Veena World

Aapla Maharashtra

History MR ↓ Epizody: 55

'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून महाराष्ट्राच्या रोमांचक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड - किल्ल्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला जाईल. मग दर गुरुवारी न चुकता ऐका ' आपला महाराष्ट्र ' आणि तुमच्या भटकंतीला द्या नवीन दिशा. Looking to explore the wonders of Maharashtra, India? Tune in to 'Aapla Maharashtra', a podcast series that takes you on a journey through the state's rich history, captivating culture, and breathtak...

Autor

Veena World

Kategorie

History

Web podcastu

www.spreaker.com

Nejnovější epizoda

26. srp 2025

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

मांसाहारी पदार्थ भाग १ - Non Veg Part 1 26.10.2023

महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेची ही अंगत पंगत आपण मांडलेली आहे,या पंगतीमध्ये फक्त शाकाहारीच पदार्थ कसे असतील ? मटण -चिकन आणि मासे यांनाही मराठी पारंपरिक जेवणात खास स्थान आहेच की,त्यामुळे आता पुढच्या दोन भागांमध्ये मिळून आपण महाराष्ट्रातील मांसाहारी पदार्थांचा आढावा घेणार आहोत.मराठी नॉनव्हेज म्हटल्यावर सगळ्यात आधी कोल्हापुरचा पांढरा-तांबडा रस्सा आठवणं स्वाभाविकच आहे.त्याबरोबरच विदर्भातलं सावजी मटन,को...

गोड पदार्थ भाग २ - Goda Padartha Part 2 19.10.2023

अंगत पंगतच्या मागच्या भागात मराठी पारंपरिक गोड पदार्थांची माहिती घ्यायला सुरवात केली होती.पुरणपोळी ही महाराष्ट्रात होळीच्या दिवशी घराघरात केली आणि खाल्ली जातेच.या पुरणपोळीचे तेलपोळी,शेंगापोळी असे प्रकारही केले जातात.तर संक्रांतीला गुळाची पोळी हा महाराष्ट्राचा नियमच.याबरोबरच खिरीचे वेगवेगळे प्रकार,साखर भात,नारळी भात आणि दिवाळीच्या फराळाती अनरसे- चिरोटे असे खास मराठमोळे पदार्थ ... थोडक्यात महाराष्ट्...

गोड पदार्थ भाग १ - Goad Padarth Part 1 12.10.2023

महाराष्ट्रातील जेवणाचं वर्णन ‘झणझणीत’ याच विशेषणानं केलं जात असलं तरी महाराष्ट्रातील लोकांना गोड पदार्थांचीही तेव्हढीच आवड आहे.त्यामुळेच तर इथे प्रत्येक सणाचं पक्वान्न ठरलेलं असतं.मराठी पारंपरिक स्वीट डिश म्हटल्यावर सर्वात आधी आठवतात ते उकडीचे मोदक.कोकणाखेरीज महाराष्ट्राच्या अन्य काही भागांमध्ये केले जाणारे तळणीचे मोदक ही तितकेच खमंग असतात.त्या जोडीला श्रीखंड,आम्रखंड,बासुंदी हे गोड पदार्थ आहेतच. म...

उपवासाचे पदार्थ - Upvasache Padarth 05.10.2023

मराठी पदार्थांमध्ये उपवासाच्या पदार्थांना विशेष स्थान आहे,कारण दर महिन्यातल्या एकादशी आणि चतुर्थी पासून ते महाशिवरात्र - आषाढी एकादशीपर्यंत अनेक उपवास भक्तिभावाने केले जातात. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी आणि वरीचे तांदूळ हे पदार्थ तर घरोघरी होतातच पण लाल भोपळ्याचं थालिपिठ,वरीच्या तांदुळाची इडली, राजगिऱ्याच्या पिठाचे उपासाचे बटाटे वडे असे अनोखे पदार्थही उपवासासाठीच केले जातात. तर मग दर गुरुवारी नक्क...

भाताचे प्रकार - Bhatache Prakar 28.09.2023

तांदूळ आपल्या भारतात सगळीकडेच उपलब्ध असतात,त्यामुळे काश्मीर ते केरळ सगळीकडे जेवणात तांदुळाचा भात पाहायला आणि खायला मिळतो. आपल्या महाराष्ट्रात तर आंबेमोहोर, जिरेसाळ, बासमती, इंद्रायणी, घनसाळ, दुबराज असे तांदुळाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, मग साहजिकच भाताचे वेगवेगळे प्रकार पानात येणारच ना ? लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, नागपूरची खासियत असलेला वडा भात, डाळिंबी भात, कैरीचा भात, जिवाला गार करणारा दही...

खमंग-चटकदार पदार्थ - Khamang Chatakdar Padarth 21.09.2023

चारी ठाव जेवण केलं तरीही काही खमंग-चटकदार पदार्थ म्हणजे ज्यांना आजकालच्या भाषेत इव्हिनिंग स्नॅक्स म्हटलं जातं ते समोर आले की चव घेतल्याशिवाय राहावतच नाही,असे खास मराठमोळे पदार्थ कोणते? बटाटा वडा आणि कांदा भजीचे अवतार भारताच्या इतर राज्यताही आढळतात पण कोथिंबीर वडी,अळूवडी,मटार करंजी असे खास मराठी पदार्थ आहेत की. शिवाय तिखट मिठाच्या पुऱ्या,कोबीचे भानवले,मेथीची मुटकुळी असे पदार्थही आहेत. तर मग दर गुरु...

पिठलं भाकरी - Pithla Bhakri 14.09.2023

मराठमोळ्या जेवणाचा अविभाज्य भाग म्हणजे भाकरी. त्यात या भाकरीला पिठल्याची जोड मिळाली की पंचपक्वान्नेही फिकी वाटू लागतात. पण भाकरीचे जसे प्रकार आहेत म्हणजे तांदुळाची,ज्वारीची,नाचणीची तसेच पिठल्याचे ही अनेक प्रकार आहेत. आता साताऱ्याचा ‘म्हाद्या’ आणि खानदेशातला ‘मिरच्यांचा झुणका ’ हे पिठल्याचेच भाउबंद कसे ? दहिदूधाचं ही पिठलं असतं? झुणका,बेसन,कोरड्यास अशी वेगवेगळी नावे का पडली असावीत? तर मग दर गुरुवार...

न्याहारी - Nyahari 07.09.2023

दिवसाची सुरवात ज्या न्याहारीपासून केली जाते तो ‘न्याहारी’ हा शब्दच आला कुठून? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे मुंबई-नागपूर-कोकण-सावंतवाडी अशा ठिकाणी न्याहारी म्हणजे ब्रेकफास्टला केले जाणारे पारंपरिक मराठी पदार्थ कोणते ? पानगी आणि घावणे यात काय फरक आहे ? उकड पेंडी हा कुठल्या भागातला पारंपरिक पदार्थ आहे ? थालिपीठ ही महाराष्ट्राची सिग्नेचर ब्रेकफास्ट डिश सगळ्यांना का आवडते ? या सगळ्या गो...

अंगत पंगत - Angat Pangat 31.08.2023

महाराष्ट्राच्या चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपरंपरेची ओळख करुन देणारी मालिका म्हणजे ‘अंगत पंगत’.कोकणातल्या कुळथाच्या पिठल्यापासून ते नागपुरी वडाभातापर्यंत आणि विदर्भातल्या सांबार वडीपासून ते कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्या रश्श्यापर्यंत कधी झणझणीत तर कधी चटकदार चवींची अंगत पंगतच महाराष्ट्राच्या गावागावात पाहायला मिळते. कोकण, विदर्भ,मराठवाडा,खानदेश,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र अशा प्रत्येक विभागाच...

परांडा किल्ला - Paranda Fort 27.07.2023

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात बुलंद भुईकोट मानला जातो.या किल्ल्याच्या संरक्षणासाठी भोवती भला मोठा खंदक आणि एकात एक अशी दुहेरी तटबंदी अशी रचना आहे.या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे बहुमजली अष्टकोनी विहीर.परांडा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला मह...

सरसगड - Sarasgad 20.07.2023

श्री बल्लाळेश्वराच्या पाली गावाचा पाठीराखा म्हणजे ‘सरसगड’.आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे याला ‘पगडीचा किल्ला’ असेही म्हणतात. मुंबईपासून फक्त दोन-अडीच तासांच्या अंतरावर असलेला सरसगड म्हणजे विकेंड ट्रेकसाठी उत्तम ठिकाण.सरसगडची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग...

हतगड किल्ला - Hatgad Fort 13.07.2023

महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवरचा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे 'हतगड'. यादव काळापासूनचा इतिहास लाभलेला हा किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. बालपणातील सातमाळ रांगेचा आरंभबिंदू असलेला हातगड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा मानबिंदूच. हतगड किल्ल्याची सगळी माहिती मिळविण्यासाठी हा एपिसोड संपूर्ण ऐकावा. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात...

सालोटा किल्ला - Salota Fort 06.07.2023

साल्हेर किल्ल्याचा जोड किल्ला म्हणजे ‘सालोटा’. हा किल्ला बागलाण मधील सालबरी रांगेत येतो. डोंगरमाथ्याला लागून कातळात खोदलेली सालोटा किल्ल्याची वाट अगदी थरारक आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ल्याचा रक्षक म्हणून सालोट्याचं महत्व काही वेगळं आहे. सालोटा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात...

साल्हेर किल्ला - Salher Fort 30.06.2023

महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आणि तो म्हणजे ‘साल्हेर ’. सहा घाटांचा हेर म्हणून याचं नाव साल्हेर.याच किल्ल्यावरुन भगवान परशुरामांनी बाण मारून सागर मागे हटवला होता अशी पुराणकथा आहे. साल्हेरच्या रणसंग्रामामध्ये मराठ्यांनी मोगलांचा धुव्वा उडवला आणि मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्चस्व मान्य केलं.साल्हेर किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अव...

धोडप किल्ला - Dhodap Fort 22.06.2023

नैसर्गिकरित्या शिवलिंगाचा आकार मिळालेला आणि आकाराने अजस्र किल्ला म्हणजे नाशिक जिल्ह्यातील धोडपचा किल्ला.पेशवाईत याच किल्ल्याच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी आपल्या काकांचं राघोबादादांचं बंड मोडून काढलं होतं.४८९२ फूटांची उंची लाभलेला घोडपचा किल्ला चढाईला सोपा नाही पण सह्याद्रीच्या रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च किल्ला म्हणून घोडपचे महत्व आहे.धोडप किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉ...

हरिहर किल्ला - Harihar Fort 15.06.2023

नाशिक जवळच्या त्र्यंबक डोंगर रांगेतील हरिहर किल्ला म्हणजे अनोख्या स्थापत्य रचनेचं उत्कृष्ट उदाहरणच. गोंडा घाटातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यादव काळात उभारलेला हरिहर किल्ला आज ट्रेकर्सचे आकर्षण ठरला आहे तो इथल्या कातळात खोदलेल्या अनोख्या पायऱ्यांमुळे. हरिहर किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडका...

रामशेज किल्ला - Ramshej Fort 08.06.2023

मर्द मराठ्यांच्या मर्दुमकीचं दर्शन घडवणारा किल्ला म्हणजे नाशिक जवळचा रामशेज किल्ला. गिरीदुर्ग प्रकारातील ह्या किल्ल्याचा संदर्भ रामायणात आढळतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात फक्त सहाशे मावळ्यांनी तब्बल सहा वर्षे हा किल्ला झुंजवला होता. रामशेज किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम...

मुरुड जंजिरा - Murud Janjira 01.06.2023

गेली ५०० वर्षे आपल्या बुलंद तटबंदीमुळे आणि अजोड रचनेमुळे अजिंक्य राहिलेला जलदुर्ग म्हणजे कोकणातील जंजिरा. मुरुड गावाजवळच्या बेटावरचा हा किल्ला आज त्याच्या इतिहासामुळे आणि मजबूत बांधकामामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. मजबूत बुरुज आणि त्यावरील ऐतिहासीक तोफा यामुळे हा किल्ला लक्षात राहातो. मुरुड-जंजिऱ्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्...

नळदुर्ग - Naldurg 25.05.2023

एका नदीला आपल्या विस्तारात सामावून घेणारा अनोखा किल्ला म्हणजे सोलापूरजवळचा नळदुर्ग. चालुक्य,बहमनी,आदिलशाही,मोगल,निजाम,मराठे,इंग्रज अशा अनेक राजवटी अनुभवणाऱ्या या किल्ल्यामध्ये आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्या घराण्यात एक शाही विवाह झाला होता. नळदुर्गातील अनेक बुरुजांच्या अनोख्या रचना पाहायला पर्यटक गर्दी करतात. नळदुर्ग किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की...

सोलापुरचा भुईकोट - Solapur Bhuikot Fort 11.05.2023

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा जपत गेली ५६० वर्षे उभा असलेला किल्ला म्हणजे सोलापूरचा भुईकोट. इतिहासकाळातील आदिलशाही आणि निजामशाही राजवटींच्या सरहद्दीवरचा हा किल्ला,आजही त्याच्या दुहेरी भक्कम तटबंदीमुळे लक्ष वेधून घेतो. सुशोभिकरणातून उभारलेल्या उद्यानामुळे या किल्ल्याची शोभा वाढली आहे. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐका...

कोर्लई किल्ला - Korlai Fort 05.05.2023

१६ व्या शतकात ‘रॉक ऑफ चौल’ या ठिकाणी पोर्तुगिजांनी बांधलेला किल्ला म्हणजे ‘कोर्लई किल्ला.’ कुंडलिका नदीच्या खाडीच्या तोंडावरचा हा किल्ला इतिहासात ‘बुऱ्हाण दुर्ग’ म्हणूनही ओळखला जात असे.या भागावरच्या पोर्तुगिज राजवटीचा ठसा इथल्या ‘नॉ लिंग’या भाषेतून पाहायला मिळतो. कोर्लई किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची प...

कुलाबा किल्ला - Kulaba Fort 27.04.2023

मराठ्यांच्या आरमारी सामर्थ्याचे प्रतिक म्हणजे अलिबाग जवळचा जलदुर्ग कुलाबा. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरवात केली आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तो बांधून पूर्ण केला.फक्त चिऱ्यांवर चिरे रचून तीनशे वर्षांपूर्वी उभारलेली कुलाबा किल्ल्याची अभेद्य तटबंदी पाहताना आश्चर्य वाटते.जलदुर्ग कुलाबा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की...

रतनगड - Ratangad 20.04.2023

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ च्या शेजारी असलेला आणि पुराणकथांच वलय लाभलेला किल्ला म्हणजे ‘रतनगड’. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या काठावरचा हा किल्ला प्रसिध्द आहे तो इथल्या ‘नेढ्या’साठी. रतनगड किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्...

शिवनेरी - Shivneri 13.04.2023

प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान बिंदू म्हणजे जुन्नर जवळचा ‘शिवनेरी’ किल्ला.याच किल्ल्यावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.नाणेघाटाचा रक्षक असलेला हा किल्ला आज तमाम मराठी लोकांसाठी ‘शिवतीर्थ’ ठरला आहे. शिवनेरी किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका, ज्यात तुम्हाला महाराष्ट्रा...

वासोटा - Vasota 06.04.2023

शिलाहारकाळापासूनचा इतिहास लाभलेला वनदुर्ग म्हणजे ‘वासोटा’.सातारा जिल्ह्यातील कोयना-महाबळेश्वर डोंगरारांगेतील,छत्रपतीं शिवाजी महाराजांनी ‘व्याघ्रदुर्ग’ म्हणून नावाजलेला हा किल्ला म्हणजे सह्याद्रीचे रत्नच.शिवसागर जलाशयातील जलसफर आणि किल्ल्याच्या घेऱ्यातील वन सफर यामुळे वासोट्याची भेट संस्मरणिय होते.वासोटा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आप...

Poslouchej podcast Aapla Maharashtra v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály