाहणं याची गंमत काही न्यारीच असते. प्रत्येकवेळी आपल्याला त्याची नवी मनोवेधक रूपं बघायला मिळतात. चला तर मग जाऊया दर्याकिनारी कवितेच्या होडीतून. 1. समुद्र कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी.. वगैरे.. 2. सागर कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more i...

लहानपण देगा देवा | Lahanpan Dega Deva 14.11.2023

लहानपण देगा देवा बालपणाचा काळ तो सुखाचा. आईचा मार अन् प्रेम, मित्र - मैत्रिणींसोबत केलेल्या गमती - जमती , शाळेतले प्रसंग अश्या असंख्य सुंदर गोष्टींचा खजाना म्हणजे बालपण. प्रत्येकालाच ते प्रिय असतं. तिथं रमायला आवडतं. चला तर मग जगुयात ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा. 1. बाळ होऊनी कुशीत यावे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - मृदगंध 2. बाळपण कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See aca...

झुळूक | Jhuluk 10.11.2023

झुळूक ती सुंदर, आल्हाददायक झुळूक किती आराम देते आपल्याला. असती छोटीच पण तीच किमया खूप मोठी असते. नुसती सगळीकडे पळत असते. झाडांची पाने हलव, फळं पाड, फुलांना गुदगुल्या कर, पाण्यावर रांगोळी काढ असे उद्योग करत राहते. चला तर मग कवितेची गोड झुळूक घेऊयात. 1. झुळुक कवी - दामोदर अच्युत कारे कवितासंग्रह - बालभारती 2. एक झुळुक कवी - ग. दि. माडगूळकर कवितासंग्रह - पूरिया Hosted on Acast. See acast.com/privacy...

आली दिवाळी | Aali Diwali 07.11.2023

आली दिवाळी सण तेजाचा, प्रकाशाचा. उटण्याची- सुवासिक तेलाची आंघोळ, दिवे - आकाशकंदील - रांगोळीची आरास, खमंग फराळाने भरलेले ताट आणि पोट, कुटुंबासोबतचा गोड वेळ या सगळ्या गोष्टींची बरसात करणार सण कोणाला प्रिय नसेल. परिसरासोबत मनातलाही अंधार दूर करणारा दीपोत्सव. चला तर मग लक्ष दिव्यांची रोषणाई करूयात कवितेच्या माळेसोबत. 1. दीपावली कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला 2. भाऊबीज कवी - सुरेश भट कवितासंग्रह -...

इच्छा | Ichcha 03.11.2023

इच्छा इच्छा - आकांक्षा असतात सर्वांच्याच. म्हणून तर आपण काहीतरी करत राहतो, धडपडतो. या इच्छा आपल्याला मोठं करतात, मार्गदर्शन करतात. काही इच्छा मजेशीर, गोड अन् कधी कधी अवघडही असतात. पण त्या आपण कधी खरोखर तर कधी स्वप्नात जगतो. चला तर जाऊया इच्छांच्या गावा. 1. इच्छा कवी - रवींद्रनाथ टागोर (अनुवाद : पु. ल. देशपांडे) कवितासंग्रह - बालभारती 2. इच्छा मेली कवी - संदीप खरे कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे...

फुलपाखरू | Fulpakhru 31.10.2023

फुलपाखरू रंगीबेरंगी , फुलांवरून एकडून - तिकडे उडणारी ही सुंदर फुलपाखरे. सारेजण ह्यांच्या प्रेमात असतात. ती दिसली की नजर त्यांच्यावरून हटतच नाही. मन प्रसन्न करणारी, जग किती सुंदर आहे हे दाखवणारी , उडत रहा असा संदेश देणारी. चला तर मग मारुया गिरकी यांच्यासोबत. 1. फुलपाखरू कवी - अ ज्ञा पुराणीक कवितासंग्रह - बालभारती 2. फुलपाखरें कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - आनंदऋतू Hosted on Acast. See acast.com...

Ascolta il podcast Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici